सगळा आधी कन्फर्म करा आणि मग पुढचा काय ते बघा की । अंदाजावर काय चालू आहे सगळा !!?
@PMCPune @prajytnair @degree_holders @RRPSpeaks @supriya_sule @Dev_Fadnavis @mieknathshinde #PMC_JE_Scam #pmc #PMC_JE_Exam
nooneasked retweeted
आणखी एक परीक्षा रद्द.....!
२०२६ भरतीचे वर्ष ❌
२०२६ पेपरफुटीचे आणि परीक्षा रद्दचे वर्ष ✅
@CMOMaharashtra
nooneasked retweeted
Replying to @PMCPune
@PMCPune #pmc स्वतः परीक्षेतील गंभीर संशय, CCTV-लॉग analysis व FIR मान्य करते; तरी याच निकालावर नियुक्तीची घाई कशासाठी? चौकशी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती तात्काळ स्थगित करा! हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड मान्य नाही—आधी सत्य, मग नियुक्ती!#PMCJE2026 #JusticeForStudents
nooneasked retweeted
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतून प्रश्नांचे फोटो बाहेर येऊनही मनपा प्रशासन जबाबदारी झटकतंय. गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी मनपासमोर आंदोलन केलं त्यावेळी मी स्वतः आयुक्तांची भेट घेऊन चौकशी होईपर्यंत नियुक्त्या न देण्याची विनंती केली होती. आता IBPS च्या अहवालात merit further investigation असा स्पष्ट निष्कर्ष असताना तसंच विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतरही मनपा प्रशासनाला प्रसिद्धीपत्रक काढून तातडीने नियुक्ती आदेश देण्याची एवढी घाई का झालीय? यामागं कुणाचा अदृश्य दबाव कार्यरत आहे का?
हे प्रकरण अतिशय गंभीर असून विद्यार्थ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन न करता प्रशासनाने नियुक्त्या देण्याचा प्रयत्न केला, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मलाही त्यांच्यासोबत मनपासमोर आंदोलनाला बसावं लागेल!
@Dev_Fadnavis
nooneasked retweeted
रात्री नियुक्ती आदेश काढून PMC ने खरंच “गतिमान कारभाराचा” नवा आदर्श घालून दिला आहे! 👏
JE भरतीत 5 आरोपी चौकशीचे प्रश्न कायम पण नियुक्त्या मात्र रात्रीच घाईघाईने!
वा@PMCPune ! गैरप्रकाराचा तपास नंतर, नियुक्त्या आधी अशी कोणती “नवी कार्यपद्धती” सुरू केली आहे?
@navalMH @prajytnair
nooneasked retweeted
विद्यार्थ्यांनी पुणे मनपा चा सुरू असलेल्या सत्रातील फोटो व्हायरल झाल्यानंतर मनपाला विविध प्रश्न विचारले तसेच मनपा समोर अनेक आंदोलने देखील केली अद्याप मनपा द्वारे याबाबत ठोस असा निर्णय झालेला नाही उलट पुणे मनपाने खालील फोटो मध्ये आहे ते ट्विट केले आणि सुरू असलेल्या सत्रातून फोटो बाहेर गेला हे अप्रत्यक्षरित्या कबूल देखील केले आहे आणि त्यानंतर ट्विट डिलिट देखील केले @PMCPune
ने ट्विट मध्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे काही प्रश्न गांभीर्याने उपस्थित होतात जसे की,
जॅमर किंवा इंटरनेट बंद असणे हा प्रश्नफुटीचा फायदा रोखणारा पुरावा ठरत नाही.
त्यामुळे PMC ने स्पष्ट करावे—
🔹 प्रत्यक्षात किती प्रश्न बाहेर गेले?
🔹 कोणत्या Session वर त्याचा परिणाम झाला?
🔹 जाहिरातीत नमूद केलेले answer-pattern/similarity analysis केले का?
🔹 किती उमेदवारांचे response-pattern संशयास्पद आढळले?
🔹 Session-wise आणि Centre-wise performance चे forensic analysis केले का?
🔹 Top scorers च्या question-wise accuracy मध्ये काही असामान्य pattern आढळला का?
फक्त “केंद्रात इंटरनेट नव्हते” एवढ्यावर प्रश्नफुटीचा संशय दूर होत नाही.
निष्पक्ष चौकशीसाठी question-wise accuracy + response similarity + session-wise performance + centre-wise data + CCTV/technical logs यांचे स्वतंत्र forensic analysis झाले पाहिजे.
दोषी कोण असेल ते तपासातून समोर येऊ द्या; तसेच दोषींवर पुणे मनपाने प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा होईपर्यंत प्रकरण बंद करता कामा नये.
#PMC #PMCExam #PMCJE #ExamScam #PaperLeak #Recruitment #Transparency #JusticeForStudents
@navalMH @prajytnair
nooneasked retweeted
एकीकडे आयुक्त साहेब स्वतः तीन उमेदवार संशयित आढळले आहेत म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांना नियुक्ती देण्यात येईल असेही सांगत आहेत, या घोटाळ्याच्या मुळाशी मात्र जाण्याची त्यांची इच्छा का दिसत नाही ?
IBPS च्या confidential Report वरती २७ ऑगस्ट ही तारीख असताना तो रिपोर्ट आज म्हणजेच २८ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सुट्ट्या असताना का प्रसिद्ध करण्यात आला? नियुक्ती आदेश निर्गमित देखील इतक्या वेगात का करण्यात येत आहेत....?
