
• खासदार - ठाणे लोकसभा मतदारसंघ • महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, प्रवक्ता शिवसेना • शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख • माजी महापौर, ठाणे #ShivSena
Thane
Joined May 2014
- Tweets11.5K
- Following103
- Followers12.7K
- Likes994
मेंटल हॉस्पिटल परिसरातील ओम साई सेवा मंडळाच्या वतीने साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंडळाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाविकांची मोठी उपस्थिती, साईनामाचा गजर आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.
दिवसभरातील विविध कार्यक्रमांमुळे या सोहळ्याला पोहोचण्यासाठी मला रात्री उशीर झाला. पण, इतक्या उशिरापर्यंत माझी वाट पाहत मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून थांबले होते. त्यांच्या या आपुलकीने आणि प्रेमाने मन भारावून गेलं. यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि साईभक्तांचे मनःपूर्वक आभार.
#NareshMhaske #SaiBaba #SaiBabaTempleAnniversary #OmSaiSevaMandal #Mahaprasad
5
193
केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.श्री. प्रतापराव जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य लाभो ही मनापासून सदिच्छा.
#NareshMhaske #PratapraoJadhav #HappyBirthday #BirthdayWishes #MinistryOfAYUSH
1
7
187
संविधान म्हणजे केवळ नियमांचं पुस्तक नाही, तर प्रत्येक भारतीयाला समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा आपल्या लोकशाहीचा भक्कम आधार आहे.
याच संविधानाचं महत्त्व, त्यातील मूल्यं आणि नागरिकांचे अधिकार यांची जाणीव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत गावदेवी मैदान, ठाणे येथे 'संविधान महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून संविधानाविषयी जाणून घेण्याची आणि त्यातील मूल्यांप्रति आपली बांधिलकी व्यक्त करण्याची एक उत्तम संधी आपल्याला मिळत आहे.
तरी सर्व ठाणेकर नागरिकांनी या संविधान महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी आणि संविधानाप्रति असलेला आपला आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करावा, ही नम्र विनंती.
#NareshMhaske #SamvidhanMahotsav #IndianConstitution #ConstitutionalValues #ThaneMunicipalCorporation
नवी मुंबई येथे खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या समवेत उपस्थित राहून सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेत नवी मुंबईतील तब्बल ४८ संघांनी सहभाग घेतला. खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे संपूर्ण स्पर्धेला विशेष रंगत आली.
नवी मुंबईत अशा भव्य क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे विशेष आभार मानले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही देखील यावेळी खासदार साहेबांनी दिली. तसेच या स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांनी अनिकेत म्हात्रे आणि संपूर्ण युवासेना टीम व शहर प्रमुख चेतन पाटील आणि जयदीप यांचं विशेष कौतुक.
यावेळी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शितलताई कचरे, सरोजताई पाटील, नवी मुंबई शिवसेना गटनेते मनोज हळदणकर, ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील, शहरप्रमुख विजय माने, जगदीश गवते, अविनाश लाड, राजू पाटील, गगनदीप कोहली इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#NareshMhaske #DrShrikantShinde #KhasdarKridaSangram #BoxCricketFinal #NaviMumbai
4
180
खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत खारेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धेला आणि कळवा येथे आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेला आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत भेट दिली. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच या स्पर्धांचं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक केलं.
खारेगाव येथे पार पडलेल्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेला शरीरसौष्ठवप्रेमी आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या, शिस्तीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर सादर केलेली शरीरसौष्ठवाची प्रात्यक्षिकं विशेष लक्षवेधी ठरली. तर कळवा येथील बॉक्स क्रिकेट स्पर्धेतही खेळाडूंचा उत्साह आणि क्रीडाप्रेमींचा सहभाग पाहायला मिळाला.
खासदार क्रीडा संग्रामाच्या माध्यमातून विविध खेळांना व्यासपीठ उपलब्ध होत असून स्थानिक खेळाडूंमधील गुणवत्ता आणि क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळत आहे. अशा स्पर्धांमुळे तरुणाईमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासोबतच खिलाडूवृत्ती, शिस्त आणि संघभावनाही रुजण्यास मदत होत आहे.
यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार रवींद्र फाटक, स्थानिक नगरसेवक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
NareshMhaske #KhasdarKridaSangram #BodybuildingCompetition #BoxCricket #Kharegaon
2
86
खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत ठाणे लोकसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कॅरम, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला.
