Dr.Kapil Zoting retweeted
स्पष्ट व साफ मनाचा महाराष्ट्राने अभ्यासलेला अखेरचा लोकनेता 🥹#दादा Maharashtra miss you today
Dr.Kapil Zoting retweeted
पुणे गुन्हेगारीविरोधात ‘झिरो टॉलरेंस’ भूमिका!
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आयोजित बैठकीत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा व कायदा-सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
पुण्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक ओळख जपत शहराची शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलीस प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे, असे मा. सुनेत्रावहिनी यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारी प्रवृत्तींचे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
शिवाजीनगर न्यायालय परिसरातील खुनी हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अवैध शस्त्रे, कोयता गँग आणि ड्रग्ज माफियांविरोधात कठोर कारवाई, गुन्हेगारी हालचालींवर प्रभावी नियंत्रण, सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त वाढवणे आणि संवेदनशील भागांत विशेष देखरेख ठेवण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासह पोलीस दलाची कार्यक्षमता, सतर्कता आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्याबाबतही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
📍पुणे
#punecrime #punecity #pune #zerotolerance
Dr.Kapil Zoting retweeted
पुणे गोळीबार प्रकरणात, फास्टट्रॅकवर कार्यवाही करण्याचे आदेश.
📍पुणे
#punecity #punecrime #maharashtra #punepolice
Dr.Kapil Zoting retweeted
आदरणीय @SunetraA_Pawar ताई तुम्ही एकट्या नाहीत.अजितदादांशी निष्ठा असलेले हजारो लाखो कार्यकर्ते आजही तुमच्या पाठीशी आहोत!
काही संघर्ष हे सत्तेसाठी नसतात, काही लढाया या राजकीय अस्तित्वासाठी नसतात; तर काही लढाया या आयुष्यभर जपलेल्या नात्यांचा, विश्वासाचा आणि एका मोठ्या वारशाचा सन्मान राखण्यासाठी असतात.दादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. पण त्या पोकळीतून पक्षाला सावरण्याची, कार्यकर्त्यांना आधार देण्याची आणि दादांनी उभ्या केलेल्या राजकीय व सामाजिक वारशाला पुढे घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी आज आपल्या खांद्यावर आहे.ज्या व्यक्तीने आयुष्यभर आपल्या कुटुंबाला, आपल्या माणसांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना आधार दिला, ती व्यक्ती अचानक निघून गेल्यानंतर त्या कुटुंबातील व्यक्तीच्या मनाची अवस्था काय असेल?
ज्यांच्या सोबत आयुष्याचा प्रत्येक निर्णय घेतला, ज्यांच्या अनुभवाच्या सावलीत अनेक वर्षे संसार केला, ज्यांच्या एका फोनवर हजारो कार्यकर्ते धावून येत असत, ती व्यक्तीच सोबत नसताना त्याच कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारणे किती कठीण असेल?
एकीकडे पतीच्या जाण्याचे दुःख, दुसरीकडे कुटुंबप्रमुख म्हणून कुटुंबाची जबाबदारी, तिसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आणि चौथीकडे एका मोठ्या राजकीय पक्षाचे नेतृत्व सक्षम करण्याचे आव्हान
एकीकडे राजकारणात विरोधकांचा सामना करावा लागतो आहे.तर दुसरीकडे कुटुंबातीलच त्यांच्या विरोधातील वेगवेगळे राजकीय सूर,पक्षातील मतभेद, संघटनात्मक आव्हाने, वरिष्ठ नेत्यांच्या अपेक्षा, सहकाऱ्यांमधील अविश्वासाचे वातावरण आणि प्रत्येक निर्णयावर होणारी टीका… या सगळ्यांच्या गर्दीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी काय दमछाक होत असेल?
आज कुणाला वाटत असेल की वहिनींनी अमुक निर्णय घ्यावा, कुणाला वाटत असेल की अमुक नेत्याला पद द्यावे, कुणाला वाटत असेल की पक्षसंघटना अधिक आक्रमकपणे चालवावी, तर कुणाला वाटत असेल की दादांसारखे निर्णय तात्काळ व्हावेत.
पण एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा…
अजितदादा असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि अजितदादा नसताना त्यांच्या जागी उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आधार देणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत!
दादांचा स्वभाव, त्यांची निर्णयक्षमता, त्यांचा प्रशासनावरील प्रभाव, कार्यकर्त्यांशी असलेले नाते आणि त्यांची कामाची गती एका दिवसात निर्माण झालेली नव्हती. त्यासाठी त्यांनी आयुष्याची अनेक दशके खर्ची घातली होती.
मग वहिनींकडून काही महिन्यांतच त्या प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करणे कितपत न्याय्य आहे?
त्यांच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकशाहीत प्रत्येकाला आहे. पण प्रश्न विचारताना परिस्थितीचे भान, माणुसकी आणि त्यांनी स्वीकारलेल्या जबाबदारीचे गांभीर्य विसरता कामा नये.
