केंद्रीय विद्यालय, देवळाली येथील विद्यार्थ्यांची आरोग्य विद्यापीठाला भेट
राष्ट्रनिर्मितीसाठी जबाबदार, संवेदनशिल, कर्तव्यदक्ष आणि शिस्तबध्द व्यक्तिमत्वे घडवणे गरजेचे - मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांचे प्रतिपादन
- राष्ट्रनिर्मितीसाठी जबाबदार, प्रामाणिक, संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि शिस्तबध्द व्यक्तिमत्वे घडवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी केले. विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी दिलेल्या निर्देशानुसार मा. कुलपतींच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’कॅम्पस कनेक्ट’ व मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमांतर्गत केंद्रीय विद्यालय, देवळाली येथील विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यापीठ परिसरास भेट दिली. याप्रसंगी, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, अधिष्ठाता डॉ. स्वाती जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. प्रदिप आवळे, डॉ. प्रशांत शिवगुंडे, श्रीमती मानसी हिरे, श्री. बापुराव मगरे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
1
62
केंद्रीय विद्यालय, देवळाली येथील विद्यार्थ्यांची आरोग्य विद्यापीठाला भेट
राष्ट्रनिर्मितीसाठी जबाबदार, संवेदनशिल, कर्तव्यदक्ष आणि शिस्तबध्द व्यक्तिमत्वे घडवणे गरजेचे - मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांचे प्रतिपादन
- राष्ट्रनिर्मितीसाठी जबाबदार, प्रामाणिक, संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि शिस्तबध्द व्यक्तिमत्वे घडवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी केले. विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी दिलेल्या निर्देशानुसार मा. कुलपतींच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’कॅम्पस कनेक्ट’ व मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमांतर्गत केंद्रीय विद्यालय, देवळाली येथील विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यापीठ परिसरास भेट दिली. याप्रसंगी, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, अधिष्ठाता डॉ. स्वाती जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. प्रदिप आवळे, डॉ. प्रशांत शिवगुंडे, श्रीमती मानसी हिरे, श्री. बापुराव मगरे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
1
47
आरोग्य विज्ञान विद्यापीठात इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी
नाशिक : (दि. १९) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे यांनी प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मता दिनाची सर्वांनी शपथ घेतली.
याप्रसंगी सहाय्यक कुलसचिव श्री. संदीप राठोड यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्याची माहिती दिली व राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या प्रतिज्ञेचे वाचन केले. याप्रसंगी श्री. मिलिंद देशमुख, श्री. महेश बिरारीस, डॉ. प्रदिप आवळे, श्री. वाय. जी. पाटील, श्री. राजेश इस्ते, श्री. सचिन बोरसे, श्री. सुरेश शिंदे, श्री. राहूल विभांडिक, श्री. प्रविण सोनार, श्रीमती उज्वला साळुंके, श्रीमती मालीका पाटील, श्री. विनायक ढोले, श्री. पुष्कर तऱ्हाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. विजय सोनवणे, श्री. सेलमोकर, श्री. अनिल कुलकर्णी, श्री. दिनेश चव्हाण, श्री. जितेंद्र शिरसाठ, श्री. राजेंद्र जोशी, श्री. अविनाश रक्टे, श्री. नंदन वाघ, श्रीमती पूजा काकुळते, श्री. निशांत पवार, श्री. संभाजी गायकवाड, श्री. शांताराम गुंजाळ, श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. – at Dindori, India
1
61
📍कंधार जि.नांदेड
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ७ वे छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन आज कंधार जि.नांदेड येथे संपन्न झाले.
या संमेलनासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ.व्यंकट गीते यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणरत्न जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या संमेलनासाठी संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती आरती झोटींग,स्वागताध्यक्ष भास्कर गीते, माजी आमदार गोविंद आण्णा केंद्रे,श्री शरद गोरे,श्री संभाजी पाटील केंद्रे यांच्यासह मराठी साहित्य क्षेत्रातील साहित्यप्रेमी तसेच गावकरी उपस्थित होते. – at Dindori, India
1
84
आरोग्य विज्ञान विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
नाशिक : (दि. १५) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी, श्री. पुष्कर तऱ्हाळ, श्री. निलेश उबाळे, श्री. दिलीप राजपूत, श्री. संदीप बावणे, श्री. संदीप पाटील, श्री. शिवाजी म्हस्के, श्री. बाळू घुगे, श्री. योगेश बोरुंगे, श्री. दीपक घुबडे, श्री. लहानू लिलके, श्रीमती पूजा कौतुके, श्री. सचिन जाधव, श्री. गौरव मालोदे, श्री. महेंद्र पवार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. – at Nashik, India
2
79
आरोग्य विज्ञान विद्यापीठात माजी पंतप्रधान पंडित नेहरु जयंती उत्साहात साजरी
नाशिक : (दि. १४) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री. प्रमोद पाटील व श्री. सचिन धेंडे यांनी पंडित नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी पंडित नेहरु यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी, श्री. सचिन धेंडे, श्री. विनोद घोडके, श्री. कृष्णा भवर, श्री. निशांत पवार, श्री. सुमित काकड, श्रीमती पूजा काकुळते, श्रीमती मयुरी काळे, श्री. सुनील मोराडे श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. – at Shrirampur, India
1
1
76
आरोग्य विद्यापीठात धनत्रयोदशीनिमित्त धन्वंतरी पूजन
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात धनत्रयोदशीनिमित्त भगवान धन्वंतरीचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू उपस्थित होते.
याप्रसंगी मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले की, आयुर्वेद व प्राचीन ग्रंथात धन्वंतरी आरोग्याची देवता आहे. आयुर्वेद ही मानवी जीवनाला संतुलित ठेवणारी जीवनशैली आहे. निरोगी जीवनासाठी ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं’ या सुत्राचा अंगीकार करणे महत्त्वपूर्ण ठरत आहे. आयुर्वेदाचा समाजात मोठया प्रमाणात प्रचार व प्रसार होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नीशील आहे. संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे काळाची गरज आहे. सर्वांनी निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदातील तत्त्वे आचरणात आणावेत. शिक्षण, संशोधन आणि आरोग्य सेवेचा संगम साधून आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प करूया असे त्यांनी सांगितले.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने विद्यापीठात भगवान धन्वंतरीचे पूजन करण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ. गीतांजली कार्ले, डॉ. प्रदीप आवळे, डॉ. स्वाती जाधव, डॉ. अनुश्री नेटके, डॉ. श्वेता तेलंग, श्री. प्रकाश पाटील, श्री. महेंद्र कोठावदे, डॉ. स्वप्नील तोरणे, श्रीमती योगिता पाटील, श्री. राजेंद्र नाकवे, डॉ. प्रशांत शिवगंुडे, श्री. महेश बिरारीस, श्री. नितीन शिंदे, श्री. संदीप ततार, श्रीमती ज्योती खांडे, मेघा बोरसे, श्री. सागर कुलकर्णी, श्री. आदेश सांगळे, श्री. लोकेश गांगुर्डे आदींसह कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. – at Dindori, India



















































