Pinned Tweet
#पुस्तकांची_ओळख
✍🏻✍🏻✍🏻✍🏻 ✍🏻✍🏻✍🏻
By #ग्रंथोपासक 😊
प्रत्येकच देशाच्या इतिहासात कित्येक दुर्दैवी घटनांच्या नोंदी सापडतात. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित. नैसर्गिक आपत्तीला टाळता येणे अशक्य असले, तरी सोयीच्या दुर्लक्षामुळे, चुकांमुळे देशाला, एखाद्या समाजाला झालेले जबर नुकसान टाळणे मात्र शक्य असते.
३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिराजींची हत्या झाली त्याआधी त्यांचे अंगरक्षक बदलण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांनी दिल्या होत्या. परंतु आपण शीख अंगरक्षक बदलले तर या समाजाबद्दल अविश्वासाचा वारा वाहील या कारणाने इंदिराजींनी त्यास नकार दिला (वाचलेलं). आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. सुरक्षारक्षक सतवंत सिंग आणि बिअंत सिंग यांनी इंदिराजींच्या देहाची अक्षरशः चाळण केली. या हत्येचं कारण ठरलं सुवर्ण मंदिरात शिरलेले अतिरेकी हुसकावून लावण्यासाठी केंद्र सरकारने केलेली लष्करी कारवाई...
५ जून ते १० जून १९८४ या कालावधीतील सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईचा आँखो देखा हाल म्हणजे "ऑपरेशन ब्लू स्टार, जसं घडलं तसं..." हे पुस्तक. ते ही खुद्द ऑपरेशन प्रमुख लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार यांच्याकडून, अगदी इत्यंभूत, तपशीलवार...
भारत पाकिस्तान फाळणीतून हिंदू-मुसलमान राष्ट्रे निर्माण झाली खरी, पण या फळणीत अजून एक फाळणी दिसून येते ती पंजाबची. फळणीमध्ये पंजाबचेही दोन तुकडे झाल्यामुळे पंजाबवर वर्चस्व असणाऱ्या शीख समाजाला हिंदू नेत्यांबद्दल, हिंदू समाजाबद्दल अविश्वास वाटू लागला असावा (मत). १९४७ पासूनच पंजाबी बोलणाऱ्यांसाठी पंजाब हे स्वतंत्र राज्य असावं या मास्टर तारा सिंह यांच्या मागणीपासून, १९७० च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या अतिरेकी भिंद्रनवाले याच्या उदयापर्यंत, पंजाबचे धगधगते राजकारण, खदखदते समाजकारण लेखकाने थोडक्यात पण अगदी व्यवस्थित समजावून दिले आहे.
पंजाब आणि पंजाबचे लोकमानस भिंद्रनवालेच्या ताब्यात गेलं आणि देशाच्या एकोप्याला आव्हान देणाऱ्या एका क्रूर अतिरेक्याचा जन्म झाला. अकाली दलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सुरवातीला काँग्रेसनेही भिंद्रनवालेला ताकद दिली होती (वाचलेलं) आणि काही काळाने हाच भिंद्रनवाले काँग्रेस, अकाली दल, पोलीस, प्रशासन वैगेरे कुणालाही ऐकेनासा झाला. अनेक खून, असंख्य लुटी करून समांतर सरकार चालवणाऱ्या भिंद्रनवालेच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकार हालचाली करू लागल्यावर, त्याने शेवटी शीख समाजाची अस्मिता असणाऱ्या सुवर्ण मंदिरात आसरा घेतला.
अनेक प्रशिक्षित अतिरेकी, सैन्य दलातील निवृत्त/ बडतर्फ अधिकारी, गुन्हेगार, अत्याधुनिक शस्त्र सामग्री वैगेरेंनी सज्ज असलेल्या भिंद्रनवालेशी लढताना, सुवर्ण मंदिरातील हरमंदिर साहिब (पवित्र स्थान) वर एकही गोळी चालवणार नाही अशी मनोमन शपथ घेऊन लढणारे आपले ८३ वीर सैनिक मृत्यूला सामोरे गेले. लेखकाने या लढाईची गरज, निर्णय, आखणी, हालचाल, वाटचाल, अफवा, गैरसमज, संग्राम आणि विजय वैगेरे या पुस्तकात व्यवस्थित रचून ठेवला आहे. प्रत्यक्षात कारवाई ५-६ दिवसरात्र चालली असली, तरी त्याचे परिणाम पुढील २५-३० वर्षे दिसत होते... जसे इंदिराजींची हत्या, शीखांविरुद्धची दंगल, त्यावेळचे लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या, शिवाय खुद्द लेखकावर लंडनमध्ये झालेला हल्ला...
