𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv) header
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv) profile picture

कवी | लेखक | स्ट्रिट फोटोग्राफर । कादंबरी : पटेली , ठसन। कविता : कविता ह्या हिणवलेल्या । जागल्या । मुक्त पत्रकार

Mumbai, India
Joined April 2020
Photo by 𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv)Photo by 𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv)Photo by 𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv)Photo by 𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv)Photo by 𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv)Photo by 𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv)Photo by 𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv)Photo by 𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv)Photo by 𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv)Photo by 𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) (@aviuv)
‘ठसन’ चे मुखपृष्ठ. लवकरच प्री बुकिंग सुरू मुखपृष्ठ - प्रथमेश पाटील सुलेखन - रोशन हुले
1
4
26
3,673
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
ज्याला महाराष्ट्रधर्म कळतो, त्याला महाराष्ट्रावर लादलेल्या विनाशकारी प्रकल्पांमुळे होणारं महाराष्ट्राचं नुकसान हे वैयक्तिक नुकसान वाटणं स्वाभाविक आहे. इतरांना मात्र स्थानिक मराठी भूमिपुत्रांचं विस्थापन, निसर्गाचा ऱ्हास आणि परप्रांतीयांची घुसखोरी, हे आर्थिक उलाढालीसाठी बळी देण्या योग्यच वाटणार.
1
15
26
343
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
पालघर येथील वरोरमध्ये आयोजित ‘उलगुलान’ वाढवण बंदरविरोधी आक्रोश सभेला उपस्थित राहून स्थानिक भूमिपुत्रांच्या संघर्षाला ठाम पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने वाढवण बंदरविरोधात भव्य बाइक रॅली काढण्यात आली. या रॅलीतून स्थानिक भूमिपुत्रांच्या संघर्षाला पाठिंबा देत वाढवण बंदर रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. वाढवण बंदराचा प्रकल्प रद्द झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. हा केवळ वाढवण बंदराचा प्रश्न नाही, तर जल, जंगल, जमीन, पर्यावरण, लोकशाही आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा लढा आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी स्थानिकांच्या जमिनी, समुद्र आणि निसर्गाचा विनाश करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? हा लढा आता शेवटपर्यंत निकराने लढला पाहिजे. आंदोलनातील नेत्यांना अटक झाली, स्थानबद्ध केले, पदाधिकाऱ्यांची धरपकड झाली तरी आंदोलन थांबता कामा नये. नेते तुरुंगात गेले तर प्रत्येकाने संघर्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. उद्यापासून एकही डंपर चालू द्यायचा नाही, हा निर्धार केवळ घोषणेत न राहता जनतेच्या एकजुटीतून दिसला पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. या लढ्यात मुंबईपर्यंत जाऊन संघर्ष करणाऱ्या सृष्टी, अपूर्वा, शेजल यांसारख्या तरुण मुलींचे धाडस प्रेरणादायी आहे. आपल्या भविष्याच्या रक्षणासाठी त्या निर्भयपणे उभ्या राहत आहेत. त्यांच्या या जिद्दीतून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्या आजोबांनी, वडिलांनी अत्यंत कष्टाने, त्यागाने आपल्यासाठी ही जमीन आणि ही संपत्ती जपली. त्यांच्या संघर्षाचा वारसा आपण पैशाच्या आमिषाला किंवा राजकीय फोडाफोडीला बळी पडून संपवायचा का? आज आपण आपल्या जमिनी आणि निसर्ग वाचवला नाही, तर येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. इंग्रजांच्या ‘फोडा, तोडा आणि राज्य करा’ या नीतीप्रमाणे आजही लोकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता एकजूट कायम ठेवली पाहिजे. हा लढा कोणत्याही एका पक्षाचा नसून सामान्य माणसाच्या अस्तित्वाचा आहे. प्रशासनालाही स्पष्ट सांगू इच्छितो की, अधिकाऱ्यांचा पगार जनतेच्या करातून येतो, अंबानी-अदानींच्या खिशातून नाही. त्यामुळे त्यांनी उद्योगपतींच्या हितापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे. आंदोलनकर्त्यांना धमक्या देणे, त्यांच्यावर दबाव आणणे किंवा प्रकल्पासाठी दलालीचे आरोप होणाऱ्या प्रकारांकडे दुर्लक्ष करणे, हे प्रशासनाला शोभणारे नाही. अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून जनतेच्या बाजूने काम करावे. मा.