DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote) header
DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote) profile picture

MLA Gadchiroli 68

Gadchiroli
Joined February 2023
Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)Photo by DR.MILIND RAMAJI NAROTE (@MilindNarote)
गडचिरोली नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा गडचिरोली भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मा. सौ. सीमाताई कन्नमवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेसाठी अशीच ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. #Gadchiroli #HappyBirthday #BJP #BJPMaharashtra #SeemataiKannamwar
12
📅 दिनांक : गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ 📍 कर्तव्य कक्ष कार्यालय, गडचिरोली आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने कर्तव्य कक्ष कार्यालय, गडचिरोली येथे निषेध करण्यात आले. या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजपा शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. नितीनजी कोडवते, डॉक्टर चंदाताई कोडवते, रेखाताई डोळस, तसेच भाजपा नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
1
11
📍 गडचिरोली गडचिरोली येथील रेड्डी गोडाऊन रोडवरील कोहळे अनाज भंडार या नवीन प्रतिष्ठानाचे उद्घाटन केले. यावेळी कोहळे परिवाराशी संवाद साधून त्यांना नवीन व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
18
📍 जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली आज विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी चारा लागवड, नाला खोलीकरण, अंगणवाडी बांधकाम, कॅटल शेल्टर, बोडी दुरुस्ती आदी कामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन विविध विभागांनी समन्वयातून कामे गतिमान करावीत, तसेच मजुरांसाठी हजेरी प्रक्रिया सुलभ करावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. विशेषतः धानोरा तालुक्यातील राजोलीसारख्या दुर्गम व दुर्लक्षित गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार कामांचे नियोजन करून नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलासजी भांडेकर, उपजिल्हाधिकारी श्रीमती बेलपत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हिवंज, उपवनसंरक्षक (प्रादेशिक व सामाजिक वनीकरण), सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता (सिंचन) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण विकासाला गती आणि स्थानिकांना रोजगार, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश!
18
जगविख्यात विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रद्धेय एकनाथ रानडे जी यांना जयंतीदिनी शतशः नमन! राष्ट्रनिर्माणासाठी आणि स्वामी विवेकानंदांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी त्यांनी केलेले समर्पित कार्य आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. #एकनाथरानडे #एकनाथरानडेजयंती #विवेकानंदशिलास्मारक #कन्याकुमारी #राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ
17
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील एक अग्रणी सेनानी, महापराक्रमी वीरांगणा आणि वीरमाता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! त्यांचे शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीसाठीचे बलिदान आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. #झाशीचीराणीलक्ष्मीबाई #राणीलक्ष्मीबाईजयंती #वीरांगणा #१८५७चाउठाव #डॉमिलिंदनरोटे
13
📍चिंचोली, ता. धानोरा जय बजरंग क्रीडा मंडळ, चिंचोली यांच्या वतीने आयोजित भव्य रात्रकालीन खुल्या पुरुष कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन केले. चिंचोली गावात भेट दिल्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना विशेष आनंद झाला. यावेळी गावकऱ्यांनी गावातील विविध समस्या व विकासकामांबाबत आपले प्रश्न मांडले. त्यापैकी काही समस्यांवर तत्काळ भ्रमणध्वनीद्वारे संबंधितांशी संपर्क साधून मार्ग काढला, तर उर्वरित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. **खेळाला प्रोत्साहन, गावाच्या विकासाला गती आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य**, या संकल्पनेतून जनसेवेचा प्रवास असाच सुरू राहील. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, नगरपंचायत धानोरा नगरसेवक मलिकजी बुधवानी, भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयजी कुमरे, राकेशजी खरवडे, सुभाषजी शिवबाची, खोब्रागडे, किसनजी चंदेल, उषाताई शेडमाके, सौरभजी सहारे, नरेशजी नि मलवार, प्रकाशजी मारबते, वन समितीचे शेडमाकेजी, ग्रामसभा अध्यक्ष मुकुंदशहा मडावी, ग्रामसभा सचिव शेषरावजी कुमेटी, मनोहरजी दु ग्गा, मनसरामजी नरोटे, जनार्दनजी गावतुरे, देवेंद्रजी सोनुले, गणेशजी कुमेठी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
17
