Vivek Bhimanwar, IAS (@bhimanwar) profile picture

Chairman, Maharashtra Public Service Commission

Mumbai
Joined September 2013
एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल. जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏
774
490
232
2,910
467,438
Vivek Bhimanwar, IAS retweeted
सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्‍या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली. #MPSC @mpsc_office
416
625
24
840
79,805
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. @MahaDGIPR @bhimanwar
46
25
2
159
79,880
Vivek Bhimanwar, IAS retweeted
📍मुंबई महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणकाधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामध्ये त्यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सीबीटी पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल तसेच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर व परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर - देशमुख उपस्थित होते 📢 अध्यक्ष भीमनवार यांनी दिलेली माहिती अशी 👇🏾 🖥️ परीक्षांतील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगाकडून व्यापक सुधारणा सुरू 🖥️ पूर्व परीक्षांचे निकाल २१ दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अवघ्या २२ दिवसांत प्रसिद्ध 🖥️ ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात तिची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित 🖥️ मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया ९ ते ११ महिन्यांत, तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया ६ ते ७ महिन्यांत पूर्ण केली जाईल 🖥️ सीबीटी पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू. राज्यसेवा, गट 'अ', गट 'ब', किवा गट 'क' च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल नाही 🖥️ लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंत सुमारे १४० परीक्षा सीबीटी प्रणालीनुसार. सीबीटी प्रणाली वैज्ञानिक, न्यायालयाने मान्यता दिलेली आणि देशभरात स्वीकारलेली #MPSC #CBT @mpsc_office
105
26
2
164
24,001
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’ या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. gr.maharashtra.gov.in/Site/U… @MahaDGIPR @bhimanwar
7
10
59
8,138
Opt out option cancelled by MPSC
83
141
4
481
46,556
Verification of documents for MPSC examination by digi locker
18
24
1
140
21,382
Honoured to call on His Excellency Hon’ble Governor Shri Jishnu Dev Varma after assuming charge as Chairman, Maharashtra Public Service Commission ( #MPSC). Briefed him on MPSC’s functioning, key initiatives, and preparedness for massive recruitments this year…
25
42
1
184
21,969
… and a similar scale next year. Hon Governor provided valuable guidance on various issues of governance. MPSC is committed to achieve new heights of excellence and transparency under his guidance. @maha_governor @MahaDGIPR @mpsc_office
4
9
38
11,245
📍 #मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष विवेक भीमनवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यानिमित्ताने मुंबईतील लोकभावनात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहून भीमनवार यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. #Mumbai #EknathShinde #Maharashtra @ADevvrat @maha_governor @Dev_Fadnavis
41
83
288
7,057
Vivek Bhimanwar, IAS retweeted
🔹 Swearing-in Ceremony of newly appointed Chairperson of Maharashtra State Public Commission MPSC Shri Vivek Bhimanwar before Hon Governor Acharya Devvrat and CM Devendra Fadnavis at Lok Bhawan, Mumbai. DCM Eknath Shinde was present too. 🔹 राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा शपथविधी समारंभ. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. 🔹 राज्यपाल आचार्य देवव्रत एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में महाराष्ट्र लोकसेवा आयोग के नवनियुक्त अध्यक्ष के रूप में विवेक भीमनवार इनका शपथग्रहण समारोह। इस दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित थे। 🕙 9.55am | 18-2-2026📍Lok Bhavan, Mumbai | स. ९.५५ वा. | १८-२-२०२६📍लोकभवन, मुंबई. @maha_governor @Dev_Fadnavis @mieknathshinde @bhimanwar #Maharashtra #DevendraFadnavis #OathCeremony #PublicServiceCommission
9
195
288
8,652
Launched of the Public / Women Safety Scheme " BYGSY " for all Auto Rixas / Taxis made on 23 Jan 2026 at the Andheri RTO , Mumbai
6
1
5
6
15,328