आज त्यांना केवळ सल्ले देण्यापेक्षा त्यांच्यासोबत उभे राहणाऱ्या माणसांची गरज आहे. त्यांना प्रत्येक वेळी त्यांच्या अपयशाची जाणीव करून देणाऱ्यांपेक्षा त्यांना यशस्वी करण्यासाठी स्वतःचा वेळ, अनुभव आणि ताकद देणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे
आमची निष्ठा ही पदासाठी नव्हती, ती अजितदादांच्या विचारांशी होती. आमचे नाते हे सत्तेपुरते नव्हते, ते दादांनी दिलेल्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि सन्मानाचे होते.
आज सुनेत्रा वहिनी त्या वारशाची जबाबदारी सांभाळत असतील, तर त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आमच्यासाठी केवळ राजकीय भूमिका नाही, तर आमच्या दादांप्रती असलेली कृतज्ञता आहे
आम्हाला तुमच्याकडून उद्या पद मिळेल की नाही, जबाबदारी मिळेल की नाही, याची चिंता नाही. आमची अपेक्षा एवढीच आहे की दादांनी ज्या सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले, त्या कार्यकर्त्यांच्या त्यागाची आणि निष्ठेची आठवण तुमच्या मनात कायम राहावी.
आम्ही तुमच्याकडे काही मागण्यासाठी नाही, तर तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आहोत.
चौफेर टीका करणाऱ्यांसाठी एवढेच सांगायचे आहे की नेतृत्वाला प्रश्न विचारणे सोपे असते; पण संकटाच्या काळात नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे भल्यभल्याना जमत नाही.
Dr.Kapil Zoting retweeted
माफी मागितली म्हणून जबाबदारी संपत नाही. महिलांचा सन्मान आणि आईसमान काकींचा आदर हा राजकारणा पलीकडचा आमचा आत्मीयतेचा विषय आहे. राजकीय, वैचारिक मतभेद असावेत. परंतु स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगताना प्रसिद्धीसाठी राजकीय विरोधाच्या नावाखाली अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे केवळ निषेधार्यच आहे.
यातून राजकीय टीकेच्या, महिला सन्मानाच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत. अतिशय कठीण काळात स्वतःला सावरत सुनेत्रा वहिनी सामाजिक, राजकीय क्षेत्रातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना लोकनेते स्व. दादांच्या सहचरणी म्हणून उभे राहिल्यात हे कोणीही नाकारू शकत नाही...!!
@SunetraA_Pawar @SunilTatkare @mahancpspeaks
Dr.Kapil Zoting retweeted
श्री वेताळैश्वर माऊली सेवा मित्र मंडळाकडून भाविक एकवीरा देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या.
📍वेताळैश्वर मंदिर, ट्रॉम्बे कोळीवाडा
#SanaMalikShaikh #EkviraDevi #TrombayKoliwada #AnushaktiNagar #MLA
Dr.Kapil Zoting retweeted
रोहित, माफी मागून झालेला अपमान पुसला जात नाही! सुनेत्रावहिनींबद्दल केलेले वक्तव्य ही राजकीय टीका नसून राजकीय सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारी बाब आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असावेत, संघर्ष असावा; मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापोटी महिलांचा व्यक्तिगत अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
Dr.Kapil Zoting retweeted
आदरणीय अजितदादांनी सुरू केलेला ‘जनता संवाद’ हा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा आणि जनसेवेची बांधिलकी जपणारा उपक्रम आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व मंत्री महोदयांच्या माध्यमातून पक्ष कार्यालयात नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि मागण्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तोडगा काढण्याची ही लोकाभिमुख परंपरा समर्थपणे पुढे नेली जात आहे.
#ncp #ncpjantasanvad #maharashtra #ajitdada #sunetrapawar
Dr.Kapil Zoting retweeted
आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शहरातील विकासकामे आणि विविध उपाययोजनांविषयी आढावा बैठक पार पडली.
याचबरोबर सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून उभारण्यात येत असलेल्या ‘अजितसृष्टी’च्या कामाची वॉकथ्रूच्या माध्यमातून मा. सुनेत्रावहिनी यांनी माहिती घेतली. पीसीएमसीच्या बर्ड व्हॅलीसमोरील १८ एकर जागेत ५१ फूट उंचीचा आदरणीय अजितदादांचा भव्य कांस्य पुतळा आणि ‘अजितसृष्टी’ उभारण्याचा प्रस्ताव आहे.
आदरणीय अजितदादांचे पिंपरी-चिंचवड शहरावर असलेले प्रेम, शहराच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि विकासाला दिलेले प्राधान्य यामुळे शहराने प्रगतीच्या बाबतीत मोठी झेप घेतली. त्याच विकास दृष्टीला पुढे नेत शहरातील पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांशी संबंधित विविध उपाययोजनांचा मा. सुनेत्रावहिनी यांनी आढावा घेतला. याशिवाय मोशी दुर्घटनेनंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच मोशी येथील कचरा विलगीकरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लोकप्रतिनिधी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#pimprichinchwad #ajitdada #ajitpawar #ajitshruti #ncp
Dr.Kapil Zoting retweeted
महाराष्ट्रातील क्रीडा प्रतिभेला जागतिक झेप देण्यासाठी आधुनिक सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संधींचे बळ!