📍 UIT गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आयोजित ‘गडचिरोली ज्ञानसभा - २०२६’ च्या उद्घाटन सोहळ्यास आणि "राष्ट्रीय शिक्षण नीती २०२० के परिप्रेक्ष्य में विकसित विदर्भ के लिए शिक्षा" या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय संगोष्ठीस उपस्थित होतो. या ज्ञानसभेचे उद्घाटन तथा प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय सचिव, शिक्षा संस्कृति उत्थान न्यास, नवीन दिल्ली माननीय श्री. अतुलजी कोठारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि विकसीत विदर्भाच्या निर्मितीसाठी शिक्षणाची दिशा यावर अतिशय मार्मिक विचार मांडले. विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. प्रशांतजी बोकारे, प्र-कुलगुरू माननीय डॉ. श्रीरामजी कावळे, TCSचे अरविंदजी कुमार, विनायकजी देशपांडे, कर्नल रामनाथजी स्वामी यांची उपस्थिती होती. ज्ञान, शिक्षण, अनुसंधान आणि सर्वांगीण विकासाच्या नवीन पर्वात गडचिरोली जिल्ह्याला अग्रेसर ठेवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत! #गोंडवानाविद्यापीठ #गडचिरोलीज्ञानसभा #राष्ट्रीयशिक्षणनीती२०२० #विविधविकास #गडचिरोली #GondwanaUniversity #Education #Vidarbha
1
25
राजोली येथे भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचा थरार! | विजेत्या संघांचा गौरव व खेळाडूंना प्रोत्साहन #राजोली #कबड्डीस्पर्धा #क्रीडासंस्कृती #युवाशक्ती #DrMilindNarote
1
19
आमचे हृदयस्थान, प्रेरणास्त्रोत आणि हिंदुत्वाचे जाज्वल्य तेज, हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे जी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे प्रखर विचार, निडर नेतृत्व आणि हिंदुत्वाची शिकवण आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील. #बाळासाहेबठाकरे #स्मृतिदिन #हिंदूहृदयसम्राट #विनम्रअभिवादन #BalasahebThackeray
19
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करणाऱ्या आणि आपल्या लेखणीने समाज जागृतीचे मौलिक कार्य करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना ‘राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या’ मनःपूर्वक शुभेच्छा! सत्याची बाजू मांडत, समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांचे मनापासून आभार आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! #राष्ट्रीयपत्रकारदिन #NationalPressDay #पत्रकारदिन #लोकशाहीचाचौथास्तंभ #DrMilindNarote
1
25
ज्वलंत हिंदुत्वाचे प्रणेते, विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते आणि श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख नायक स्व. अशोक सिंघल जी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! भारतीय संस्कृती, धर्मरक्षण आणि राष्ट्रउभारणीसाठी त्यांनी दिलेले अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम! #अशोकसिंघल #AshokSinghal #पुण्यतिथी #विश्वहिंदूपरिषद #DrMilindNarote
45
“जल, जमीन आणि जंगलाच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारणारे, आपल्या क्रांतिकारी विचारांनी आदिवासी समाजाला नवी दिशा देणारे थोर स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!  सर्व देशवासियांना जनजातीय गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #JanjatiyaGauravDivas #BhagwanBirsaMunda #बिरसामुंडा #जनजातीयगौरवदिन #Gadchiroli
37
📍पोलिस मुख्यालय गडचिरोली महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील विविध भागातून आलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सशी ‘डिजिटल डेमोक्रसी डायलॉग’ च्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या परिवर्तनाचा आढावा घेत भविष्यातील विकासाची दिशा स्पष्ट केली. नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडणारा गडचिरोली जिल्हा आता उद्योग, रोजगार, पायाभूतसुविधा आणि आदिवासी सक्षमीकरणाच्या माध्यमातून देशातील विकासाचे नवे केंद्र म्हणून उदयास येत आहे. या परिवर्तनाची यशोगाथा डिजिटल माध्यमांतून देशभर पोहोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके, सहपालकमंत्री ॲड. आशिषजी जयस्वाल, आमदार कीर्तिकुमारजी भांगडिया, नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीपजी पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांतji पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहासजी गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेशजी आदी उपस्थित होते. #DigitalMedia #SocialMediaInfluencers #Gadchiroli #DrMilindNarote
1
36
📍 गडचिरोली | जनजाती गौरव दिन ‘वनगर्जना – स्टोरी ऑफ राणी दुर्गावती अँड बिरसा मुंडा’ या नाटकाचे भव्य सादरीकरण संपन्न झाले. राणी दुर्गावती यांचा पराक्रम आणि भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्षमय जीवनप्रवास कलाकारांनी आपल्या अभिनयातून सुंदररीत्या साकारला. जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास उलगडणारा हा नाट्यप्रयोग विशेष ठरला. या सोहळ्याला केंद्रीय आदिवासी विकास मंत्री मा. श्री. जुअलजी ओराम, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके, माजी मंत्री तथा आमदार धर्मरावजी आत्राम, राज्यसभा खासदार मा. मायाताई इवनाते, मा.सतीशजी दौंड, मा. व्ही.सतीशजी, राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जमाती मोर्चा) तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, भाजपा आदिवासी विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, जिल्हाध्यक्ष श्री. रमेशजी बरसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोतीताई निंबोरकर व मान्यवर उपस्थित होते.
