#महात्मा_जोतीराव_फुले :
सामाजिक क्रांतीचा विचार आणि परिवर्तनाचा अखंड वारसा
सविस्तर लेख : mahasamvad.in/221926/
समान नागरी संहितेबाबत आपले मत मांडा !
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी नागरी कायद्यांची एक समान चौकट लागू असावी, असे तुम्हाला वाटते का? महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करण्याबाबत समिती नागरिकांची मते, दृष्टीकोन आणि सूचना मागवत आहे.
#UCC
1
30
तुमचे अभिप्राय ucc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदवा किंवा 15 डिसेंबर 2026 पर्यंत [email protected] या ईमेलवर पाठवा.
@Dev_Fadnavis
#Maharashtra
#DevendraFadnavis
#UniformCivilCode
#UCC
1
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमीन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, २ लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती आता थेट आयकर विभागाला जाणार आहे.
#RevenueDepartment
29
भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर ;
पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस...
#ExamReforms
#MPSC
@MahaDGIPR
22
कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी 'महाज्योती'
#MahatmaPhule200
#महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
29
स्त्री शिक्षणाचा पाया रचत फुले दांपत्याने दिला समतेचा विचार !
#MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
27
बालवयातच रुजणार महात्मा जोतीराव फुले यांचे प्रेरणादायी विचार !
#MahatmaPhule200
#महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
27
"महात्मा ज्योतिबा फुले यांनी दुष्काळ निवारणासाठी मोठे कार्य केले आहे. त्यासाठी शेतकरी व शेतमजुरांच्या त्यांनी संघटना बांधल्या व जागृती केली."
#MahatmaPhule200
#महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
🤖 Made with AI
25
महात्मा जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथात १८८३ साली शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र प्रकाशित केले...
#MahatmaPhule200
#महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
25
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA retweeted
राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी राज्य शासनाचा सहभाग वाढविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय कृतीदलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी चर्चा केली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा, राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) संचालक श्रुती सिंघल आदी उपस्थित होते.
एनटीएमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील परीक्षांसाठी राज्यातील उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करणे, प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक परीक्षा केंद्रांची उपलब्धता, परीक्षा केंद्रांवरील मनुष्यबळाचे प्रशिक्षण तसेच परीक्षा आयोजनासाठी आवश्यक लॉजिस्टिक व्यवस्थापन या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन करताना राज्य शासन आणि परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय संस्थांमध्ये समन्वयाची प्रभावी यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने परीक्षा केंद्रांची उपलब्धता, केंद्रांवरील सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षित परीक्षा वातावरण निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. उपलब्ध शासकीय यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा यासाठी उपयोग करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
परीक्षा प्रक्रियेत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, इंग्रजी भाषेची अडचण असलेल्या तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक सुलभ व्हावी, यासाठी आवश्यक बदल करण्यावर भर देण्यात आला. परीक्षांमधील विश्वासार्हता कायम राखताना गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षित आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी परीक्षेच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार परीक्षा पद्धती निश्चित करणे आणि स्पर्धात्मक व प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, या बाबींचाही आढावा घेण्यात आला.
@Dev_Fadnavis
#एनटीए
#NTA
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA retweeted
अनुपस्थित व स्थलांतरीत मतदारांसाठी शेवटची संधी. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६ कार्यक्रम अंतर्गत नव्याने गणना प्रपत्र (EF) उपलब्ध करून दिले आहेत. या अनुषंगाने, दिनांक २८ व २९ नोव्हेंबर रोजी संबंधित मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे .
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA retweeted
समान नागरी संहितेबाबत आपले मत मांडा!
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी नागरी कायद्यांची एक समान चौकट लागू असावी, असे तुम्हाला वाटते का? महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करण्याबाबत समिती नागरिकांची मते, दृष्टीकोन आणि सूचना मागवत आहे.
