
Editor @lokmat Mumbai | Award winning Journalist | Journalist with Mission to Connect People
Mumbai, India
Joined January 2010
- Tweets12K
- Following167
- Followers6.9K
- Likes1.1K
Pinned Tweet
Replying to @OfficeofUT
@OfficeofUT यांना बाजूला ठेवून महाराष्ट्रात बंडखोरांसोबत सरकार बनवण्याची @BJP4Maharashtra ची योजना आहे अशी बातमी @lokmat मध्ये मी 23 जून रोजी दिली होती. आज ती खरी ठरली. @vijayjdarda @Dev_Fadnavis @mieknathshinde @ShivSena @INCIndia @NCPspeaks @mnsadhikrut @rishidarda @karandarda
एफडीए कमिशनर तुकाराम मुंढे यांच्याशी एका वेगळ्याच विषयावर गप्पा झाल्या. ही मुलाखत नक्की पहा, लोकमत यूट्यूब चैनल वर... येत्या सहा तारखेपासून... तसेच ही मुलाखत लोकमत दीपोत्सव मध्ये ही वाचायला मिळेल.
@Tukaram_IndIAS @lokmat @LokmatMumbai
आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी, त्याच्या प्रेमापोटी अशी निस्वार्थ भावना ठेवून काम करणारे दोन टक्के लोक जरी निर्माण झाले तरी केवढी मोठी क्रांती होईल...
सर, आपण या माध्यमाचा इतका सकारात्मक वापर करत आहात ही देखील एक जनसेवाच आहे...
कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील होन्नाळी तालुक्यातील सी. कडतकट्टे गावचे ८२ वर्षीय जमाल साब सध्या कौतुकाचा विषय ठरले आहेत. त्यांची पत्नी सुमारे वर्षभरापूर्वी वारली. तिच्या स्मृती जपण्यासाठी ते दररोज तीन तास गावाच्या स्वच्छतेसाठी श्रमदान करतात.
गावातील मंदिर असो वा मशीद, स्वच्छतेच्या कामात ते कोणताही भेदभाव करत नाहीत. बसस्थानक, ग्रामपंचायत परिसर, सरकारी शाळा, विद्यार्थी वसतिगृह, रस्ते आणि गटारे यांसह सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी ते निःस्वार्थपणे धडपडतात. या सेवेसाठी त्यांना कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नाही. एवढेच नव्हे, तर गरजू कुटुंबांच्या विवाहासाठीही ते आर्थिक मदत करतात.
गावकरी त्यांना गावाचा अभिमान मानतात. पत्नीच्या आठवणींना सेवेच्या माध्यमातून उजाळा देणारे जमाल साब प्रेमाची खरी ताकद, माणुसकी आणि निःस्वार्थ सेवेचा अर्थ शिकवतात. त्यांचा हा सेवाभाव खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे!
#JamalSaheb #Karnataka
#Cleanliness
सर आपणास दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा..!!! आपल्या शुभेच्छा कायम आमच्या सोबत असतात..!!!
दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा, वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय... विजयादशमीच्या या मंगलमय शुभपर्वावर आपल्या जीवनातील नकारात्मकतेचे सीमोल्लंघन होवो, विचारांना नवी दिशा मिळो आणि प्रत्येक प्रयत्नाला यशाची सुवर्णझळाळी लाभो.
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाची सोनपावले उमटोत.
आपणा सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🌿
#dasara2026
#DasaraFestival
मंत्र्यांच्या तत्कालीन खासगी सचिवाचेही निलंबन करण्याची वेळ आली आहे. जे चालू आहे ते गंभीर आहे. हे थांबवण्यासाठी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यात नक्की लक्ष घालतील याची खात्री आहे. @lokmat @LokmatMumbai @Narhari_Zirwal
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात नववी ओळख महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांची. त्यांनी आपल्या निर्णयक्षमतेतून, प्रशासकीय कौशल्यातून आणि कामाप्रतिच्या बांधिलकीतून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कामगार, गृह, ऊर्जा, नियोजन, पर्यावरण, वस्त्रोद्योग, आर्थिक सांख्यिकी आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांत काम करताना त्या राज्याच्या विकास प्रक्रियेत मोलाचे योगदान देत आहेत. पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, कामातील शिस्त आणि नेतृत्वातील ठामपणा हेच त्यांच्या खऱ्या सौंदर्याचे पैलू आहेत. या अधिकारी आहेत - (बसलेल्या, डावीकडून) कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे तसेच (उभ्या, डावीकडून) नियोजन विभागाच्या सहसचिव गीतांजली बाविस्कर, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त ज्योत्स्ना पडियार, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती म्हसे-पाटील, वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव शैला ए., सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका डॉ. निरुपमा जे. डांगे.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @LokmatMumbai @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @vijayjdarda @RajendrajDarda @devendarda @rishidarda @karandarda
घडलेली घटना गंभीर आहे. मुंबईत अशी गुन्हेगारी अनेक वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे. @MumbaiPolice याचा नक्की छडा लावेल...