राहुलजी गांधी आणि काँग्रेस पक्ष देशभरातील जनआंदोलनांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि नेतृत्वाचा भाग म्हणून मी या संघर्षात स्थानिकांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. जिथे मदतीची गरज असेल, तिथे काँग्रेस पक्षाचा सक्रिय सहभाग राहील. भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोड असो किंवा वाढवण बंदराच्या नावाखाली होणारा पर्यावरणाचा विनाश असो, निसर्ग आणि जनतेच्या हक्कांसाठीचा संघर्ष आम्ही सुरूच ठेवणार आहोत. संविधान वाचवायचे आहे, लोकशाही वाचवायची आहे आणि जल, जंगल, जमीन वाचवायची आहे. ही लढाई आता सामान्य माणसाने आपल्या हातात घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. राज राजापूरकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार श्री. अंबादास दानवे, मनसेचे नेते तथा माजी आमदार श्री. राजू पाटील, बहुजन विकास आघाडीचे श्री. हितेंद्र ठाकूर, शिक्षक भारतीचे (माजी विधान परिषद आमदार) श्री. कपिल पाटील तसेच पालघर जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
12
1
56
828
प्रस्तावित वाढवण बंदर आणि पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित विनाशकरी प्रकल्प विरोधी जनसमुदाय.
23
57
789
Do read this article
My piece about Baburao Bagul in today's Hindustan Times Few works of Marathi literature can match the piercing, unshakably brutal gaze that Bagul turns on the tentacles of caste
3
4
198
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
चलो वाढवण.. उलगुलान वाढवण बंदर विरोधी आक्रोश सभा... दि. ३० ऑक्टोबर २०२६ वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : वरोर / वाढवण, पालघर #उलगुलान #वाढवण
17
63
874
प्रश्न हा विचारा की पंपिंग साठीची १२०% वीज ही कोण देणार आणि कोणत्या भावाने देणार रात्री पंपिंग करणार म्हणजे पंपिंगसाठी ‘क्लिन’ वीज ही फक्त १५ ते २० टक्के असेल बहूतेक सरकार स्वताच छोटे छोटे पंप स्टोरेज का उभारत नाही. सध्याच्या सर्व जलविद्युत प्रकल्पांना पंप स्टोरेज का करत नाय
3
6
1
54
1,843
देशात वाराणसी राज्यात नागपूर
22
502
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
पालघर जिल्ह्याच्या संभाव्य विध्वंसाची सुरुवात वाढवण बंदर! वाढवण बंदरविरोधी समितीच्या पत्रकानुसार, या प्रकल्पामुळे पालघरच्या पर्यावरणाला, शेतीला, मासेमारीला आणि आदिवासींच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. 🔴 वाढवण बंदर * समुद्रात भराव टाकून १,४४८ हेक्टर जमीन तयार होणार. * १०.१४ किमी लांबीची समुद्री भिंत. * दरवर्षी ६५ लाख घनमीटर ड्रेजिंग. * सूर्या नदीतून दररोज २.१ कोटी लिटर पाणी. 🔴 डोंगर आणि जंगलांचा विनाश * बंदरासाठी ७ कोटी टन दगड-मुरूम आणि २० कोटी घनमीटर वाळूची गरज. * गारगाव, खानिवडे परिसरातील डोंगर, जंगल आणि जैवविविधतेला धोका. 🔴 चौथी मुंबई * डहाणू परिसरातील ९३ आदिवासी गावांवर परिणाम होण्याची भीती. * ३० लाख घरांच्या प्रस्तावामुळे शेती, पाणी आणि स्थानिक संस्कृतीवर दबाव. 🔴 मच्छिमारांचे विस्थापन * ५,३३३ घरे आणि २०,८०९ मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका. * रेल्वे व रस्ते प्रकल्पांमुळे आणखी २१ गावे बाधित होण्याची शक्यता. * समुद्रातील १२६ मत्स्यप्रजाती आणि खारफुटीवर परिणाम. 🔴 शेती आणि प्रदूषण * हजारो डम्पर व ट्रकच्या वाहतुकीमुळे प्रदूषण वाढण्याची भीती. * शेती, बागायती, जलस्रोत आणि स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता. विकासाच्या नावाखाली पालघरच्या जल-जंगल-जमिनीची आणि स्थानिकांच्या उपजीविकेची किती किंमत मोजावी लागणार?
