Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait) profile picture

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।”

india
Joined December 2021
Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)Photo by Adv.Dr Ajit D Kakde (@BrandedKrait)
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
#MPSC च्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून #MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना पदावरून हटवावं या मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विद्यार्थ्यांची विराट ताकद दाखवून दिली. या मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भावनेचा विचार करुन सरकारने तातडीने त्यांच्या या मागण्या मान्य कराव्यात आणि भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या #MPSC च्या कारभाराची झाडाझडती घेऊन तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तसंच MPSC ची ऑफलाईन परीक्षा, औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी अटक झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्याकाळातील सर्व परीक्षांचं फॉरेन्सिक ऑडीट यासह विद्यार्थ्यांच्या सर्वच मागण्या या न्याय्य आहेत. त्याकडं सरकारने दुर्लक्ष करु नये, अन्यथा विद्यार्थ्यांचं यापेक्षाही मोठं आंदोलन पुण्यातच उभारण्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी खा. सुप्रियाताई सुळे, आ. डॉ. विश्वजीतजी कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (SP) प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रा. विठ्ठल कांगणे सर, प्रा. सचिन ढवळे सर, प्रा. यशवंत सोलाट सर, प्रा. अजित काकडे सर, प्रा. गणेश कड सर, प्रा. धनंजय मते, प्रा. समाधान कोकटे सर, प्रा. अनिकेत पाटील सर, सचिन म्हस्के सर, तसंच या आंदोलनात प्रमुख भूमिका घेणारे प्रमोद पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी किरण जगताप, संग्राम नराळे, अक्षय कांबळे, अमोल अतकरे (जॉली), स्वप्नील भिसे, प्रविण पाटील, दीपक कसबे, नितीन गिते, अजय जगताप, निकेतन शिंदे, साहेबराव क्षीरसागर, सिद्धांत जांभुळकर, ऋषिकेश गांगुर्डे, कुणाल दिलपाक, तनया साठे, शकील शेख, शिवदास मोरे, बालाजी मिसाळ, अजय बनसोडे, अमोल शिंदे, महेश सरकाळे, राहुल तरंगे, मिथुन भालेराव, गणेश कोराळे, आश्रूबा चौधरी, साक्षी खंडावळे, स्नेहा बावनकर, ऋषिकेश शिंदे, राहुल गुडदे यांच्यासह सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सीजेपी यांचे पदाधिकारी, मा. आ. मोहनदादा जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, रविराज साबळे पाटील यांच्यासह राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #MPSC_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी
13
384
2
1,173
14,313
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
पुण्यात विद्यार्थ्यांच्या यशस्वी झालेल्या विराट आंदोलनामागे अनेकांचे हात राबत होते. यामध्ये प्रामुख्याने प्रमोद पाटील आणि या फोटोत दिसणारे त्यांचे सहकारी तसंच फोटो फ्रेममध्ये न येता कायम विद्यार्थी हितासाठी निःस्वार्थी भावनेने काम करणारी शिक्षक मंडळी या सर्वांचे मनस्वी आभार..! या सर्वांच्या मेहनतीमुळंच पुण्यात विद्यार्थ्यांची अभूतपूर्व एकजूट आणि ताकद सरकारला दिसली आणि म्हणूनच सरकारला विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल, यात शंका नाही…! सर्व प्रसार माध्यमांनीही मोर्चातील विद्यार्थ्यांचा आवाज सरकारसह राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोचवला, मोर्चामुळं गैरसोय होऊनही पुणेकरांनीही विद्यार्थ्यांना समजून घेतलं आणि पोलिस प्रशासनानेही अत्यंत सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळं या सर्वांचेही मनापासून आभार! #विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी #MPSC
8
80
630
12,119
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
Replying to @mahapwdofficial
@mahapwdofficial ने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठीच्या जागा कोणाच्या दबावाखाली 2025 मध्ये वळवल्या या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे.. @Dev_Fadnavis @VRadhaIAS @mieknathshinde