सुवर्ण मंदिरातील या लष्करी कारवाईच्या हेतूबद्दल प्रशासकीय अधिकारी कुलदीप नय्यर किंवा ज्येष्ठ साहित्यिक खुषवंतासिंग यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित लोकांचेच अगाध अज्ञान होते, तर सर्वसामान्य शीख समाजामध्ये लष्कराच्या या धाडसाविरोधात किती अफवा आणि किती गैरसमज पसरले होते याची कल्पना पुस्तक वाचताना येते.
या विषयावरील आपल्या समजाचे, माहितीचे खुंटे हलवून पुन्हा बळकट करण्यासाठी नक्कीच #वाचावं_असं_पुस्तक
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक
#सबका_मलिक_एकच_पुस्तकं
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
#पुस्तकांची_ओळख
✍🏻✍🏻✍🏻✍🏻 ✍🏻✍🏻✍🏻
by #ग्रंथोपासक 😊
फॉर हिअर, ऑर टू गो?
इतर देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येकाला कधी न कधी कळत नकळत कुत्सितपणे विचारला गेलेला हा प्रश्न... इथेच राहणार की गडगंज पैसा कमावून आपापल्या देशात निघून जाणार?
हेटाळणीचे असे टोमणे झेलत १९६० च्या आसपास अमेरिकेत येण्यासाठी देश सोडलेले मराठी तरुण तरुणी, हे पुस्तक २००७ साली प्रकाशित झालं तेव्हा ६०-७० वर्षांचे सिनियर सिटिझन्स झाले असतील. त्यांच्या स्थलांतरित आयुष्यातील ४०-४५ वर्षांच्या हेलकाव्यांच्या लाटा, अपर्णा वेलणकर या कलंदर लेखिकेने या पुस्तकात कैद केल्या आहेत.
कधी अक्राळ विक्राळ तर कधी संथ गंभीर अशा समुद्री लाटांच्या हेलकाव्यांमधून जशी लहान मोठी जहाजे आपापल्या वकुबाप्रमाणे मार्गक्रमण करत असतात, तशा काही मराठी माणसांच्या आयुष्याच्या जहाजांचे हे स्थलांतरित मार्गक्रमण...
अमेरिकेच्या किनाऱ्याला लागणाऱ्या या मराठीजनांचे चार लाटांमध्ये वर्गीकरण करता येतील... भारतातील कारकुनी शिक्षण आणि संधींची उपासमार या तुलनेत अमेरिकेतील उच्च शिक्षण, स्वातंत्र्य आणि प्रगतीची संधी पाहून पहिल्या पिढीतील लोकांनी अमेरिकन भूमीवर पाय ठेवले ती स्थलांतरितांची पहिली लाट.
जन्मापासून तरुणपणापर्यंतच्या आठवणी, माणसे, ठिकाणं हजारो मैल दूर ठेवून आलेल्या या पिढीला अमेरिकेत जम बसवण्यास प्रचंड संघर्ष करावा लागला आणि सुरू झाली शरीर-मनाची, भाव-भावनांची, अदृश्य असह्य घालमेल आणि तडफड. त्यातून काही अपयशी होऊन माघारी फिरले, तर काहींनी तग धरत आपल्या अर्धांगिनीला अमेरिकेत बोलवून घेतले. या "बेटर हाफ" म्हणजे अमेरिकेवर जाऊन धडकलेली दुसरी लाट.
१९६०-७० च्या भरारी घेण्याच्या काळात अमेरिकेला मनुष्यबळाची बेसुमार आवश्यकता भासल्यामुळे "फॅमिली रियुनीफिकेशन" नावाखाली, तोपर्यंत अमेरिकेत स्थायिक झालेल्यांना आपल्या नातलगांना अमेरिकेत आणण्यासाठी मुभा देण्यात आली. या स्पॉन्सर स्कीममध्ये आलेले कुटुंब-नातलग, विशेष प्राविण्य नसताना देखील अमेरिकेत दाखल होऊ शकले ही तिसरी लाट म्हणता येईल.