20
153
8
485
16,017
भक्तांच्या पक्षाचा प्रवक्ता बनायचा असेल तर फक्त ‘तालासूरात निबंध पाठ’ करता यायला पाहिजे. (एजन्सीने दिलेले) त्यांचा माहिती ज्ञान आकलन याचा दूरान्वये संबंध नसतो.
1
22
475
तुम्हाला माहितेय का प्रस्तावित वाढवण बंदराकडे जाणार्या रस्त्यासाठी किती झाडे तोडली आहेत? तुम्हाला माहितेय का प्रस्तावित वाढवण बंदराच्या समुद्रात दहा किमीची ब्रेक वॅाटर वॅाल बांधण्यात येणारय, त्यासाठी दगड गारगाव खानिवडे इथल्या रिझर्व्ह फॅारेस्ट मधून खणणारयत,(१)
2
27
1
62
976
त्यासाठी किती झाडे तोडणारयत माहितीय का? ही संख्या हजारोत आहे ! (२)
1
4
124
भविष्यातील उध्वस्त पालघरच्या नकाशासोबत ह्याच मूळ असणार्या प्रस्तावित वाढवण बंदरासंदर्भातील माहिती ही वाढवण बंदर विरोधी समितीच्या पत्रकातून संकलित केली आहे. (१)
1
5
29
879
#पंपस्टोरेज #थ्रेड कर्जत प्रकल्प नाही हा जनरेशनचा प्लॅंट नाही हे मागच्या ट्विट मध्ये म्हटलेचय. ह्या प्रकल्पात सर्वात मोठी गोम ही आहे की जर ३००० जनरेशन होईल तर कमीत कमी ३५०० मेगावॅट पंपिंग करायला लागेल. हे ३५०० मेगावॅट पंपिग करायला वीज कोण देणार ? (१)
3
19
2
82
8,871
जर २१ पंप स्टोरेज सह्याद्रीत येत असेल तर एक नक्कीय की घाटावर जो शेतीसाठी कमांड एरिया आहे त्याला जे पाणी लागत ते ह्या पंप स्टोरेज कडे वळवल जाणारय. सह्याद्रीत हे पंप स्टोरेज कशासाठी येणार तर हा एक भांडवली धंदाय. जो खाजगी भांडवलदारांना सरकारने मोकळा केलाय. (६)
2
1
13
877
तरी ह्यात डेटासेंटर बद्दल अवाक्षरही काढल नाहीय परत अधिकृत आकड्यांमध्ये ३००० मेगावॅट असणारा प्रकल्प आयटीसेलच्या टूलकीटने १२००० केला संपूर्ण राज्याची सध्याची जलविद्युत जनरेशन ३२०० च्या आसपासय. एकतर ३००० मेगावॅट जनरेशन म्हटले तरी हा देशातला सर्वात मोठा जनरेशन जलविद्युत प्रकल्पय (७)
1
2
15
803