Pinned Tweet
त्या चिमुरडीचे अवघ्या १० दिवसापूर्वी गंभीर प्रकारच्या हृदयविकारासाठी ऑपरेशन झाले होते. गरीब कुटुंबातली. जन्मापासून मी तिला पाहत होतो.सर्जरीचा खर्च अफाट! प्रयत्न केले; ऑपरेशन विनामूल्य झाले. तिने गिफ्ट आणले होते; माझा वाढदिवस. तिला नीट चालताही येत नव्हते. डोळ्यात नकळत अश्रू होते
एक जर्मन साहित्यिक योहान वोल्फगांग म्हणाला होता की, केवळ इच्छा असूनही पुरेसे नाही; कृती केली पाहिजे आणि केवळ ज्ञान असून पुरेसे नाही; ते आचरणात आणले पाहिजे. त्याचे विचार मला खूप आवडतात कारण ते पावलोपावली मला प्रेरणा देत असतात. तुमच्या पैकी काही लोकांचं ही तसंच आहे. इच्छा आहे पण..
10
450
रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठून बाहेर फिरायला जा, रनिंग करा किंवा जिम 🏋️♂️
जाण्यापूर्वी काहीतरी खा. उदा. ओट्स, केळी, पिनट बटर आणि ब्रेड सॅंडविच. नंतर ब्लॅक कॉफी घ्या. नीट वार्म अप करा आणि व्यायामानंतर स्ट्रेचिंग करा.
आल्यावर वेळ न घालवता कामाला लागा
काल रात्री उशिरा गॅलरीत उभा होतो तेव्हा, शहराने विषारी धुराची घट्ट चादर ओढून घेतली आहे की काय, असं वाटत होतं. राजधानी दिल्ली तर जणू गॅस चेंबरच बनली. हवेची गुणवत्ता विक्रमी प्रमाणात घसरली होती.एअर क्वालिटी इंडेक्स २५१८ टक्के इतका वाढला होता, दृश्यमानता खूपच कमी झाली होती.
सुर्ये आधिष्ठीली प्राची।
जगा जाणीव दे प्रकाशाची।।
तैसी श्रोतया ज्ञानाची।
दिवाळी करी।।
-संत ज्ञानेश्वर
अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी तुम्हाला आणि कुटुंबियांना सुखाची,आरोग्यदायी व भरभराटीची जावो..
1
14
566
नेहमी प्रमाणे सकाळी ४.३० वाजता उठलो. आज रनिंग करायचं, हे घरी कळले असते तर माझी खैर नव्हती. दब्या पावलांनी मी म्हसोबा फाटा गाठला. ३ तास ५१ मिनिटात ३४ किमी अंतर कापलं. उन्हाने अंग अक्षरशः तापले होते. थंड पाण्याने अंघोळ केली. थकवा दूर झाला आणि मन प्रसन्न झालं. दिवाळी संस्मरणीय झाली
1
67
1,836
सणाच्या सुट्टीतही थोडा वेळ आपल्या आवडीचा व्यायाम करण्यासाठी काढा. त्यामुळे दिवाळीचा फराळ घेताना आरोग्याचा समतोल राखता येईल आणि दिवाळीची मजा लुटता येईल. दिवाळीत सगळेच पदार्थ तळलेले असतात, त्यातच सुक्यामेव्याच्या स्निग्धतेमुळे ते अधिकच अनारोग्य बनतात.
1
26
813
अतिव्यायाम नको 🙂↔️
हा सल्ला आहे जे व्यायाम करत आहेत, त्यांना..
पण जे व्यायाम करतच नाहीत, त्यांचे आपले बरे आहे, ना नैराश्याचा धोका ना थकवा किंवा पार्किंसन! 🤪
9
498
थोडे राहिलेले, पाहिलेले,
जोखिलेले आहे
माझ्या जगाची एक
गंधवेणाही त्यात आहे
केव्हा चुकलो, मुकलो
नवे शिकलोही मी आहे
जसा जगत मी आहे
तसाच शब्दात आहे
- नारायण सुर्वे
लवकर झोपा आणि वजन कमी करा..
झोपण्यापुर्वी ३ तास काहीही खाऊ नका,
२ तास अगोदर स्क्रीन बंद ठेवा,
१ तास आधी पाणी नको,
बघा कशी गाढ झोप येते ते..
तुम्ही लठ्ठ आहात का?
मोजा तुमचा बीएमआय ..
त्यासाठी तुमचे वजन आणि उंची या चार्ट वर पहा..
आणि सांगा
11
1,239









