आज रोहित पवारांच्या बुद्धीची दिवाळखोरी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली..!!
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रोहित पवारांची होत असलेली अवहेलना आणि निर्णयप्रक्रियेत त्यांना मिळत नसलेले स्थान यामुळे ते राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत आहे. या अस्वस्थतेतून ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या वाटेवर आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होतो. अजितदादांच्या निधनानंतर सातत्याने त्यांची राजकीय जागा घेण्याचा आणि स्वतःला त्यांचे राजकीय वारसदार म्हणून प्रस्थापित करण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न दिसत आहे.
एकेकाळी रोहित पवार हे महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्व असल्याचा समज होता. मात्र, आज ज्या पद्धतीने ते आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करत आहेत, ते पाहता त्यांच्या राजकीय परिपक्वतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही; पण स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याच्या वारशाचा आधार घेणे आणि बिनबुडाचे आरोप करणे ही राजकीय दिवाळखोरीच आहे.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #RohitPawar #AjitPawar #MaharashtraPolitics
रोहित पवार हा अजितदादा पवार यांच्या मरण्याची वाट बघत होता का?
रोहित पवार, अजितदादांच्या मृत्यूचं सत्य शोधताय की त्यांच्या मृत्यूच्या दुःखद घटनेचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजताय? दादांच्या अंत्यसंस्काराची चिताही विझली नव्हती, तोच ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ‘जुना वारसा घेऊन नवा पुतण्या येतोय’, ‘काळ चेहरे बदलतो’ अशा सूचक मजकुराच्या रिल्स लाखो व्ह्यूजसह व्हायरल होत होत्या. या रिल्समागचं नियोजन कुणाचं होतं? दादांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी स्वतःच्या नेतृत्वाची संधी म्हणून आधीच पाहिली जात होती का? पक्षातील अंतर्गत मतभेद, वरिष्ठ नेत्यांशी विसंवाद आणि निर्णयप्रक्रियेत स्थान मिळवण्याची धडपड यांची किनार या संपूर्ण घटनाक्रमाला आहे का, याचं उत्तर द्यावंच लागेल.
सहा पत्रकार परिषदा, रोज नवे आरोप, नवनवे संशय आणि प्रत्येक वेळी राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा उद्योग! तपासाची मागणी करण्याच्या नावाखाली दुसऱ्यांचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचा आणि स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्याचा हा प्रयत्न आहे का? अजितदादा हे महाराष्ट्राचं मोठं नेतृत्व होतं. त्यांच्या मृत्यूला राजकीय प्रसिद्धीचा मंच बनवणं आणि त्यांच्या नावावर स्वतःची राजकीय दुकानदारी चालवणं हा त्यांच्या वारशाचा सन्मान नाही. दादांच्या मृत्यूचं सत्य शोधा; पण त्यांच्या मृत्यूच्या आडून स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांशी खेळू नका! राजकारण करा, पण दुःखाचं भांडवल करून नव्हे.
#RohitPawar #AjitPawar #Ajitdada #ajitdadapawar #AjitPawarPlaneCrash #politics #MaharashtraPolitics
शिवछत्रपतींंचा इतिहास घराघरांत पोहोचविणारे,
ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!!
#BabasahebPurandare #shivchatrapati #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
116
भूदान चळवळींचे प्रणेते, महान स्वातंत्र्यसैनिक भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!!
#VinobaBhave #AcharyaVinobaBhave #DrParinayFuke #BJP4Maharashtra
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी संघर्ष करणारे महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
#BirsaMunda #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
122
युवा भारताने इतिहास घडवला..!! 🏆🇮🇳
१९ वर्षांखालील आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून आशिया चषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय युवा संघाचे मनःपूर्वक अभिनंदन.
शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची वृत्ती, एकजुटीने केलेला संघर्ष आणि विजयाची जिद्द यांचे दर्शन भारतीय खेळाडूंनी घडवून आणले.
या युवा शिलेदारांच्या कामगिरीने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. संपूर्ण संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #AsiaCup #AsiaCupU19 #indiavspakistan
100
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव..!!🏅
देशाच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या सर्व पुरस्कारार्थींचे मनःपूर्वक अभिनंदन!
यामध्ये महाराष्ट्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा संस्थांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीने देशाच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा ठसा उमटवला आहे.
महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानाची बाब म्हणजे...