41
📍 गडचिरोली जनजातीय गौरव दिनानिमित्त आयोजित ‘भगवान बिरसा कलासंगम – २०२६’ महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या आदिवासी कलाकारांनी साकारलेल्या हस्तकला व चित्रकलेच्या कलाकृतींची केंद्रीय आदिवासी विकास मंत्री मा. श्री. जुअलजी ओराम आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके यांच्यासमवेत पाहणी केली.
1
37
📍 गडचिरोली | जनजाती गौरव दिन विशेष जनजाती गौरव दिनानिमित्त गडचिरोली येथे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आणि गावांतून आलेल्या जनजाती बांधवांनी आपल्या पारंपरिक संस्कृतीचे, विविध पूजन पद्धतींचे आणि धार्मिक परंपरांचे सुंदर दर्शन घडवून दिले. महाराष्ट्रातील विविध जनजातीय समाजांच्या वैशिष्ट्यपूर्ण पूजापद्धती, श्रद्धा आणि परंपरा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी गडचिरोलीकरांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. यावेळी विविध जनजातीय पूजन पद्धतींचे विधिवत पूजन करून उद्घाटन केले. आपल्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचविण्याचा हा महोत्सव निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी माझासमवेत माजी खासदार डॉ अशोकजी नेते, डॉ. धम्मदीपजी बोदले व मान्यवर उपस्थित होते. #जनजातीगौरवदिन #Gadchiroli #आदिवासीसंस्कृती #जनजातीपरंपरा #महाराष्ट्र
25
📍 गडचिरोली भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांना, त्यागाला आणि जनजातीय अस्मितेच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करत जनजातीय गौरव दिनानिमित्त आयोजित ‘भगवान बिरसा कलासंगम – २०२६’ महोत्सवाचा आज भव्य शुभारंभ झाला! या सोहळ्याला केंद्रीय आदिवासी विकास मंत्री मा. श्री. जुअलजी ओराम, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके, राज्यसभा खासदार मा. मायाताई इवनाते, राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जमाती मोर्चा) तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, भाजपा आदिवासी विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, जिल्हाध्यक्ष श्री. रमेशजी बरसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोतीताई निंबोरकर,नगरसेविका श्रीमती वर्षाताई शेडमाके, भाजपा जिल्हा महामंत्री श्री. प्रकाशजी गेडाम, माजी जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी वाघरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच आदिवासी विकास आयुक्त श्रीमती लीनाताई बनसोड, TRTI आयुक्त श्री. निलेशजी सागर, जिल्हाधिकारी श्री. अभिश्यंतजी पांडा, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आदिवासी समाजाची संस्कृती ही केवळ परंपरा नसून ती आपल्या देशाच्या अस्मितेचा आणि गौरवशाली इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, स्वाभिमान आणि समाजासाठीचे समर्पण आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे आहे. पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात जनजातीय समाजाचा सन्मान, स्वाभिमान आणि सर्वांगीण विकास यांना केंद्रस्थानी ठेवून देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. हाच गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आणि आदिवासी कला-संस्कृतीला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘भगवान बिरसा कलासंगम – २०२६’ महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. #जनजातीयगौरवदिन #भगवानबिरसाकलासंगम२०२६ #गडचिरोली
1
36
📍 गोंडवाना सैनिक विद्यालय, गडचिरोली आजपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय जनजाती गौरव दिवस महोत्सवाच्या अनुषंगाने गोंडवाना सैनिक विद्यालय येथे करण्यात आलेल्या निवास व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.
25
महाराष्ट्राच्या गौरवशाली आदिवासी लोककलांचा महासंगम! आदिवासी संस्कृती, परंपरा आणि आधुनिक कलेचा भव्य सोहळा असलेल्या ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ साठी आपण सर्व सहकुटुंब आमंत्रित आहात. आपल्या समृद्ध वारशाचा अनुभव घेण्यासाठी आणि कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा.  🗓️ दिनांक: १४ नोव्हेंबर २०२६ 📍 स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, धानोरा रोड, गडचिरोली  कार्यक्रमाची रूपरेषा: सकाळी १०:०० ते सायं. ५:००: आदिवासी पारंपारिक (नृत्य, गायन, वाद्य इ.) आणि आधुनिक (फिल्म्स, रील्स, व्लॉग्स इ.) कला सादरीकरण. सकाळी १०:०० ते सायं. ५:००: आदिवासी संस्कृती देव-देवता व पूजा विधीचे दर्शन. सायंकाळी ६:०० वाजता: ‘वनगर्जना स्टोरी ऑफ राणी दुर्गावती अँड बिरसा मुंडा’ या नाटिकेचे भव्य सादरीकरण.  #BhagwanBirsaKalaSangam2026 #Gadchiroli #TribalCulture #AdivasiLokkala #BirsaMunda
35