Soham Jadhav retweeted
"श्रीमंत रावसाहेब गेले याजमुळे सर्वच फसल्यासारखे झालें आहे. वाघ गेला ! सारी कोल्हीं राहिली आहेत. ईश्वर सत्ताप्रमाण."
थोरल्या माधवराव पेशव्यांची प्रकृती अखेरच्या काळात दिवसेंदिवस खालावत होती. राजयक्ष्मा, पोटाचा विकार, ताप आणि खोकला यांमुळे त्यांना मोठा त्रास होत होता. विविध वैद्यांकडून उपचार सुरू होते. मात्र कडक पथ्य पाळणे त्यांना शक्य होत नव्हते. प्रकृती गंभीर असूनही त्यांचे राज्यकारभारावरील लक्ष आणि निर्णयक्षमता कायम होती. रामशास्त्री प्रभुणे, नाना फडणीस, हरिपंत फडके आणि त्रिंबकमामा पेठे यांसारखे विश्वासू सहकारी त्यांच्या सोबत होते. माधवरावांनी नारायणरावांचा सांभाळ करण्याची आणि दौलतीचा कारभार वडीलपणाने सांभाळण्याची विनंती रघुनाथरावांना केली. ३० सप्टेंबर १७७२ रोजी माधवरावांनी नऊ कलमी मृत्युपत्र तयार केले. त्यात राज्यावरील कर्जफेड, रयतेचे हित, महसूल व्यवस्थेतील सुधारणा, काशी-प्रयाग तीर्थक्षेत्रे मिळवण्याचा प्रयत्न आणि गोपिकाबाईंच्या तीर्थयात्रेची व्यवस्था अशा सूचना होत्या. तसेच धार्मिक कार्यांसाठी देणग्या, ब्राह्मणभोजन आणि रघुनाथरावांना जहागीर देण्याची तरतूद केली होती. ऑक्टोबरमध्ये त्यांची प्रकृती अधिक खालावली. उपचार सुरू असूनही सुधारणा होत नसल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांनी आपला मुक्काम महालातून थेऊरच्या मंदिरात हलवला आणि गाभाऱ्याजवळील खोलीत राहू लागले.
६ नोव्हेंबरच्या सुमारास असह्य पोटदुखीने त्रस्त झालेल्या माधवरावांनी वेदना असह्य झाल्याने रघुनाथरावांकडे खंजीर मागितला. मृत्यू जवळ आल्याची जाणीव झाल्याने त्यांनी नारायणरावांना अखेरचा निरोप दिला आणि दानधर्म, धार्मिक विधी व ब्राह्मणभोजनाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. ताप, खोकला आणि अंगावरील सूज यांमुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. माधवरावांच्या प्रकृतीची गंभीर बातमी समजताच रमाबाईंनी सतीची वस्त्रे आणण्यासाठी पुण्याला सांडणीस्वार पाठवला. ही बातमी कळल्यावर माधवराव संतप्त झाले. मृत्यूच्या छायेत असतानाही त्यांनी राज्यावरील कर्ज फेडण्याची तळमळ कायम ठेवली. सावकारांकडून कर्जाची माहिती घेतली आणि दीर्घकाळ सेवा केलेल्या व्यक्तींना देणग्या व इनामे दिली. प्रकृती सुधारल्यावर पुन्हा राज्यकारभार पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र आजाराने त्यांना दिवसेंदिवस ग्रासले.
१८ नोव्हेंबर १७७२ रोजी माधवरावांच्या जीवनाचा अखेरचा दिवस उजाडला. मृत्यूपूर्वी त्यांनी वैद्यांना जुलाबाचे औषध देण्यास हरकत नाही मात्र खोकला वाढवणारे औषध देऊ नये असे सांगितले. खोकल्यामुळे नामस्मरण करता येणार नाही अशी त्यांना चिंता होती. ते अन्नग्रहण करत नव्हते. केवळ दूध आणि गंगाजल घेत होते. मृत्यूपूर्वी त्यांनी सर्व अमात्य आणि वेदमूर्ती ब्राह्मणांना जवळ बोलावले. "महायात्रेस आम्ही जातो. आमच्या स्वारीची तयारी करा." असे सांगून ते "गजानन, गजानन" असे नामस्मरण करू लागले. त्यानंतर त्यांच्या नेत्रांद्वारे प्राण निघून गेले. अशा प्रकारे अवघ्या सत्तावीस वर्षांच्या माधवराव पेशव्यांचे थेऊर येथे निधन झाले. माधवरावांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र शोककळा पसरली. त्यांच्या निधनामुळे मराठा राज्याने एक कर्तबगार आणि दूरदृष्टीचा शासक गमावला होता.
माधवरावांच्या निधनानंतर रमाबाईंनी सती जाण्याचा निश्चय कायम ठेवला. त्यांनी धर्मशिलेवर उभे राहून जवळच्या मंडळींना आपले दागिने आणि मोहरा वाटल्या. त्यानंतर रघुनाथरावांना बोलावून नारायणरावांचा हात त्यांच्या हाती दिला आणि "सर्वांचे वडीलपणाने यथास्थित चालवावे" अशी विनंती केली. नमस्कार करण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला रमाबाईंनी मोहर दिली. माधवरावांच्या आवडत्या गाईही त्यांनी स्वतःच्या हाताने ब्राह्मणांना दान दिल्या. रमाबाईंनी उपस्थित पटवर्धन मंडळींनाही काही दागिने दिले. परशुरामभाऊंना पाचूची अंगठी तर वामनरावांना गणपतीची मुद्रा असलेली हिऱ्याची अंगठी दिली. त्यानंतर त्या सती गेल्या. अवघ्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत पानिपतच्या पराभवातून मराठा साम्राज्याला सावरून पुन्हा वैभव प्राप्त करून देणारा कर्तबगार शासक काळाच्या पडद्याआड गेला होता. त्यांच्यानंतर राज्यात अनुभवी सरदार आणि मुत्सद्दी असले तरी सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे नेतृत्व उरले नव्हते.
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩
#ईश्वरदत्त #श्रीमंत_माधवराव_पेशवे #मराठा_साम्राज्य
Madhav Bhat never visited Delhi.
It was Mahadji Shinde.
Instead of asking questions to their own politicians people from such states come to MH and then ask us why they get treated bad ?
Why are they so poor ?
Soham Jadhav retweeted
Replying to @sahyadritempest
Soham Jadhav retweeted
Found this photograph a few days ago from our personal archives.
From L to R:
Sitting: Keshavrao Jedhe, Independence activist, leader of the Indian National Congress in Maharashtra and Former MP from Baramati.
Vinayak Damodar Savarkar
Pandurang Bapat (Senapati Bapat), Famous for the Mulshi Satyagraha & close associate of Savarkar.
Standing: Vasudeo Balwant Gogate, Attempted to assasinate the acting governor of Bombay in 1931 Sir Ernest Hotson. Was imprisoned after the Gandhi assassination. Later became the Mayor of Pune City.
Shri Gangurde.
Looks like the photo has been clicked at the Jedhe Mansion in Pune in the mid 1950's where many meetings of Sanyukta Maharashtra and Goa Liberation Movement used to take place.
Today is the Birth Anniversary of Senapati Bapat & Death Anniversary of Keshavrao Jedhe.
#Pune #savarkar #punecity