🏅 अर्जुन पुरस्कार २०२५
दिव्या देशमुख – बुद्धिबळ
विदित गुजराथी – बुद्धिबळ
🏅 द्रोणाचार्य पुरस्कार २०२५
नेहा चव्हाण – नेमबाजी प्रशिक्षक
🏅 राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार २०२५
आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे
तसेच द्रोणाचार्य पुरस्कार २०२५, अर्जुन पुरस्कार २०२५, तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार २०२४ आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार २०२५ या विविध श्रेणींतील सर्व सन्मानितांचे हार्दिक अभिनंदन!
खेळाडूंची जिद्द, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण समर्पण यांचा हा गौरव आहे. त्यांच्या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेला नवी उंची मिळाली असून देशातील नवोदित खेळाडूंनाही प्रेरणा मिळत आहे.
सर्व पुरस्कारार्थींना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव असाच वृद्धिंगत होत राहो, ही सदिच्छा
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #Sports #NationalAwards #ProudMoment
देशाचे भविष्य घडविणाऱ्या, उद्याच्या भारताचे शिल्पकार असणाऱ्या सर्व बालकांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
#ChildrensDay #HappyChildrensDay #DrParinayFuke #BJP4Maharashtra
96
अनाथांची माय, ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
#Sindhutaisakpal #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
149
स्वातंत्र्यलढ्याला सशस्त्र क्रांतीची दिशा देणारे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
#lahujivastadsalve #DrParinayFuke #BJP4Maharashtra
109
लाखनी येथील निवासस्थानी लक्ष्मीपूजन..!!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #LakshmiPujan #Diwali #lakhani
वाघाच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आधाराचा हात..!!
📍ब्राह्मणी, ता.लाखनी.
#DrParinayFuke #BJP4Maharaahtra #tigerattack #RIP
काँग्रेस आणि विरोधकांचे आरोप दुर्दैवी आणि आक्षेपार्ह
पेंच अभयारण्य परिसरात घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि काही विरोधी पक्ष नेत्यांकडून माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल करण्यात आलेले आरोप अत्यंत दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहेत.
अपघातग्रस्त वाहनात माझा मुलगा नव्हता. तो दुसऱ्या गाडीत होता. या अपघातात ज्या तरुणाचे निधन झाले तो सुद्धा माझ्या मुलासारखाच होता. त्याच्या कुटुंबीयांशी आमचे स्नेहाचे नाते आहे. त्याच्या दुर्दैवी मृत्युने आमचे कुटुंब सुद्धा दुःखात आहे. आम्ही अजूनही सावरलेलो नाही.
परंतु, या घटनेसंबंधी कोणतीही ठोस माहिती किंवा तपासातून निष्पन्न झालेली वस्तुस्थिती समोर येण्यापूर्वीच अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. यातून माझी आणि माझ्या कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे.
या घटनेच्या अनुषंगाने काँग्रेस आणि काही विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आलेले आरोप आणि त्यातून निर्माण केले जाणारे राजकीय वातावरण योग्य नाही. अपघात नेमका कसा घडला, त्यावेळी काय परिस्थिती होती आणि या प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे, हे पोलिसांच्या निष्पक्ष चौकशीतूनच स्पष्ट होईल.
या दुर्दैवी घटनेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणे काँग्रेसने टाळायला हवे होते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सत्य आणि न्याय महत्त्वाचा आहे.
माझा कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला किंवा अपप्रचाराला बळी न पडता निष्पक्ष चौकशी होऊ द्यावी. सत्य समोर येईलच!
- आमदार डॉ. परिणय फुके
वंचित, भटके-विमुक्त व आदिवासी बांधवांसोबत दिवाळी सणाचा आनंद..!!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #Diwali #adivasi #tribal
लोकमतचे सहसंपादक श्री. कमलेशजी वानखेडे यांच्या लाडक्या शिवेंदू आणि धनुष यांच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आनंदसोहळ्याला उपस्थित राहून दोन्ही चिमुकल्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दोघांनाही उत्तम आरोग्य, आनंदी आयुष्य आणि उज्ज्वल भवितव्यासाठी अनेक शुभेच्छा.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #birthday
सर्व लाडक्या भाऊ-बहिणींना भाऊबीज सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #bhaubij #BhaiDooj #Diwali
1
3
332
















