Asim Sarode (@AsimSarode) profile picture

Constitutional Law practice.Enabling access to justice for all. Dealing with Criminal,Family, Environment cases. Writer, Law-Policy-Constitutionalism Analyst

Maharashtra
Joined June 2009
Photo by Asim Sarode (@AsimSarode)Photo by Asim Sarode (@AsimSarode)Photo by Asim Sarode (@AsimSarode)Photo by Asim Sarode (@AsimSarode)Photo by Asim Sarode (@AsimSarode)Photo by Asim Sarode (@AsimSarode)Photo by Asim Sarode (@AsimSarode)Photo by Asim Sarode (@AsimSarode)Photo by Asim Sarode (@AsimSarode)Photo by Asim Sarode (@AsimSarode)
सत्तासंघर्ष प्रकरण आज लिस्ट नसताना सुद्धा काल रात्री अचानक आजच्या कामकाज यादीवर घेण्यात आले. थोड्याच वेळात सुनावणी सुरू होईल.
5
22
376
11,673
शिंदेसेनेची लाचारी संपता संपत नाही. माझे मित्र @DrVishwam यांनी सडेतोड लिहिले आहे. अमित शहांच्या स्वागताचे एकनाथ शिंदेंचे सर्वात जास्त फ्लेक्स पुण्यात लागले होते. जर सुप्रीम कोर्टातून शिंदेसेनेचा कार्यक्रम झाला तर अमित शहा हे शिंदेंचं शेवटचं आश्रयस्थान आहे एवढाच या फ्लेक्सचा अर्थ. भाजपातले लोक सोडून एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्रातला सर्वात जास्त गुजराती शरण नेता आहे. पुण्याचे खरे फ्लेक्ससम्राट मुरलीधर मोहोळ पण शिंदेंनी त्यांना यावेळी मात दिली. माझे हे म्हणणे आहेच की एकनाथ शिंदेसेना हा महाराष्ट्रातील अमित शाहांचा पक्ष आहे.
12
110
796
20,816
अमित शाहजी, राहुल गांधी कुठे जातात, काय बोलतात आणि कसे राजकारण करतात, याची भाजपला एवढी काळजी का? काँग्रेसला पुढील ३० वर्षे सत्ता मिळणार नाही, असा दावा तुम्ही करता आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवता! हा आत्मविश्वास आहे की अस्वस्थता? राहुल गांधींची चिंता सोडा; कारण विरोधकांना संपवण्याच्या घोषणा करून सत्ता टिकत नाही, जनतेचा विश्वास जिंकून सत्ता टिकवावी लागते! शेवटी, राहुल गांधी काय करतात हा त्यांचा प्रश्न; पण भाजप सत्तेत असल्याने सरकार काय करते, हा जनतेचा प्रश्न आहे!
15
102
5
647
9,108
टीव्हीपासून होर्डिंगपर्यंत मोदींचा फोटो झळकला, जाहिरातींवर कुठे किती खर्च? youtu.be/1zfVi266FbA?si=DyJE… via @YouTube
2
5
32
1,511
टीव्हीपासून होर्डिंगपर्यंत मोदींचा फोटो झळकला, जाहिरातींवर कुठे किती खर्च? किती लोकांना जगविता आले असते, किती जणांना जीवन देता आले असते या पैशांमधून!
