
MD DNB FSCAI Cardiology , Sr Consultant Physician & Cardiologist , 25 years in Clinical Practice. #MedTwitter #JustForHearts , Founder Just For Hearts.
Pune Satara
Joined April 2012
- Tweets9.9K
- Following3.7K
- Followers14.9K
- Likes16.2K
Pinned Tweet
“आजच्या तरुणांमध्ये heart attacks ‘blockage’ मुळे नाही… तर plaque rupture मुळे होतायत आणि हीच सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे!”
Office stress, late nights, junk food आणि smoking यामुळे plaque इतकं unstable होतं की फक्त 30–40% blockage असूनही 100% sudden block तयार होतो.
1 Plaque म्हणजे काय आणि का धोकादायक हे समजून घेतले पाहीजे.
Artery च्या wall मध्ये LDL, inflammation आणि fat मिळून soft plaque तयार होतं.
हे दिसायला छोटं असलं तरी rupture झालं की काही सेकंदांत clot तयार होतो.
(Ref: AHA/ACC 2024)
2 LDL & Triglycerides plaque ‘unstable’ करतात
High LDL → plaque मऊ पडतं.
High Triglycerides → plaque मध्ये inflammation वाढतं.
दोन्ही मिळून rupture risk multiply होतो.
(Ref: NEJM 2022)
3 तरुणांमध्ये plaque rupture जास्त का?
🔥 High stress, overworking
🔥 Smoking & Vaping
🔥 Junk food + high cholesterol
🔥 कमी झोप
🔥 No exercise
हे सगळं plaque ला “fragile” बनवतं.
4 Rupture → Clot → अचानक 100% block
Plaque फाटलं की platelet तिथे पटकन चिकटतात.
Seconds मध्ये platelet-rich clot → complete block → sudden heart attack.
यामुळेच सगळे “normal reports” असतानाही तरुणांना attacks येतात.
5 Timely treatment फायदेशीर कधी?
Early arrival → thrombolysis clot तोडतं.
Severe symptoms किंवा re-block? → Angioplasty life-saving.
Late arrival = higher muscle damage.
Advanced tests जसे IVUS/OCT plaque biology समजायला मदत करतात.
6 Plaque stable ठेवण्यासाठी काय महत्वाचे ?
✔ LDL < 70
✔ Smoking/vaping बंद
✔ Daily exercise + strength work
✔ 7–8 hrs sleep
✔ Weight control
✔ Statins → scientifically plaque stabilize करतात (JACC 2021)
7 कोणत्या तरुणांनी विशेष काळजी घ्यावी?
✔ Family history of early heart disease
✔ Diabetes / obesity / fatty liver
✔ High triglycerides
✔ Chest tightness after stress
✔ Sedentary lifestyle
✔ High ApoB
आजच्या तरुणांमध्ये “major blockage” हा प्रश्न नाही…
“unstable plaque + rupture + sudden clot” हा खरा killer आहे.
ही पोस्ट WhatsApp groups, college friends, office teams मध्ये नक्की शेअर करा. एक share एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतं.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#YoungHeartAttack #PlaqueRupture #LDL #Triglycerides #PreventiveCardiology #HeartHealth #JustForHearts #Thrombosis #मराठीआरोग्य #CardiologyCare
Weight तेवढंच आहे…
पण पोटाचा घेर वाढतोय!
हा बदल अधिक महत्त्वाचा आहे का?
“डॉक्टर, गेल्या सहा महिन्यांपासून माझं वजन 72 किलोच आहे. पण पँट कमरेला घट्ट होतेय. Weight वाढलं नाही, मग पोट का वाढतंय?”
हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
कारण Weight Stable असणं म्हणजे Body Composition आणि Metabolic Health सुद्धा Stable आहे, असं नाही!
वजनकाटा आपल्याला एकूण वजन सांगतो. पण त्यात Fat आणि Muscle किती आहे, हे सांगत नाही.
1️⃣ Weight तेवढंच… तरी Waist कशी वाढते?
शरीरात एकाच वेळी दोन बदल घडू शकतात.
🔹 Muscle Mass कमी होणं - विशेषतः वयानुसार, कमी Activity किंवा Strength Training च्या अभावामुळे.
🔹 पोटाभोवती Fat वाढणं -विशेषतः Abdominal Fat.
त्यामुळे Weight फारसं बदलत नाही, पण Waist वाढू शकते.
यालाच Body Composition Change म्हणतात.
वजनकाटा शांत असला तरी शरीरात बदल सुरू असू शकतात!
2️⃣ Waist वाढणं अधिक महत्त्वाचं का?
पोटातील चरबी दोन प्रमुख प्रकारची असते.
🔸 Subcutaneous Fat: त्वचेखालची चरबी.
🔸 Visceral Fat: पोटातील अवयवांच्या आसपासची चरबी.
विशेषतः Visceral Fat चा Insulin Resistance, Fatty Liver, Diabetes आणि Cardiovascular Risk शी संबंध असतो.
म्हणून Weight किंवा BMI सोबत Waist मोजल्याने Metabolic Risk बद्दल अतिरिक्त माहिती मिळते.
पण Waist वाढली म्हणजे Visceral Fat निश्चित वाढलं, असंही नाही.
3️⃣ भारतीयांसाठी Waist किती असावी?
भारतीय व दक्षिण आशियाई व्यक्तींमध्ये वापरले जाणारे सामान्य Abdominal Obesity Risk Cutoffs
👨 पुरुष: 90 cm किंवा अधिक
👩 महिला: 80 cm किंवा अधिक
याशिवाय एक सोपा नियम
Waist शक्यतो आपल्या Height च्या निम्म्यापेक्षा कमी असावी.
उदा. Height 160 cm असेल, तर Waist 80 cm पेक्षा कमी ठेवणं हा उपयुक्त सामान्य उद्देश.
हे Risk Indicators आहेत; आजाराचं निदान नाही.
4️⃣ प्रत्येक वाढलेली Waist म्हणजे Fat वाढलं?
नाही!
Bloating, Constipation, जेवणानंतरचा बदल किंवा मोजण्याच्या पद्धतीतील फरक यामुळेही Waist बदलू शकते.
पण काही महिन्यांत Waist सातत्याने वाढत असेल, विशेषतः Weight Stable असूनही, तर त्याकडे लक्ष द्यायला हवं.
अशावेळी Muscle Strength, Activity, BP, HbA1c, Lipids आणि Fatty Liver Risk एकत्र पाहणं अधिक उपयुक्त ठरतं.
5️⃣ पुढील 4 आठवडे एक छोटा प्रयोग करा! 📱
यावेळी फक्त Weight नाही, Waist सुद्धा मोजा.
✅ Weight: आठवड्यातून एकदा, सकाळी साधारण एकाच परिस्थितीत.
✅ Waist: आठवड्यातून एकदा, सकाळी. शेवटची बरगडी आणि Hip Bone यांच्या मधल्या भागात Tape सरळ ठेवा. पोट आत न ओढता, सामान्य श्वास सोडल्यानंतर मोजा.
✅ Just For Hearts App मध्ये Weight आणि Steps/Exercise नोंदवा. Waist च्या मोजमापाचीही तारीखवार नोंद ठेवा.
App आधीच आहे? छान! आजची Entry करा. 😊 सुरुवात करण्यासाठी Premium आवश्यक नाही.
सोबत नियमित Walking आणि आठवड्यातून किमान दोन दिवस Muscle Strengthening वर लक्ष द्या.
4 आठवड्यांनी स्वतःला विचारा
① Weight Stable असूनही Waist वाढतेय का?
② Walking नियमित आहे, पण Strength Training कमी आहे का?
③ Waist बरोबर Sugar, BP किंवा Lipids मध्येही काही बदल आहेत का?
एका-दोन सेंटीमीटरच्या फरकावरून निष्कर्ष काढू नका. सातत्याने दिसणारा बदल महत्त्वाचा.
Weight Stable असूनही Waist वाढत असेल, Body Composition Assessment ची गरज समजून घ्यायची असेल किंवा Tracking साठी मदत हवी असेल, तर तुमच्या नोंदींसह प्रश्न विचारा
JFH ONE: 92097 42597 ,
Ask | Update | Follow up
Chat Only.
❤️ लक्षात ठेवा
Weight Tells How Much.
Waist Adds Where.
वजन कमी करणं हाच प्रत्येकाचा उद्देश असायला हवा असं नाही.
Waist नियंत्रणात ठेवणं, Muscle टिकवणं आणि Metabolic Health सुधारणं हेही तितकंच महत्त्वाचं.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ महत्त्वाचं: पोटाचा घेर अचानक वाढणं, सूज, पोटदुखी किंवा श्वास लागणं अशी लक्षणं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रत्येक वाढलेला घेर म्हणजे Fat असेलच असं नाही.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#JustForHearts #WaistCircumference #BodyComposition #MetabolicHealth
📖 Prefer reading in English? This post is also available in English in the Just For Hearts App.
थोडं चाललं की पोटऱ्या दुखतात…
थांबलं की बरं वाटतं. हे फक्त वयामुळे?
OPD मध्ये अनेकजण सांगतात
“Doctor, चालायला सुरुवात केली की काही त्रास नसतो.”
“पण थोड्या अंतरानंतर पोटऱ्या भरून येतात, दुखायला लागतात.”
“दोन मिनिटं थांबलो की बरं वाटतं… पुन्हा चालता येतं.”
बहुतेकांना वाटतं वय झालंय, Calcium कमी असेल किंवा Muscle weakness असेल.
पण इथे एक प्रश्न खूप महत्त्वाचा
“दरवेळी साधारण तेवढंच अंतर चालल्यावर त्रास सुरू होतो का?”
कारण हा pattern कधी पायांच्या रक्तपुरवठ्याबद्दल महत्त्वाचं काही सांगत असतो.
1. चालताना 🦵 दुखतं… थांबल्यावर बरं होतं?
पायांच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या असतील तर चालताना muscles ना पुरेसं रक्त मिळत नाही.
मग पोटऱ्या दुखतात, जड होतात किंवा घट्ट झाल्यासारख्या वाटतात.
थोडं थांबल्यावर आराम मिळतो.
याला PAD (Peripheral Artery Disease) म्हणतात , म्हणजे पायांच्या रक्तवाहिन्या अरुंद होण्याचा आजार.
2. पाय दुखतोय… पण Heart ❤️ चा काय संबंध?
Heart च्या रक्तवाहिन्यांमध्ये blockage होण्याची जी प्रक्रिया असते, तीच पायांच्या रक्तवाहिन्यांमध्येही होऊ शकते.
