DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) header
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) profile picture

Official Account of District Information Office GADCHIROLI, DGIPR Dept., Govt of Maharashtra. #DioGadchiroli

GADCHIROLI, MAHARASHTRA
Joined April 2016
Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli)
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी विजयी काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना ६७,२३१ मते, तर भाजपचे सुधाकर कोहळे यांना ६३,९६० मते मिळाली. ४१ तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
4
348
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वेक्षण उपयुक्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वेक्षणामुळे योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास आणि अंमलबजावणीत गुणात्मक सुधारणा करण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
119
उद्योजकता परिषदेसाठी संशोधनपर लेख सादर करण्याचे आवाहन भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबादतर्फे २४ ते २६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान आयोजित १७ व्या द्वैवार्षिक परिषदेसाठी संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी संशोधनपर लेख सादर करावेत. अधिक माहितीसाठी: conference.ediindia.org
88
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
उजेडाच्या वाटेवर… प्रत्येक महिलेची एक वेगळी कहाणी, एक वेगळा मार्ग! #महिलाआयोग #MSCW #MahaDGIPR
13
1
4
2,209
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
दिव्यांगांच्या कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ टक्का निधी #दिव्यांग #MahaDGIPR
1
14
14
2,928
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
#नागपूर जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजना आणि पेंच उजव्या मुख्य कालव्याच्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक निधीचे नियोजन करावे, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने सकारात्मक निर्णय घ्यावेत, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. सिंचन प्रकल्पांची प्रगती, प्रलंबित कामे आणि निधीची उपलब्धता यांचा आढावा घेताना, निधीची कमतरता भासू नये यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींचे पुनर्विनियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांची देयके प्रलंबित राहू नयेत आणि प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी आवश्यक प्रस्ताव व कागदपत्रे तातडीने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक निधीसाठी मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करून पूरक अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. धरणातील पाणीसाठ्याची उंची वाढल्याने पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या जागा अपुऱ्या पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी जागांचा शोध, जमीन संपादन आणि नवीन पुनर्वसन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाधित कुटुंबांना भूखंड, रस्ते, पाणी व इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या आर्थिक मदतीच्या मागण्यांचाही नियमानुसार विचार करण्यात येणार आहे. @cbawankule #सिंचनप्रकल्प #जलसंपदा
4
4
2,443
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास असलेला एक चांगला पत्रकार गमावला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. @mieknathshinde
8
7
2,086
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
राजकारणाचा समाजजीवनावरील परिणामांचे विश्लेषक म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांची पत्रकारिता सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. @Dev_Fadnavis
4
9
2,167
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
‘बाप्पाचा कट्टा’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जागर! 🔹 महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि कलांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी #मुंबई आणि #पुणे येथे ‘बाप्पाचा कट्टा’ हा ९० दिवसांचा सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि बाप्पा डॉट ऑर्गचे श्रीपाद आष्टेकर यांच्या सहभागातून २९ ऑक्टोबर २०२६ पासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. 🔹 उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडा, लोककला, म्हणी, अंताक्षरी तसेच हिप-हॉप आणि रॅप अशा पारंपरिक व आधुनिक कलांचे सादरीकरण या उपक्रमात पाहायला मिळणार आहे. मुंबईतील वांद्रे बँडस्टँड आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता (एफ.सी. रोड) येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 🔹 सहभागासाठी प्रवेश शुल्क नाही! इच्छुक जोड्यांनी ‘bappa.org’च्या +९१ ९१३६१ ७२६८१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ३० सेकंदांचा ऑडिशन व्हिडिओ पाठवावा. जोडीतील किमान एका सदस्याचे वय १८ ते ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. सादरीकरण कोणत्याही भारतीय भाषेत करता येईल; मात्र त्यात मराठीतील किमान एक ओळ असणे बंधनकारक आहे. 🔹 प्रत्येक शहरातून दर आठवड्याला १६ जोड्यांची निवड केली जाणार आहे. सार्वजनिक मतदानाच्या आधारे विजेत्यांची निवड होईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांची रोख पारितोषिके, तसेच सुवर्ण, रौप्य आणि कांस्य स्वरूपातील ‘मोदक करंडक’ प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर केले जाईल. 🔹 २९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळे मुंबईतील वांद्रे बँडस्टँड येथे सायंकाळी ७ वाजता, तर पुण्यातील एफ.सी. रोड येथे सकाळी १० वाजता होणार आहेत. १५ नोव्हेंबर २०२६ ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत दर रविवारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. 🔹 या उपक्रमाचा महाअंतिम सोहळा २६ जानेवारी २०२७ रोजी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड येथे होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘कलाधिपती करंडक’ प्रदान करण्यात येणार असून, पुण्यातही सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. मुंबई आणि पुणे येथील नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्यांना उपस्थित राहून सहभागी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मंत्री ॲड.शेलार आणि अष्टेकर यांनी केले आहे. @ShelarAshish #बाप्पाचाकट्टा #गणेशोत्सव #महागणेशोत्सव२०२६ #राज्यउत्सव
