
Official Handle of District Information Office, #KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra.
Kolhapur, India
Joined September 2012
- Tweets22.5K
- Following122
- Followers12.5K
- Likes1.6K
महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
शिक्षण, समता, सामाजिक न्यायाचा विचार समाजात रुजवणारे, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे क्रांतिकारक समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
#सामाजिक_समता
86
#कोल्हापूर : राज्यपाल @Jishnu_Devvarma यांचे आज सकाळी 10:45 वा. कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.
यावेळी त्यांचे प्रशासनाच्यावतीने @CollectorKolha1 डॉ. विजय राठोड यांनी पुस्तक तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनिश कामत यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
@MahaDGIPR
1
365
District Information Office, Kolhapur retweeted
आतापर्यंत राज्यात ३१० तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे दुष्काळ अग्रीम वितरित करण्यात येत आहे. आज २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ९६ लाख ४८ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या खात्यांत ४ हजार ८२४ कोटी २४ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील एकही पात्र #शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचित राहणार नाही. #फार्मरआयडी आणि काही तांत्रिक अडचणींमुळे दुष्काळग्रस्त तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही, त्यांच्या अडचणी दूर करून त्यांनाही मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून ९८ लाख २१ हजार २३ शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी ९६ लाख ४८ हजार ४८९ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत वितरित झाली आहे. शेतकऱ्यांचे फार्मर आयडी, तांत्रिक अडचणी दूर होत असून अग्रीम मदत देण्याची प्रक्रियेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू असून, पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहितीही मंत्री जाधव पाटील यांनी दिली.
#ॲग्रीस्टॅक (AgriStack) डेटाच्या माध्यमातून कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तांत्रिक अडचणींमुळे मदत जमा होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. अशा अडचणी सोडविण्यास प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.
राज्यातील एकही पात्र शेतकरी दुष्काळ मदतीपासून वंचित राहणार नाही. फार्मर आयडी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांनाही पाच हजार रुपयांची दुष्काळ अग्रीम मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे मंत्री जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले.
@makrandpatil99
महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधनाला मिळतेय नवी दिशा ! महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा.
@MahaDGIPR
221
#कोल्हापूर: जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अशोक स्तंभाजवळ आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन @CollectorKolha1 डॉ. विजय राठोड यांनी केले.
@MahaDGIPR
213
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य
३३ जिल्ह्यांतील अन्न सुरक्षा योजनेबाहेरील शेतकऱ्यांना दिलासा
#दुष्काळ
#शेतकरी
@MahaDGIPR
209
भारतीय संविधान दिनानिमित्त #कोल्हापूर जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त ऐतिहासिक बिंदू चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
@CollectorKolha1
169
District Information Office, Kolhapur retweeted
पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. भविष्यातही नियम व कायद्याच्या चौकटीत पोलिसांचा स्वतंत्रपणे विचार करून आवश्यक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात २६/११ दहशतवादी हल्ला तसेच पहलगाम येथील शहीद जवान आणि निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस कुटुंबांसाठी संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
२६ नोव्हेंबर हा #संविधानदिन असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला अर्पण केलेल्या संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्याचबरोबर मुंबईवरील २६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचाही हा दिवस असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
२६/११ चा हल्ला हा केवळ ताज हॉटेल, ट्रायडेंट किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील हल्ला नव्हता, तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर केलेला हल्ला होता. पोलीस आणि सुरक्षा दलातील जवानांनी अतुलनीय शौर्याने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. शहीद तुकाराम ओंबळे यांनी प्राणांची पर्वा न करता कसाबला जिवंत पकडल्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा जगासमोर आला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई तेव्हाही थांबली नाही आणि कधीही थांबणार नाही. कोणताही दहशतवादी मुंबई, महाराष्ट्र आणि भारताचा निर्धार संपवू शकत नाही. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे. पहलगाममधील हल्ला मानवतेला काळिमा फासणारा होता. भारताच्या जवानांवर किंवा नागरिकांवर होणारा कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कृतीतून दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करेल. पोलीस भरती, प्रशिक्षण, पोलीस पाल्यांचे प्रश्न आणि पोलीस कुटुंबांचे कल्याण यासाठी शासन सातत्याने निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
@Dev_Fadnavis
#कोल्हापूर: समान नागरी संहितेबाबत विविध हितसंबंधी गट, संस्था तसेच नागरिकांच्या सूचना,त्यांच्या हरकती व मते जाणून घेण्याच्या अनुषंगाने आज @CollectorKolha1 डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहूजी सभागृह येथे पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली.
@MahaDGIPR
279
दुष्काळाच्या सावटाने वीस दिवसांत २२ लाख टन उसाचे जिल्ह्यात गाळप
गतवर्षीच्या तुलनेत कमी : उसाचा हंगाम एक महिना आधी संपण्याची शक्यता
#दुष्काळ
@MahaDGIPR
275
शासकीय कार्यालयांत WhatsApp Web वापरताना सतर्क राहा!
सायबर सुरक्षेबाबत गृह मंत्रालयाचा इशारा : शासकीय कार्यालयांतील संगणकावर WhatsApp Web वापरताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.
1
243
शासकीय माहितीची गोपनीयता व डिजिटल यंत्रणांची सुरक्षितता राखण्यासाठी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा! #सायबरसुरक्षा #गृह मंत्रालय #CyberSecurity #WhatsAppWeb #DigitalSafety
27
संविधान:लोकशाहीचा आत्मा, सामाजिक न्यायाचा आधार
भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचं पुस्तक नाही. तर ते या देशाचा आत्मा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय हे केवळ प्रस्तावनेतले शब्द नाहीत ती आपल्या जगण्याची मूल्यं आहेत.
1
164
District Information Office, Kolhapur retweeted
📍 हॉटेल फेअरमॉन्ट, मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘तिसरी वर्ल्ड मेअर्स फोरम’
#LIVE nitter.cf/i/broadcasts/2mdVMvmKk…
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक विचारांचा वारसा जपत प्रत्येक नागरिकाने लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. संविधानाचा सन्मान हा केवळ शब्दांतून नव्हे, तर आपल्या कृतीतून व्यक्त झाला पाहिजे.
#संविधान
@MahaDGIPR
1
224
महात्मा फुले यांचे विचार आजही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे वास्तव मांडणारा शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ आजही महत्त्वपूर्ण आहे.शेतकरीआत्महत्या रोखण्यासाठी या ग्रंथातील विचारांचा प्रचार,प्रसार,प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
1
202
महात्मा फुले यांनी शेतीत वर्षातून तीन पिके घेण्याचा प्रयोग करून आधुनिक शेतीचा आदर्श घालून दिल्याचेही त्यांनी सांगितले. 📺 ‘जय महाराष्ट्र’ विशेष मुलाखत 🎙️ मुलाखत : छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग.
@MahaDGIPR
32