8
278
Judges can lecture citizens on politics, philosophy, food, reading habits, even unseat an elected PM but we can’t return the favour. Unfair; repeal criminal contempt of court law. barandbench.com/columns/rule…
7
76
3
239
6,580
काही स्त्रिया वेश्या व्यवसाय करतात म्हणून त्यांना अशाप्रकारे शिंदेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण करणे अत्यंत चुकीचे आहे. पोलिसांनी करण्याचे काम तुम्ही मॉरल पोलिसिंग करून स्वतःच्या हातात कायदा घेऊ शकत नाही. इथे तर शिंदे सेनेच्या महिलांनी पोलीस आणि न्यायाधीश दोन्ही होण्याची भूमिका केलेली आहे. त्या वेश्याव्यवसायिक स्त्रिया स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने शरीरविक्रीचा धंदा करतात. मन- डोकं आणि नैतिकता विकून राजकारणाचा धंदा करणाऱ्या तुमच्या नेत्यांकडे करोडो रुपये आहेत त्यातून त्या स्त्रियांचे पुनर्वसन करा ना …… त्या असहाय्य वेश्यां व्यावसायिकांच्या झिंज्या उपटणे, पुरुष कार्यकर्त्यांनी लाकडी काठ्या आणून देणे आणि त्याने त्या बायांना मारणे हे अमानुष आहे. मला या मारहाण करणाऱ्यांची नावे पत्ते द्या आणि यांच्यावर न्यायालयात केस करणे आवश्यक आहे. एकनाथ शिंदे साहेब निवडणुका झाल्यावर आता तुम्हाला या वेश्या व्यावसायिक ‘लाडक्या बहिणींची’ आवश्यकता नसेल. या राक्षसी असंवेदनशील वागणुकीसाठी तुमचा आणि तुमच्या पक्षातील खूनशी, अमानुषतेचा निषेध. instagram.com/reel/Dfr0yZeqQ…
3
19
1
131
7,099
अण्णा हजारेंनी देवेंद्र फडणवीस यांची आरती ओवाळली आहे. अजून काय पाहिजे ?! एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणला हेलिकॉप्टरने आले होते आणि तेव्हा अण्णा त्यांच्या पीए गँगसह तिथे तयार केलेल्या हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गेले. तेव्हा अण्णानी स्वहस्ते देवेंद्र फडणवीस यांची आरतीचे ताट हातात घेऊन ओवाळणी केली होती. या घटनेचे फोटो तेव्हा सोशल मीडियावर आले होते. २०१४ नंतर अण्णा हजारेंना- त्यांच्यातील हवा काढून घेऊन आणि हजारे उध्वस्त करून ‘अण्णा झिरो’ करण्यात धंदेवाईक पद्धतीने गिरीश महाजन यांनी भूमिका निभावली. अण्णाच्या अवतीभवती श्याम आसावा सारखी काही चांगली माणसे होती तर काही अण्णांच्या जवळचे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करणारे झाले होते. एकदा अण्णाच्या एका पीए च्या डेअरी चे उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीस आले. अण्णा हजारे स्टेजवर होते आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणात त्या पीए नाव घेऊन म्हणाले की, त्या पीए ने बोलविल्याने मला यावेच लागले. अण्णा ला भाजपने नंतर जणू मांडलिकत्व दिल्याप्रमाणे ठेवले. अण्णा हजारेंबाबत सोनिया गांधी यांचे पुस्तकातील मत चुकीचे आहे असे त्यामुळेच म्हणता येत नाही.
12
65
563
16,452
believe in using the strategic power of law, the press and media to drive institutional and judicial reforms, challenge deeply entrenched patterns of brutality and dehumanisation, and resist the forces that undermine democratic values and institutions. My endeavour is to make legal practice an instrument of meaningful social change—not merely a profession of litigation, but a commitment to justice, human dignity, accountability and democracy. I invite more lawyers to join hands in this mission and transform the practice of law into a collective force for institutional reform and democratic renewal.
5
26
1,244