20
344
1
203
2,509
मा @Dev_Fadnavis जी महाराष्ट्र आता थांबणार नाही अस‌ आपण म्हणाला होता त्याप्रमाणेच राज्य शासनाच्या जागा भरल्यानंतरच महाराष्ट्र विकासाला वेग घेईल त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत ही विनंती.. @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @ssaunik #CombineGroupBIncreaseVacancies
11
344
3
174
3,157
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
राज्यसेवा तर्फे ज्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्या जागांची यादी बघितल्यानंतर राज्यसेवा आयोग नेमक काय करत आहे हेच कळत नाहीं. राज्यसेवेच्या मागील परिपत्रकात PSI पदासाठी 441 जागांची भरती करण्यात येणार होती.त्या जागा कमी करून केवळ 216 जागांची भरती आता करण्यात येणार आहे.शिवाय DYSP,तहसीलदार सारख्या महत्वाच्या पदांच्या तर जागाच काढण्यात आलेल्या नाहीयेत.ही क्रूर थट्टा आहे त्या लाखो विद्यार्थ्यांची जे,ही परिक्षा पास होण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. शिवाय राज्यसेवेची ही होणारी परीक्षा Objective Pattern नुसार शेवटची परीक्षा आहे, त्यामुळे राज्य शासनाने यात लक्ष घालत 2024 च्या जाहीरातीमध्ये सर्वच्या सर्व पदे कसे भरता येतील याकडे लक्ष देत,विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यावा..! प्रत्येक विभागात हजारो जागा रिक्त असताना हे सरकार काहीच जागा भरणार आहे.माझी राज्य सरकारला आणि राज्यसेवा आयोगाला विनंती आहे की,राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करू नका...!! त्यांना न्याय द्या..त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या..! #राज्यसेवा
73
720
6
908
22,238
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे. शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा! @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks #combine_2024_जागावाढ #राज्यसेवा_जागावाढ_2024 #संयुक्त_2024_जागावाढ #MPSC #Studentsrights
73
1,531
17
1,025
18,556
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
#राज्यसेवा_जागावाढ 2024 #Combine_जागावाढ 2024 #MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याकडून शासनाला आलेल्या जाहिरात मध्ये जागा वाढबाबत नम्र विनंती.. 1. MPSC 2024 मध्ये होणारी राज्यसेवा ही शेवटची Objective पॅटर्न ची असल्याने आलेल्या जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागावाढ करावी. खूप पदांच्या जागा रिक्त आहेत..🙏 2. MPSC Combine पूर्व 2024 गट ब, गट क जाहिरात मध्ये सुद्धा जागावाढ करावी. खूप जागा सुधारित SEBC आरक्षण मुळे वापस गेलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त जागा शासनाने या जाहिरात मध्ये ऍड करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना दिलासा द्वावा ही विनंती..🙏 @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @cbawankule @SMungantiwar @dhananjay_munde @ChhaganCBhujbal @SunilTatkare @girishdmahajan @atulsave_india @ChDadaPatil @Dwalsepatil @RVikhePatil @mrhasanmushrif @RajThackeray @mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP @PawarSpeaks @supriya_sule @uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61 @ajitpawarspeaks @Chh_Udayanraje @NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu
175
2,388
38
1,210
21,703
✨ राज्यसेवा आणि Combine 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP
27
675
4
358
4,568
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
राज्यसेवा आणि Combine 2024 च्या जाहीरातीमध्ये तात्काळ 100% सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP @ssaunik
31
906
4
475
5,477
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
विद्यार्थी हितासाठी केलेल्या आणखीन एका मागणीला मूर्त स्वरूप आले. मा देवेंद्रजींनी विधिमंडळात शब्द दिल्याप्रमाणे गट-क दर्जाची शासकीय पदे सुद्धा टप्प्याटप्प्याने एमपीएससीमार्फत भरणेबाबतचा शासननिर्णय निर्गमित झाला आहे. मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांचे मनःपूर्वक आभार. #MPSC
