अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेची कारवाई!
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोड तसेच हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मंत्रा सोसायटी व केशवनगर परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सुमारे २४,५०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच अनधिकृत व्यावसायिक स्टॉल, हातगाड्या, पत्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. हडपसर-मांजरी परिसरातून विविध व्यावसायिक साहित्य आणि सुमारे १० ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
#PMCPune #PuneMunicipalCorporation #EncroachmentRemoval #Pune
पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना!
१९ नोव्हेंबरपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#PuneUpdates #WaterSupply #WaterCut #WaterConservation #SaveWater #WaterManagement
पुणे महानगरपालिका करआकारणी व करसंकलन विभागात घोटाळा या करण्यात आलेल्या आरोपांबाबत तसेच येत असलेल्या बातम्यांबाबतचा खुलासा
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#PuneMunicipalCorporation #PMC #PMCPropertyTax #TaxAssessment #TaxCollectionDepartment #PropertyTax #OfficialClarification #AdministrativeClarification #Transparency #PublicAccountability #PuneNews #PuneUpdates
स्वच्छता व विकासकामांना गती देण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करण्याच्या मा. महापालिका आयुक्तांच्या सूचना
परिमंडळ क्र. १ अंतर्गत तीनही क्षेत्रीय कार्यालयांच्या विविध कामकाजाचा आढावा
पुणे महानगरपालिकेच्या मा. महापालिका आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली परिमंडळ क्र. १ अंतर्गत तीनही क्षेत्रीय कार्यालयांच्या विविध कामकाजाबाबत सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता मा. प्रभाग समिती हॉल, दुसरा मजला, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीमध्ये मा. महापालिका आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांनी शहरातील झाडण कामकाज तसेच विविध विकासकामांच्या निविदांबाबत सविस्तर आढावा घेतला. पुणे शहर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी मिशन मोडमध्ये काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी, आरोग्य कोठ्यांमध्ये विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, क्रॉनिक स्पॉट निरस्त करणे, CTPT टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे तसेच झोपडपट्टी भागातील कचरा १०० टक्के संकलित करण्याबाबत मा. महापालिका आयुक्तांनी विस्तृत सूचना दिल्या.
पदपथांच्या कामांमध्ये क्षेत्रीय कार्यालय व पथ विभागाकडून एकाच ठिकाणी दुबार काम होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रस्ता दुरुस्तीच्या कामांमध्ये SOP चा अवलंब करण्याबाबत निर्देश देण्यात आले. नवीन अभियंत्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
सर्व प्रलंबित निविदा पुढील १५ दिवसांत प्रकाशित करण्याबाबत मा. महापालिका आयुक्तांनी निर्देश दिले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करून नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्यासाठी प्रोत्साहित केले.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#CleanPune #SwachhPune #MissionMode #SwachhBharat #UrbanDevelopment #RoadDevelopment #WasteManagement #SolidWasteManagement #PublicHealth #CivicDevelopment #PuneSmartCity #GoodGovernance #PMCUpdates #NawalKishoreRam
@SwachSurvekshan @SwachhBharatGov @majhivasundhara
नगर रोड–वाघोली क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आज विश्रांतवाडी येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान सार्वजनिक रस्ते व पादचारी मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना सुरक्षित व मोकळे रस्ते उपलब्ध व्हावेत तसेच सार्वजनिक जागांचे संरक्षण व्हावे, यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने करण्यात येत आहे.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#Vishrantwadi #NagarRoad #Wagholi #EncroachmentRemoval #AntiEncroachmentDrive #RoadSafety #TrafficManagement #PublicSpace #CleanPune #SmartPune #PuneCity #PMCAction
पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग व सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत बाणेर-बालेवाडी येथील ‘उमंग ऑटिझम सेंटर अँड सेन्सरी पार्क’ येथे दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर यांनी भेट देऊन केंद्रातील विविध उपक्रमांची पाहणी केली.
यावेळी ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अँड लँग्वेज थेरपी, स्पेशल एज्युकेशन, बिहेवियर थेरपी, सेन्सरी रूम, वैद्यकीय तपासणी, समुपदेशन तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी लवकर निदान व हस्तक्षेप यांसारख्या सुविधांची माहिती जाणून घेतली.
तसेच केंद्रात उपस्थित पालक व लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, अनुभव आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
याप्रसंगी मुख्य समाज विकास अधिकारी श्री. रामदास चव्हाण, सहाय्यक समाज विकास अधिकारी श्री. राजेंद्र मोरे, समाजसेवक श्री. संदीप कांबळे व समूह संघटिका श्रीमती क्रांती जाधव उपस्थित होते.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#SocialDevelopmentDepartment #UmangAutismCentre #UmangSensoryPark #AutismAwareness #AutismSupport #DivyangWelfare #SpecialChildren #EarlyIntervention #ChildDevelopment #OccupationalTherapy #SpeechTherapy #SpecialEducation #InclusiveSociety #InclusiveEducation #BaleWadi #Baner #DivyangEmpowerment
@MahaDGIPR
बाहेर पडताना एकदा मागे वळून पाहा
दिवे, पंखे, एसी बंद आहेत ना? छोटीशी काळजी, मोठी ऊर्जा बचत!
