
ALT दिनांक २९ व ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय शालेय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, नाशिकच्या खेळाडूंनी तेजस भुसारे- ८०० मीटर धावणे व १५०० मीटर धावणे — दोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मयूर आढळ- 1500मी द्वितीय क्रमांक (रौप्य पदक) तेजस व मयूर यांची दिनांक ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पालघर* येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि सातत्यपूर्ण सरावाने आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, नाशिक तसेच आदिवासी विकास विभागाचा नावलौकिक वाढविला आहे. *दोन्ही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा*! 💐👏

ALT नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत (१९ ते २२ ऑक्टोबर) शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिरसगाव (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली आहे! 🥇🥈 ✨ पदक विजेते गुणवंत खेळाडू: 🏃♂️ १४ वर्षे वयोगट: 🥇 संभव भोये - २०० मीटर धावणे (सुवर्ण पदक) 🏃♀️ १९ वर्षे वयोगट: 🥇 सानिका चौधरी - ३००० मीटर धावणे (सुवर्ण पदक) व क्रॉस कंट्री ४ कि.मी. (सुवर्ण पदक) 🥈 रुतिका लहारे - ३ कि.मी. चालणे (रौप्य पदक) 🥈 किशोर आंबेकर - ३००० मीटर धावणे (रौप्य पदक) 🙌 मार्गदर्शक व प्रशिक्षक: या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ भोगले, क्रीडाशिक्षक हिरामण टोपले, संघ व्यवस्थापक मधुकर लहारे, रुपाली गायकवाड, अधीक्षक अरुण बागले आणि अधिक्षिका पूनम बावणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ALT शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मुरबाड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा मढ येथे आज सदिच्छा भेट दिली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या प्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, सहायक प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ALT "आदिवासी विकास प्रकल्प, पुसद यांच्या वतीने 'सेवा संकल्प अभियानां'तर्गत विद्यार्थिनींसाठी करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. पुसद प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. 🌟 मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे: 📌विद्यार्थिनींनी मोठे ध्येय निश्चित करून त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न करावेत. 📌स्वतःवर विश्वास ठेवा, मनात नकारात्मकता येऊ देऊ नका आणि जिद्दीने पुढे जा. याप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक शशांक कदम यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. तसेच किरण बोर्डे, शिक्षण विस्तार अधिकारी नागनाथ चटलेवाड, स्त्री गृहपाल सुनयना अग्रेहारी, आदिवासी निरीक्षक रवींद्र पवार, मुख्याध्यापक सुनील साबळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी विविध स्पर्धा परीक्षांबाबत विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करण्यात आले.

ALT शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मुरबाड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा मढ येथे आज सदिच्छा भेट दिली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या प्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, सहायक प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतानाच नियमित अभ्यास, शिस्त, आत्मविश्वास आणि आयुष्यात स्वतःचे ध्येय निश्चित करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

ALT विठ्ठलराव पटवर्धन आश्रमशाळा वाघेरा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय (केंद्र) क्रीडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिरसगावच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे! शाळेच्या संघाने खो-खो, रिले आणि वैयक्तिक मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये अनेक सुवर्ण व रौप्य पदके पटकावत प्रकल्पस्तरीय (जिल्हा) क्रीडा स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. 🥇 प्रमुख अजिंक्यपद व सुवर्णपदके (सांघिक): खो-खो: १४ व १७ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुली (सर्व संघ सुवर्ण पदक 🥇) रिले (४x१०० व ४x४०० मीटर): १४ व १७ वर्षांखालील मुले आणि १९ वर्षांखालील मुली (सर्व संघ सुवर्ण पदक 🥇) 🏅 वैयक्तिक स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांचा दबदबा: धावणे, चालणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक आणि भालाफेक स्पर्धांमध्ये आपल्या शिरसगावच्या विद्यार्थ्यांनी अनेक सुवर्ण व रौप्य पदके नावावर केली आहेत!






