30
100
4
217
7,072
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
मा. सचिव, @Drsuvarnas मॅडम @mpsc_office सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी. @ssaunik @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
44
807
3
423
5,670
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलेच. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना प्रवर्ग (SEBC किंवा OBC) बदलाची संधी पूर्व परीक्षेपूर्वीच देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तसेच मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा श्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार. मराठा परीक्षार्थींची भविष्यातील संभाव्य कायदेशीर अडचण आणि भविष्यात प्रकरण न्यायप्रविष्ठ बनून भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता मावळली याचा मनस्वी आनंद आहे. मी व्यक्तिशः परीक्षा पुढे ढकलण्याच्या विरोधात असतो पण भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ठ बनून 4-6 महिने वाया जाण्यापेक्षा परीक्षा थोड्याशा पुढे जाऊ देऊन भविष्यातील संभाव्य कायदेशीर अडचण आत्ताच दूर करणं अधिक संयुक्तिक वाटल्यानेच या विषयात मी ताकदीने पाठपुरावा केला. या निर्णयामुळे EWS प्रवर्गात असणाऱ्या जवळपास 70,000 मराठा विद्यार्थ्यांना SEBC आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. परीक्षा पुढे गेली तरी प्रवर्ग बदलासाठी पर्याप्त कालावधी गृहीत धरून परीक्षेची सुधारित तारीखदेखील याच प्रसिद्धीपत्रकात जाहीर करावी यासाठी मी आग्रही होतो, याचा सकारात्मक विचार करून 25 ऑगस्ट ही परीक्षेची सुधारित तारीख आजच जाहीर केल्याबद्दल देखील आयोगाचे आभार. #MPSC @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office
170
299
15
738
13,502
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
MPSC राज्यसेवा परीक्षा पास करून सुधा...भावी अधिकारी नैराश्याच्या स्तिथित..गतिमान सरकारने प्रक्रिया गतिमान करण्यासाठी कृपया लक्ष द्यावे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @OfficeofUT @RRPSpeaks #Mpsc #state_service_joining_22
3
73
1
84
5,275
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
आज मुंबई व लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा फटका आज होत असलेल्या लिपिक टंकलेखक परीक्षेला बसला आहे. संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थी इथे दाखल झाले आहेत पण पावसामुळे त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता येत नाहीये.. परिणामी ज्यांना आज परीक्षेला बसणे शक्य झाले नाही त्यांची परीक्षा इतर दिवशी घ्यावी, असे निर्देश शासनाने #MPSC ला द्यावेत, ही विनंती! @mpsc_office @mieknathshinde @Dev_Fadnavis
7
73
247
9,115
संदर्भ : आप महाराष्ट्र /०७०७२०२४/ ००४. प्रति, मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य विषय: #पेपरफुटी कायदा विधेयक २०२४ - सूचना. महोदय, राज्यातील युवांची प्रमुख मागणी असलेल्या पेपरफुटी कायद्याचे विधेयक "महायुती" सरकारने विधानसभेत मांडले मांडल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. या कायद्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या राज्यातील लाखो तरुण तरुणींना न्याय मिळण्याच्या दृष्टीने आपल्या सरकारने अत्यंत महत्वाचे पाऊल टाकले आहे. या ऐतिहासिक विधेयकातील विविध मुद्द्यांवर येत्या आठवड्यात चर्चा होऊन त्याचे कायद्यात रूपांतर होईल. गेले अनेक वर्षे बेरोजगारी व सरकारी परीक्षा प्रक्रियेतील भ्रष्टाचार याबाबत लोकशाही मार्गाने आवाज उठवून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. विधानसभेत या विधेयकावर विस्तृत चर्चा होऊन कुठलीही पळवाट राहणार नाही आणि पेपर फोडण्याची कोणाची हिम्मत होणार नाही असा कायदा अस्तित्वात यावा ही आमची अपेक्षा आहे. तरी सदरील कायद्यासाठी पुढील सूचना देत आहोत. कृपया आपण विधिमंडळातील उद्याच्या चर्चेत या सूचनांचा अंतर्भाव करून चर्चा घडवून आणावी हि विनंती. पेपरफुटी कायद्याबाबत सूचना: १. पेपर