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#ऊर्जाबचत #वीजबचत #ऊर्जासंवर्धन #जबाबदारनागरिक #हरितपुणे #SaveEnergy #Electricity #greenenergy #PMCCare #PuneCity @majhivasundhara
1
1
3,067
PMC Care retweeted
महत्त्वाची सूचना!
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यानिमित्त १५ व १६ नोव्हेंबर रोजी शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
गैरसोय टाळण्यासाठी कृपया वरील पोस्टमधील सविस्तर माहिती पाहून पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#BirsaMunda #BirsaMundaJayanti #15November #TribalFreedomFighter #TribalPride #JanjatiyaGauravDiwas #JanjatiyaGaurav #IndianFreedomFighter
महत्त्वाची सूचना!
पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागांतर्गत येणाऱ्या सांस्कृतिक केंद्रे व नाट्यगृहांच्या चौमाही आरक्षण वाटपासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व्यक्ती व संस्थांनी निर्धारित कालावधीत आपले अर्ज सादर करावेत.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#CulturalDepartment #CulturalCentre #Theatre #NatyaGriha #BalGandharvaRangMandir #TheatreBooking #ReservationNotice #QuarterlyReservation #CulturalEvents #PuneEvents #PuneArtists
@MahaDGIPR
भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या कामाची राज्याचे मा. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे.
स्मारकामध्ये ऑडिओ-व्हिडिओ शो, होलोग्राफी, माहितीपट अशा आधुनिक तंत्रज्ञानाधारित सुविधांसोबतच मुली व महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, ग्रंथालय, मार्गदर्शन केंद्र, संगणक केंद्र आणि ॲम्फीथिएटर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यावेळी मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाचे जतन आणि ज्ञानप्रसाराला चालना देणारे हे स्मारक पुणे शहराच्या ऐतिहासिक व सामाजिक वारशात महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#PuneMunicipalCorporation #PMC #BhideWada #SavitribaiPhule #MahatmaPhule #Pune
2
3
2,290
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाला मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#LahujiSalveJayanti #Jayanti #Tribute #RespectfulTribute #IndianFreedomFighter
1,498
स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#JawaharlalNehru #jayanti #ChildrensDay2026 #BalDiwas #Tribute
1
6
1,546
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#LahujiSalveJayanti #Jayanti #Tribute #RespectfulTribute #IndianFreedomFighter
बाल दिन
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#JawaharlalNehru #ChildrensDay #ChildrensDay2026 #BalDiwas #Tribute #RespectfulTribute #PMCCARE #ChildrenAreTheFuture #HappyChildrensDay #jaynti
पुणे ग्रँड टूर २०२७च्या पार्श्वभूमीवर पॅकेज वन अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश
पुणे ग्रँड टूर २०२७च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पायाभूत सुविधा व रस्ते विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी आज पॅकेज वन अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, पथ विभागाचे अधिकारी तसेच पीएमआरडीए, मेट्रो, PITCMRL, MSEDCL आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच कामाचे ठेकेदार मे. गणेश कन्स्ट्रक्शन आणि तज्ज्ञ सल्लागार पेवटेक कंपनीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बाणेर रस्ता – यशदा ते गणराज चौक तसेच खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्याच्या कामांची पाहणी करण्यात आली. सुरू असलेले डांबरीकरण, चेंबर उचलण्याचे काम, फुटपाथ निर्मिती तसेच इतर आवश्यक कामांचा आढावा घेण्यात आला.
मेट्रोच्या पिलरचे रंगकाम करण्याबाबत मा. आयुक्तांनी यावेळी निर्देश दिले. तसेच कामाचा वेग वाढवून फुटपाथ व अन्य प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. मेट्रोखालील रस्ता दुभाजक एका रेषेत आणण्याबाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या.
तसेच ब्रेमेन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खडकी रेल्वे स्टेशन ते एबीआयएल आणि गणेशखिंड रस्ता या मार्गादरम्यान सुरू असलेल्या डांबरीकरण, फुटपाथ निर्मिती व अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचीही पाहणी करण्यात आली. पुणे ग्रँड टूर २०२७च्या पार्श्वभूमीवर सर्व कामे निर्धारित वेळेत, गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्देश यावेळी देण्यात आले.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#PuneGrandTour #InfrastructureDevelopment #PuneDevelopment #RoadDevelopment #UrbanDevelopment
@CMOMaharashtra @PMOIndia

























































