Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) header
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) profile picture

Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

India
Joined August 2013
Photo by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks)Photo by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks)Photo by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks)Photo by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks)Photo by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks)Photo by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks)Photo by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks)Photo by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks)Photo by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks)Photo by Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks)
गोकुळच्या संदर्भात लढाई करण्यापेक्षा किंवा न्यायालयात जाण्यापेक्षा, सरकारने समंजसपणा दाखवून चर्चेतून मार्ग काढला असता, तर ते अधिक योग्य ठरले असते.
2
517
शक्तिपीठ महामार्गाविरोधात जनआंदोलन उभे राहिले आहे. मला वाटते, महाराष्ट्र सरकारने याची अतिशय संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने दखल घेऊन विचार करावा.
1
4
373
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweeted
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श घालून देणारं त्यांचं कार्य आणि पुरोगामी विचार सदैव प्रेरणा देत राहतील...!
6
55
882
12,622
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweeted
आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षा भयंकर असून शेतकरी, शेतमजूर पूर्णतः उध्वस्त झाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था देखील संकटात आली आहे, तसेच याचा फटका शहरी अर्थव्यवस्थेला देखील बसत आहे. या गंभीर दुष्काळी संकटाचा विषय केंद्रस्थानी ठेवून उपाययोजना करणे हीच सर्वांची प्राथमिकता असायला हवी. शेतकरी-शेतमजूरांच्या प्रमुख १४ मागण्यांसाठी शेतकरी व शेतमजुर यांच्या साथीने न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. आपण शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कांसाठी आयोजित न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चाच्या मागण्यांवर चर्चा करण्याची तयारी दाखवली, त्याबद्दल आपले आभार. आपण आज दुष्काळ निवारण उपसमितीची बैठक आयोजित केली आहे. आम्ही या बैठकीला उपस्थित राहावे किंवा लेखी निवेदन देण्याबाबत आपली प्रतिक्रिया माध्यमांमध्ये बघितली. या बैठकीबाबत आपल्या कार्यालयाकडून अधिकृत निमंत्रण नसले तरी या बैठकीची पूर्वकल्पना जरी असती, तरी देखील मी नक्कीच या बैठकीला उपस्थित राहिलो असतो. परंतु सद्यःस्थितीला मुंबईबाहेर असल्याने, या पत्राच्या माध्यमातून आपल्याकडे शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या मागण्या पोहोचवत आहे. सदरील पत्र इमेलच्या माध्यमातून तसेच आपल्या कार्यालयाला प्रत्यक्ष इनवर्ड केलेले आहे. सरकारने या मागण्या जशाच्या तशा मान्य केल्यास मोर्चाची देखील गरज राहणार नाही. आपण सदरील मागण्यांवर नक्कीच ठोस व सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय व त्यांच्या हक्काची मदत देण्याची भूमिका घ्याल, ही अपेक्षा आहे. सरकारने सदरील मागण्या मान्य न केल्यास न्यायहक्क मोर्चा नियोजित तारखेनुसार पार तर पाडूच, शिवाय सरकारलादेखील शेतकरी व शेतमजुरांना मदत देण्यास भाग पाडू.
1
9
89
3,573
ज्या धोरणनिर्मितीसाठी जनतेने मला निवडून दिले आहे, त्याबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत, याची खंत वाटते.
440
पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महासंसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांनी आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावर जाऊन त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. त्यांच्या पत्रकार परिषदेत मांडलेले ठळक मुद्दे...
3
1
11
724
स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करताना त्यांनी केवळ तत्कालीन गरजांचा विचार केला नाही, तर भविष्यातील राज्याची पायाभरणी करण्यावर भर दिला. सहकार चळवळ, कृषी विकास, शिक्षणाचा प्रसार आणि औद्योगिक प्रगती यांना चालना देताना समाजातील सामान्य माणूस हा विकासाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे, ही भूमिका त्यांच्या कार्यातून दिसून आली. राजकारणात विचारांची स्पष्टता असावी; मात्र संवादाची दारे कायम खुली असावीत, हा त्यांचा दृष्टिकोन आजही महत्त्वाचा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतींना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
2
5
17
681
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweeted
आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांत आलेल्या या बातम्या... १) दर्यापूरमध्ये नापिकीला कंटाळून कापूस उत्पादक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. २) मेहकरमध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्याने पाणीटंचाईमुळे चार वर्षे पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेली फळबाग जेसीबीने भुईसपाट केली. ३) राजस्थानमधून २,००० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या मेंढपाळांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अकोटमध्ये रोखून त्यांच्या मेंढ्या परत पाठवण्यात आल्या... या केवळ बातम्या नाहीत, तर दुष्काळाची विदारकता दाखवणारी वस्तुस्थिती आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची हीच व्यथा आणि वस्तुस्थिती मांडण्यासाठी न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा आहे. सरकारने तत्काळ हेक्टरी १ लाख रुपये मदत, शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत, कर्जमाफी, मायक्रो फायनान्सची सक्तीची वसुली बंद करणे, चारा छावण्या, पीकविमा, धानाचा बोनस यांसह सर्व मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, ही विनंती! #न्याय_हक्क_ट्रॅक्टर_मोर्चा #बळीराजा #कोरडा_दुष्काळ #दुष्काळग्रस्त_शेतकरी
2
17
130
4,951
"कोयनेचं पाणी मुंबईसाठी वळवताना सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त, पाणी टंचाई असणाऱ्या भागांवर अन्याय होऊ देऊ नका.", अशी आग्रही भूमिका प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री माननीय श्री. शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना मांडली.
1
2
4
751
आपत्तीच्या वेळी उपाययोजना आखताना सरकारकडून महिलांचा दृष्टिकोन विचारात घेणे आवश्यक आहे
1
3
642
सरकारकडून महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
1
2
540
सरकारकडे मोठमोठ्या इव्हेंटसाठी कोट्यवधी रुपये, पण शेतकऱ्यांसाठी अवघे पाच हजार!
1
1
1
530
कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांचा संवाद वाढल्यास अनेक समस्या सोडवता येऊ शकतात.
1
2
535
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी भवन, सातारा येथे पार पडली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना माजी खासदार मा. फौजिया खान यांनी मांडलेले ठळक मुद्दे...
1
8
1,013
सरकारकडे निवडणुकांसाठी पैसा आणि वेळ आहे; मात्र दुष्काळाचे नियोजन करण्यासाठी ना वेळ आहे, ना पुरेशी तरतूद!
1
4
565
महाराष्ट्रातील वाड्या-वस्त्यांवरील मुलींचे शिक्षण आर्थिक तरतुदीअभावी बंद पडत आहे.
1
2
517
बाळ रडल्याशिवाय आई दूध देत नाही; त्याचप्रमाणे आपण प्रश्न मांडल्याशिवाय सरकार उत्तर देणार नाही!
2
3
10
715
कौटुंबिक अन्यायाला बळी पडणाऱ्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची पक्ष संघटना कटिबद्ध आहे.
1
1
511
या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पक्षाची संघटना खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभी राहील.
1
2
513
जर अन्नधान्य आणि जनावरांचा चारा गरजूंपर्यंत पोहोचला नाही, तर पक्षाच्या महिला आघाडीकडून सरकारला बांगड्यांचा आहेर !
1
1
4
541