विशेषतः Diabetes, BP, Cholesterol, Smoking किंवा Kidney disease असलेल्या व्यक्तींमध्ये.
म्हणून कधी पोटरीचं दुखणं हा केवळ पायाचा प्रश्न नसतो , तो संपूर्ण रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचा clue असतो.
3. पण प्रत्येक पोटरीदुखी म्हणजे blockage नाही.
Muscle cramps, जास्त Walking, सांध्यांचा किंवा पाठीच्या मणक्यांचा त्रास यामुळेही पाय दुखू शकतात.
पण फरक लक्षात घ्या
ठरावीक अंतर चालल्यावर दुखणं आणि उभं राहून थांबल्यावर आराम - रक्तपुरवठ्याचा प्रश्न असू शकतो.
बसल्यावर किंवा पुढे वाकल्यावर अधिक आराम हा कधी पाठीच्या nerves चा त्रास असू शकतो.
साधे muscle cramps अनेकदा अचानक, अनियमितपणे किंवा विश्रांतीतही येऊ शकतात.
दुखण्याची वेळ आणि त्याचा pattern कारण शोधायला मदत करतो.
4. मग तपासणी कशी करतात?
डॉक्टर पायांचा रक्तपुरवठा आणि रक्तवाहिन्यांचे ठोके तपासतात.
गरजेनुसार हाताचा आणि घोट्याजवळचा BP तुलना करणारी साधी तपासणी (ABI) किंवा Leg Doppler करता येतो.
प्रत्येकाला Angiography आवश्यक नसते.
5. मग Walking 🚶 बंद करायचं?
नेहमीच नाही.
योग्य diagnosis आणि treatment नंतर नियोजित Walking exercise मुळे चालण्याची क्षमता सुधारू शकते.
पण दुखत असतानाही जबरदस्तीने Steps पूर्ण करू नका.
6. कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष ⚠️ नको?
विश्रांतीतही पाय दुखणं, बोटांवरील जखम न भरणं किंवा पायाचा रंग बदलणं यासाठी लवकर तपासणी आवश्यक.
पाय अचानक खूप दुखणं, थंड किंवा बधिर होणं ही Emergency असू शकते.
आजपासून तीन गोष्टी observe करा ✅
किती अंतर चालल्यावर दुखतं?
थांबल्यावर किती वेळात बरं वाटतं?
पूर्वीपेक्षा कमी अंतरात त्रास सुरू होतोय का?
हा pattern वारंवार दिसत असेल तर एकदा योग्य clinical तपासणी करून घ्या.
तुम्हाला किंवा घरातील व्यक्तीला चालताना पोटऱ्या दुखतात, थांबल्यावर बरं वाटतं किंवा Diabetes असून चालण्याची क्षमता कमी झाली आहे?
JFH ONE: 92097 42597 ,
WhatsApp Chat Only.
तुमचा प्रश्न विचारा. Muscle चा त्रास आहे की पायांचा रक्तपुरवठा तपासायला हवा, याची योग्य पुढची दिशा सांगू.
एकाच अंतरावर वारंवार पाय दुखायला लागणं हा योगायोग नसू शकतो.
कधी शरीर चालण्याची मर्यादा दाखवत असतं आणि त्यामागे रक्तपुरवठ्याचा प्रश्न असू शकतो.
आजचा Just For Hearts नियम
पाय दुखतो म्हणून Walking थांबवण्याची घाई नको.
पण प्रत्येक वेळी त्याच अंतरावर दुखत असेल, तर कारण शोधायला उशीरही नको.
📲 Just For Hearts App मध्ये Steps नोंदवा. Step count सोबत तुमची चालण्याची क्षमता कमी होतेय का, हेही लक्षात ठेवा. त्रास होत असेल तर केवळ Step target पूर्ण करण्यासाठी चालू नका.
Observe the Pattern.
Change the Course.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI
Sr Consultant Physician & Cardiologist
Just For Hearts
#LegPain #HeartHealth #VascularHealth #JustForHearts
काल OPD मध्ये 26 वर्षांचा एक तरुण.
US Stock market trading करतो.
रात्रभर screen समोर.
Weight 136 kg.
तो viral fever साठी आला होता.
Routine discussion मध्ये exercise बद्दल विचारलं.
म्हणाला
“Doctor, walk सुरू करायचा प्रयत्न करतो… पण 5 मिनिटं चाललो की chest pain वाटतं.”
मग?
“Google करतो. Heart attack सारखं काहीतरी दिसतं… मग walk बंद करतो.”
काही दिवस पुन्हा बसून काम.
पुन्हा walk सुरू करण्याचा विचार.
पुन्हा थोडं discomfort.
पुन्हा Google.
आणि cycle तिथेच.
आई-वडील सोबत होते.
आईचा मात्र वेगळाच concern होता
“Doctor, गेल्या काही आठवड्यांत याचं 5 किलो वजन कमी झालंय… मला त्याची काळजी वाटते.”
त्या क्षणी मला एक गोष्ट खूप स्पष्ट दिसली.
136 kg त्यांच्या नजरेला आता problem राहिलं नव्हतं.
5 kg कमी होणं problem वाटत होतं.
25 वर्षांच्या practice मध्ये वारंवार जाणवलेली ही एक मोठी गोष्ट आहे
मानव शरीरापेक्षा आधी मन adaptation करतं.
एखादी unhealthy गोष्ट वर्षानुवर्षं राहिली की ती आपल्याला परिचित होते.
आणि परिचित गोष्ट हळूहळू acceptable वाटू लागते.
थोडं जास्त वजन.
थोडं कमी चालणं.
थोडा जास्त screen time.
थोडं जास्त खाणं.
थोडी कमी stamina.
एकेक गोष्ट वेगळी पाहिली तर फार मोठी वाटत नाही.
पण त्या सगळ्या मिळून कधी lifestyle तयार होतं… आणि lifestyle हळूहळू risk बनतं.
Parents चं प्रेम खरं असतं.
Concern ही खरं असते.
पण कधी कधी आपण आपल्या माणसाला discomfort पासून वाचवताना change पासूनही वाचवत असतो.
त्या तरुणाला फक्त “weight कमी कर” एवढं सांगणं पुरेसं नव्हतं.
त्याला आणि त्याच्या कुटुंबाला हे समजणं जास्त महत्त्वाचं होतं
Change सुरुवातीला uncomfortable वाटतो.
पण familiar असलेली प्रत्येक गोष्ट healthy असतेच असं नाही.
कधी कधी आपण आजाराला नाही,
तर त्याच्याशी जुळवून घेतलेल्या आयुष्याला normal मानायला लागतो.
आणि मग खरा प्रश्न weight चा राहत नाही.
तो असा होतो
आपण आपल्या आयुष्यात नेमकं काय फक्त “खूप दिवसांपासून असंच आहे” म्हणून Normal मानायला लागलो आहोत?
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
#PatientStories #JustForHearts
रोज 10,000 Steps पूर्ण होतात…
मग 30 मिनिटं Brisk Walking वेगळं का? 🤔
“ मी रोज 10,000 Steps चालतो. तरी तुम्ही Brisk Walking करायला का सांगता? Steps पूर्ण झाले की Exercise झाली ना?”
हा प्रश्न अनेक Active लोकांच्या मनात असतो.
कारण आपण किती चाललो आणि चालताना शरीराला किती Effort द्यावा लागला, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
दोन्ही महत्त्वाच्या. पण त्यातून शरीराला मिळणारा फायदा नेहमी सारखा नसतो.
1 Steps नेमकं काय सांगतात?
Steps म्हणजे दिवसभरातील आपल्या हालचालीचं प्रमाण -Activity Volume.
घरात, ऑफिसमध्ये, बाजारात किंवा Walking करताना Steps जमा होतात.
यामुळे निष्क्रिय वेळ कमी होतो, ऊर्जा खर्च होते आणि Metabolic Health ला फायदा होऊ शकतो.
2025 मधील एका मोठ्या Scientific Review नुसार, रोज सुमारे 7,000 Steps चालण्याचा अनेक चांगल्या आरोग्यपरिणामांशी संबंध आढळतो.
म्हणजे 10,000 Steps हा प्रत्येकासाठी अनिवार्य किंवा जादुई आकडा नाही!
2 मग Brisk Walking मध्ये वेगळं काय?
Brisk Walking मध्ये केवळ Steps वाढत नाहीत, तर शरीराला थोडा अधिक Effort द्यावा लागतो.
❤️ Heart Rate आणि श्वासोच्छ्वास वाढतात.
🫁 Heart आणि Lungs अधिक काम करतात.
💪 Muscles ना नियमित Aerobic Challenge मिळतं.
अशा Moderate-Intensity Activity मुळे कालांतराने Cardiorespiratory Fitness सुधारू शकते.
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट
तुमच्या 10,000 Steps मध्ये आधीच 30 मिनिटं Brisk Walking असेल, तर वेगळी 30 मिनिटं चालण्याची गरज असेलच असं नाही!
प्रश्न Steps विरुद्ध Brisk Walking असा नाही. तुमच्या Steps मध्ये योग्य Intensity किती आहे, हा आहे.
3 Brisk म्हणजे नेमकं किती Fast?
प्रत्येकाची Fitness वेगळी. त्यामुळे सर्वांसाठी एकच Walking Speed योग्य नसते.
एक सोपी पद्धत म्हणजे Talk Test.
✅ चालताना श्वास थोडा वेगवान होतो.
✅ बोलता येतं, पण सहज गाणं म्हणता येत नाही.
✅ Effort जाणवतो, पण असामान्य धाप लागत नाही.
हे अनेकांसाठी Moderate Intensity चं व्यावहारिक लक्षण आहे.
विशेषतः Heart Disease असलेल्या किंवा Beta-blockers घेणाऱ्या व्यक्तींमध्ये Pulse वरूनच Exercise Intensity ठरवू नये. Talk Test, जाणवणारा Effort आणि वैयक्तिक वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा.
4 मग Fitness साठी नेमकं काय आवश्यक?
WHO Guidelines नुसार बहुतांश प्रौढांसाठी
🔹 आठवड्याला 150–300 मिनिटं Moderate-Intensity Aerobic Activity.
🔹 आठवड्यातून किमान 2 दिवस Strength Training.
🔹 दिवसभर जास्त वेळ बसून राहणं कमी करणं.
इथे तीन गोष्टी लक्षात ठेवा
Steps = किती हालचाल झाली.
Intensity = किती Effort लागला.
Fitness = सातत्यपूर्ण Training मुळे विकसित होणारी शारीरिक क्षमता.
तिन्ही महत्त्वाच्या आहेत.
एक दुसऱ्याची पूर्ण जागा घेत नाही.