7
1
3
1,757
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
महात्मा फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा वारसा जपणे आवश्यक आहे. महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त पुण्यातील फुलेवाडा आणि भिडेवाडा येथील सुशोभिकरण आणि विकासाच्या कामांना गती देवून त्वरित ते पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे मनपाला दिले. मंत्रालयात आयोजित ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत उपसमितीचे सदस्य तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (ऑनलाईन) उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त पुण्यातील ऐतिहासिक फुलेवाडा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रस्तावाबाबत बैठकीत चर्चा झाली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याकरिता १२ ठिकाणी जागा निश्चित झाली आहे. १५ ठिकाणी नाममात्र एक रुपया दराने जागा उपलब्ध करून देण्याची योजना तयार करावी. सर्व जिल्ह्यात वसतीगृहासाठी जागा निश्चिती १५ दिवसात पूर्ण करावी. मुंबई शहरातही जागा उपलब्ध करून घेण्यास प्राधान्य द्यावे. प्रत्येक वसतिगृहात ५०० विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था होईल, अशा स्वरूपाचा आराखडा तयार करावा. महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दुष्काळ निवारणासाठी कार्यरत असलेल्या संबंधित आठ विभागांनी महात्मा फुले यांच्या नावाने योजना तयार करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कलिना येथे फुले, शाहू, आंबेडकर इंटरनॅशनल ग्रंथालय पूर्ण झाले आहे, याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री यांना निमंत्रित करावे. राज्यातील सर्व विद्यापीठात महात्मा फुले अध्यासन केंद्र स्थापन करावे, पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमात महात्मा फुलेंच्या साहित्याचा समावेश व्हावा, शिष्यवृत्ती किंवा फेलोशिप महात्मा फुले यांच्या नावाने सुरू करावी, महिला सक्षमीकरणासाठी विशेष महिला योजना सुरू करण्याबाबत बैठकीत मंत्री भुजबळ यांनी सूचना केल्या. भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या विकासासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष असावे, व्हीजेएनटीसोबत ओबीसी, एसबीसीसाठी आधार योजनेतील भत्त्यात वाढ करावी, अशी सूचना मंत्री सावे यांनी बैठकीत केली. आगामी डिसेंबर महिन्यात भटक्या-विमुक्त घटकांसाठी स्वतंत्र निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात येणार आहे, असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, ओबीसी विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, पुणे मनपाचे आयुक्त नवलकिशोर राम आदी उपस्थित होते. @cbawankule @ChhaganCBhujbal @bharanemamaNCP @GulabraoRPatil @SanjayDRathods @save_atul #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
4
2
5
950
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १४ हजार ७८७ अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती #आरोग्यविभाग #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR
6
6
2,151
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थी-केंद्रित योजनांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अनावश्यक कागदपत्रांची मागणी आणि प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता कमी होणार आहे. शासकीय डेटाबेसच्या माध्यमातून आवश्यक माहिती व प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. अनुदान थेट आधार-संलग्न बँक खात्यात जमा करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान होईल. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरातून योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर शासनाचा भर आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी : mahadbt2.maharashtra.gov.in/ @Dev_Fadnavis @NiteshNRane #मत्स्यव्यवसाय #महाडीबीटी #डिजिटलमहाराष्ट्र #mahadbt2
6
1
5
2,138
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनाच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क विभागातर्फे नियुक्त ॲक्सिस माय इंडिया या संस्थेमार्फत विविध विभागांच्या योजनांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासंदर्भात सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि योजना पश्चात सर्वेक्षणाबाबत बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या सर्वेक्षणाच्या माध्यमातून योजनांबद्दलची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल तसेच शासनाच्या योजनांसाठी असणारा प्रतिसाद समजण्यास मदत होईल. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अचूक डेटा बेस तयार होईल आणि लोकांना शासकीय योजनांचा अधिक लाभ मिळण्यास मदत होईल. या सर्वेक्षणातून शासकीय योजनांबाबत अधिक विश्वासार्हता निर्माण होऊन राज्य शासनास अचूक माहिती मिळेल आणि गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजनांची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांची भूमिका महत्वाची आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आवश्यक सहकार्य करून माहिती संकलन व विश्लेषणाच्या प्रक्रियेत समन्वय साधावा आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूरक वातावरण निर्माण करावे. बैठकीस इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित होते. @Dev_Fadnavis @ShelarAshish #MahaDGIPR