चौथी लाट मात्र स्थलांतरितांच्या या मराठी कुटुंबांमध्येच निर्माण झाली, ती म्हणजे त्यांची दुसरी पिढी. जी पिढी स्वतःला ना धड भारतापासून पूर्णपणे वेगळं करू शकली, ना धड अमेरिकेशी पूर्णपणे एकरूप होऊ शकली.
या चारही लाटांनी कधी एकमेकांशी आदळत, कधी एकमेकांशी एकरूप होत, "अमेरिकेन ड्रीम"च्या किनाऱ्याला लागण्यासाठी चिवटपणे केलेल्या अविरत परिश्रमांचा मागोवा म्हणजे हे पुस्तक. ज्यामुळे आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल होऊ शकतो.
प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधलेल्या प्रगतीमुळे अख्खा डोंगर विकत घेऊन राजवाड्यासारखे घर बांधणारं एखादं यशस्वी मराठी कुटुंब एकीकडे... तर जुजबी कौशल्यामुळे विशेष प्रगती न केलेले मुंबईतील चाळीतील घर भासावे अशा घरात राहणारे त्यामानाने अपयशी मराठी कुटुंब एकीकडे... जीवनमानाच्या या दोन टोकांवरील मधल्या अंतरात सापडणाऱ्या अनेक मराठी कुटुंबांच्या, त्यातील माणसांच्या संघर्षाची, प्रयत्नांची, सुख-दुःखाची, मान-अपमानाची, यश-अपयशाची, दुस्वास-जिव्हाळ्याची ही खरीखुरी कहाणी... प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी...
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #पुस्तकांशी_सलगी
#वाचावं_असं_पुस्तक
#वाचन_शुभेच्छा 💐
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
✍🏻 @rajuparulekar
मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मतः असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे.
@rautsanjay61 असाच एक माणूस. २०१४ साली भारतात फॅसिस्ट काळोखाची छाया पसरू लागली. २०१६ च्या मनमानी नोटबंदीने तो काळोख देशभर पसरवला, अधोरेखित केला. त्यानंतर भाजप संघप्रणीत राजवटीचे स्वमर्जीने स्लीपर सेल बनलेल्या अस्सल भारतीय गेस्टापो एजन्सीज, आयटी, ईडी, सीबीआय, एनएसए आणि एनसीबी यांनी सत्तापक्षाच्या राजकीय विरोधातल्या सर्व व्यक्ती, संस्था आणि राजकीय पक्ष यांना लक्ष्य बनवले. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली गेली. शेकडो निरपराध मानवतावादी पत्रकार, राजकीय नेते, उद्योजक आणि मोदीविरोधक तुरुंगात डांबले गेले. आजही डांबले जात आहेत.
त्यामधला एक सर्वात डोळस पत्रकार आणि खासदार म्हणजे संजय राऊत. अनेक आमिषं, अनेक धमक्या आणि गद्दारीचे अनेक मोह टाळून त्याने ईडीच्या तुरुंगात उडी घेतली. आपण निरपराध असताना हा तुरुंगाचा काळोख त्याने स्वीकारला. त्या काळोखात हळूहळू त्याला सभोवतालचा तुरुंग आणि त्या तुरुंगाबाहेरचा तुरुंग बनलेला देश दिसू लागला. त्याचंच हे मर्मभेदक चित्रण 'नरकातला स्वर्ग.'
भारताच्या इतिहासातल्या एका भयाण काळ्याकुट्ट कालखंडात आपण जगत असताना एका पत्रकार-लेखक-संपादकाने तुरुंगातून आपल्या भोवतालच्या समाजाला मारलेली ही हाक प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यालाही हा काळोख दिसू लागेल...
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| retweeted
Celebrated Bhaubeez yesterday - sisters had come over, their husbands, nephews, nieces, brothers - almost everyone walked into the library and asked - So have you got "Belonging" yet.
then spotted the book, oohed & aahed over the photos, wished @SoniaGandhi mam the very best.
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
महाराष्ट्राचा प्रत्येक धोंडा एकेका रोमहर्षक प्रसंगाचा साक्षी. त्याला जर कधी काळीं जिभा फुटल्या, तर तो जे सांगेल, ते ऐकून प्रेते उठतील. कबंधे जिवंत होतील. षंढांच्या अंगी वारे भरेल ! असा सांस्कृतिक आणि समरतीर्थांचा महाराष्ट्रात अपूर्व योग घडून आला आहे.
स्वातंत्र्यप्रियता ही तर महाराष्ट्राची अंगिक प्रवृत्ती.
