
#मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान, महाराष्ट्राची ओळख. साहित्य, राजकारण, समाजसेवा आणि सण-उत्सवांचा उत्साही चाहता. विचारांचे आदान-प्रदान आणि ज्ञानवर्धन हेच ध्येय.
संयुक्त महाराष्ट्र
Joined January 2016
- Tweets39.2K
- Following1.1K
- Followers22.1K
- Likes9.3K
Pinned Tweet
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
#घटस्थापना #नवरात्री #नवरात्रोत्सव #Navratri #Navratrotsav
📚 मराठी साहित्यातील अजरामर ऐतिहासिक कादंबऱ्या
इतिहास वाचायचा नसतो, तो अनुभवायचा असतो! या कादंबऱ्या आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातात. 🚩
📖 छावा – शिवाजी सावंत
📖 श्रीमान योगी – रणजित देसाई
📖 मृत्युंजय – शिवाजी सावंत
📖 स्वामी – रणजित देसाई
📖 राऊ – ना. सं. इनामदार
शौर्य, त्याग, राजकारण आणि भावभावना यांचा अप्रतिम संगम असलेली ही पुस्तके प्रत्येक मराठी वाचकाच्या संग्रहात हवीतच!
💬 तुमचं यातलं आवडतं पुस्तक कोणतं? कमेंटमध्ये नक्की सांगा!
पु.ल म्हणजे अनेक गुणांचं, कलांचं, बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व.
पुलंनी बोलावं आणि आपण फक्त ऐकाव...
पु ल देशपांडे यांच्या वाऱ्यावरची वरात या नाटकातील एक भाग
अभिनेते श्रीकांत मोघे यांनी वयाच्या 80 व्या वर्षी ताकदीने आणि उमेदीने "बोरटाके" गुरुजींची भूमिका निभावली...
आनंदोत्सव संगीत समारोह २०२२ मधील खास क्षण!
पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या जादुई आवाजात "तुला पाहिले मी" 🎶
वऱ्हाड निघालंय लंडनला
सादरकर्ते : डॉ. लक्ष्मणराव देशपांडे
या नाटकाचे लेखन आणि निर्मिती प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांनी केली होती. त्यांनी १९७७ मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. सध्या प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक हे नाटक रंगभूमीवर सादर करत आहेत. या एकाच नाटकात अभिनेते तब्बल ५२ वेगवेगळी पात्रे साकारतात.
"प्रचंड मोठे वृक्ष पाडणे हा सदोष मनुष्यवधाइतका भयंकर गुन्हा मानायला हवा..."
- पु. ल. देशपांडे
पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध पुण्यात घालवला. ९० च्या दशकात पुण्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे जेव्हा मोठ्या प्रमाणावर रस्ते रुंदीकरणासाठी जुनी आणि डेरेदार झाडे तोडली जात होती, तेव्हा त्यांनी अनेक जाहीर सभा आणि पर्यावरण चळवळींच्या मंचावरून यावर तीव्र आक्षेप घेतला होता.
प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनी नक्षत्रांचे देणे कार्यक्रमात 'हे सुरांनो चंद्र व्हा' सादर केलं तेंव्हाचा व्हिडीओ !
गीत : कुसुमाग्रज
संगीत: पंडित जितेंद्र अभिषेकी
मूळ स्वर: पंडित जितेंद्र अभिषेकी
नाटक : ययाती आणि देवयानी
#आठवणीतील_गाणी
विनोदाचा बादशहा, मराठी मनाचा लाडका लक्ष्या! 🌹
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
त्यांची अफलातून टायमिंग, चेहऱ्यावरील निरागस हावभाव आणि प्रत्येक भूमिकेत ओतलेला जिवंतपणा यामुळे ते घराघरांत पोहोचले. "अशी ही बनवाबनवी", "धुमधडाका", "थरथराट", "हमाल दे धमाल" यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि मराठी सिनेमाला सुवर्णकाळ दिला.
आज ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या भूमिका आणि संवाद आजही आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवतात. खरा कलाकार तोच, जो गेल्यानंतरही लोकांच्या आठवणीत हसत राहतो.
लक्ष्या, तुम्ही कायम आमच्या हृदयात राहाल! ❤️















