हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
‘तोरणडोंगरी एक्सप्रेस’ दिलीप गावित! आपल्या मातीचा आणि संपूर्ण आदिवासी समाजाचा अभिमान! 🏅🇮🇳
तोरणाई गाव विकास समिती, तोरणडोंगरी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागरिक सत्कार सोहळा, विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि आद्य क्रांतिकारकांच्या संयुक्त जयंती सोहळ्याला उपस्थित राहण्याचा आनंद लाभला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्स तसेच आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देशाचा गौरव वाढवणारे धावपटू श्री. दिलीप महादू गावित आणि त्यांचे प्रशिक्षक मा. वैजनाथ काळे सर यांची संपूर्ण गावातून पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी दिलीप गावित यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करताना, ज्याप्रमाणे कविता राऊत यांना ‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून ओळखले जाते, त्याचप्रमाणे दिलीप गावित यांना ‘तोरणडोंगरी एक्सप्रेस’ म्हणून ओळखले जावे, अशी भावना व्यक्त केली.
दिलीपच्या यशामागे त्यांचे आई-वडील, शिक्षक आणि विशेषतः प्रशिक्षक वैजनाथ काळे सर यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांच्या समर्पणाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आणि क्षमता आहे. त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जागतिक स्तरावर निश्चितच यश संपादन करू शकतात.
यावेळी विविध सामाजिक संघटनेचे तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हॊते. माजी आमदार जे पी गावीत, खासदार भास्कर भगरे,आमदार नितीन पवार, आमदार मंजुळाताई गावित,एन डी गावीत, इंद्रजित गावीत, ऍड दत्तू पाडवी, गिरीष गावीत, मोहन गांगुर्डे, विनायक गावीत, के के (तात्या ) गांगुर्डे, सुभाष चौधरी, रतन चौधरी, काशिनाथ बागुल, विजय पवार, रमेश साबळे, नामदेव ठाकरे, मंगलदास गवळी, उलगुलान शिक्षक संघटना पदाधिकारी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयराम गावीत यांनी तर सूत्रसंचालन परशराम पाडवी यांनी केलं.
दिलीप गावित यांना पुढील ऑलिम्पिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या यशाची भरारी अशीच उंचावत राहो!
#तोरणडोंगरीएक्सप्रेस #दिलीपगावित #सुवर्णपदक #महाराष्ट्र
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
मराठी साहित्यविश्वाला विनोदाची अनोखी श्रीमंती बहाल करणारे आणि महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असामी’ आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’ यांसारख्या अजरामर कलाकृतींतून त्यांनी सामान्य माणसाच्या आयुष्यातील गंमतीजमती अत्यंत मार्मिकपणे उलगडल्या.
त्यांचे लेखन आजही वाचकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवते आणि नकळत अंतर्मुखही करते.
#पु_ल_देशपांडे
#PLDeshpande
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
ज्येष्ठ प्रकाशक आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांच्या निधनाने एक अनुभवी आणि साहित्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रकाशन व्यवसायाकडे केवळ व्यावसायिक उपक्रम म्हणून न पाहता त्याकडे साहित्य संवर्धनाचे माध्यम म्हणून पाहणाऱ्या अनिल मेहता यांच्या दृष्टिकोनातून मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठी प्रकाशन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. मराठी वाचकांना साहित्याची नवनवी दालने खुली करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अनिल मेहता यांनी आयुष्यभर केले. मराठी पुस्तकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व प्रकाशन क्षेत्रातील त्यांची समर्पित कारकीर्द सदैव स्मरणात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
नरक चतुर्दशीचा हा पवित्र सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो. आपल्या शेतात कष्टाने सोनं पिकवणाऱ्या बळीराजाच्या जीवनात भरभराट येवो, शेतकऱ्यांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळो आणि प्रत्येक सामान्य नागरिकाच्या घरात सुख-समाधान व आनंद नांदो.
अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय साजरा करणारा हा दीपोत्सव सर्वांच्या जीवनात नवी आशा आणि ऊर्जा घेऊन येवो!
सर्वांना नरक चतुर्दशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔✨
@mahancpspeaks @SunetraA_Pawar @SunilTatkare
#नरकचतुर्दशी #NarakChaturdashi #DiwaliCelebration #deepawali #दीपोत्सव #शेतकरीबांधव #बळीराजा #शेतकऱ्यांचेसुखसमृद्धी #सर्वसामान्यजनता #सुखसमृद्धी #महाराष्ट्र
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
आपले सर्वांचे प्रेरणास्थान लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांनी थेट जनसंवादातून जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचा, ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा संस्कार आम्हाला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात, ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनात हा संस्कार पुढे नेण्यासाठी, थेट संवादाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज गीताबाग, सुतारवाडी येथे "जनता संवाद" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जनता संवादाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधला. सर्वांचे प्रश्न व अडीअडचणी जाणून घेत बहुतांश प्रश्न तातडीने मार्गी लावले. उर्वरित काही प्रश्नांबाबत संबंधित शासकीय कार्यालयांसोबत समन्वय साधून प्रश्न सोडवण्याच्या सूचना माझ्या कार्यालयास दिल्या आहेत.