अंग्रेजांना संपूर्ण भारत जिंकण्यापूर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या, काळसर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युद्धश्री, ती रग, तो आवेश, अजूनही मावळला नाही. कधी मावळेलसे दिसतही नाही. हा गुण डोंगरावरून वाहात येणाऱ्या भराट वाऱ्याचा आहे. कृष्णा, कोयना, पवना, भीमेच्या पाण्याचा आहे.
तेव्हा महाराष्ट्र श्रीमंत आहे. स्वाभिमानी तर आहेच आहे. कणखर आहे, चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही. मित्रांसाठी जीव देणारा आहे. भक्तिभावाने गहिवरणारा आहे. लढताना प्राण तळहाती घेणारा आहे. थोडासा भांडखोरही आहे. थोडीशी हिरवटपणाची झांक आहे. पण किती? चंद्रावरल्या डागाएव्हढी. ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला, त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता तो भोळाही आहे. आतिथ्यशील आहे. किंबहुना तो आहे, गिरिशिखरांच्या दैवतासारखा, शंभुमहादेवासारखा. संतापला तर त्रिभुवने पेटवील. संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहवील.
त्या महाराष्ट्राचे हे दर्शन.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| retweeted
Whenever I need inspiration and enlightenment, I turn to the pages of these three Modern Indian classics.
My respectful tribute to Pandit Jawaharlal Nehru, the world's greatest scholar-statesman of the 20th century, on his birth anniversary.
The more they malign him, the more relevant he becomes.
|ग्रं|थो|पा|स|क| retweeted
🧵Nehru's last gift
Water Crocker's book "Nehru - A contemporary's estimate" has been on my book shelf for some time. Today seemed as good a time to start reading it.
Reading any material on Pt. Nehru always surfaces something new.
1/6
#RememberingNehru
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
Both spectacle and ruin, Mumbai exemplifies the cosmopolitan metropolis. It is not just a big city but also a soaring vision of modern urban life. Millions from India and beyond, of different ethnicities, languages and religions, have washed up on its shores, bringing with them their desires and ambitions. Mumbai Fables explores the mythic inner life of this legendary city as visualized by its inhabitants, journalists, planners, writers, artists, film-makers and political activists.
In this remarkable cultural history of one of the world's most important urban centres, Gyan Prakash unearths the stories behind its fabulous history, viewing Mumbai through significant moments and kaleidoscopic ideas that have shaped it, its comic-book heroes and famous scandals. Shedding light on what has been called 'the maximum city', Mumbai Fables offers an unparalleled look at this oneof-its-kind city.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
पंचवीस वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांच्या जन्मगावी चिखलगाव येथे डॉ. राजा दांडेकर या ध्येयवादी तरुणाने एक स्वप्न हृदयात जपून तिथल्या काळ्या कातळावर पाय रोवले. साथीला होती त्याची पत्नी आणि लोकांवरचा दुर्दम्य विश्वास. गावातल्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवता पुरवता त्याची स्वप्नं फुलू लागली.
सुरुवातीला चिखलगावला एका गोठ्यात सुरू झालेली शाळा मुलांनी गजबजू लागली. मैलोन्मैलाची पायपीट करून मुलांना शाळेपर्यंत यायला लावणं सोपं नव्हतं. पण या तरुणाला माहीत होतं की, ग्रामविकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला माणसांची शेती करायची आहे.
सुरुवातीच्या चार हातांचे आज अगणित हात झाले आहेत आणि लोकसाधना न्यासाच्या रूपानं त्याचं स्वप्न प्रत्यक्षात आलं आहे.
ही माणसं घडवण्याची किमया कशी घडली ते सांगणाऱ्या या सुंदर कहाण्या.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| retweeted
अक्षरधारा बुक गॅलरी - पुणे!
तृतीयपंथी समाजाच्या वास्तवावर आधारित कादंबरी #कायांतर इथे उपलब्ध आहे.
