Maha Forest Official (@MahaForest) header
Maha Forest Official (@MahaForest) profile picture

This is the official X handle of Maharashtra Forest Department. Call 1926 - 'Hello Forest' toll free helpline.

Maharashtra, India
Joined October 2015
Photo by Maha Forest Official (@MahaForest)Photo by Maha Forest Official (@MahaForest)Photo by Maha Forest Official (@MahaForest)Photo by Maha Forest Official (@MahaForest)Photo by Maha Forest Official (@MahaForest)Photo by Maha Forest Official (@MahaForest)Photo by Maha Forest Official (@MahaForest)Photo by Maha Forest Official (@MahaForest)Photo by Maha Forest Official (@MahaForest)Photo by Maha Forest Official (@MahaForest)
वन्यजीव गुन्हे नियंत्रणासाठी आंतरविभागीय समन्वय बैठक पुणे येथे संपन्न #WildlifeProtection #WCCB #MaharashtraForest #Pune #वन्यजीवसंरक्षण #महाराष्ट्रवनविभाग
1
103
वनातील अमूल्य ठेवा — जांभूळ नदीकाठी व वनक्षेत्रात आढळणारे सदाहरित, दीर्घायुषी झाड वन्यजीवांसाठी आहार स्रोत असून मृद संवर्धन व प्रदूषण नियंत्रणात महत्त्वाचे आहे. वनवृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया. #जांभूळ #वृक्षसंवर्धन #MahaForest
1
4
1
10
455
Maha Forest Official retweeted
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding various issues of the Forest Department. Minister Ganesh Naik, MoS Adv. Ashish Jaiswal and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक. यावेळी मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में वन विभाग के विभिन्न प्रश्नों के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕑 1.50pm | 17-11-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.५० वा. | १७-११-२०२६📍मंत्रालय, मुंबई. @Dev_Fadnavis @NaikSpeaks @Ashishjaisw3Adv #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
42
295
1
391
23,372
निसर्गातील प्रेम, निष्ठा आणि सहजीवनाचे प्रतीक — सारस क्रौंच विदर्भातील पाणथळ जागा, लांब पाय, व तांबड्या रंगाची मान व डोके असणारा हा पक्षी ताडोबा परिसरातील जैवविविधतेतही अत्यंत महत्त्वाचा आहे. 🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह #सारसक्रौंच #पक्षीसंवर्धन
🤖 Made with AI
2
3
334
आकाशातील दुर्मीळ सम्राट — राजगिधाड काळसर शरीर, लाल रंगाचे उघडे डोके व मान आणि मजबूत चोच असलेला हा अत्यंत मोठा आणि शक्तिशाली पक्षी विदर्भ आणि मध्य भारतातील जंगलात व खुल्या प्रदेशात आढळतो. 🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह #राजगिधाड #पक्षीसंवर्धन
1
3
2
185
पांढऱ्या पाठीचे गिधाड विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर जंगलांमध्ये आढळणारे हे गिधाड मृत प्राण्यांचे मांस खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. यांच्या कार्यामुळे मृत जनावरांमधून पसरणाऱ्या रोगांचा धोका टळतो. 🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह
3
7
444
नदीच्या वाळूवर घरटे करणारा आकर्षक पक्षी — पाणाचिरी मोठ्या नद्या व वाळूच्या पट्ट्यांवर आढळणारा हा काळा-पांढरा आकर्षक पक्षी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. 🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह #पाणाचिरी #पक्षीसंवर्धन #IndianSkimmer #MahaForest
🤖 Made with AI
3
1
12
488
गवताळ प्रदेशातील निसर्गाचा नर्तक — तणमोर सोलापूर व दख्खनच्या पठारी भागात आढळणारा हा जगातील सर्वात आकर्षक प्रणयप्रदर्शन करणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. 🗓️ पक्षी सप्ताह: ५-१२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह #तणमोर #LesserFlorican #BirdWeek
🤖 Made with AI
1
4
10
514
चला या दीपावलीला वृक्ष संवर्धनाची ज्योत सर्वत्र प्रज्वलित करूया. शुभ दीपावली #शुभ_दीपावली
1
3
9
520
शंभर वर्षांनंतर पुन्हा सापडलेला मध्य भारतातील स्थानिक प्रजाती असलेला — रानपिंगळा तब्बल ११३ वर्षे नामशेष मानला गेलेला हा दुर्मिळ घुबडवर्गीय पक्षी १९९७ मध्ये पुन्हा शोध लागल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जंगले व मेळघातात आढळतो. पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर
🤖 Made with AI
6
1
15
579
गवताळ प्रदेशाचा दुर्मिळ सम्राट — माळढोक लांब पाय, मजबूत शरीर आणि डोक्यावर काळा मुकुट असलेला हा देखणा पक्षी आपल्या गवताळ प्रदेशाचा गौरव आहे. सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांतील माळराने हा या दुर्मिळ पक्ष्याचा ऐतिहासिक अधिवास आहे. 🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर
🤖 Made with AI
1
3
337
वसुबारस ऐवजी साजरी होते 'वाघबारस', दिवाळीतील परंपरा, निसर्ग आणि वन्यजीवांच्या सहअस्तित्वाचा अनोखा उत्सव. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील ही अनोखी परंपरा निसर्ग, पशुधन आणि वन्यजीवांमधील सलोख्याचे सहअस्तित्व सुंदर पद्धतीने दर्शवते. #वाघबारस #वसुबारस #वन्यजीवसंरक्षण
2
2
1
5
390
हिरव्या वनराईचा हिरवा मानकरी — महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवास व खाद्यस्रोत जतन करण्याचा आणि स्थानिक फळझाडांचे संवर्धन करण्याचा दृढ संकल्प करूया पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह #हरियाल