मुंबईतील जुहू येथे अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर आज संध्याकाळी गोळीबार झाला पण सुदैवाने तो बचावल्याची प्राथमिक माहिती आहे.
दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी सुमारे पाच गोळ्या झाडल्या. टायगर श्रॉफ सुखरूप आहे मात्र या घटनेत दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
#TigerShroff #Mumbai #Attack
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात आठवी ओळख फिजिओथेरपिस्टची. रुग्णांना वेदनामुक्त जीवनाची दिशा देणे, अपघात व दुखापतींनंतर शरीराची हालचाल पूर्ववत करणे, शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन करणे आणि व्यक्तींना पुन्हा स्वावलंबी बनविणे, अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या फिजिओथेरपिस्ट पार पाडतात. राज्यात शासकीय आणि खासगी मिळून १२६ फिजिओथेरपी महाविद्यालये असून, दरवर्षी ७,४०५ विद्यार्थी या क्षेत्रात प्रवेश घेतात. महिला फिजिओथेरपिस्ट म्हणजे संवेदनशीलता, कौशल्य आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम. त्यांच्या कार्याला सलाम.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @thecsp @Pure_Physio @mieknathshinde @SunetraA_Pawar @LokmatMumbai
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात सातवी ओळख करून घेऊया पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात अतिशय उत्तम काम करणाऱ्या डॉक्टरांचे. रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान करणाऱ्या पॅथॉलॉजी डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते त्यांनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारे पुढे आजाराची सगळी ट्रीटमेंट ठरत असते त्या महत्त्वाच्या या विभागात अनेक महिला डॉक्टर महत्त्वाचे काम करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @LokmatMumbai
#pathology @vijayjdarda @RajendrajDarda @RajThackeray @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @Pathologists
पाच अधिकाऱ्यांनी 250 क्विंटल सुपारी मध्ये (ज्याचे बाजार मूल्य दहा कोटी रुपये होते) कसे घोटाळे केले हे लोकमतने उघडकीस आणले आणि बातमी छापून आल्याच्या तिसऱ्या दिवशीच पाचही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड चालली. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे त्यासाठी अभिनंदन.
@lokmat @LokmatMumbai @FDA_MAHARASHTRA @Tukaram_IndIAS @Narhari_Zirwal @mieknathshinde @SunetraA_Pawar
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात सहावी ओळख करून घेऊ मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो, भुयारी मार्ग, उड्डाणपूल आणि रस्त्यांसह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीत पुरुषांच्या बरोबरीने महिला अभियंत्यांची. सिव्हिल इंजिनिअर अधिकारी म्हणून त्या अनेक किचकट प्रकल्पांचे नियोजन, डिझाइन, बांधकामावर देखरेख, तांत्रिक बाबींची पूर्तता आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी पार पडत आहेत. त्यांच्या कामाला सलाम.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @LokmatMumbai @MMRDAOfficial @DrSanMukherjee @swati_lokhande @vijayjdarda @RajendrajDarda
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात पाचवी ओळख करून घेऊया आपापले व्यवसाय सांभाळून ढोल ताशा या वाद्य प्रकारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तरुणींची. ढोल ताशांचा गजर नसानसात संचारलेल्या उत्साह, आणि उरात महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान घेऊनच या तरुणी ढोल वादनासाठी उतरतात तेव्हा सर्वत्र अनोखे मांगल्य साकारते. अनोखे वाद्य सांभाळत वेगळा स्वर निर्माण करणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @LokmatMumbai @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @RajThackeray @mieknathshinde @SunetraA_Pawar
बिहारलाही लाजवेल अशा पद्धतीचा संघटित भ्रष्टाचार एफडीए मध्ये करणारे हे अधिकारी आहेत कोण? त्यांना पाठीशी कोण घालत आहे? आता मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनीच त्यांचा तिसरा डोळा उघडण्याची वेळ आली आहे. ते नक्की यात लक्ष घालतील याची खात्री आहे.
