Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27) header
Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27) profile picture

Politician | Social Worker | Corporator, Mumbai Municipal Corporation

Joined April 2024
Photo by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27)Photo by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27)Photo by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27)Photo by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27)Photo by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27)Photo by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27)Photo by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27)Photo by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27)Photo by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27)Photo by Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27)
अखेर दहिसरकरांना न्याय मिळाला.. दहिसरचं रडार हटलं! मी सर्वप्रथम कार्यक्षम मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस, केंद्रीय मंत्री किंजरापू नायडू साहेब, केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मा. खा. गोपाळ शेट्टी साहेब, आ. मनीषाताई चौधरी यांच्यासह सर्व दहिसरकरांचे मनापासून आभार मानते! हा तांत्रिक व गुंतागुंतीचा प्रश्न फक्त आणि फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेबांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. रडार हटल्यामुळे 10 लाखापेक्षा अधिक नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे लाखो दहिसरकरांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. . . . . #TejasveeGhosalkar #Dahisar #bjp #BJPForDahisar #BJPWithDevelopment
10
6
1
61
10,375
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन! त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण सदैव प्रेरणा देत राहील. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना मानाचा मुजरा! 🇮🇳 #NeverForget2611 #MumbaiTerrorAttack #श्रद्धांजली
2
95
भारतीय संविधान दिन चिरायू होवो ! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #ConstitutionDay
1
87
गुरुनानक जयंतीनिमित्त काल माझ्या प्रभाग क्रमांक २ मधील गुरुद्वाराला भेट देऊन श्री गुरुनानक देवजींचे दर्शन घेतले. यावेळी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या गुरुनानक देवजींचे विचार सदैव प्रेरणादायी आहेत.
14
263
पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड होणे, ही मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानास्पद बाब आहे.
1
2
111
आपल्या लेखणीतून सामाजिक वास्तव, वंचितांचे प्रश्न आणि मानवी संघर्ष प्रभावीपणे मांडणाऱ्या त्यांच्या साहित्यिक योगदानाचा हा गौरव आहे. या सार्थ निवडीबद्दल डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
2
25
देव दिवाळीनिमित्त आयोजित ‘स्वरसंध्या’ या मराठी व हिंदी गीतांच्या सुरेल नजराण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून संगीताच्या सुरेल मैफलीचा आनंद घेतला. सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कलाकारांचे आणि उपस्थित रसिकांचे मनःपूर्वक आभार!
3
108
15 वर्षांच्या वयात इतिहास घडवणारी खेळी! 🔥🏏 53 चेंडूंत 204 धावा, तब्बल 28 षटकार! वैभव सूर्यवंशीने आपल्या वादळी खेळीने क्रिकेटविश्वाला थक्क करत नवा इतिहास रचला. भारतीय क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य! 🇮🇳👏 #VaibhavSooryavanshi #IndianCricket #RecordBreaker
2
50
976
दहिसर पूर्व येथील श्री मुद्रणेश्वर महादेव मंदिरात तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त काल उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी भक्तिमय वातावरणात तल्लीन होत, भक्ती आणि श्रद्धेचा हा मंगलमय सोहळा अनुभवताना मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान लाभले.
1
1
42
694
मानवतेचा, समतेचा आणि बंधुभावाचा संदेश देत समाजाला सत्य, करुणा व निःस्वार्थ सेवेचा मार्ग दाखवणारे शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरू गुरुनानक देवजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
7
125
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादितच्या नूतन पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहाचा उद्घाटन सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विधानसभा अध्यक्ष मा. ना. श्री. राहुलजी नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर मा. सौ. रितूताई तावडे यांच्या शुभहस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
1
20
349
Devabhau Mode: BUILDING THE FUTURE.🔥
4
181
श्रद्धा, भक्ती आणि मांगल्याचा सुंदर संगम असलेला तुळशी विवाहाचा पवित्र उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात नवचैतन्य आणि आनंद घेऊन येवो. माता तुळशीचा आशीर्वाद सदैव सर्वांवर राहो! तुळशी विवाहाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
6
184
हिंदुत्वाचा बुलंद आवाज, मराठी अस्मितेचे प्रखर समर्थक आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांचे विचार, संघर्ष आणि हिंदुत्वाचा विचार सदैव प्रेरणा देत राहील.
1
9
229
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार, ३३८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग आणि पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! भारतीय युवा संघाने जिद्द, आत्मविश्वास आणि सांघिक खेळाच्या जोरावर नवव्यांदा अंडर-१९ आशिया कपवर आपले नाव कोरले. या दिमाखदार कामगिरीबद्दल संपूर्ण संघाचे, प्रशिक्षकांचे अभिनंदन!
1
9
388
भाऊबीजेनिमित्त देवाभाऊंची ग्रेट भेट! आज भाऊबीजेच्या खास निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवाभाऊ फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. या भेटीचा आनंद आणखी खास होता, कारण यावेळी माझी मुलं यश्वी आणि सतेज हे दोघेही उपस्थित होते. @Dev_Fadnavis
3
3
79
2,901
आपल्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातूनही देवाभाऊंनी आमच्यासाठी आवर्जून वेळ काढला. आपुलकीने विचारपूस केली, मुलांशीही मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक न राहता एक सुंदर कौटुंबिक आठवण बनली! देवाभाऊ, या प्रेम, आपुलकी आणि स्नेहाबद्दल आपले मनःपूर्वक आभार! #bhaubeej
3
208
दिवाळीनिमित्त केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, भाजपा नेते व खासदार मा. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
2
2
104
3,885
दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त आदरणीय आमदार मनिषाताई चौधरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनिषाताईंशी विविध विषयांवर चर्चा करत स्नेहपूर्ण संवाद साधला. त्यांच्या सहवासात दिवाळीच्या आनंदाला एक वेगळाच उत्साह लाभला.
1
25
633
सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.! बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या भाऊबीज निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! #dipavali #Bhaubij
1
8
587
दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर मा. रितू तावडे जी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी स्नेहपूर्ण संवाद साधला. @TawdeRitu
2
5
98
1,840