Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde) header
Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde) profile picture

Chairman, Legislative Council, Maharashtra State,India

Chondi Maharashtra, India
Joined October 2012
Photo by Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde)Photo by Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde)Photo by Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde)Photo by Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde)Photo by Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde)Photo by Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde)Photo by Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde)Photo by Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde)Photo by Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde)Photo by Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde)
आज संपूर्ण कुटुंबासोबत चिरंजीव अजिंक्य याचा वाढदिवस साजरा केला. अजिंक्य, तुझ्या कष्टाला, प्रामाणिकपणाला आणि कर्तृत्वाला सदैव यशाची जोड मिळो. तुझ्या पुढील प्रत्येक वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि भरभरून आशीर्वाद! तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! #AjinkyaShinde #Family #Birthday #RamShinde
3
180
📍 चोंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. श्री. संजय राठोड साहेब यांनी आज चोंडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी अहिल्येश्वर मंदिरात अभिषेक करून दर्शन घेतले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वाड्याची पाहणी केली आणि लोकमातेच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी त्यांचे स्वागत व सन्मान केला. #चोंडी #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #SanjayRathod #RamShinde
2
7
222
तुकाई उपसा सिंचन योजनेचा कार्यारंभ..! 📍 वालवड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर दहा वर्षांच्या संघर्षाला आज विकासाच्या कृतीतून उत्तर मिळाले! कर्जतच्या जलक्रांतीची नवी पहाट ठरणाऱ्या ‘तुकाई उपसा सिंचन योजनेचा’ ऐतिहासिक शुभारंभ सोहळा मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. श्री. संजय दुलिचंद राठोड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार झाला. ६६ कोटी ८३ लाख रुपयांच्या या प्रकल्पातून कुकडी डाव्या कालव्याचे पाणी उचलून तालुक्यातील १९ दुष्काळी गावांतील २७ जलसाठे भरले जाणार असून, ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शेतशिवारात हिरवाई फुलण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. योजनेचे पाणी प्रत्येक शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाइपलाइनच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन केले. २०१४ मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेली तुकाई चारीची मागणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन जलसंधारण मंत्री म्हणून विभागाच्या पुनर्रचनेतून सिंचन क्षेत्राची मर्यादा ६०० हेक्टरपर्यंत वाढवली. या निकषांतर्गत मंजुरी मिळालेली महाराष्ट्रातील एकमेव योजना म्हणजे तुकाई उपसा सिंचन योजना आहे. या प्रवासात तत्कालीन जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड साहेब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी बोलताना संजय राठोड साहेब यांनी या योजनेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि पाठपुराव्याचा आवर्जून उल्लेख करत गौरवोद्गार काढले. या योजनेसाठी पहिल्या दिवसापासून भक्कम पाठबळ देणारे आणि निधी कमी पडू न देणारे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे कर्जतच्या शेतकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार! याप्रसंगी राज्य मृद व जलसंधारण विभाग सचिव श्री. जितेंद्र पापळकर, मा. जि.प. सदस्य ॲड. कैलास अण्णा शेवाळे, मा. जि.प. सदस्य श्री. मधुकर आबा राळेभात, मा. जि.प. सदस्य श्री. शांतीलाल कोपनर, मा. जि.प. सदस्य श्री. अशोक खेडकर, मा. उपसभापती कृ.उ.बा.स. कर्जत श्री. प्रकाश शिंदे, जामखेड जिल्हा बँक संचालक श्री. सचिननाना घुमरे, मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व माता-भगिनी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी जमीन दिलेले शिंदे येथील श्री. सदाशिव घालमे, श्रीमती ताराबाई घालमे, श्री. मोहन घालमे तसेच वालवड येथील श्री. दादा राऊत यांचे मनःपूर्वक आभार! तसेच जलक्रांतीसाठी ‘जलदूत’ म्हणून योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन! तुकाईच्या पाण्याने कर्जतचे शिवार असेच फुलत राहो, हीच सदिच्छा!