#कादंबरी #LGBTQCommunity #तृतीयपंथी #वास्तववादी #मराठी #मराठीसाहित्य
|ग्रं|थो|पा|स|क| retweeted
कालच मिळाला, आपल्या सर्वांच्या आवडीच्या विषयावर "पैसा '
वाचून नक्कीच कळवेन
@LetsReadIndia
@KalantriPravin
@granthopasak
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
...काही वेळ मी नजर न हलवता नुसती बघत राहिले. मला कळलं, हे माझ्यासाठी स्वर्गातून आलेलं आश्वासन आहे. फक्त माझ्यासाठी. इथे, माझ्याच घरात. मला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. कोणत्याही मळलेल्या वाटेनं हिंडायचं नाही. ना कोणाच्या परवानगीची गरज, ना कोणाच्या नजरेचा जाच. मी जशी होते, जिथे होते, तिथे उतरला आहे हा आशीर्वाद. गेली पंचवीस वर्षं ह्या कुमारिकेनं तपश्चर्या केली या गरम, उन्हाळी प्रदेशात ! ऊन खात, वारे सोसत ! तिचं फळ आहे हे. उत्तरेकडच्या हिमाच्छादित पर्वतातून अवतरलेलं. की स्वतः तो कैलासच उतरलाय इथे? माझ्या कन्याव्रताची सांगता करायला? आता मी ह्याचा स्वीकार न करू, तर काय करू?...
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
बखर वाङ्मय हा मध्ययुगीन काळातील मराठी साहित्यातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा वाङ्मयप्रकार आहे. गेल्या पिढीतील इतिहास संशोधकांनी ऐतिहासिक साधन म्हणून बखरी प्रकाशित केल्या व त्याच दृष्टिकोणातून बखरींना दुय्यम दर्जाचे साधन ठरविले. विद्यापीठातून बखरींचे अध्यापन सुरू झाल्यानंतर मात्र बखरीतील वाङ्मय गुणांची पाहणी सुरू झाली आणि केवळ वाङ्मयीन कलाकृती म्हणूनही बखरींचे महत्त्व सर्वमान्य झाले.
'भाऊसाहेबांची बखर' ही साऱ्या बखर वाङ्मयातील गुणाढ्य अशी बखर आहे. व्यक्तिरेखाटनातील प्रखर भेदकता, संवाद-लेखनातील मार्मिकता आणि प्रसंग-वर्णनातील प्रत्ययकारिता हे या बखरीचे गुणविशेष आहे. या प्रभावी वाङ्मयीन वैशिष्ट्यांचा सविस्तर परामर्श घेणे हा या संपादनातील प्रमुख हेतू आहे. 'बखर' या वाङ्मय प्रकाराचे विशेष आणि भाऊसाहेबांच्या बखरीतील साहित्य-गुणांचा सोदाहरण व ससंदर्भ परिचय, यांमुळे ही संपादित आवृत्ती अभ्यासकांना संग्राह्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
देव माणसांच्या मनात जागले; आणि त्यांनी गुणित-शतगुणित होत कोट्यावधी रुपे धारण केली, ठोस व ठसठशीत आकार धारण केले.
कुणी घडवले त्यांना?
कसे घडले ते?
प्रतिमांच्या प्रवासाचा हा विलक्षण थरारक असा वेध...
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
'द लिट्ल किंग'
तो आला, त्याला पाहिलं आणि तो आमचा झाला. घरातला तो सगळ्यांत छोटा पेट. मग नाव तर स्पेशलच हवं. सगळ्यांनी मिळून ठरवलं, नाव 'रायन' ठेवायचं.
रायनचा अर्थ 'द लिट्ल किंग'. सगळ्या घरावर, आमच्यावर आणि घरातल्या 'ॲनिमल किंगडम्' वरही याचंच राज्य. त्याच्या राज्यात आम्ही सगळे समाधानी, आनंदी आणि सुरक्षितसुद्धा. त्याची आमच्या सर्वांबरोबरची जवळीक, त्याचं खेळणं, त्याचं बागडणं, सगळंच भावणारं.
त्याचं स्वतःवरही इतकं प्रेम नसेल तितकं प्रेम तो आमच्यावर करायचा. आम्ही त्याला जे दिलं, त्यांत त्याला सुख देण्याची आमची भावना होती पण त्याने आम्हाला जे दिलं त्यांत त्याची दात्याची भावना नव्हती, तर समर्पणाची भावना होती.
आम्ही त्याच्या सहवासात मजेत होतो. तो होता का आमच्याबरोबर मजेत ?
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
A compulsively readable account of a journey to the Congo a country virtually inaccessible to the outside world - vividly told by a daring and adventurous journalist.
Ever since Stanley first charted its mighty river in the 1870s, the Congo has epitomized the dark and turbulent history of a failed continent. However, its troubles only served to increase the interest of Daily Telegraph correspondent Tim Butcher, who was sent to cover Africa in 2000. Before long he became obsessed with the idea of recreating Stanley's original expedition but travelling alone.