फोडणाऱ्या टोळ्यांमधील सर्व व्यक्तींची संपत्ती कायमस्वरूपी जप्त करण्यात यावी. २. संघटितरीत्या पेपर फोडणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकी रु. २५ कोटींपर्यंत दंड ठोठावण्यात यावा. ३. पेपर फोडीत सहभागी खासगी संस्था किंवा कंपनीला रु. ५० कोटी पर्यंत दंड आकारून त्या कंपनीला व संचालकांना कायमस्वरूपी बंदी घालवावी. ४. पेपर फोडीत सहभाग आढळणाऱ्या क्लास चालकांचा व संचालकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून त्यांना रु. २५ कोटी पर्यंत दंड ठोठावण्यात यावा. ५. पेपरफुटीत पहिल्यांदा आढळणाऱ्या विद्यार्थाला पाच वर्षापर्यंतची शिक्षा आणि २५ लाखापर्यंत अधिकतम दंड ठोठावण्यात यावा. तर सदर विद्यार्थी पुन्हा दुसऱ्यांदा पेपरफुटीत आढळल्यास त्याला दहा वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा आणि १ कोटी पर्यंत दंड ठोठावण्यात यावा. ६. या कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यात तपासात कुचराई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कार्यवाहीची तरतूद असावी. ७. या कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यात तपासात कुचराई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कार्यवाहीची तरतूद असावी. २०१६ ते २०२४ या कालावधीत पेपरफुटीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्या गुन्ह्यांची पूर्ण चौकशी झालेली नाही. हे सर्व गुन्हे एकत्र करून न्यायालयीन SIT स्थापन करून विशिष्ट कालावधीत सखोल तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्यास २०१६ पासून महापरीक्षा पोर्टल द्वारे घेतलेल्या सर्व भरती प्रकिया आणि इतर सरळ सेवा भरती मधील घोटाळा उघड होऊन त्यांना शिक्षा देणे उचित राहील. याबाबत सखोल चर्चा करून निर्णय घ्यावा हि विनंती. धन्यवाद @mieknathshinde
4
26
46
2,311
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
राज्यातील युवांची प्रमुख मागणी असलेल्या #पेपरफुटी कायद्याचे विधेयक सरकारने विधानसभेत मांडले आहे. यापूर्वी राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, कर्नाटक, झारखंड, मध्यप्रदेश, हरियाणा, बिहार, ओडिसा, आसाम या राज्यासह केंद्र सरकारनेही कायदा केला आहे. राज्याच्या विधानसभेत या विधेयकावर विस्तृत चर्चा होऊन कुठलीही पळवाट राहणार नाही आणि पेपर फोडण्याची कोणाची हिम्मत होणार नाही असा कायदा अस्तित्वात यावा ही अपेक्षा आहे. तरी सदरील कायद्यासाठी काही सूचना असतील तर कमेंट करून सांगा.. आपण उद्याच्या चर्चेत आपल्या सूचना नक्की मांडू… #पेपरफुटी #Maharashtra
77
145
4
378
18,578
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
Replying to @AkasaAir
This video from delhi airport date 03/07/2024 galti se akasa ki tickets book kar di thi.. or time pe pahoch gaye the..5 ghante se jyada wait krna pada..sab milke lade fir flight me bithaya….or time ki baat karte hai..flight number QP1146
1
3
2
431
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
कर सहायक 482 पदांच्या मागणीपत्राबद्दल अर्थमंत्री @AjitPawarSpeaks यांचे आभार. तसेच राज्य कर निरीक्षक (STI) चे 600+ जागांचे मागणी पत्र पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती.
6
226
1
204
5,096
Adv.Dr Ajit D Kakde retweeted
पाठपुराव्याला यश !! गेल्याच आठवड्यात सर्व शासकीय पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करावी अशी विनंती मी मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे केली होती, यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. आज सभागृहात बोलताना गट-क ची पदे देखील MPSC मार्फत भरण्याचा निर्णय मा उपमुख्यमंत्री महोदयांनी घोषित केला. विद्यार्थ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन निर्णय घेतल्याबद्दल मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार 🙏
55
142
3
308
6,834
16 जून रोजी झालेल्या UPSC पूर्व परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे दुसरीकडे FSO, राज्यसेवा, निरीक्षक वैधमापन मुख्य परीक्षा 2023 निकाल 6 महिन्यांपासून रखडला आहे! @mpsc_office
3
47
126
3,562