@Tukaram_IndIAS @Narhari_Zirwal @mieknathshinde @SunetraA_Pawar @lokmat ने आज हे प्रकरण समोर आणले असले तरी सगळ्यांनी हा विषय उचलून धरला पाहिजे.
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात चौथी ओळख करून घेऊ आजच्या तरुण पिढीची. जेन झी या नावाने ओळखली जाणारी ही तरुण पिढी खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान आहे. रंग रूपापेक्षा त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास आहे. दांडगी इच्छाशक्ती हे त्यांचे बळ आहे. उद्याचा भारत घडवण्यात याच पिढीचा मोठा वाटा असेल. यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @LokmatMumbai @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात तिसरी ओळख करून घेऊ या मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, आणि आर्थिक घडामोडीत योगदान देणाऱ्या कोळी समाजातील भगिनींची. समुद्राशी नाते जोडून मत्स्य व्यवसायातून कुटुंबाचा आर्थिक गाडा सांभाळणाऱ्या या कोळी महिलांनी आपल्या अपार कष्टातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @LokmatMumbai @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar #कोळीबांधव
Great
मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मी आणि लोकमतचे अध्यक्ष डॉ. विजयबाबू दर्डा यांनी नुकतीच जयपूरमध्ये भेट घेतली.
विद्यापीठांना आदर्श बनविण्यासाठी राबविलेले उपक्रम, आदिवासी भागांमध्ये करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती नानांनी दिली. गावाकडच्या गप्पाही झाल्या. तश्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटी होत असतात पण जयपूरमध्ये भेटणे हा एक सुखद अनुभव होता.
माननीय राज्यपाल महोदयांनी जयपूरच्या राजभवनात आमचे मनःपूर्वक स्वागत केले, आम्हाला खूप प्रेम दिले याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
@RajBhavanJaipur
@BagadeHaribhau
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या वर्षीच्या उपक्रमात दुसरी ओळख
या तरुण महिला कलाकारांची.
भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपण्याचा आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. सतार, तबला, बासरी, हार्मोनियम आणि गायन अशा विविध कलाप्रकारांतून या तरुणी वादनकौशल्याने रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे @lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @LokmatMumbai
"साडीच्या रंगापेक्षा कर्तृत्वाचे रंग मोठे" ही मालिका लोकमतने याही वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आजपासून सुरू केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना पुढे आणून त्यांच्या कामाची ओळख समाजाला करून देण्यासाठीच्या या उपक्रमात पहिली ओळख मल्लखांबाच्या माध्यमातून स्वतःचे नाव राज्य आणि देशपातळीवर नेणाऱ्या कर्तबगार मुलींची.
#साडीच्या_रंगापेक्षा_कर्तृत्वाचे_रंग_मोठे
@lokmat @vijayjdarda @RajendrajDarda @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @LokmatMumbai @devendarda @rishidarda @karandarda
दुष्काळाची घोषणा झाली आहे. त्याचीच वाट पहाणाऱ्या काही मोजक्या अधिकारी नेत्यांना ही स्वकमाईची संधी वाटू नये हीच प्रार्थना...
वाचा @lokmat @LokmatMumbai
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी यांच्या मतदारसंघातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सौभाग्यवती प्रतिमाताई तसेच उद्योजक महेश मुद्दा, त्यांच्या पत्नी उमाताई आणि माझी पत्नी दीपा... असे आम्ही सगळ्यांनी सोरटी सोमनाथ देखाव्याचेही दर्शन घेतले.
@ShelarAshish #Bandra #गणेशोत्सव२०२६ @lokmat


