📍पुणे
#ncp #maharashtra #pune #sports #taekwando
Dr.Kapil Zoting retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचा प्रसार माध्यमांशी संवाद
दि. २३ नोव्हेंबर २०२६
📍पुणे
Dr.Kapil Zoting retweeted
आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे आयोजित बैठकीत शहरातील विकासकामं, प्रलंबित प्रकल्प आणि आगामी नियोजनाचा आढावा घेतला. आदरणीय अजितदादांच्या विकासदृष्टीतून शहरानं साधलेली प्रगती कायम राखत पुढील २५ वर्षांचा शाश्वत विकास घडवण्यासाठी पाणी, वाहतूक, पर्यावरण आणि नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत पाणीपुरवठा व जलव्यवस्थापन अधिक सक्षम करणं, औद्योगिक वापरासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढवणं तसंच इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांना गती देण्याबाबत आढावा घेतला. याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, विलगीकरण, शास्त्रोक्त विल्हेवाट, हॉटेल वेस्टमधून बायोगॅस निर्मिती आणि मोशी दुर्घटनेनंतरच्या उपाययोजनांची माहिती घेतली. मोशी येथील कचरा विलगीकरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचंही यावेळी स्पष्ट केलं.
आदरणीय अजितदादांच्या संकल्पनेतून व डिझाईननुसार उभारण्यात येणाऱ्या १८ मजली प्रशासकीय इमारतीचं काम डिसेंबर २०२६ च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन, BRTS मार्ग पुन्हा सुरू करणं, PMPML चा विस्तार, नव्या बसेस, प्रत्येक नागरिकाच्या घरापासून ५०० मीटरच्या परिसरात सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि नवीन पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा बैठकीत घेतला.
त्याचप्रमाणे सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या (पीपीपी) तत्त्वावर १०० बेडचं कॅन्सर हॉस्पिटल, प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वेळेत घरांचा लाभ, क्रांतिवीर चाफेकर वाडा पुनर्विकासाचा दुसरा टप्पा आणि कबड्डी संकुलासह आधुनिक क्रीडा सुविधांच्या विकासाबाबतही चर्चा केली. अनधिकृत बांधकामं व अतिक्रमणांना आळा घालणं, महानगरपालिकेच्या भूखंडांवरील अतिक्रमणं हटवून वृक्षारोपण आणि मुलांसाठी खेळाची मैदानं विकसित करण्याच्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला. याचबरोबर नाशिक फाटा ते एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगून राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. तसेच यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.
या बैठकीत नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील मांडलेल्या समस्यांच्या निराकरणासाठी महापौर व महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केली. याचबरोबर सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून उभारण्यात येत असलेल्या 'अजितसृष्टी'च्या कामाची देखील वॉकथ्रूच्या माध्यमातून माहिती घेतली.
📍 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय, पिंपरी
Dr.Kapil Zoting retweeted
खेळाडूंच्या उत्साहात सहभागी होत नेम साधण्याचा आनंद घेतला आणि योगायोगाने ‘परफेक्ट १०’ साधता आला.
Dr.Kapil Zoting retweeted
मनू भाकर यांची ISSF खेळाडू समितीवर निवड; भारतीय क्रीडा विश्वासाठी अभिमानाचा क्षण!
भारताची प्रतिभावान नेमबाज मनू भाकर यांची २०२६ ते २०३० या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या (ISSF) खेळाडू समितीवर निवड झाली आहे. ऑनलाईन मतदानाद्वारे निवड झालेल्या सहा खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश झाला. त्या रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या नेमबाजी प्रकारांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
मनू भाकर यांच्या या उल्लेखनीय यशामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!
Dr.Kapil Zoting retweeted
रविवार, १५ नोव्हेंबर रोजी माननीय केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री. अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय निबंधक सहकारी संस्था, पश्चिम क्षेत्रीय प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन तसेच इतर उपक्रमांचे भूमिपूजन एकत्रितरित्या तळेगाव दाभाडे, पुणे येथे करण्यात आले होते.
आज सेनापती बापट मार्ग, पुणे येथील या प्रादेशिक कार्यालयास भेट देऊन तेथील दालनाचे उद्घाटन करत पाहणी केली. यावेळी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि माननीय केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधरजी मोहोळ उपस्थित होते.
📍पुणे
Dr.Kapil Zoting retweeted
आज पुणे जिल्हा परिषदेत माननीय केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री. अमितभाई शाह यांच्या शुभहस्ते लोकनेते, आदरणीय अजितदादांच्या नावाने प्रवेशद्वाराचे नामकरण आणि त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं.
आदरणीय अजितदादांचे कार्य, त्यांचे विचार आणि जनतेच्या मनातील त्यांचे स्थान सदैव अढळ राहील!