Despite warnings Butcher spent years poring over colonial-era maps and wooing rebel leaders before making his will and venturing to the Congo's eastern border. He passed through once thriving cities of this country and saw the marks left behind by years of abuse and misrule. Almost, 2,500 harrowing miles later, he reached the Atlantic Ocean, a thinner and a wiser man.
Butcher's journey was a remarkable feat. But the story of the Congo, vividly told in Blood River, is more remarkable still.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
✍🏻 डॉ. आनंद नाडकर्णी
कसोटीच्या कालखंडाला कसं सामोरं जायचं ह्या विषयावर मी जसा वागत होतो तसाच बोलत होतो... ते पुस्तकी नव्हतं. विवेकनिष्ठ माणूस म्हणून मानसोपचारतज्ज्ञ आणि अद्वैत तत्त्वज्ञान ह्या दोहोंमधली माझी समज विस्तारणारं होतं. शिवाय, माझं माणूस म्हणूनचं जगणं आणि मनआरोग्य प्रसारक म्हणून माझं उद्दिष्ट ही दोन्ही अगदी एकजीव झाल्याचा अनुभव मला यायला लागला.
या पुस्तकात तुमच्या भेटीला येणारे लेख तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आधीच वाचले, ऐकले, पाहिले, अनुभवले असण्याची शक्यता आहे. पण आता हा त्यांचा एकत्रित असा गुच्छ आहे. ह्यामध्ये कोरोनाच्या कालखंडाचे वैयक्तिक, सामाजिक, भावनिक असे दस्तऐवजीकरण तर आहेच; पण त्याचबरोबर ह्या पालक खंडातून जाताना नेमकं काय शिकायचं आणि पुढे काय न्यायचं ह्याचं भरीव सूचनही आहे. आजूबाजूची अनिश्चितता काही रातोरात संपणार नाही हे आपल्याला कळून चुकलं आहे. अशा संक्रमणकाळातून जाताना स्वतःच्या विचारभावनांचं आरोग्य कसं जपायचं ह्यासाठी एक 'गाईड' म्हणूनही हे पुस्तक उपयोगाचं आहे आणि ह्या साऱ्यातून पार पडल्यावर उद्याच्या पिढीला कोरोनाची गोष्ट सांगण्यासाठीसुद्धा हे लिखाण उपयुक्त ठरणारं आहे.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
✍🏻 गिरीश प्रभुणे
जमिनीत खोलवर लुप्त झालेली संस्कृती उत्खननातून सापडते. 'मोहेन्जोदाडो-हराप्पा' या अशाच सापडलेल्या शहरांमुळेच आपले पूर्वज-गणगोत आपल्याला गवसले ! जमिनीत खोलवर खणत जाता येतं. गाळाखाली गाडलेलं उकरून काढता येतं. गाळाने, मातीने जतन करून ठेवलेलं आपल्या आघातानं तुटणार नाही, नष्ट होणार नाही असं काढावं लागतं.
इथं झंझावाती वेगानं, आधुनिकतेनं नष्ट होत चाललेली संस्कृती. अगदी आपल्यातच प्राण हळूहळू निघून जावा तसा. आपल्यातच आपल्या जवळच वावरणारा एक आपलाच संस्कृती समूह 'इतिहासकालीन' सांस्कृतिक जीवन जगणारा. हळूहळू नष्ट होत जाणारा... त्याचं दर्शन अंगावर रोमांच उभं करणारं. तसंच खिन्न करणारं, वेदना देणारं.
ही भारतीय लोकगंगा अनादी काळापासून वाहत आलेली. त्यातल्या काही ओंजळी म्हणजे हे लेखन. या समाजदर्शनानं माझं जीवन समृद्ध झालं. या लोकगंगेच्या काठावर अजून खूप घनदाट अरण्य आहे. अनेक जाती-समूह प्राचीन भारतीय वैभवसंपन्न समृद्ध संस्कृतीचे चालतेबोलते अवशेष त्या ठिकाणी जगत आहेत. अनेक अस्पर्श वाटा खुणावताहेत.
हे पुस्तक म्हणजे एक अवघड प्रवास आहे. भटक्या-विमुक्त समजातले असंख्य सहकारी कार्यकर्ते, समरसता मंचाचे कार्यकर्ते यांच्या बरोबरच्या चर्चा, बैठका, प्रवास यामधूनच हे लेखन साकारले.
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐































