📍 लंडन, युनायटेड किंग्डम 🇬🇧 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा काळ ज्या लंडनमधील वास्तूत ज्ञानसाधना करत व्यतीत केला, त्या ऐतिहासिक स्मारकाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी भेट देऊन पाहणी केली. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा प्रेरणादायी संदेश देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या ठिकाणी त्यांच्या वापरातील वस्तू, दुर्मिळ पुस्तके, छायाचित्रे तसेच त्यांच्या लेखनाचा अमूल्य ठेवा जतन करण्यात आला आहे. या सर्व ऐतिहासिक ठेव्याची पाहणी करताना बाबासाहेबांच्या पुतळ्याला उपमुख्यमंत्री साहेबांनी विनम्र अभिवादन केले आणि अभिप्राय पुस्तिकेत आपल्या भावना नोंदवल्या. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये आपल्या संविधानातून देशाला देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांमधून समाजातील शोषित, पीडित आणि वंचित घटकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. या पवित्र वास्तूला भेट देताना सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या कार्यासाठी नवी ऊर्जा आणि बळ मिळाल्याची भावना एकनाथ शिंदे साहेबांनी व्यक्त केली. #EknathShinde #DrBabasahebAmbedkar #London #UnitedKingdom #Maharashtra #ShivSena #SocialJustice
53
236
368
87,414
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये आपल्या संविधानातून देशाला देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांमधून समाजातील शोषित, पीडित आणि वंचित घटकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते

Sep 11, 2026 · 12:31 PM UTC

20