अण्णा अजूनही लोकांची व स्वतःची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी आता तरी खरे बोलावे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ यामध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनावर टीका केली आहे व हे आंदोलन भाजप आणि आरएसएसच्या पुढाकारातून झाल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि सोनिया गांधींचे म्हणणे बरोबर आहे हे भारतातील अनेक नागरिकांना अण्णांच्या एकांगी वागण्यातून 2014 पासून पटायला लागले आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलेले उत्तर की त्यांचा कोणत्या राजकिय पक्षाशी संबंध नव्हता, त्यांच्यासाठी सगळे समान आहेत, कुणी वंदनीय नाही आणि कुणी निंदनीय नाही इत्यादी….. हे उत्तर पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. अण्णांना आता या पुस्तकाच्या निमित्ताने सत्य बोलण्याची संधी आहे त्यांनी ती घालवू नये असे मला वाटते. मुळात ते अण्णा हजारेंनी उभे केलेले आंदोलन होते का? याबाबत आधी स्वच्छ विचार करावा लागेल. एकदा हे सांगणे मला आवश्यक वाटते की अण्णांच्या देशप्रेमाबद्दल मला मुळीच शंका नाहीत. पण माझे असे मत आहे की, ते अण्णांचे आंदोलन नव्हते तर एका नियोजित रणनीतीचा भाग म्हणून अण्णांना नेता म्हणून पुढे करण्यात आले होते. ते आंदोलन… इंडिया अगेष्ट करप्शन आणि अरविंद केजरीवाल यांनी सुरू केले होते. या आंदोलनाला भाजपचा पूर्ण पाठिंबा होता आणि त्यांचा, भाजपच्या अनेक नेत्यांचा सहभाग त्यात होता. अण्णांना मोठेपणा दिल्याने ते सुखावलेल्या अवस्थेत होते आणि त्या आंदोलनात अनेक भाजपचे छुपे नेते सांगतील तसे अण्णा करत होते. आता राहिला मुद्दा की, अण्णांना जवळ करणे किंवा भाजपप्रमाणे चतुराईने अण्णांशी जवळीक ठेवण्याचे कॉंग्रेसला जमले नाही ……. तर 2014 नंतर अण्णाने केलेले एक आंदोलन कुणीही दाखवा, सातत्याने केवळ लोकशाही व देश मजबूत राहावा म्हणून लाऊन धरलेले एखादे म्हणणे किंवा त्यांचा सत्याग्रह दाखवा ज्यामुळे काँग्रेस ने अण्णांवर विश्वास ठेवावा. मी काही काँग्रेस किंवा कोणत्या राजकीय पक्षाचा सदस्य नाही पण हे दिसते की अण्णांच्या बेभरवशाच्या भूमिकांमुळे काँग्रेस अण्णांना दखलपात्र सुद्धा मानत नाही. कारण 2014 नंतर इतके विषय, भ्रष्टाचार, राजकीय गुन्हेगारी व अराजकता घडूनही अण्णांनी त्यांच्या मागण्यांद्वारे आणि आंदोलन करून अण्णांनी कधी लोकशाहीसाठी आवाज उठविला नाही. अण्णा वयस्कर झालेत त्यांनीच सगळे करावे असे माझे मत नाही. पण 2014 पासून अनेक वर्षे तर ते ठणठणीत होते तरीही त्यांनी एखादा भाजप विरोधी विषय घेतला नाही. त्यांना राष्ट्रपती व्हायची लालसा होती असे म्हणतात. असो. त्यामुळे अण्णा कितीही म्हणत असले तरीही ते भाजपा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही नाठाळ मंत्री यांच्याशी सलगी ठेऊन वागले आहेत व त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका भाजपमय अशीच दिसते. कुणी अण्णांच्या पाया पडले की तो त्यांच्या नजरेत चांगला व्यक्ती ठरतो या त्यांच्या भोळसटपणाचा देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने राजकीय वापर केला आहे व तसा कदाचित काँग्रेस ला करता आला नसेल. पण अण्णा भाजप समर्थक असल्याप्रमाणे वागले असे माझे स्पष्ट मत आहे. सोनिया गांधींचे ‘ बिलाँगिंग - ए जर्नीऑफ लव्ह’ वाचतोय….. वाचल्यावर अधिक बोलूया. पण सोनिया गांधींनी लिहिलेल्या अण्णा हजारेंच्या उल्लेखा निमित्त इतकेच सांगावे वाटते की अण्णांना चेहरा करून झालेल्या या आंदोलनाचा मोठा हातभार 2014 मध्ये सत्तांतर होण्यात झालेला आहे आणि तेव्हापासून लोकशाहीचे, लोकशाही प्रक्रियांचे अपरिमित नुकसान झाले, एक देश म्हणून भारताची जगभर नाचक्की झाली. ज्यांनी ज्यांनी अण्णांना चेहरा करून झालेल्या त्या स्ट्रेटेजिक आंदोलनात सहभाग घेतला त्यांनी मान्य करावे की त्यांची दिशाभूल झाली. त्या सगळ्यांनी धाडस दाखवावे व सांगावे की त्यांची चूक झाली. प्रामाणिकपणे एकदा असे जाहीरपणे सांगावे. * हे वरील माझे म्हणणे आहे व ते सगळ्यांना पटावेच असा आग्रह नाही.
56
96
6
822
18,011
नरेंद्र मोदी सुद्धा पुण्यात स्कूटर वर फिरत होते. नरेंद्र मोदी तेव्हा भाजपचे जुने कार्यकर्ते प्रा. विकास मठकरी यांच्यासोबत स्कूटरवर फिरायचे असे ऐकले. डॉ. डी. वाय. पाटील यांनी स्कूटर वर फिरून शिक्षणसंस्था उभ्या केल्या. त्यांनी पैसा कमविला असेल पण त्यांच्या स्कूटरवर फिरल्याने निदान शिक्षण व्यवस्था उभ्या राहिल्या, अनेकांना जीवनवाटा मिळाल्या. डॉ. डी. वाय. पाटील यांचा स्कूटरवरील प्रवास अनेक सकारात्मक व रचनात्मक गोष्टी दाखविणारा तर नरेंद्र मोदी या स्कूटरवर फिरणाऱ्या माणसाने आज या देशाची वाट लावली, सगळे उध्वस्तपण आणि भकासपण आणले. थोडक्यात, डॉ. डी. वाय. पाटील यांचा सारखा स्कूटरवरील प्रवास अनुकरणीय आहे.