तुमचे अभिप्राय ucc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदवा किंवा 15 डिसेंबर 2026 पर्यंत [email protected] या ईमेलवर पाठवा.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #UniformCivilCode #UCC
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA retweeted
पुस्तकांचा परिचय व्हावा तसेच पुस्तकांबद्दलची आवड लोकांमध्ये जागृत रहावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित ‘मुंबई पुस्तक महोत्सवा’स मुंबईकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. या महोत्सवात पुस्तक प्रदर्शनाबरोबरच विविध व्याख्याने, चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. पुस्तकप्रेमी मुंबईकर या महोत्सवास आवर्जुन भेट देतील, याची मला खात्री आहे.- अश्विनी भिडे, आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका
@mybmc
#MumbaiBookFestival
#ReadingCulture
#LoveForBooks
#ReadAndGrow
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA retweeted
📍नवी दिल्ली
शासकीय कार्यालयांमध्ये संगणकावरून व्हॉट्सॲप वेबचा वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविण्याचा धोका भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय #सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर #गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्रावर सायबर गुन्हेगारांनी अनधिकृत ताबा मिळवल्यास संबंधित खात्यातील संदेश वाचणे, वापरकर्त्याच्या नावाने संदेश पाठविणे, संपर्क क्रमांक आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती मिळविणे शक्य होते. अशा प्रवेशाचा वापर करून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख धारण करणे, आर्थिक फसवणूक करणे, फिशिंगद्वारे माहिती मिळविणे तसेच अन्य सायबर गुन्हे घडविण्याचा धोका आहे.
शासकीय कामकाजाशी संबंधित कागदपत्रे, प्रशासकीय माहिती, आर्थिक व्यवहारांचा तपशील, गोपनीय पत्रव्यवहार आणि अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सॲप वेबद्वारे करू नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. कार्यालयीन संगणकावर व्हॉट्सॲप वेबचे लॉगिन कायमस्वरूपी सुरू ठेवू नये. प्रत्येक वापरानंतर खात्यातून लॉगआऊट करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक संगणक, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अविश्वसनीय संगणकांवरून व्हॉट्सॲप वेब वापरणे टाळावे.
व्हॉट्सॲप खात्यावरून आपल्या नकळत संदेश पाठविले जाणे, संपर्क व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्यात अन्य संशयास्पद हालचाली आढळणे, ही संभाव्य सायबर घुसखोरीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा बाबींकडे दुर्लक्ष न करता तातडीने आवश्यक खबरदारी घ्यावी. कार्यालयीन संगणकांची ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउझर आणि सुरक्षा प्रणाली नियमितपणे अद्ययावत ठेवावी. अनोळखी फाइल्स, संशयास्पद डाउनलोड, क्रॅक सॉफ्टवेअर तसेच अविश्वसनीय स्रोतांमधून प्राप्त झालेल्या फाइल्स उघडू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे.
शासकीय माहितीची गोपनीयता, कार्यालयीन पत्रव्यवहाराची सुरक्षितता आणि डिजिटल यंत्रणांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि डिजिटल संवाद साधताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.
#सायबरसुरक्षा
#व्हॉट्सॲपवेब
#WhatsApp
राज्यातील भरती व #स्पर्धापरीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल शासनास सादर केला आहे.
सविस्तर वृत्त - mahasamvad.in/222843/
35
पुढील आठ महिने कोणत्याही #मायक्रोफायनान्स कंपनीने #कर्जवसुली न करण्याचे राज्य शासनाने निर्देश.
शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या अवैध कंपन्या आणि सावकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार महसूलमंत्री #चंद्रशेखरबावनकुळे
#microfinance
#DroughtRelief
#FarmarWelfare
36
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA retweeted
उत्सव
तुमच्या ज्ञानाचा तुमच्या अभिव्यक्तीचा
निवडणूक साक्षरता मंडळांसाठी निबंध आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा
@ECISVEEP
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA retweeted
लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवनच्या इतिहास व वारशावर आधारित तीन कॉफी टेबल पुस्तके आणि मोरांच्या छायाचित्रांचा विशेष कॅटलॉग अशा चार प्रकाशनांचे अनावरण करण्यात आले. यावेळी या पुस्तकांच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
लोकभवनचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आपल्या भूतकाळाची जाणीव ठेवून वर्तमानात जगणे आणि भविष्यातील पिढ्यांना इतिहासाची ओळख करून देणे महत्वाचे आहे. लोकभवनमधील ऐतिहासिक वस्तू, मेजवानीच्या परंपरा, पाककला आणि नैसर्गिक वैभव यांचे दस्तऐवजीकरण करणारी पुस्तके या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
राज्यपाल म्हणाले की, लोकभवनमधील ब्रिटिश कालीन ऐतिहासिक कटलरी, क्रॉकरी, पोर्सिलिन आणि चांदीची भांडी या केवळ वापराच्या वस्तू नसून इतिहासाच्या महत्वपूर्ण नोंदी आहेत. त्यातून तत्कालीन जीवनशैली, कलात्मकता आणि त्या काळातील परंपरांचे दर्शन घडते. या वस्तूंची निर्मिती अत्यंत मेहनतीने आणि कलात्मक पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे जतन आणि दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल असताना हैदराबाद येथील सालार जंग संग्रहालयाचे अध्यक्ष होतो. त्यावेळी आपण ऐतिहासिक वस्तूंचे महत्व जवळून अनुभवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकभवनमधील मोरांची छायाचित्रे हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. मुंबईसारख्या महानगरात मलबार हिल परिसरात मुक्तपणे वावरणारे मोर पाहणे ही सर्वांकरिताच अनोखी बाब आहे. त्यामुळे या मोरांच्या छायाचित्रांचा संग्रह तयार करून त्याची नोंद पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांच्या मेजवानी संदर्भातील पुस्तकाविषयी राज्यपाल वर्मा म्हणाले की, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या भेटी, त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ आणि काळानुसार बदललेले मेन्यू यांची माहिती या पुस्तकात आहे. खाद्यसंस्कृतीचा संबंध केवळ पोट भरण्याशी नसून ती संबंधित देशाच्या संस्कृतीचा अनुभव देणारी असते. पाककला ही कौशल्य, सर्जनशीलता आणि कलात्मकतेची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे पाककलेचे दस्तऐवजीकरणही महत्वाचे आहे.
महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या कलांचे जतन करण्यासाठी स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्याचा मानसही राज्यपालांनी व्यक्त केला. वारली कलेला केवळ संग्रहालये आणि प्रदर्शनांपुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात स्थान मिळावे, यासाठी शाळांच्या वर्गखोल्या आणि अंगणवाड्यांमध्ये वारली चित्रकला साकारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेच्या वारली पेंटिंगने वर्गखोल्या रंगविण्याच्या उपक्रमाची माहिती देताना राज्यपाल म्हणाले की, सुमारे ३० शाळांचे मुख्याध्यापक या शाळेला भेट देणार आहेत. वारली कलेच्या माध्यमातून बालगीते आणि पौराणिक कथाही साकारता येतील. यामुळे लहान वयातच मुलांना पारंपरिक कलेची ओळख होईल.
या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आलेल्या चारही पुस्तकांचा परिचय आणि माहिती लोकभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी दिली.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पुस्तकांच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास चिकित्सक समूहाचे सचिव गुरुनाथ पंडित, पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग विभागाच्या विभागप्रमुख तथा मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर, पाटकर महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शेफ अमोल राऊळ, ॲटलस स्किलटेक विद्यापीठाच्या शिक्षणतज्ज्ञ व प्रमुख डॉ. इंदू शहानी, विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थ शहानी, कुलसचिव डॉ. पराग अमिन, प्रा. मानसी कक्कर, प्रा. कनुप्रिया शर्मा, शांतनू घुरियानी, चार्वी किंजर आणि काशिश शाह उपस्थित होते.
@Jishnu_Devvarma
@maha_governor
DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA retweeted
'स्क्रीन टाइम'मधून थोडे बाहेर पडूया, पुस्तकांच्या दुनियेत रमूया!
मुंबई पुस्तक महोत्सव
📚 २४–२९ नोव्हेंबर २०२६
📍 मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस (गेट-२)
🎟️ प्रवेश विनामूल्य
#MumbaiBookFestival
#ReadingCulture
#LoveForBooks
#ReadAndGrow
