खासदार क्रीडा संग्रामाला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून विविध खेळांमधून तरुणांना आपलं कौशल्य दाखवण्याची आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळत आहे. यावेळी सहभागी सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच या स्पर्धांचं उत्कृष्ट नियोजन आणि आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं विशेष कौतुक केलं.
यावेळी मला बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा टेबल टेनिस खेळण्याचा आनंद घेता आला. शाळेत असताना टेबल टेनिस खेळण्याची विशेष आवड होती. त्या जुन्या दिवसांच्या, मित्रांसोबत खेळलेल्या सामन्यांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. काही आवडी अशा असतात की काळ कितीही पुढे गेला तरी त्यांचा आनंद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी कायम मनात घर करून राहतात.
यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
#NareshMhaske #KhasdarKridaSangram #Thane #SportsFestival #TableTennis
2
114
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला समृद्धीची दिशा देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#NareshMhaske #YashwantraoChavan #DeathAnniversary #Maharashtra #RememberingYashwantraoChavan
1
85
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या संकल्पनेतून गावदेवी मैदान येथे तीन दिवसीय संविधान महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून संविधानाविषयी जनजागृती करण्यासोबतच विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे १०० बाय १०० फुटांची भव्य रांगोळी. या रांगोळीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
भारताची विविध भाषा, संस्कृती, धर्म आणि परंपरा यांना एका समान धाग्यात बांधून ठेवण्याचं काम आपलं भारतीय संविधान करतं. देशातील सर्व कायदे, सरकार आणि विविध संस्थांना संविधानाच्या चौकटीत राहूनच कार्य करावं लागतं. कोणताही कायदा हा संविधानाच्या विरोधात असू शकत नाही. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध संरक्षण तसेच आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार दिला आहे. हे अधिकार आणि संविधानाचं महत्त्व केवळ आजच्या पिढीलाच नव्हे, तर येणाऱ्या नव्या पिढीलाही समजलं पाहिजे. समाजातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घटनात्मक हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव झाली पाहिजे, असे उद्गार मी संविधान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
संविधान हा केवळ एका पुस्तकातील मजकूर नसून तो आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आणि प्रत्येक भारतीयाच्या अधिकारांचं संरक्षण करणारा मार्गदर्शक आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये आपल्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजेत. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या संकल्पनेचं तसेच ठाणे महानगरपालिकेने या महोत्सवाच्या आयोजनासाठी घेतलेल्या पुढाकाराचं मी मनापासून कौतुक केलं.
यावेळी माझ्यासह प्रभाग समितीचे अध्यक्ष, नगरसेवक संजय वाघुले, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्यासह विविध मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
#NareshMhaske #SamvidhanMahotsav #IndianConstitution #DrBabasahebAmbedkar
3
110
मानवतेचा, प्रेमाचा, बंधुभावाचा आणि समानतेचा संदेश संपूर्ण जगाला देणारे शीख धर्माचे संस्थापक, थोर संत गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त घोडबंदर येथील गुरुद्वाराला भेट देऊन गुरुनानक देवजींचं दर्शन घेतलं आणि त्यांना विनम्र अभिवादन केलं.
गुरुनानक देवजींनी दिलेली 'एक ओंकार, सर्व मानव एकसमान' ही शिकवण आजही समाजाला एकतेचा, सेवाभावाचा आणि माणुसकीचा मार्ग दाखवते.
यावेळी गुरुद्वारा समितीच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला यासाठी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आणि सर्व शीख बांधवांना गुरुपर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी माझ्यासमवेत श्री. प्रवीणजी नागरे आणि सर्व शीख बांधव उपस्थित होते.
#NareshMhaske #GuruNanakJayanti #Gurpurab #GuruNanakDevJi #UnityAndEquality
4
131
खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथील सचिन तेंडुलकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाठीकाठी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला आणि सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लाठीकाठी हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि शिवकालीन परंपरेचा वारसा जपणारा पारंपरिक युद्धकला प्रकार आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तरुणाईला आपल्या पारंपरिक खेळांची ओळख व्हावी आणि अशा खेळांना योग्य व्यासपीठ मिळावं, या उद्देशाने खासदार क्रीडा संग्राममध्ये लाठीकाठी स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
विशेषतः आजच्या काळात मुलींना आणि महिलांना लाठीकाठीसारख्या पारंपरिक स्वसंरक्षण कलांचं प्रशिक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर आत्मविश्वास, धैर्य आणि संकटाच्या वेळी स्वतःचं संरक्षण करण्याची क्षमता या प्रशिक्षणातून विकसित होतं. महिलांवरील छेडछाड आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वसंरक्षणाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. त्यामुळे अशा प्रशिक्षणाचा लाभ अधिकाधिक मुली आणि महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी विभागा-विभागांमध्ये लाठीकाठी प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करण्यात यावं, अशी सूचना यावेळी केली.