#raigad #रोहा #जनतासंवाद #ncp #adititatkare
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
On the auspicious occasion of Lakshmi Puja, praying for prosperity, protection and peace for all.
#LakshmiPuja #HappyDeepavali
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
लेखक, नाटककार, अभिनेते, संगीतकार, दिग्दर्शक आणि प्रभावी वक्ते अशा विविध भूमिका समर्थपणे साकारणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
प्रत्येक क्षेत्रात आपल्या सहजसुंदर शैलीने, मिश्किल विनोदाने आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे साहित्य आणि कलात्मक योगदान हा मराठी संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे.
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
मंगल पावलांनी लक्ष्मी यावी,
आपली दिवाळी आनंदमय व्हावी !
दीपावलीचा हा पवित्र उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात नवचैतन्य घेऊन यावा, आपल्या जीवनाचा पुढील प्रवास आनंदमय व्हावा याच सदिच्छा...
आपणांस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
#diwali #लक्ष्मीपूजन #happydiwali
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
#काळी दिवाळी 🥹🥹🙏🙏
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
‘रामन इफेक्ट’ या महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोधाने जागतिक स्तरावर भारतीय विज्ञानाची ओळख उंचावणारे महान शास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेते भारतरत्न सर डॉ. सी. व्ही. रामन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#DrCVRaman
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
नरक चतुर्दशीच्या मंगलपर्वानिमित्त आणि लक्ष्मीपूजनाच्या पावन दिवशी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारी दीपावली सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#Diwali2026
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
सर्वांना नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा!
सौख्य, मांगल्य आणि समृद्धीचा मंगलमय संगम म्हणजे लक्ष्मीपूजनाचं पावन पर्व. ह्या मंगलमय समयी आपल्या जीवनातील आरोग्यसंपदा व धनसंपदेचा आलेख सदैव वृद्धिंगत व्हावा आणि दीपावलीच्या तेजोमय प्रकाशात अंध:काररूपी विघ्नं, अडी-अडचणी व नकारात्मकता नष्ट व्हावी, हीच सदिच्छा!
#लक्ष्मी_पूजन
#LaxmiPujan
#नरकचतुर्दशी
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
Wishing everyone a bright and prosperous Diwali! May this illuminating occasion bring you joy, abundance of good times and prosperity.
#HappyDiwali2026 #ShubhDeepawali
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
अभ्यंगस्नानाची मंगल पहाट, घराघरांत उजळणाऱ्या पणत्या, रांगोळ्यांची मनमोहक सजावट आणि लक्ष्मीपूजनाचा भक्तिमय सोहळा… नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आसमंत आनंद, उत्साह आणि चैतन्याने उजळून निघतो.
या दीपोत्सवाचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो. प्रत्येकाच्या मनात नवी उमेद आणि सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित होवो!
नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyDiwali
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
📍 भरणेवाडी | बियाणे व महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरण
भरणेवाडी येथील निवासस्थानी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान योजनेंतर्गत रब्बी हंगामातील ज्वारीचे ८०० मिनी किट तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत हरभऱ्याचे २४ मिनी किट यांचे बियाणे वितरण माझ्या उपस्थितीत संपन्न झाले.
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी । सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥
दिपावलीचे हे मंगल पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृध्दीचा प्रकाश घेऊन येवो... सर्वांना लक्ष्मीपूजन निमित्त मंगलमय शुभेच्छा !
#लक्ष्मीपुजन
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
🪔 लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🪔
#दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा उत्सव!
लक्ष्मीपूजनाच्या या पवित्र पर्वावर प्रत्येकाच्या घरात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो.
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
नरक चतुर्दशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून अन्यायावर न्यायाचा विजय मिळवला.हा दीपोत्सव आपल्या जीवनातील सर्व वाईट शक्तींचा नाश करून, सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.
#नरकचतुर्दशी #शुभदिपावली
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
घराची स्वच्छता, दारासमोरील सुंदर रांगोळी आणि पणत्यांची आरास… अशा मंगलमय वातावरणात लक्ष्मीमातेचे स्वागत करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीचे सौंदर्य जपते. स्वच्छता, सकारात्मकता आणि सौहार्द यांचा संगम असलेल्या घरात आनंदाचे वातावरण फुलते.
प्रत्येकाच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो!
लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना शुभेच्छा!
#LaxmiPujan #Diwali2026
हानुमान सुरेशराव कदम पाटील retweeted
शुभ दीपावली!
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीचा हा मंगलमय सण प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. प्रत्येकाच्या घरात सुख-शांती नांदो, जीवनातील अडचणी दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होवोत, हीच सदिच्छा!
#NarakaChaturdashi #LakshmiPujan #Diwali2026
