57
111
9
955
34,227
महत्वाच्या विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठीचे ठेवणीतले विषय. आण बाबा जे जे कायदे आणायचे ते आण पण दुष्काळ, कुपोषण मृत्यू, बालविवाह, वायुप्रदूषण, अनावश्यक वृक्षतोडी अश्या विषयांवर सुद्धा बोल.
दुष्काळी भागातील जनतेला सुखावणारी घोषणा ! 👇🏽
27
1
215
4,270
हा बघा महामूर्ख शिरोमणी! दिल्लीतील AQI 1000 क्रॉस झालाय जेव्हा की 50 च्या वर AQI मानवी आरोग्यदाला घातक आहे. यंदाच्या दिवाळीत जगातील 100 सर्वाधिक शहरांमधील 99 शहरे भारतातील आहेत. श्वसनास धोकादायक वातावरण आणि वाईट दर्जा आपण तयार केलाय आणि हा तथाकथित संस्कृतीरक्षक म्हणतोय की दिवाळीतील फटाक्यांनी प्रदूषण होत नाही तर वातावरणातील किडेकीटक इत्यादी मरतात व पर्यावरण सुद्धा होते असे मोहन भागवत म्हणतोय. /www.instagram.com/reel/DfkYlirTRXm/?dlrf=b3RxMGJkcXNtY2Nu
6
52
1
368
19,234
न्यायाधीशांनी राजकीय नेत्यांच्या/मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारणे टाळावे. कारण न्यायव्यवस्था केवळ निष्पक्ष असणे पुरेसे नाही, तर तिची निष्पक्षता जनतेला दिसलीही पाहिजे. काहींना कायद्याची माहिती असल्याचा अभिमान, तर काहींना न्यायाधीश माहिती असल्याचा विश्वास! न्यायव्यस्थेला राजकारणाने घेरणे चांगली परिस्थिती नाही. न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता टिकवायची असेल, तर न्यायाधीशांनी सत्तेच्या प्रभावापासूनही अलिप्त दिसले पाहिजे आणि प्रत्यक्षात अलिप्त असले पाहिजे. #GokulElection2026 #GokulChairmanElection #GokulProtest #GokulPolitics @satejp @AUThackeray @RajThackeray @INCHarshsapkal @Dev_Fadnavis
5
53
3
396
5,284
गोकुळवर आपला अध्यक्ष तर नेमला पण लोकांच्या मनातील उरला सुरला आदर सुद्धा गमावला. विजय मिळविला, सत्ता संपादन केली तरीही लोकांमध्ये आनंद तर नाहीच उलट भीषण शांतता आहे. ओळखीची आहे ही शांतात- - तीच जी २०२४ च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर भारतभर होती व विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रभर पसरली होती. लोकशाहीचे वादळ आता अटळ आहे…. कमळ नाचविणारे त्तुम्ही नुसते वाहून जाणार नाही तर भुईसपाट होणार.
40
142
5
878
11,837
जर गोकुळचा कोरम पूर्ण करण्याचीच काळजी होती तर … देवेंद्र फडणवीस म्हणतात की “ गोकुळ” ही छोटी संस्था आहे, (500 कोटी पेक्षा जास्त उलाढाल असलेल्या महाराष्ट्रात केवळ 3 सहकारी संस्था आहेत ते असूद्या). गोकुळ वर ताबा करण्याचा वैगेरे काहीही उद्देश नाही असेही फडणवीस म्हणाले आणि त्यांनी सांगितले की ‘केवळ कोरम पूर्ण करण्यासाठी सरकार नियुक्त सदस्य (ज्यापैकी चार जणांना मतदानाचा हक्क आहे) नेमले आहेत. जर कोरम पूर्ण करण्याची काळजी होती तर मग भाजप महायुतीच्या निवडून आलेल्या 12 संचालकांना गोकुळ चा अध्यक्ष निवडीच्या मिटिंगसाठी हजर रहा इतकेच सांगितले असते तरी कोरम पूर्ण झाला असता ना? आताही हसन मुश्रीफ यांना तुम्ही सांगू शकता की त्या 12 जणांना लपवून ठेवलेय तिथून काढा आणि मिटिंगसाठी पाठवा ‘कोरम’ पूर्ण होईल. नाहीतर थेट मान्य करा की तुमचे राजकारण अशाच खोटारडेपणावर, पळवापळावीवर, निवडणूक चोरीवर, घटनाबाह्य वागणुकीवर आधारित आहे. हे सुद्धा सांगा की तुम्ही नेहमी खोटे नॅरेटिव तयार करतांना मीडियाचा स्वच्छंदी वापर करता.
47
271
1
1,639
45,060