विद्यार्थ्याचे अनेक प्रश्न आणि शंका आहेत उत्तर द्यावेच लागेल.
nooneasked retweeted
पुणे मनपाने नियुक्ती आदेश देखील दिले ते पण इतक्या रात्री..... याला गतिमान कारभाराचा उत्तम नमुना म्हणायचं की पेपरफोडणाऱ्यांना वाचण्याचा उत्तम नमुना म्हणायचं???
नक्की कोणाला वाचवत आहे @PMCPune
nooneasked retweeted
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती फक्त तीन उमेदवार आणि दोन कर्मचारी यांच्यापर्यंत आहे हे कशाच्या आधारावरून ठरवले गेले आहे, याबाबतचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा आणि याचा तपास हा पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात यावा.
@PMCPune
nooneasked retweeted
PUNE MUNICIPAL CORPORATION PAPER LEAK
MPSC cancelled its entire recruitment process after the paper reached just ONE candidate. Has PMC become bigger than MPSC that it refuses to cancel its JE exam despite a reported paper leak?
@RahulGandhi @PMCPune
nooneasked retweeted
PMC चा RTI ला दिलेला प्रतिसाद म्हणजे माहिती लपवण्याचा प्रयत्न. यापूर्वी PMC ने RTI मधून Answer Key दिल्या होत्या, मग आता IBPS चं कारण पुढे करून टाळाटाळ का? पारदर्शकता असेल तर Answer Key तात्काळ जाहीर करा. अन्यथा संशय आणखी बळावेल.
#PaperLeak #PMCJE @PMCPune @prajytnair @navalMH
nooneasked retweeted
प्रति,
मा. संचालक,
नगररचना विभाग,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करून रिक्त पदांची भरती करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकडून नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदभरतीबाबत सातत्याने निवेदने व मागण्या प्राप्त होत आहेत. राज्यातील वाढती बेरोजगारी आणि विविध विभागांतील रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर या पदांची भरती तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे.
सन २०२४ मध्ये रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटूनही विभागातील अनेक पदे अद्याप रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. या रिक्त पदांमुळे नगररचना विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही विलंब होत आहे. नगररचना विभागामध्ये नव्याने पदभरती प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या अनुषंगाने रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आपणाकडे आग्रही मागणी करीत आहे.
तसेच, विभागातील सर्व रिक्त पदांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत करण्यात यावा, जेणेकरून अधिकाधिक पात्र उमेदवारांना संधी मिळेल आणि विभागालाही आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळबद्ध पद्धतीने राबवून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी व नियुक्तीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्यात यावी. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि राज्यातील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
आपण वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @OfficeofEknath @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @INCMaharashtra @INCHarshsapkal
#रचनासहाय्यक #TownPlanning #महाराष्ट्र #UrbanDevelopment #MaharashtraJobs #Recruitment #रोजगार
nooneasked retweeted
PMC JE भरतीतील कथित पेपर फुटीप्रकरणी प्रशासनाचे मौन संशय अधिक गडद करत आहे. हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले असताना दोषींवर कारवाईचा वेग शून्य का? भरती प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करायचा असेल तर सत्य बाहेर आलेच पाहिजे. #PaperLeak @PMCPune @prajytnair @navalMH
nooneasked retweeted
पुणे मनपा ने बेरोजगार विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रस्त्यावर यायला भाग पाडू नये.
@PMCPune
nooneasked retweeted
पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता(गट क) घेण्यात आलेल्या परीक्षेमधील पेपरफुटी,गुणांच्या समानीकरणं याचा गोंधळ,विद्यार्थ्यांच्या मार्कातील तफावत तसेच उत्तर पत्रिकेतील आढळलेले दोष याचा तपास व तपासाची योग्य दिशा यांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन तपास योग्य दिशेने पूर्ण करावा.
nooneasked retweeted
राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२७ पूर्वी ती भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
MPSC परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, या विद्यार्थ्यांच्या भावनेची दखल घेत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत बैठक घेतली. आयोगाची स्वतःची यंत्रणा उभारल्याशिवाय ऑनलाईन परीक्षा पद्धत विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही असेही मा. मुख्यमंत्री महोदय यांनी आश्वासित केले. याबद्दल मा. मुख्यमंत्री महोदय तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मनःपूर्वक आभार! यानुषंगाने माध्यमांशी संवाद साधला.
#mpsc #maharashtra #devendrafadnavis #exam
nooneasked retweeted
झालेल्या पुणे मनपा कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) परीक्षेत काही उमेदवारांनी #RTI द्वारे उत्तरपत्रिका मागवली होती त्या उत्तरपत्रिकेत प्रश्न क्रमांक ४४ आणि ४५ साठी पर्याय क्रमांक ६ हे उत्तर दिलेले आहे.ज्यावेळी परीक्षेत पर्यायच ५ होते अशा वेळी पर्याय क्रमांक ६ हे उत्तर कसे काय असू शकते.
nooneasked retweeted
कनिष्ठ अभियंता पदाच्या उमेदवारांनी केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याबाबतचं पत्र काढून याबाबत दिलेला शब्द पाळल्याबाबत महापालिका आयु्क्त मा. नवल किशोर राम साहेब यांचे आभार! यापुढंही दिलेल्या आश्वासनानुसार या भरती प्रक्रियेची सखोल चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत कोणत्याही नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत, शिवाय कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, ही अपेक्षा!
@PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता
#पदभरती – at Pune, India




