8
5
2,327
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये खरीप हंगामात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. #दुष्काळ #MahaDGIPR
2
14
1
34
10,044
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते #महाडीबीटी २.०, #आपलेसरकार २.०, #मैत्री पोर्टलवरील नवीन सेवा आणि ‘महाइंडस’ या सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत महासारथी पोर्टलचा त्यांनी आढावा घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरातून शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी आणि योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन अधिक प्रभावीपणे करता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 🔹 कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या वापरातून शासकीय कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता व उत्तरदायित्व वाढणार. योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी आणि योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन अधिक प्रभावी होणार. 🔹 ‘महाइंडस’ सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मचा शुभारंभ – मराठीसह २२ भारतीय भाषांमध्ये मसुदालेखन, भाषांतर, सारांश आणि माहितीचे विश्लेषण करण्याची सुविधा. शासन निर्णयांचा शोध, ई-मेलचा सारांश आणि निविदांचे मूल्यांकन करणे शक्य. 🔹 ‘महाआयडी’अंतर्गत एक कोटीहून अधिक आयडी तयार – विविध विभागांतील माहितीचे एकत्रीकरण करून शासकीय सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यावर भर. 🔹 डिजिटल सेवांचा विस्तार – ‘महाडीबीटी २.०’वर ३६ नवीन योजनांचा शुभारंभ, ‘आपले सरकार २.०’वर ७१ सेवा सुरू, तर ‘मैत्री’ पोर्टलवर वैधमापनशास्त्र विभागाच्या १३ नवीन सेवांचा समावेश. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विभागांना डिजिटल प्रणालींचा प्रत्यक्ष वापर वाढवून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनू कुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. @Dev_Fadnavis @NiteshNRane #डिजिटलमहाराष्ट्र #कृत्रिमबुद्धिमत्ता
1
8
10
1,864
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती #सावित्रीबाईफुले आधार योजनेंतर्गत’ भोजन, निवास आणि निर्वाहासाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाच्या रकमेत राज्य शासनाने वाढ केली आहे. शिक्षणाच्या ठिकाणानुसार विद्यार्थ्यांना ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे. याबाबतचा #शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. ▶️ मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण ८० हजार रुपये ▶️इतर महसूल विभागीय शहरांतील तसेच उर्वरित ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ६८ हजार रुपये ▶️अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी तसेच महानगरपालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरातील शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५७ हजार रुपये ▶️तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये ▶️या रकमेत भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्याचा समावेश ▶️याव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी प्रतिवर्षी आठ हजार रुपये ▶️अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना चार हजार रुपये ठोक स्वरूपात देण्यात येतील.
5
16
5
38
27,156
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
युवकांनी व्यसनांपासून दूर राहून चांगल्या सवयी, शिस्त आणि एकाग्रतेच्या बळावर स्वतःचे चारित्र्य घडवावे. स्वतः व्यसनमुक्त राहण्यासोबतच मित्र, सहाध्यायी, कुटुंबीय आणि समाजातील नागरिकांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रोत्साहित करावे. युवकांच्या सामर्थ्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करून विकसित भारत २०४७ साकार करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. महाकवी कालिदास कलामंदिरात ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ अभियानांतर्गत नाशिक येथे आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, न्या. दिलीप घुमरे, न्या. मदन गोसावी, ॲड. महेश सावंत, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल श्री. वर्मा यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली. भारत हा तरुणांचा देश असून युवक ही राष्ट्राची खरी शक्ती आहे. देशाला विकसित राष्ट्र आणि जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांचे सशक्त, निरोगी, शिस्तबद्ध आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित असणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले. @Jishnu_Devvarma @girishdmahajan
2
6
3
1,987
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI retweeted
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
10
7
2,430
जिल्हा परिषद गडचिरोलीत अनुकंपा नियुक्तीसाठी २ नोव्हेंबरला समुपदेशन गट-क व गट-डच्या अंतिम प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांनी सकाळी ११ वाजता मूळ कागदपत्रांसह वीर बाबुराव शेडमाके सभागृहात उपस्थित राहावे. #गडचिरोली #अनुकंपानियुक्ती
277
‘पी. एम. किसान’च्या २४ व्या हप्त्याचे ३० ऑक्टोबरला वितरण पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी ₹२,००० जमा होणार. गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी pmindiawebcast.nic.in येथे थेट प्रक्षेपणाद्वारे सहभागी व्हावे. #PMKisan #Gadchiroli
260