हव्या त्या व्यक्तीसोबत रात्रभर बसून गप्पा मारत बसणं म्हणजे बरेचसे गैरसमज दूर करणं.. आणि एकमेकांमध्ये आलेले अंतर दूर करण्यासारखे असते.. अधून मधून वेळ देत राहावा अशा गप्पांसाठीही..
त्याला बरं नव्हतं वाटत आणि अशातच तिचा कॉल येतो.. कॉलवरती बोलत असतांना तो सारखा खोकलत असतो.. तीही लगेसच त्याला म्हणते बोलायचं नाहीये म्हणून मुद्दामहून खोकलू नकोस.. आणि कॉल कट करते.. तो काही विचार करेलच तेवढ्यात तिचा पुन्हा कॉल येतो.. मस्करी केली रे.. आराम कर नंतर बोलू आपण..
दिवसभरात काम करून थकून झाल्यावर जेव्हा तो तिला भेटतो आणि ती प्रेमाने ज्याप्रकारे त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून अलदग त्याच्या डोक्यावरून जेव्हा प्रमाणे हात फिरवते तेव्हा त्याचा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे निघून जातो..