3
8
236
📍 वालवड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर तुकाई उपसा सिंचन योजना, पंपगृहाचा शुभारंभ..! तुकाई उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाचा शुभारंभ मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड यांच्या समवेत कळ यंत्र दाबून केला. यानंतर योजनेच्या कामाची पाहणी केली आणि विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी राज्य मृद व जलसंधारण विभाग सचिव श्री. जितेंद्र पापळकर, मुख्य अभियंता मृद व जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगर श्री. हरिभाऊ कारभारी गिते, अहिल्यानगर कार्यकारी अभियंता श्री.पांडुरंग गायसमुद्रे यांच्यासह लाभधारक शेतकरी, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी उपस्थित होते. #तुकाई_उपसा_सिंचन_योजना #जलस्वप्न #karjat #Ahilyangar #RamShinde
1
11
277
चि. अजिंक्य राम शिंदे याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आयुष्यातील प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाकत, आपल्या कर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी. उत्तम आरोग्य, आनंद आणि यशाची साथ सदैव लाभो, हीच मनापासून सदिच्छा! खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा! #HappyBirthday #AjinkyaRamShinde #birthdaywishes
8
4
61
2,094
वनस्पतींनाही संवेदना असतात हे जगासमोर सिद्ध करणारे थोर भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
1
5
228
संसदीय लोकशाहीची मूल्ये अधिक दृढ करणारे आणि आपल्या संयमी, कुशल नेतृत्वाने सभागृहाचे कामकाज यशस्वीरीत्या चालवणारे लोकसभेचे माननीय अध्यक्ष श्री. ओम बिर्लाजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
1
138
📍 चापडगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जत सेवा सोसायटी मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनिर्वाचित संचालिका सौ. ज्योती प्रकाश शिंदे यांचा सत्कार समारंभ उत्साहात झाला. सौ. ज्योती प्रकाश शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! #Chapadgaon #Karjat #Ahilyanagar #DCCBank #ramshinde
14
436
📍 अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरच्या वतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाओ, भीडतंत्र हटाओ’ या अभियानांतर्गत आज अहिल्यानगर शहरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप दिल्लीगेट येथे झालेल्या जाहीर सभेने झाला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना लोकशाही, संविधान आणि लोकशाही संस्थांच्या रक्षणाबाबत आपली भूमिका मांडली.
1
13
397
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत अभ्यासू, संयमी आणि तळागाळातील सामान्य माणसाशी नाळ जोडलेले ज्येष्ठ नेतृत्व, राज्यसभा खासदार डॉ. रामरावजी सखाराम वडकुते यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती! #RamraoWadkute
1
4
21
683
कर्जतच्या जलक्रांतीचा ऐतिहासिक सोहळा! सस्नेह निमंत्रण : “तुकाई उपसा सिंचन योजना” मौजे वालवड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथील पंपगृहाच्या कामाचा उद्घाटन सोहळा..! वेळ : सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६, सकाळी ९.३० वाजता ठिकाण : मौजे शिंदे, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
3
1
12
505
तुकाई उपसा सिंचन योजनेतून कर्जत तालुक्यातील १९ गावे व २७ तलावांना जलसंजीवनी मिळणार! सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी भव्य उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा. 📍 मौजे वालवड, कर्जत #TukaiLiftIrrigation #Karjat #RamShinde
1
1
8
251
दुष्काळ निवारण नियोजनासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला ₹१५ लाखांचा निधी! ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
2
123
कर्जत तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल! ‘दलित वस्ती सुधार योजने’ अंतर्गत तालुक्यातील ५० वस्त्यांमधील ६३ विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, यासाठी ₹ ३ कोटी ३५ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
8
205
जामखेड तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल! ‘दलित वस्ती सुधार योजने’ अंतर्गत तालुक्यातील १५ वस्त्यांमधील १६ विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, यासाठी ₹ ६५ लाख ७५ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
5
204
राजुरा, जि. चंद्रपूर मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. देवराव भोंगळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
1
6
207
पंढरपूर-मंगळवेढा, जि. सोलापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. समाधान आवताडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
1
7
184
टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीची वीणा, माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला! 🚩 भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा सोहळा असलेल्या कार्तिकी एकादशीच्या सर्व भाविकांना व वारकरी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
3
168
विज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे नाव जागतिक पातळीवर सुवर्णाक्षरांनी कोरणारे आणि देशाला विज्ञानातील पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारे महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, भारतरत्न सर सी. व्ही. रमन यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
2
129
आपल्या मायबोलीचा आणि अस्मितेचा मान राखण्यासाठी, तसेच अखंड व संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस शतशः नमन!
1
3
141