🤖 Made with AI
2
3
5
442
वनातील अमूल्य ठेवा — आवळा (Phyllanthus emblica) वनातील अमूल्य ठेवा मानवी आरोग्यासोबतच माती संवर्धन व कार्बन शोषणात महत्त्वाची भूमिका बजावतो. जंगलांमधील गुणकारी वृक्ष आपल्या निसर्गाचा आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा आधार आहे. #MahaForest #Amla #TreePlantation #Ayurveda #SaveNature
1
1
4
299
Maha Forest Official retweeted
कोल्हापूर वन विभागाने गेल्या वीस दिवसांत लोकसहभागातून वनक्षेत्रात ४५० वनराई बंधारे उभारले असून, त्यामुळे सुमारे तीन कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. एक हजार बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंवर्धनाचे विविध उपाय करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या उपक्रमाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती तसेच वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभाच्या दिवशी करण्यात आली. या अभियानातून जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश पोहोचवण्यात आला. या अभियानात ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. वनक्षेत्रात वनराई बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी, भूजल पातळी वाढण्यास तसेच परिसरातील विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास हातभार लागतो. तसेच, पाण्याचा प्रवाह नियंत्रित होऊन मातीची धूप कमी करण्यास आणि मृदसंधारणाचे कार्य साध्य करण्यास मदत होते. जंगलामध्ये वन्यप्राण्यांसाठी पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज जंगलातच भागविण्यास मदत होते, असे श्री. पाटील यांनी सांगितले. #वनराईबंधारे #वनविभाग
3
2
1,997
सामाजिक जबाबदारी फंडातून सहकार्यातून निसर्ग संवर्धनाचे कार्य महाराष्ट्रात होत आहे. वनविभागाने विकास व पर्यावरण समतोल एकाच वेळी साध्य करत वनक्षेत्र वाढण्याबरोबरच विकासात्मक कामांनाही गती दिली आहे. #महाराष्ट्र #निसर्ग #संवर्धन #वनविभाग #विकास #पर्यावरण #समतोल #वनक्षेत्र
8
3
1
11
651
Maha Forest Official retweeted
कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र व नवीन विस्तारित तानसा वन्यजीव राखीव क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता १४ संवर्धन राखीव क्षेत्रांनाही मान्यता #वनक्षेत्र #MahaDGIPR
7
7
2,374
वन विभागामार्फत तालुक्यातील तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण शेतात अथवा घर अंगणात आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नका. बिबट्यापासून सावध रहा, मानव बिबट संघर्ष कमी करूया. "सावध रहा - सुरक्षित रहा." #Forest #वनविभाग #बिबट्या #सावधान
2
24
26
19,172
Maha Forest Official retweeted
गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्रास वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात तसेच तानसा वन्यजीव अभयारण्य क्षेत्राजवळील नवीन विस्तारित तानसा वन्यजीव अभयारण्यास वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील १४ संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावांना मान्यताही यावेळी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची २६ वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वन मंत्री गणेश नाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच वन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, मंडळाचे सदस्य तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्यासह मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांचे गाभा, बफर व अधिसूचित पर्यावरण संवेदनशील क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून अधिसूचित करणे, मानव-वन्यजीव संघर्षाला नैसर्गिक आपत्ती घोषित करणे आणि व्याघ्र प्रकल्पांच्या बफर क्षेत्रातील इच्छुक गावांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करणे या प्रस्तावांवरही बैठकीत चर्चा झाली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी, विद्यमान नुकसानभरपाई व्यवस्था आणि वन विभागाचे अधिकार यांची सुसंगती तपासून पुढील कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अभयारण्य म्हणून घोषित झालेली; मात्र अद्याप प्रादेशिक वन विभाग किंवा वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापनाखाली असलेली क्षेत्रे वन्यजीव शाखेकडे देण्याबाबत कर्मचारी समायोजन, प्रतिनियुक्ती आणि रिक्त पदांचा अभ्यास करून एका महिन्यात निर्णयासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. @Dev_Fadnavis @NaikSpeaks #वन्यजीव #अभयारण्य
6
5
2,301
महाराष्ट्र वन विभागामार्फत सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येत आहे. मागील २ ते ३ दिवसांपासून भीमाशंकर अभयारण्यामध्ये एका कंपनीच्या प्रकल्पासाठी अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या बातम्या सोशल मीडिया व विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारीत झालेल्या आहेत.
332
198
93
724
81,780
परंतु भीमाशंकर अभयारण्यामध्ये कंपनीच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड सुरू नाही. तरी याबाबतची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.
30
2
7
58
16,159