My_MBMC (@My_MBMC) header
My_MBMC (@My_MBMC) profile picture

This is the official Twitter account of Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC). Facebook Page : https://nitter.cf/t.co/AjpNbvtopF

Mira Bhaindar, Maharashtra
Joined June 2020
Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)
पाण्याच्या वापरात अचानक वाढ दिसल्यास किंवा गळती अथवा इतर बिघाड आढळल्यास त्वरित तपासणी करा. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटरकडे लक्ष द्या आणि आवश्यक दुरुस्ती करून घ्या. #MBMC #MiraBhayandar #Savewater
2
511
आज शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. #indiragandhi #mbmc #mirabhayandar
1
310
आज शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. #sardarvallabhbhaipatel #mbmc #mirabhayandar
1
370
भारतीय इतिहासातील लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
270
हॉटेल, दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळून जलसंवर्धनासाठी सहकार्य करा. प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, पाणी वाचवा, भविष्य वाचवा! #MBMC #MiraBhayandar #SaveWater
2
383
आज शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात मा. परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या विकासकामांचा सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांची प्रगती, त्यासंदर्भातील प्रशासकीय बाबी तसेच विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या समन्वयाबाबत चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस मा. महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, पोलीस उपायुक्त (भा.पो.से.) राहुल चव्हाण, उपायुक्त (मुख्यालय) प्रणाली घोंगे, शहर अभियंता दिपक खांबित, सहाय्यक संचालक नगररचना पुरुषोत्तम शिंदे, मुख्य लेखा परीक्षक सुधीर नाकाडी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिरीषकुमार धनवे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. #MBMC #MiraBhayandar #DevelopmentReviewMeeting #CityDevelopment #MiraBhayandarMunicipalCorporation
3
1
4
1,249
घरातील वॉशरूममध्ये ड्युअल फ्लश वापरा आणि गरजेपुरते पाणी वापरून पाणी बचतीसाठी योगदान द्या. #savewater #mbmc #mirabhayandar
1
3
422
पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन क्रॅकर्समुळे होणारे वायुप्रदूषण कमी असते. त्यामुळे फटाके फोडताना योग्य निवड करा, पर्यावरणाची काळजी घ्या आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आपले योगदान द्या. #MBMC #MiraBhayandar #GreenCrackers #GreenDiwali #EcoFriendlyDiwali
2
358
वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून पाणी बचतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान द्या! #savewater #mbmc #mirabhayandar
1
515
दिवाळीच्या सजावटीसाठी LED दिवे वापरा आणि गरजेपुरतीच रोषणाई करून विजेचा अपव्यय टाळा. छोट्या सवयींतून ऊर्जा वाचवूया आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया! #MBMC #MiraBhayandar #SaveElectricity #EcoFriendlyDiwali
2
370
रस्त्यावर, उद्यानात किंवा सार्वजनिक नळाजवळ पाण्याची गळती आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवा. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, गळतीमुळे होणारी पाण्याची नासाडी रोखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. #MBMC #MiraBhayandar #savewater
3
532
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या (MoHUA) मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाचा शुभारंभ मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आणि Making The Difference (MTD) या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आज बुधवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी समाजमंदिर, माशाचा पाडा येथे आयोजित RRR (Reduce, Reuse, Recycle) प्रदर्शन व वापरण्यायोग्य वस्तू वितरण उपक्रमाद्वारे करण्यात आला. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहरात एकूण १० RRR केंद्रे स्थापन केली आहेत. सेवा संकल्प अभियानांतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नागरिकांकडून कपडे, पुस्तके, खेळणी, पादत्राणे, भांडी आणि इतर पुनर्वापरयोग्य वस्तू संकलित करण्यात आल्या. या वस्तूंचे RRR प्रदर्शनात मांडणी करून गरजू नागरिकांना त्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ६०,३५४ पुनर्वापरयोग्य वस्तू संकलित करण्यात आल्या असून, त्यापैकी ५६,३५० वस्तू गरजू नागरिकांना वितरित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश वापरण्यायोग्य वस्तूंचा पुनर्वापर करणे, गरजू नागरिकांना उपयुक्त वस्तू उपलब्ध करून देणे, कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, नैसर्गिक संसाधनांची बचत करणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, ओला व सुका कचरा तसेच सॅनिटरी आणि विशेष काळजीचा कचरा यांचे योग्य वर्गीकरण करणे आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. वापरण्यायोग्य वस्तू फेकून न देता त्यांचा पुनर्वापर करणे, गरजू नागरिकांना मदतीचा हात देणे आणि स्वच्छतेची सवय दैनंदिन जीवनात रुजविणे, या माध्यमातून स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक मिरा-भाईंदर घडविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. तसेच, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि जलसंवर्धनासाठी सहकार्य करावे. #MBMC #SwachhMiraBhayandar #SwachhDiwaliShubhDiwali #ReduceReuseRecycle #SwachhBharat
3
403
साफसफाईतून निघालेला कचरा योग्य ठिकाणी टाकूया आणि घरासोबत आपला परिसरही स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करूया. #MBMC #SwachhDiwaliShubhDiwali #PlasticFreeDiwali #SwachhSurvekshan2025_26 #CleanMiraBhayandar
1
385
पिण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी घ्या आणि पाण्याचा अपव्यय टाळा. पाणी बचत ही प्रत्येकाची जबाबदारी! #MBMC #SaveWater #MiraBhayandar
3
537
गाडी धुण्यासाठी पाइपऐवजी बादली आणि स्पंजचा वापर करा. प्रत्येक थेंब वाचवा, पाणी बचतीचा संकल्प करा! #MBMC #SaveWater #पाणीबचत #जलसंवर्धन #MiraBhayandar
1
3
438
स्वच्छ व पर्यावरणपूरक दिवाळीसाठी पणत्या, कंदील, मिठाई आणि भेटवस्तूंच्या खरेदीत प्लास्टिकमुक्त पर्याय निवडूया! #MBMC #SwachhDiwaliShubhDiwali #PlasticFreeDiwali #SwachhSurvekshan2025_26 #CleanMiraBhayandar
2
372
पाणी बचतीच्या टिप्स..👉🏽 #MBMC #savewater #MiraBhayandar (1/2)
1
1
614
आज सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली "स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी" अभियानाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता राखणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा साचू न देणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला. शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे तसेच फटाक्यांमुळे निर्माण होणारा कचरा योग्य पद्धतीने संकलित करणे, याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. #MBMC #SwachhMiraBhayandar #SwachhDiwaliShubhDiwali #CleanMiraBhayandar #SwachhBharat
1
406
आज सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता व मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी, मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, मा. स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत, उपायुक्त (मुख्यालय) प्रणाली घोंगे, नगरसचिव दिनेश कानगुडे आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते. #महर्षी_वाल्मिकी_जयंती #mbmc #mirabhayandar
1
1
425