आपली पारंपरिक युद्धकला केवळ स्पर्धांपुरती मर्यादित न राहता प्रत्येक विभागात शिकवली जावी आणि नव्या पिढीने या कलेचा वारसा पुढे न्यावा, हीच अपेक्षा
यावेळी माझ्यासह अभिनेते अरुण कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के ,अनिल भोर , कांचन चिंदरकर, यज्ञा भोईर, राकेश शिंदे, वर्षा शेलार, शीतल ढमाले, निता घोगरे ,सरिता ठाकूर,राजा जाधवर , रामचंद्र गुरव, यज्ञेश भोईर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
#NareshMhaske #KhasdarKridaSangram #LathiKathi #TraditionalMartialArts #WomenSelfDefence
3
97
नाचू कीर्तनाचे रंगी,
ज्ञानदीप लावू जगी...
लोकसत्ता… लोकमान्य, लोकशक्ती!
#NareshMhaske #Kirtan #Loksatta #LoksattaLitFest #LiteraryFestival
2
83
खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत ठाणे शहरात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून टीप टॉप येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेला तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आयोजित कॅरम स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो एकाग्रता, संयम, चिकाटी आणि खिलाडूवृत्ती विकसित करणारा महत्त्वाचा माध्यम आहे. बुद्धिबळासारखा बुद्धिमत्तेचा खेळ असो किंवा कॅरमसारखा कौशल्य आणि अचूकतेची कसोटी पाहणारा खेळ असो, प्रत्येक खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावं, हीच अपेक्षा आहे.
या स्पर्धांचं उत्कृष्ट नियोजन करून त्या यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व आयोजकांचं विशेष कौतुक केलं. बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी होण्याकरता नगरसेविका नम्रता भोसले, शिवसेना लोकसभा सचिव बाळा गवस यांनी तर कॅरम स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्रभाग समिती अध्यक्ष मीनल संख्ये तसेच नगरसेवक राजेंद्र फाटक, तानाजी पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी आमदार रवींद्र फाटक, सभागृह नेते हणमंत जगदाळे, पवन कदम, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, शाखाप्रमुख तानाजी पाटील यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
#NareshMhaske #KhasdarKridaSangram #ChessCompetition #CarromCompetition
ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक तसेच आमचे मित्र श्री. मनोज शिंदे यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं आहे.
यावेळी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच जनसेवेचं हे कार्य असेच अविरत सुरू राहो, त्यांच्या हातून समाजहिताची अनेक विधायक कामं घडोत आणि त्यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी मनोज शिंदे यांचे वडिल आणि श्रीनगर वसाहतीचे संस्थापक श्री. तुकाराम शिंदे यांची सुद्धा भेट झाली. त्यांच्याशी सुद्धा मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले.
@shindemanojt
#NareshMhaske #ManojShinde #BirthdayWishes #Thane #SocialService
खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील खारकर आळी येथे आयोजित करण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या समवेत सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांनी पुढाकार घेतला असून, स्थानिक खेळाडूंना आपलं क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक केलं, तसेच मैदानावर आपला खेळ आणि जिद्द दाखवणाऱ्या सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, यावेळी आम्ही देखील काही वेळ मैदानात उतरून बॉक्स क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आणि खेळाडूंसोबत खेळातील उत्साह अनुभवला.
यावेळी शिवसेनेचे गटनेते पवन कदम, आमदार रवींद्र फाटक, नगरसेवक योगेश जानकर, विकास रेपाळे, शहरप्रमुख हेमंत पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@DrSEShinde @Shivsenaofc
#nareshmhaske #ShrikantShinde #KhasdarKridaSangram #shivsena
6
195
खासदार क्रीडासंग्राम सीझन २
@drshrikantshinde @shivsenaofc
#nareshmhaske #ShrikantShinde #KhasdarKridaSangram #shivsena #thane









































































