5 पुढील 7 दिवस एक छोटा प्रयोग करा! 📱
तुमचं नेहमीचं Walking सुरू ठेवा. फक्त रोज दोन गोष्टी पाहा.
✅ Total Steps -दिवसभरात किती चाललात?
✅ Brisk Minutes - त्यापैकी किती मिनिटं Moderate Effort झाला?
दोन्ही नोंदी Just For Hearts App मधील Steps आणि Exercise Trackers मध्ये करा.
App आधीच आहे? आजची Entry करा. नवीन असाल, तरी सुरुवात करण्यासाठी Premium आवश्यक नाही बरं का!
Brisk Walking ची सवय नसेल तर सुरुवातीला 10–15 मिनिटंही पुरेशी चांगली सुरुवात ठरू शकते. सुरक्षितपणे हळूहळू वाढवा.
7 दिवसांनी स्वतःला विचारा
① Steps भरपूर असूनही Brisk Minutes कमी आहेत का?
② कमी Steps असलेल्या दिवशीही चांगला Aerobic Effort झाला का?
③ चालताना Effort कसा जाणवतो आणि कालांतराने तो बदलतोय का?
एका आठवड्यात Fitness बदललीच पाहिजे असं नाही. पण आपल्या Activity मधला फरक समजायला सुरुवात होईल.
Walking करताना Pulse किती असावा, Brisk Walking सुरक्षित आहे का, किंवा Heart Disease, Diabetes, Joint Pain असल्यास Exercise कसं ठरवावं?
तुमच्या नोंदींसह असे प्रश्न विचारा. App Tracking साठी मदत हवी असल्यासही
📱 JFH ONE: 92097 42597
WhatsApp Chat Only.
❤️ Steps Show How Much You Move. Intensity Shows How Hard You Work.
10,000 Steps आणि 30 मिनिटं Brisk Walking हे एकमेकांचे पर्याय किंवा प्रतिस्पर्धी नाहीत.
दिवसभर अधिक चाला. त्यात स्वतःच्या क्षमतेनुसार Brisk Effort ठेवा. Muscle Strength वरही काम करा.
कारण आरोग्यासाठी फक्त Steps चा आकडा नाही, तर कालांतराने शरीराची कार्यक्षमता सुधारणंही महत्त्वाचं.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ व्यायामात छातीत दुखणं, चक्कर, असामान्य धाप असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार Exercise ठरवा.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
#JustForHearts #Walking #Metabolism
2 दिवस झाले ,
काही गोष्टी मनातून सहज जात नाहीत.
त्या retired school teacher होत्या.
Heart Failure clinic मधील patient
Low EF 20 % वर regular treatment सुरू होतं.
Otherwise त्या व्यवस्थित होत्या.
अचानक एक दिवस त्यांनी ठरवलं
“धायरी , पुण्यातलं जुनं घर एकदा पाहून यावं.”
ते घर त्यांनी 20–25 वर्षांपूर्वी घेतलं होतं.
विशेष कारण नव्हतं.
फक्त somehow त्यांना वाटलं
घर पाहावं, आसपास राहणाऱ्या नातेवाईकांना भेटावं…
आणि कदाचित ते घर विकून टाकावं.
कारण त्यांच्या मनात एक विचार आला होता
“पुन्हा कधी तिकडे जाणं होईल की नाही, माहित नाही.”
दोन-तीन दिवस travel
आणि थोडी धावपळ झाली.
काही दिवसांनी त्या OPD मध्ये आल्या
अचानक वाढलेला दम,
weakness, fatigue…
पूर्ण exhausted.
तपासणीत pneumonia दिसला.
Admission झालं.
आजाराची तीव्रता जास्त ,
ICU मध्ये treatment चालू
पुढच्या 2–3 दिवसांत
condition वेगाने deteriorate झाली.
आणि शेवटी त्या गेल्या.
25 वर्षांच्या practice मध्ये गंभीर patients पाहणे हे आता नेहमीचेच .
Reports समजतात.
Complications समजतात.
Disease progression समजते.
पण काही गोष्टी समजूनही समजत नाहीत.
इतक्या वर्षांनी त्या घराकडे का ओढल्या गेल्या?
तोच काळ का?
आणि तोच विचार का
“पुन्हा कधी तिकडे जाणं होईल की नाही…”
कदाचित योगायोग.
कदाचित काहीच नाही.
Rounds संपतात.
Reports बंद होतात.
पुढचा patient येतो.
पण काही stories तिथेच थांबत नाहीत.
त्या मनात राहतात.
आणि एक प्रश्न सोडून जातात
आपल्याला खरंच कधी कळतं का…
कोणती भेट शेवटची ठरणार आहे?
#PatientStories #JustForHearts
रोज 8–10 हजार Steps होतात…
तरी Weight कमी का होत नाही?
OPD मध्ये अनेकजण सांगतात
“Doctor, रोज 45 मिनिटं Walking करतो.”
“Steps पण 10,000 होतात.”
“पण तीन महिन्यांपासून Weight तसंच आहे!”
Walking नियमित आहे, हे उत्तम. पण 10,000 Steps म्हणजे Weight loss ची guarantee नाही.
मग नेमकं कुठे चुकतं?
1. Walking वाढलं… पण खाणंही 🍽️ वाढलं!
Walking नंतर चहा-बिस्किटं, थोडे snacks, मोठे portions किंवा weekend ला जास्त खाणं.
चालण्यात खर्च झालेल्या Calories नकळत परत मिळतात.
Healthy food सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर Weight कमी होणार नाही.
2. सकाळी 45 मिनिटं Walking 🚶… बाकी दिवस बसून?
सकाळचे 5,000 Steps आणि दिवसभर खुर्चीत बसणं
यामुळे एकूण Activity कमी राहू शकते.
Morning Walk चांगला. पण दिवसभराची हालचालही महत्त्वाची.
3. Steps जास्त… पण Walking चा Pace ⏱️ किती?
10,000 Steps हळूहळू चालणं आणि त्यातील काही वेळ Brisk Walking करणं यांचा शरीरावर होणारा परिणाम वेगळा असतो.
थोडा श्वास वाढेल, पण बोलता येईल इतका Pace अनेकांसाठी योग्य असतो.
मात्र प्रत्येकाला वेग वाढवणं आवश्यक किंवा सुरक्षित असेलच असं नाही.
4. Walking आहे… पण Muscle 💪 साठी काय करता?
Walking उत्तम आहे. पण Fat कमी करताना Muscle टिकवणंही महत्त्वाचं.
आठवड्यातून 2–3 दिवस क्षमतेनुसार Strength Training आणि पुरेसं Protein उपयोगी ठरू शकतं.
Weight कमी होण्याबरोबर शरीराची ताकदही टिकली पाहिजे.
5. Sleep 😴 कमी… Weekend routine वेगळं?
कमी झोपेमुळे भूक आणि cravings वाढू शकतात.
पाच दिवस Walking आणि diet चांगला, पण weekend ला जास्त खाणं
Weight loss हा एका दिवसाचा नाही, पूर्ण आठवड्याच्या सवयींचा परिणाम असतो.
6. Weight तसंच आहे… पण Waist कमी होतेय?
कधी Fat कमी होत असतानाही Weight काही काळ स्थिर राहू शकतं.
म्हणून Waist, Strength आणि कपड्यांचा फिटही लक्षात घ्या.
सातत्यपूर्ण प्रयत्न असूनही बदल होत नसेल तर medicines, Thyroid किंवा इतर कारणांचाही review उपयोगी ठरतो.
मग उद्यापासून नेमकं काय बदलायचं?
✅ Walking बंद करू नका.
✅ दर तासाला थोडी हालचाल वाढवा.
✅ क्षमतेनुसार Walking चा Pace सुधारा.
✅ Walking नंतरचं अनावश्यक खाणं लक्षात घ्या.
✅ Step count बरोबर त्यातील किती Steps Brisk Walking चे आहेत, हेही पाहा.
आता एक छोटा 14-Day Challenge!
📲 Just For Hearts App मध्ये आजच तुमचा Step Count नोंदवा.
पुढचे 14 दिवस किती Steps होतात, किती नियमित चालता आणि Walking चा Pace कसा आहे हे observe करा.
App download केले आहे?
आजची Steps entry करा.
Walking नियमित असूनही Weight कमी होत नाही? Steps किती ठेवायचे किंवा Pace कसा वाढवायचा, याबद्दल प्रश्न आहे?
📱 JFH ONE: 92097 42597 ,
Chat Only.
तुमचा प्रश्न विचारा; तुमच्या Walking routine मध्ये योग्य बदल कसे करायचे, याची दिशा सांगू.
आजचा Just For Hearts नियम
Walking करून Weight कमी झालं नाही म्हणजे Walking वाया गेलं असे नाही.
पण Steps पूर्ण करणं आणि Weight loss साठी योग्य routine तयार करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
Observe the Pattern.
Change the Course.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#Walking #StepCount #WeightLoss #JustForHearts
शनिवार-रविवार आराम केला… तरी सोमवारी Sugar, BP किंवा Weight का वाढतं? 🤔
Weekend Metabolic Drift
आपल्या शरीरात नेमकं काय बदलतं?
“डॉक्टर, आठवडाभर Diet आणि Walking व्यवस्थित असतं. पण सोमवारी Sugar थोडी जास्त, Weight वाढलेलं आणि शरीरही जड वाटतं. दोन दिवसांत एवढा फरक कसा पडतो?”
हा अनुभव अनेकांचा असेल!
Weekend ला आपण आराम करतो. पण नकळत जेवण, झोप, Activity आणि औषधांच्या वेळाही बदलतात.
यालाच आपण Weekend Metabolic Drift म्हणू शकतो , म्हणजे सुट्टीच्या दिवसांत नियमित Metabolic Habits पासून थोडं दूर जाणं.
पण सोमवारची Reading बदलली म्हणजे दोन दिवसांत आरोग्य बिघडलं, असं नाही!
1️⃣ Weekend मध्ये नेमकं काय बदलतं?
🔹 Meal Pattern: उशिरा नाश्ता, बाहेरचं Dinner, मोठे Portions किंवा रात्रीचं Snacking.
🔹 Activity: आठवडाभर Walking व्यवस्थित; पण Weekend ला जास्त वेळ बसून राहणं.
🔹 Sleep: उशिरा झोपणं, उशिरा उठणं आणि नियमित Sleep Timing बदलणं.
🔹 Food, Drinks & Routine: जास्त Salt, Calories, Alcohol किंवा औषधांची वेळ चुकणं.
एकेक बदल छोटा वाटतो. पण अनेक बदल एकत्र झाले की शरीराच्या Glucose, BP आणि Fluid Balance वर परिणाम होऊ शकतो.
2️⃣ मग सोमवारी कोणते बदल दिसू शकतात?
🍚 Sugar थोडी जास्त
मोठं Carbohydrate-rich Dinner, कमी Activity किंवा अपुरी झोप यामुळे पुढच्या दिवशी Glucose Response बदलू शकतो.
⚖️ Weight अचानक 1 किलो वाढणं
हा संपूर्ण 1 किलो Fat वाढला, असं नाही!
जास्त Salt आणि Carbohydrates मुळे शरीरात तात्पुरतं पाणी साठू शकतं. त्यामुळे Weight वाढलेलं दिसू शकतं.
❤️ BP जास्त येणं
जास्त Salt, Alcohol, अपुरी झोप किंवा औषधांची वेळ चुकणं यांचा BP वर परिणाम होऊ शकतो.
😴 थकवा आणि जडपणा
Weekend ला झोपण्याची व उठण्याची वेळ खूप बदलली तर शरीराच्या Biological Clock मध्ये विसंगती निर्माण होऊ शकते. याला Social Jetlag म्हणतात.
3️⃣ पण Monday Report चा अर्थ लावताना एक चूक टाळा!
प्रत्येक Report वर Weekend चा सारखाच परिणाम होत नाही.
🔸 Fasting Sugar आणि BP: अलीकडच्या सवयींचा परिणाम दिसू शकतो.
🔸 Weight: Water Retention आणि प्रत्यक्ष Fat Gain यामध्ये फरक असतो.
🔸 HbA1c: दोन दिवसांत झालेला बदल दाखवत नाही; मागील साधारण 2–3 महिन्यांचा Average दर्शवतं.
🔸 Lipid Profile किंवा Liver Tests: अनेक घटकांचा परिणाम असतो. एका Weekend वरून निष्कर्ष काढू नये.
Monday Reading हा एक Clue असू शकतो; संपूर्ण Metabolic Health चा निकाल नाही!
4️⃣ मग Weekend पूर्णपणे Strict ठेवायचा?
अजिबात नाही!
Family Dinner, प्रवास, बाहेरचं खाणं आणि आराम हे आयुष्याचे भाग आहेत.
माझ्या मते प्रत्येक गोष्ट Control करण्यापेक्षा काही महत्त्वाच्या सवयींचं सातत्य टिकवणं अधिक व्यवहार्य आहे.
✅ झोपण्याची आणि उठण्याची वेळ फार बदलू देऊ नका.
✅ जेवणानंतर थोडं चाला; दिवसभर बसून राहू नका.
✅ बाहेर जेवताना Portions आणि Salt कडे लक्ष द्या.
✅ औषधांची वेळ नियमित ठेवा.
Weekend Enjoy करा… पण सोमवारपासून पुन्हा सगळं नव्याने सुरू करण्याची वेळ येऊ देऊ नका! 😊
5️⃣ पुढील दोन Weekends एक छोटा प्रयोग करा! 📱
शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांत
✅ Just For Hearts App मध्ये Steps, Sleep आणि Weight नोंदवा.
✅ BP किंवा Sugar Monitoring सुरू असेल, तर नेहमीच्या सूचनेनुसार त्याच्याही Readings नोंदवा.
✅ बाहेरचं जेवण, उशिराची झोप किंवा Activity कमी झाली असेल, तर त्याचीही छोटी नोंद ठेवा.
दोन Weekends नंतर स्वतःला तीन प्रश्न विचारा
① Weekend ला Steps कमी होतात का?
② Sleep Timing बदलल्यावर सोमवारचा थकवा किंवा BP वेगळा दिसतो का?
③ Weight किंवा Sugar मध्ये दर सोमवारी सारखाच बदल दिसतो का?
एका सोमवारवरून निष्कर्ष काढू नका. पण वारंवार दिसणारा Pattern लक्षात घ्या.
अशा नोंदींमधून तुमच्या Monday Readings मागचा संदर्भ समजायला मदत होऊ शकते.
तुमच्या Sugar, BP किंवा Weight मधील बदलांबद्दल प्रश्न असतील, किंवा App मध्ये Tracking करताना मदत हवी असेल, तर नोंदींसह विचारा
📱 JFH ONE: 92097 42597
Chat Only.
प्रश्न विचारा. योग्य पुढची पायरी आम्ही सांगू.
आरोग्यासाठी Weekend सोडून द्यायची गरज नाही. पण Weekend आणि Weekday यांच्यात आपल्या सवयी किती बदलतात, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ महत्त्वाचं: Sugar/BP वारंवार जास्त असल्यास किंवा अचानक वजनवाढीसोबत सूज, धाप लागणं अशी लक्षणं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधं स्वतःहून बदलू नका.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Consultant Physician & Cardiologist
#JustForHearts #MetabolicHealth #WeekendHabits
Fasting Sugar ठीक… पण जेवणानंतर Sugar जास्त! Early Warning की Normal Variation? 🤔
“डॉक्टर, माझी Fasting Sugar 94 आहे. पण जेवणानंतर कधी 165, तर कधी 195 येते. मग माझी Sugar Control मध्ये आहे की नाही?”
हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
कारण Fasting Sugar Normal असणं म्हणजे जेवणानंतर शरीर Glucose योग्य प्रकारे हाताळतंय, असं नेहमीच नाही!
Fasting आणि Post-meal Sugar एकाच Metabolic System च्या दोन वेगळ्या बाजू दाखवतात.
1️⃣ Fasting Normal असूनही Post-meal Sugar का वाढते?
उपाशीपोटी Liver रक्तात Glucose सोडत असतो आणि Insulin त्याचं नियमन करतं.
पण जेवणानंतर परिस्थिती बदलते.
🔹 Carbohydrates मधून Glucose रक्तात येतं.
🔹 Pancreas मधून Insulin चा प्रतिसाद मिळतो.
🔹 Muscles आणि इतर Tissues Glucose वापरतात.
या प्रक्रियेत Insulin चा सुरुवातीचा प्रतिसाद कमी झाला किंवा Insulin Resistance वाढली, तर Fasting Normal असूनही Post-meal Sugar जास्त दिसू शकते.
काही व्यक्तींमध्ये हा Metabolic Dysfunction चा सुरुवातीचा संकेत असू शकतो.
2️⃣ प्रत्येक Sugar Spike धोकादायक असतो का?
नाही!
जेवणानंतर Sugar वाढणं नैसर्गिक आहे.
पण किती वाढते, किती वेळ वाढलेली राहते आणि वारंवार तसंच घडतं का, हे महत्त्वाचं.
आधीपासून Diabetes असलेल्या बहुतांश प्रौढांसाठी जेवण सुरू केल्यानंतर 1–2 तासांनी Sugar साधारण 180 mg/dL पेक्षा कमी ठेवण्याचं लक्ष्य असतं. मात्र ते व्यक्तीनुसार बदलतं.
एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या
घरच्या जेवणानंतरची Sugar आणि Lab मधील 75 g OGTT या वेगळ्या चाचण्या आहेत.
त्यांचे Cutoffs एकसारखे लावून Prediabetes किंवा Diabetes ठरवू नये.
3️⃣ मग कोणत्या Pattern कडे लक्ष द्यायचं?
माझ्या दृष्टीने तीन गोष्टी महत्त्वाच्या
🔸 Meal Effect: भात-पोळीचं प्रमाण, गोड पेयं, Fibre आणि Protein बदलल्यावर Sugar किती बदलते?
🔸 Muscle Effect: जेवणानंतर बराच वेळ बसून राहिल्यावर आणि थोडं चालल्यावर काही फरक दिसतो का?
🔸 Metabolic Effect: जवळपास सारखंच जेवण असूनही वारंवार Sugar जास्त राहते का?
विशेषतः पोटाभोवती चरबी, Fatty Liver, वाढलेलं HbA1c किंवा Diabetes चा Family History असेल, तर हा Pattern अधिक महत्त्वाचा ठरतो.
म्हणजे प्रश्न फक्त काय खाल्लं हा नाही… शरीराने त्या जेवणाला कसा प्रतिसाद दिला, हाही आहे!
4️⃣ HbA1c ठीक असेल, तरी काळजी करायची का?
HbA1c साधारण मागील 2–3 महिन्यांतील Average Glucose दर्शवतं.
पण Average चांगला असूनही काही वेळा जेवणानंतर Sugar वाढलेली असू शकते.
म्हणून केवळ एका आकड्यावर निर्णय न घेता Fasting, Post-meal, HbA1c आणि Metabolic Risk एकत्र पाहणं महत्त्वाचं.
गरजेनुसार OGTT सारखी तपासणी उपयोगी ठरू शकते.
5️⃣ पुढील 7 दिवस एक छोटा प्रयोग करा! 📱
सर्वांनी रोज Sugar तपासण्याची गरज नाही. पण Diabetes असेल किंवा डॉक्टरांनी Home Monitoring सुचवलं असेल, तर काही निवडक जेवणांचा Pattern पाहा.
✅ जेवणाची वेळ आणि काय खाल्लं ते नोंदवा.
✅ जेवणाच्या पहिल्या घासापासून 2 तासांनी Sugar मोजा.
✅ Just For Hearts App मध्ये Sugar Readings नोंदवा. त्यासोबत Steps किंवा Exercise च्याही नोंदी ठेवा.
आणि हो… App वापरायला Premium घ्यावंच लागतं असं नाही बरं का! 😊 आधी नोंदी सुरू करा. स्वतःचा Pattern समजून घ्या.
शारीरिकदृष्ट्या सुरक्षित असेल तर जेवणानंतर 10–15 मिनिटं हलकं चालण्याची सवयही सुरू करा.
7 दिवसांनी स्वतःला तीन प्रश्न विचारा
① कोणत्या जेवणानंतर Sugar वारंवार जास्त दिसते?
② जेवणानंतर चालण्याचा काही सकारात्मक फरक दिसतो का?
③ Fasting ठीक असूनही Post-meal Sugar सातत्याने जास्त राहते का?
एका-दोन Readings वरून निष्कर्ष काढू नका. पण वारंवार दिसणारा Pattern दुर्लक्षितही करू नका.
तुमच्या Sugar Readings चा अर्थ समजून घ्यायचा असेल, HbA1c किंवा OGTT ची गरज जाणून घ्यायची असेल, किंवा App मध्ये Tracking करताना मदत हवी असेल, तर नोंदींसह प्रश्न विचारा.
📱 JFH ONE: 92097 42597
Chat Only.
❤️ लक्षात ठेवा
“Fasting Sugar Shows the Baseline. Post-meal Sugar Reveals the Response.”
Sugar Control म्हणजे फक्त उपाशीपोटी चांगला आकडा मिळवणं नाही.
आपलं शरीर जेवणानंतर Glucose कसं हाताळतं, हे समजणं तितकंच महत्त्वाचं.
Observe the Pattern.
Change the Course.
⚠️ महत्त्वाचं: Sugar वारंवार जास्त येत असल्यास किंवा तहान, वारंवार लघवी, वजन घटणं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधं स्वतःहून बदलू नका
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#JustForHearts #PostMealSugar #DiabetesCare #MetabolicHealth
सकाळी BP जास्त… Pulse Normal… पण झोप नीट नाही! 🤔
या तीन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का?
“डॉक्टर, सकाळी BP 150/92 असतो. Pulse मात्र 68–72 असतो. दिवसभरात BP कमी होतो. पण रात्री झोप नीट लागत नाही.”
अशा वेळी पहिला विचार काय करायचा?
औषधांचा प्रभाव कमी पडतोय? झोपेचा परिणाम आहे? की रात्रीही BP जास्त राहतोय?
एकाच Reading वरून उत्तर मिळत नाही. संपूर्ण Pattern समजून घ्यावा लागतो.
1️⃣ सकाळी BP वाढतोच का?
झोपेतून जागं होताना शरीरातील Hormones आणि Sympathetic Nervous System च्या Activity मध्ये बदल होतात. त्यामुळे BP नैसर्गिकरीत्या वाढू शकतो.
पण दोन परिस्थिती वेगळ्या आहेत
🔹 रात्री BP कमी होतो आणि सकाळी वाढतो (Morning BP Surge).
🔹 रात्रीही BP जास्त राहतो आणि सकाळी तसाच दिसतो (Nocturnal Hypertension).
सकाळची Reading सारखी असली तरी त्यामागचं कारण वेगळं असू शकतं.
2️⃣ Pulse Normal म्हणजे सगळं ठीक?
असं नाही!
Pulse 68–72 असणं सामान्य असू शकतं. पण त्यामुळे BP नियंत्रणात आहे किंवा Stress आणि Sleep चा परिणाम नाही, असं ठरत नाही.
BP वर Heart Rate बरोबरच रक्तवाहिन्यांचा ताण, Hormones, शरीरातील द्रवाचं प्रमाण आणि औषधांचाही परिणाम होतो.
Normal Pulse म्हणजे Normal BP Pattern चा पुरावा नाही.
3️⃣ झोपेबद्दल नेमकं काय विचारायचं?
😴 घोरणं, झोपेत श्वास अडखळणं: Sleep Apnoea ची शक्यता.
🌙 वारंवार जाग येणं, अपुरी झोप: Sleep Fragmentation आणि Stress Response चा परिणाम.
🥱 सकाळी डोकेदुखी, थकवा, दिवसा झोप येणं: Sleep Quality आणि Sleep Apnoea तपासण्याचे महत्त्वाचे संकेत.
विशेषतः Obesity, Diabetes किंवा औषधं घेऊनही BP जास्त राहणाऱ्या व्यक्तींमध्ये हे प्रश्न अधिक महत्त्वाचे ठरतात.
4️⃣ Night-time BP का महत्त्वाचा?
सामान्यतः झोपेत BP दिवसा असलेल्या BP पेक्षा साधारण 10–20% कमी होतो. याला Nocturnal Dipping म्हणतात.
काही व्यक्तींमध्ये ही घट होत नाही (Non-Dipping) किंवा रात्री BP उलट वाढतो (Reverse Dipping).
अशा Patterns चा Cardiovascular Risk शी संबंध आढळतो.
पण घरच्या सकाळ-संध्याकाळच्या Readings वरून रात्रीचा BP समजत नाही.
त्यासाठी गरजेनुसार 24-hour ABPM तपासणी उपयुक्त ठरते.
5️⃣ पुढील 7 दिवस स्वतःचा Pattern पाहा!
✅ सकाळी: उठल्यानंतर थोडं स्थिर होऊन, नाश्ता आणि BP च्या औषधांपूर्वी BP मोजा.
✅ संध्याकाळी: रोज साधारण एकाच वेळी BP मोजा.
प्रत्येक वेळी 5 मिनिटं शांत बसून, योग्य Cuff वापरून, 1 मिनिटाच्या अंतराने दोन Readings घ्या.
✅ Just For Hearts App मध्ये BP आणि Sleep दोन्ही नोंदवा. झोपेचे तास, Quality आणि सकाळी कसं वाटलं, हेही Track करा.
आणि हो… App वापरायला Premium घ्यावंच लागतं असं नाही बरं का! 😊 आधी नोंदी सुरू करा. स्वतःचा Pattern समजून घ्या.
7 दिवसांनी स्वतःला विचारा
① झोप खराब झाली की पुढच्या सकाळी BP वारंवार जास्त असतो का?
② सकाळचा BP संध्याकाळपेक्षा सातत्याने जास्त असतो का?
③ झोप सुधारली तरी BP जास्त राहतोय का?
या नोंदींमधून Clues मिळू शकतात; पण कारण निश्चित ठरत नाही.
तुमच्या BP आणि Sleep Pattern बद्दल शंका असतील, ABPM किंवा Sleep Apnoea तपासणीची गरज समजून घ्यायची असेल, किंवा App Tracking साठी मदत हवी असेल, तर तुमच्या नोंदींसह प्रश्न विचारा.
JFH ONE: 92097 42597,
WhatsApp Chat Only.
❤️ लक्षात ठेवा
“Morning BP is a Reading.
The Overall Pattern Tells the Story.”
सकाळचा BP जास्त दिसला म्हणून लगेच औषध किंवा त्याची वेळ बदलू नका.
आधी Measurement, Medication Timing, Sleep आणि BP Pattern समजून घ्या.
Observe the Pattern.
Change the Course.
महत्त्वाचं: BP वारंवार जास्त येत असल्यास 7 दिवसांची वाट न पाहता डॉक्टरांचा सल्ला घ्या. BP 180/120 किंवा अधिक असल्यास पुन्हा तपासून तातडीने वैद्यकीय मार्गदर्शन घ्या. छातीत दुखणं, श्वास लागणं, अचानक कमजोरी किंवा बोलण्यात बदल असल्यास Emergency Care घ्या.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
25+ Years Clinical Experience
#JustForHearts #MorningBP #SleepHealth #Hypertension
📖 Prefer reading in English? This post is also available in English in the Just For Hearts App.
BP Average ठीक आहे… पण BP सतत वर-खाली होतोय! हे किती महत्त्वाचं? 🤔
“डॉक्टर, माझ्या BP चा Average 128/78 आहे. पण कधी 110/70, कधी 145/90, तर कधी 160/94 येतो!
मग माझा BP खरंच Control मध्ये आहे का?”
हा प्रश्न OPD मध्ये अनेकदा विचारला जातो.
कारण BP चा Average आणि BP Variability (रक्तदाबातील चढ-उतार) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
Average आपल्याला एकूण BP Control सांगतो. पण BP किती बदलतो, कधी बदलतो आणि किती वेळा बदलतो, यामधूनही महत्त्वाची माहिती मिळू शकते.
1️⃣ BP बदलणं नेहमीच धोकादायक नसतं!
आपला BP दिवसभर स्थिर राहत नाही.
चालणं, व्यायाम, मानसिक ताण, झोप, औषधांची वेळ आणि शरीराची Biological Clock यामुळे BP बदलत असतो.
म्हणून एकदा 120 आणि दुसऱ्यांदा 140 आला, म्हणजे लगेच काळजीचं कारण नाही.
पण हा बदल नैसर्गिक आहे की वारंवार अनपेक्षितपणे होतोय, हे महत्त्वाचं!
2️⃣ Average सारखा… पण Risk वेगळी असू शकते!
समजा, दोन व्यक्तींचा Systolic BP Average 130 आहे.
🔹 व्यक्ती A: बहुतेक readings 125–135 दरम्यान.
🔹 व्यक्ती B: कधी 105–110, तर कधी 150–160.
दोघांचा Average सारखा असला तरी दुसऱ्या व्यक्तीच्या BP Pattern कडे अधिक लक्ष देण्याची गरज असू शकते.
संशोधनानुसार जास्त Day-to-Day आणि Visit-to-Visit BP Variability चा Stroke व Cardiovascular Events च्या वाढलेल्या जोखमीशी संबंध आढळतो.
पण लक्षात ठेवा
Variability हा Risk Marker आहे. केवळ चढ-उतार दिसले म्हणून औषध वाढवायचं असं नाही.
3️⃣ Variability कधी अधिक महत्त्वाची ठरते?
🔸 सकाळी BP वारंवार जास्त: औषधांचा 24 तासांचा प्रभाव, Sleep Apnoea किंवा इतर कारणं तपासावी लागू शकतात.
🔸 रात्री BP कमी होत नाही: झोपेत BP पुरेसा कमी न होणं (Non-Dipping) हे वाढलेल्या Cardiovascular Risk शी संबंधित असू शकतं.
🔸 कधी खूप कमी, कधी खूप जास्त: विशेषतः चक्कर, अशक्तपणा किंवा पडण्याची प्रवृत्ती असल्यास कारण तपासणं आवश्यक.
🔸 Diabetes, Kidney Disease, पूर्वीचा Stroke किंवा Heart Disease: अशा व्यक्तींमध्ये BP Pattern अधिक काळजीपूर्वक समजून घ्यावा लागतो.
4️⃣ मग फक्त BP च्या एका Reading वर निर्णय घ्यायचा?
नाही!
सर्वप्रथम BP योग्य पद्धतीने मोजला आहे का, Cuff योग्य आहे का, औषधं नियमित घेतली जातात का आणि Readings मध्ये सातत्याने काही Pattern दिसतोय का, हे तपासायला हवं.
काही रुग्णांमध्ये 24-hour Ambulatory BP Monitoring (ABPM) अधिक उपयुक्त ठरतं. विशेषतः रात्रीचा BP आणि Nocturnal Dipping समजण्यासाठी.
5️⃣ पुढील 7 दिवस स्वतःचा BP Pattern पाहा! 📱
हा एक छोटासा, पण उपयोगी प्रयोग आहे.
✅ सकाळी: नाश्ता आणि BP च्या औषधांपूर्वी BP मोजा.
✅ संध्याकाळी: रोज साधारण एकाच वेळी BP मोजा.
✅ प्रत्येक वेळी 5 मिनिटं शांत बसून, योग्य Cuff वापरून, 1 मिनिटाच्या अंतराने दोन readings घ्या.
✅ दोन्ही Readings Just For Hearts App मध्ये नोंदवा.
“App वापरायला Premium घ्यावंच लागतं असं नाही बरं का! 😊 आधी तुमच्या BP च्या नोंदी सुरू करा. हळूहळू स्वतःचा Pattern समजायला लागेल.”
शक्य झाल्यास औषधांची वेळ, झोप, ताण किंवा चक्कर यांचीही छोटी नोंद ठेवा.
7 दिवसांनी स्वतःला तीन प्रश्न विचारा
① सकाळचा BP संध्याकाळपेक्षा सतत जास्त असतो का?
② काही दिवस BP अनपेक्षितपणे खूप कमी किंवा जास्त होतो का?
③ या बदलांचा झोप, औषधांची वेळ किंवा इतर परिस्थितीशी काही संबंध दिसतो का?
एकाच Reading पेक्षा हा सात दिवसांचा Pattern डॉक्टरांना अधिक उपयुक्त माहिती देऊ शकतो.
आणि त्यानंतरही BP Variability बद्दल शंका असतील, किंवा तुमच्या Readings चा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर तुमचा BP Summary घेऊन आमच्याशी संपर्क करा.
App मध्ये Tracking कसं करायचं, नोंदी कशा ठेवायच्या किंवा इतर कोणतीही मदत हवी असल्यासही
JFH ONE: 92097 42597 ,
Chat Only .
प्रश्न विचारा. योग्य पुढची पायरी आम्ही सांगू.
❤️BP Control म्हणजे फक्त एक चांगला आकडा मिळवणं नाही.
तर योग्य Average, सुरक्षित चढ-उतार आणि दिवसभर पुरेसं BP Control टिकणं महत्त्वाचं आहे.
⚠️ महत्त्वाचं: BP 180/120 किंवा अधिक आल्यास शांत बसून पुन्हा तपासा आणि तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. छातीत दुखणं, श्वास लागणं, बोलण्यात किंवा दृष्टीत अचानक बदल, हात-पायात कमजोरी अशी लक्षणं असल्यास Emergency Care घ्या. औषधं स्वतःहून बदलू नका.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
25+ Years Clinical Experience
#JustForHearts #BloodPressure #BPVariability #HeartHealth
📖 Prefer reading in English? This post is also available in English in the Just For Hearts App.
आता Comments च्या पुढे जाऊया… ❤️
गेल्या वर्षभरात Posts, Videos, Live sessions आणि हजारो Commentsमधून आपण सतत जोडलेलो आहोत.
तुमच्यापैकी अनेकांनी प्रश्न विचारले, अनुभव share केले, स्वतःमध्ये बदल केले आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे अधिक सजगपणे पाहायला सुरुवात केली.
आता त्याच प्रवासाला एक अधिक private, organised आणि continuous जागा मिळाली आहे.
Just For Hearts App मध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे.
App वापरण्यासाठी Premium आवश्यक नाही.
आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर
प्रत्येकालाच Premium ची गरज असेल असं मला वाटत नाही.
अनेक मित्र योग्य माहिती, थोडं guidance आणि स्वतःची शिस्त यावर उत्तम काम करू शकतात.
App मध्ये सगळ्यांसाठी काय आहे?
1️⃣ Metabolic Assessment
दर 3 महिन्यांनी पुन्हा करून progress आणि health ची दिशा पाहता येईल.
2️⃣ 10 Essential Health Trackers
BP, Pulse, Sugar, Weight आणि इतर basic parameters track करून isolated numbersऐवजी trends आणि patterns दिसू लागतील.
3️⃣ Personal Health Questions अधिक private जागेत
General discussion Social Media वर उत्तम आहे.
पण तुमची Sugar, reports, angioplasty, medicines किंवा family history सारखे personal health details open commentsमध्ये लिहिण्यापेक्षा App मधून विचारणं अधिक योग्य.
Clinic room मध्ये जसं health confidential असतं, तसं digital health conversation ही असायला हवं.
4️⃣ जुने Posts + English versions
नवीन followersना मागील useful content एकाच ठिकाणी मिळेल.
5️⃣ Live Sessions, Playlists, Polls, Quiz आणि Puzzles
Health learning अधिक organised, interactive आणि enjoyable ठेवण्यासाठी.
ही basic App journey सगळ्यांसाठी आहे.
Basic Health Trackers कायम free राहतील.
Premium बद्दल मात्र मी पुढच्या postsमध्ये स्पष्टपणे सांगत राहीन
कोणाला खरंच जास्त hand-holding, repeat assessments, closer tracking, प्रत्येक प्रश्नामागचा context, coaching आणि course correction उपयोगी पडू शकतो.
Diabetes, Obesity, BP, Fatty Liver, Heart Disease किंवा इतर chronic health concernsमध्ये हा फरक अधिक महत्त्वाचा ठरू शकतो.
त्या examples मध्ये तुम्हाला स्वतःची situation दिसली, आणि अधिक structured support उपयोगी वाटलं तेव्हाच Premium निवडा.
तोपर्यंत फक्त App वापरा.
Track करा. , Questions विचारा.
Live sessions मध्ये सहभागी व्हा.
दोन्ही journeys equally welcome आहेत. ❤️
📱 Just For Hearts App download करा.
Profile complete करा. Assessment करा. Tracking सुरू करा.
App install, onboarding, WhatsApp Channel link किंवा कोणत्याही शंकेसाठी
📱 JFH ONE: 92097 42597
Chat Only. Happy to help.
ज्यांनी Monthly किंवा Annual Premium Membership निवडलं आहे , त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. ❤️ तुमच्यासाठी पुढच्या 30 दिवसांचा Premium Care Plan App notification आणि WhatsApp Channel वर लवकरच share करणार आहे.
Observe the Pattern.
Change the Course.
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#App #JustForHearts
Sugar control सुधारलं… पण Fatty Liver तसंच! असं का? 🤔
“डॉक्टर, माझं HbA1c आधी 8.2 होतं, आता 6.5 झालं. Sugar छान control मध्ये आहे. पण Sonography मध्ये अजूनही Grade 2 Fatty Liver दिसतंय. मग नेमकं सुधारलं काय?”
हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
कारण Blood Sugar सुधारली म्हणजे संपूर्ण Metabolic Health सुधारलीच, असं नाही!
आपल्या शरीरात Sugar control, Insulin Resistance, Visceral Fat आणि Liver Fat या एकमेकांशी जोडलेल्या, पण वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत.
चला, थोडं खोलात समजून घेऊया.
1️⃣ HbA1c सुधारलं… पण Insulin Resistance?
औषधं, आहारातील बदल किंवा वजन कमी झाल्यामुळे रक्तातील Sugar सुधारू शकते.
पण शरीराला अजूनही जास्त Insulin लागत असेल, तर Metabolic Dysfunction पूर्णपणे सुधारलेलं असेलच असं नाही.
विशेषतः पोटाभोवतीची चरबी आणि Liver मधील Fat वेगळ्या गतीने कमी होऊ शकतात.
2️⃣ Liver हा फक्त Sugar साठवणारा अवयव नाही!
Liver मध्ये Fat तीन प्रमुख मार्गांनी जमा होतं.
🔹 शरीरातील Fat Tissue मधून येणारे Fatty Acids
🔹 जास्त ऊर्जा, विशेषतः अतिरिक्त Calories आणि काही Carbohydrates पासून Liver मध्ये तयार होणारी चरबी
🔹 Liver मधून Fat बाहेर पाठवण्याची आणि वापरण्याची क्षमता
या प्रक्रियांमधील असंतुलन कायम असेल, तर Sugar सुधारूनही Liver Fat टिकू शकतं.
3️⃣ Weight कमी झालं का? Waist कमी झाली का?
हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न!
काही रुग्णांचं HbA1c कमी होतं, पण वजन आणि कंबरेचा घेर फारसा बदलत नाही.
अशावेळी Liver Fat कमी होण्यासाठी आवश्यक असलेले Metabolic Changes पुरेसे झाले नसण्याची शक्यता असते.
संशोधनानुसार, जास्त वजन असलेल्या Fatty Liver रुग्णांमध्ये सातत्याने सुमारे 5% वजन कमी झाल्यास Liver Fat कमी होण्यास मदत होते. 7–10% वजन घटल्यास Liver Inflammation मध्येही अधिक सुधारणा दिसू शकते.
4️⃣ Sonography अजूनही Grade 2 दाखवतेय… म्हणजे काहीच सुधारणा नाही?
तसंही नाही!
Sonography मधील Grade 1, 2, 3 ही ढोबळ वर्गवारी आहे. Liver Fat मधील लहान बदल त्यात नेहमी स्पष्ट दिसतीलच असं नाही.
आणि महत्त्वाचं म्हणजे
Fatty Liver चा Grade आणि Liver Fibrosis (यकृताला आलेली जखम/कडकपणा) हे एकच नाहीत.
ALT/SGPT Normal असलं तरी काही रुग्णांमध्ये Fibrosis असू शकतो.
म्हणून Diabetes, Obesity किंवा इतर Metabolic Risk असलेल्या रुग्णांमध्ये गरजेनुसार FIB-4 Score आणि FibroScan वापरून Fibrosis Risk तपासणं महत्त्वाचं ठरतं.
मग आता नेमकं काय करायचं? 🎯
✅ HbA1c बरोबर Waist आणि Weight चा Trend पाहा. फक्त एक रिपोर्ट नाही, मागील 3–6 महिन्यांतील बदल तपासा.
✅ Diet मध्ये Calories आणि Quality दोन्ही तपासा. गोड पेयं, अतिरिक्त Calories, Refined Carbs आणि Saturated Fat कमी करा.
✅ Aerobic Activity + Strength Training दोन्ही ठेवा. Muscle Health सुधारल्याने Metabolic Health ला मदत होते.
✅ Liver चा Risk स्वतंत्रपणे तपासा. विशेषतः Diabetes अनेक वर्षांपासून असेल, तर Sugar चांगली असूनही Liver Assessment दुर्लक्षित करू नका.
❤️ आजचा Just For Hearts नियम
Sugar Control हा एक चांगला Report आहे. पण Metabolic Recovery ही अनेक अवयवांमध्ये घडणारी प्रक्रिया आहे.
एका आकड्यात झालेली सुधारणा म्हणजे संपूर्ण शरीरातील सुधारणा नव्हे.
Observe the Pattern.
Change the Course.
आपल्या Just For Hearts App मध्ये HbA1c, Weight, Waist आणि Lifestyle Trends एकत्र नोंदवत राहा.
कारण एकाच Report पेक्षा अनेक महिन्यांत दिसणारा Pattern अधिक उपयुक्त ठरतो. Liver ची वैद्यकीय तपासणी मात्र स्वतंत्रपणे आवश्यक आहे.
Sugar सुधारली, पण Fatty Liver कायम आहे? तुमच्या Reports मधील बदलांचा अर्थ समजून घ्यायचा असल्यास
📱 JFH ONE: 92097 42597
WhatsApp Chat Only.
प्रश्न विचारा. योग्य पुढची पायरी आम्ही सांगू.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Specialist in CardioMetabolic Diseases
#JustForHearts #FattyLiver #MetabolicHealth #DiabetesCare
आज एक आनंदाची घोषणा ❤️
Just For Hearts App आता सर्वांसाठी तयार आहे.
गेल्या वर्षभरातील आपला Health Awareness प्रवास आता एका नव्या टप्प्यावर येतोय.
App मध्ये essential Health Trackers, regular health posts, Q&A, Live Videos आणि basic health tools सगळ्यांसाठी उपलब्ध राहतील.
Basic Health Trackers कायम free राहतील.
ज्यांना awareness पासून पुढे जाऊन structured tracking, personalised guidance, coaching आणि continuity हवी आहे, त्यांच्यासाठी JFH Premium Membership उपलब्ध आहे.
Premium बद्दलचा सविस्तर विचार आजच्या attached “1% Letter” मध्ये आहे.
दसऱ्याला Premium members साठी पुढच्या एका महिन्याचा Care Roadmap स्वतंत्रपणे share करणार आहे.
App features, Premium journey आणि पुढचे updates आपल्या WhatsApp Channel वर share करत राहू.
ज्यांनी Premium निवडायचं ठरवलं आहे त्यांनी App download करा, upgrade करा आणि stay tuned.
📱 JFH ONE: 92097 42597
Chat Only.
App, onboarding किंवा WhatsApp Channel link साठी इथेच Message करा.
आणि जे मित्र Social Media वरच आपले regular posts follow करू इच्छितात
तुमच्यासाठी काहीही बदलत नाही. ❤️
Welcome to the Just For Hearts App.
एक नवा chapter आजपासून सुरू होतो.
Observe the Pattern.
Change the Course.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#JustForHearts #HealthApp #HealthTracking #PreventiveHealth #MetabolicHealth
📲 Our Just For Hearts App is Now Live! ❤️
🍎 iPhone / Apple App Store:
bit.ly/4yYR8Py
🤖 Android / Google Play Store:
bit.ly/4zDfUVb
Install करा. Explore करा. Track करा. ❤️
संध्याकाळी पाय जड होतात…
मोज्यांचे वळ / Sock marks उमटतात…
Heart की Kidney चा problem?
OPD मध्ये अनेकजण अगदी सहज सांगतात
“Doctor, सकाळी पाय अगदी ठीक असतात.”
“पण संध्याकाळी घोट्याजवळ सूज येते…”
“मोज्यांचे वळ उमटतात, चप्पल घट्ट वाटते.”
काहींना दिवसभर पाय जड वाटतात. तर काहीजण विचारतात
“Kidney चा problem तर नाही ना? Heart मुळे असेल का?”
खरं तर प्रत्येक सूज म्हणजे मोठा आजार नाही.
पण सूज कधी येते, एका पायाला की दोन्ही पायांना येते आणि कशासोबत येते यावर तिचा अर्थ बदलतो.
1. सकाळी ठीक… संध्याकाळी पाय 🦵 सुजतात?
दिवसभर उभं राहणं, खुर्चीत बसणं, लांबचा प्रवास, कमी हालचाल
यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे पायांच्या खालच्या भागात पाणी साचू शकतं.
गरम हवामान, जास्त वजन किंवा पायांच्या शिरांमधून रक्त वर जाण्याची प्रक्रिया मंद असणं यामुळेही त्रास वाढतो.
रात्री आराम केल्यावर सूज कमी होणं हा एक महत्त्वाचा clue आहे.
2. BP, Pain किंवा Diabetes च्या medicines 💊 चालू आहेत?
Amlodipine सारख्या काही BP गोळ्यांमुळे घोट्याजवळ सूज येऊ शकते.
काही painkillers, steroids किंवा Diabetes ची Pioglitazone सारखी medicine सुद्धा सूज वाढवू शकते.
BP normal आहे, पण पाय सुजतात अशा वेळी medicines बघणंही महत्त्वाचं.
गोळी स्वतःहून बंद करू नका.
3. पाय जड होतात… पण Varicose Veins आहेत का?
पायांवर फुगलेल्या शिरा दिसणं, घोट्याजवळ त्वचा काळवंडणं, दिवसभर उभं राहिल्यावर जडपणा वाढणं
हे Venous Insufficiency (पायातील रक्त वर परत जाण्यात अडचण) याचे संकेत असू शकतात.
इथे प्रश्न नेहमी शरीरात जास्त पाणी असण्याचा नसतो.
म्हणून प्रत्येक सूजेवर लघवी वाढवणारी गोळी हा उपाय नाही.
4. महिलांमध्ये 👩 Hormonal changes चा संबंध?
Periods च्या आसपास, Pregnancy मध्ये किंवा काही hormonal medicines मुळे पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती बदलू शकते.
मात्र Pregnancy मध्ये अचानक सूज वाढणं, तीव्र डोकेदुखी किंवा नजरेत बदल जाणवणं यासाठी तातडीने तपासणी हवी.
5. Heart ❤️, Kidney किंवा Liver चा आजार कधी विचारात घ्यायचा?
दोन्ही पायांना वाढणारी सूज असेल तर कधी त्यामागे मोठा आजारही असू शकतो.
Heart Failure / Dilated Cardiomyopathy (हृदयाची pumping क्षमता कमी होणं) - सूजेसोबत दम लागणं, झोपल्यावर श्वासाचा त्रास किंवा वजन झपाट्याने वाढणं.
Chronic Kidney Disease (मूत्रपिंडांचं काम कमी होणं) - पायांची किंवा चेहऱ्याची सूज, लघवीत बदल; मात्र सुरुवातीला लक्षणं नसू शकतात.
Liver Cirrhosis (दीर्घकाळच्या आजारामुळे यकृतावर व्रण पडणं) - पायांची सूज, पोटात पाणी साचणं. दीर्घकाळ जास्त alcohol घेणं हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं.
रक्तातील Albumin (एक महत्त्वाचं protein) कमी असणंही सूजेचं कारण ठरू शकतं.
म्हणून सूज ही एकच तक्रार असली तरी तिच्यामागची कारणं पूर्णपणे वेगळी असू शकतात.
6. फक्त ⚠️ एका पायाला अचानक सूज आली?
एका पायाला अचानक सूज, दुखणं, लालसरपणा किंवा गरमपणा असेल तर लवकर तपासणी करा.
कधी पायातील रक्तवाहिनीत clot (रक्ताची गाठ) असू शकतो.
अचानक दम लागणं किंवा छातीत दुखणं असेल तर Emergency care घ्या.
7. मग रोज काय करता येईल ✅ ?
🚶 दर तासाला काही मिनिटं चाला. बसल्याजागी घोट्यांची हालचाल करा.
🦵 आराम करताना काही वेळ पाय उंच ठेवा.
🧂 अतिरिक्त मीठ आणि खारट packaged foods कमी करा.
👟 आरामदायक footwear वापरा. दीर्घकाळ एकाच स्थितीत राहणं टाळा.
📝 सूज वारंवार येत असेल तर सकाळ-संध्याकाळचा फरक, वजन आणि BP चा trend नोंदवा.
काहींना Compression stockings उपयोगी पडतात; पण योग्य प्रकार डॉक्टरांच्या सल्ल्याने निवडा.
स्वतःहून Diuretic (लघवी वाढवणारी गोळी) सुरू करू नका किंवा पाणी कमी करू नका. Heart / Kidney / Liver disease असल्यास डॉक्टरांनी दिलेल्या fluid मर्यादा पाळा.
8. तपासण्या 🔍 कधी आवश्यक?
सूज वारंवार येत असेल, टिकून राहत असेल किंवा वाढत असेल तर कारणानुसार Kidney function, Urine protein, Albumin, Liver function , Fasting Insulin आणि Thyroid तपासण्या लागू शकतात.
Heart ची लक्षणं असतील तर ECG / Echo, तर पायांच्या शिरांचा प्रश्न असेल तर Venous Doppler उपयोगी पडतो.
प्रत्येक सूजेसाठी सगळ्या तपासण्या आवश्यक नसतात.
तुमचे पाय संध्याकाळी सुजतात, मोज्यांचे वळ उमटतात, BP ची औषधं चालू आहेत किंवा Heart / Kidney / Liver disease असताना सूज वाढतेय? अशा questions साठी
JFH ONE: 92097 42597
Chat Only .
📲 आता आपला Just For Hearts App Android and IOS वर उपलब्ध आहे.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#HeartHealth #KidneyHealth #JustForHearts
उद्या एक नवीन उपक्रम सुरू होत आहे
गेल्या 15–18 महिन्यांत आपण रोज भेटत आलो , Posts, Videos, Comments, Q&A आणि तुमच्या अनुभवांमधून.
या काळात अनेकांनी अतिशय सुंदर feedback दिला - Diet बदलला, Walking सुरू केली, Weight कमी केलं, Sugar–BP कडे अधिक शिस्तीत पाहायला सुरुवात केली, घरच्यांच्या आरोग्याची जबाबदारी अधिक सजगपणे घेतली.
हे सगळं पाहताना एक गोष्ट वारंवार जाणवली
योग्य माहिती + योग्य वेळी थोडं मार्गदर्शन मिळालं, तर अनेक लोक स्वतःही खूप चांगले बदल करू शकतात.
आणि हे पुढेही सुरूच राहणार आहे.
Health awareness, practical posts, discussions, comments - जे आजवर होत आलंय, त्यात काहीही कमी होणार नाही.
I repeat, nothing changes.
मग App का?
कारण काही मित्र आता आणखी एक पाऊल पुढे जायला तयार आहेत.
मी त्यांना माझे “1% मित्र” म्हणतो
बाकी 99% कमी महत्त्वाचे आहेत म्हणून नाही.
तर हे ते लोक आहेत ज्यांनी मनाशी ठरवलंय
“आता फक्त समजून घ्यायचं नाही; स्वतःच्या आरोग्यावर सातत्याने, structured पद्धतीने काम करायचं आहे.”
अनेक जण हा बदल स्वतःही उत्तम करत आहेत आणि तेही तितकंच महत्त्वाचं आहे.
पण ज्यांना थोडं अधिक tracking, hand-holding, coaching, personalised guidance आणि continuity हवी आहे, त्यांच्यासाठी आता वेगळी व्यवस्था तयार केली आहे.
उद्या, 19 October
मी या सगळ्याबद्दल एक खुलं पत्र share करणार आहे.
त्यात App का तयार केला, पुढचा प्रवास कसा असेल, Premium कोणासाठी आहे आणि सुरुवात कुठून करायची , हे अगदी स्पष्टपणे सांगणार आहे.
एक practical गोष्ट आधीच सांगतो.
आम्ही 8–10 लोकांची lean team आहोत.
Clinic, technology, support आणि onboarding हे सगळं एकत्र सांभाळतो.
म्हणून सुरुवातीच्या काही दिवसांत onboarding करताना थोडा patience ठेवा.
कुठे अडचण आली तर
📱 JFH ONE: 92097 42597 , Chat Only.
हा App, Profile, Premium आणि onboarding साठी आपला primary help channel असेल.
प्रत्येकाला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
App ची प्रत्येक feature explanation Social Media वर रोज टाकणं योग्य वाटत नाही.
ज्यांना खरंच त्या journey बद्दल जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी WhatsApp Channel वर आपण रोज एकेक feature, त्याचा उपयोग आणि पुढची पायरी समजावून सांगू.
Channel link Bio मध्ये आहे , न मिळाल्यास JFH ONE वर फक्त “Channel” असा Message करा.
आणखी एक गोष्ट
काहीजण उद्याच join करतील.
काहीजण थोडं पाहतील, समजून घेतील आणि मग निर्णय घेतील.
दोन्ही योग्य आहेत.
पण personalised guidance, reviews आणि support यासाठी technology सोबत मानवी वेळही लागतो.
म्हणून Premium enrollment काही टप्प्यावर capacity ला पोहोचला, तर Waiting List ठेवावी लागू शकते.
ही urgency निर्माण करण्यासाठी नाही. तर Quality टिकवण्यासाठी आहे.
शेवटी एवढंच
गेल्या वर्षभरात तुमच्या हजारो प्रश्नांनी मला एक गोष्ट शिकवली
आरोग्यात बदल तेव्हा सुरू होतो, जेव्हा माहिती “मला कळली” इथून पुढे जाऊन “मी हे माझ्या आयुष्यात करणार” इथपर्यंत पोहोचते.
अनेकजण आधीच त्या टप्प्यावर आले आहेत.
त्यांना पुन्हा convince करण्याची गरज नाही.
त्यांच्यासाठी उद्यापासून मार्ग थोडा अधिक स्पष्ट, structured आणि personalised होणार आहे.
बाकी सगळ्यांसाठी
आपला संवाद पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
उद्याचं पत्र खास त्या मित्रांसाठी आहे ज्यांच्या मनात एक वाक्य आता स्पष्ट झालंय
“आता स्वतःसाठी थोडं अधिक गंभीरपणे काम करायचं आहे.”
Observe the Pattern.
Change the Course.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
#Metabolism #inflammation #Routine #Habits #Health #AI #RemoteMnitoring
प्रश्न तोच नसतो…
तुमची story पुढे गेलेली असते.
गेल्या वर्षभरात आपण हजारो Comments आणि WhatsApp questions ला उत्तर दिलं.
एक गोष्ट वारंवार दिसली
आज कुणीतरी विचारतो,
“Sir, TG 260 आहेत. काय करू?”
दोन महिन्यांनी तोच मित्र update देतो
“आता TG 220 झाले… पुढे काय?”
पण Social Media वर त्या दुसऱ्या प्रश्नासोबत तुमची पूर्ण story दिसत नाही.
मागचं Weight किती होतं?
Activity वाढली का?
Medicines बदलली का?
Fatty Liver आहे का?
Sugar सुधारली का?
मागच्या वेळी काय advice दिलं होतं?
म्हणून प्रत्येक follow-up ला पुन्हा context तयार करावा लागतो.
आरोग्याचा प्रत्येक नवा प्रश्न हा वेगळा नसतो , तर तो आधीच्या बदलांचा, reports चा आणि routine चा पुढचा संदर्भ असतो.
म्हणून App मध्ये तुमचा Profile, Assessments, Trackers, Reports आणि previous questions एकाच ठिकाणी राहतील.
पुढच्या वेळी तुम्ही विचाराल
“आता पुढे काय?”
तेव्हा उत्तर फक्त आजच्या report वर नसेल.
तुम्ही कुठून सुरू केलं, काय बदललं आणि अजून कुठे लक्ष द्यायचं आहे यावर असेल.
Social media comment ला उत्तर देताना तुमच्याबद्दल context मर्यादित असतो.
App मध्ये Profile, Assessments, Trackers आणि मागचे records उपलब्ध असल्यामुळे guidance अधिक relevant आणि personalised होऊ शकते.
19 October 2026 पासून Just For Hearts App download करण्यासाठी तयार रहा.
पहिली पायरी - App download करा आणि तुमचा Health Profile complete करा.
App कसा सुरू करायचा, Profile कसा complete करायचा किंवा App बद्दल काही प्रश्न असतील तर WhatsApp करा.
JFH ONE: 92097 42597
Chat First.
Observe the Pattern.
Change the Course.
Dr Ravindra L Kulkarni
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#JustForHearts #RemoteMonitoring #App
Pulse सतत 100–110 …
BP normal आहे, तरी काळजी करायची?
OPD मध्ये patients नेहमी विचारतात
BP normal असला तरी Pulse वाढलेला असू शकतो. आणि कधी वाढलेला Pulse हा Heart चा आजार नसून शरीरातील दुसऱ्या समस्येचा पहिला संकेत असतो.
1. Pulse ❤️ 110… पण BP normal आहे?
BP म्हणजे रक्तवाहिन्यांमधील दाब. Pulse म्हणजे Heart एका मिनिटात किती वेळा धडधडतं.
दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.
BP normal आहे म्हणून वाढलेल्या Pulse कडे दुर्लक्ष करू नका.
2. Pulse ⚡ जास्त… पण ठोक्यांची लय कशी आहे?
Heart वेगाने पण नियमित धडधडतंय, की ठोके अनियमित आहेत?
कधी Pulse अचानक 140–160 पर्यंत जातो आणि तसाच अचानक normal होतो.
अशा वेळी Arrhythmia (Heart च्या ठोक्यांची लय बिघडणं) असू शकते.
ECG आणि गरजेनुसार Holter तपासणी उपयोगी पडते.
दोन episodes मधला ECG normal असू शकतो.
3. Pulse जास्त + छातीत अस्वस्थपणा 🫀 किंवा दम?
विशेषतः आधीपासून Heart disease असेल तर छातीत दुखणं, दम, घाम, अचानक weakness किंवा अस्वस्थपणा यांचा एकत्र विचार करावा लागतो.
हे प्रत्येक वेळी Anxiety मुळेच होतं असं नाही.
नवीन छातीत दुखणं, तीव्र दम किंवा बेशुद्ध पडणं असेल तर तातडीने Emergency care घ्या.
4. Pulse 115… पण Anxiety 😟 किंवा Panic Attack आहे?
अचानक धडधड, अस्वस्थपणा, घाम, हात थरथरणं, घाबरल्यासारखं वाटणं
Panic Attack मध्ये हे होऊ शकतं.
काहीजण वारंवार Smartwatch पाहतात. Number वाढतो, चिंता वाढते आणि Pulse आणखी वाढतो.
अशा वेळी धडधड खरी असते. पण तिचं कारण प्रत्येक वेळी Heart disease असेलच असं नाही.
5. Haemoglobin 🩸 , Thyroid आणि Hydration बघितलं का?
Hb कमी, Thyroid जास्त काम करणं, Fever, Infection किंवा Dehydration यामुळेही Pulse वाढू शकतो.
कधी Heart मध्ये problem नसतो , Heart शरीरातील दुसऱ्या समस्येला प्रतिसाद देत असतं.
6. Medicines 💊 आणि रोजच्या सवयींचाही परिणाम होतो.
Asthma चे काही inhalers, सर्दीच्या काही गोळ्या, excess Coffee, energy drinks आणि काही supplements Pulse वाढवू शकतात.
काही Heart medicines अचानक बंद केल्यानेही Pulse वाढू शकतो.
म्हणून medicines चा review महत्त्वाचा.
7. Resting Pulse ⌚ 90–100 असतो… मग?
चालून आल्यावर Pulse 110 असणं आणि 10 मिनिटं शांत बसल्यानंतरही 110 असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
Resting Pulse 90–100 हा अनेक adults मध्ये normal range च्या वरच्या बाजूला असतो.
पण पूर्वी नेहमी 65–70 असणारा Pulse आता सतत 95–100 होत असेल, तर हा बदलही महत्त्वाचा.
Smartwatch चा एक alert म्हणजे diagnosis नाही. पण वारंवार येणारे alerts दुर्लक्ष करण्यासारखेही नाहीत.
8. Pulse वाढला तर आधी काय ✅ करायचं?
🪑 5–10 मिनिटं शांत बसा. Pulse पुन्हा तपासा.
🌬️ Anxiety जाणवत असेल तर हळूहळू श्वास घ्या. सतत Smartwatch पाहू नका.
💧 योग्य Hydration ठेवा. Excess Coffee, energy drinks आणि stimulants टाळा. Heart / Kidney patients नी fluid restriction पाळावं.
📝 Resting Pulse, BP, symptoms आणि त्या वेळची परिस्थिती नोंदवा.
Resting Pulse वारंवार 100+ असेल किंवा नेहमीचा pattern बदलला असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
तुमचा BP normal असूनही Pulse जास्त असतो? छातीत अस्वस्थपणा, धडधड किंवा Smartwatch alerts येतात? ECG normal असूनही कारण समजत नाही?
अशा प्रश्नांसाठी WhatsApp करा
JFH ONE: 92097 42597
Chat First.
लक्षात ठेवा
दोन व्यक्तींचा Pulse सारखाच 110 असू शकतो.
एकाला Anxiety असेल.
दुसऱ्याला Anemia.
आणि तिसऱ्याला Heart Rhythm चा problem.
Pulse किती आहे यापेक्षा तो कधी वाढतो, किती वेळ टिकतो, ठोक्यांची लय कशी आहे आणि त्यावेळी शरीराला काय जाणवतं.
कारण कधी Heart आजारी नसतं…
ते शरीरातील दुसऱ्या समस्येची पहिली सूचना देत असतं.
आपल्या Just For Hearts App मधून Resting Pulse, BP, Sleep आणि इतर health patterns नियमित track करून awareness पासून योग्य action कडे जाता येईल.
Observe the Pattern.
Change the Course.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#HeartRate #Palpitations #ClinicalMedicine #JustForHearts



