Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) header
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) profile picture

Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://nitter.cf/t.co/FqADu8UR7R

Maharashtra State, India
Joined April 2010
Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)
Devendra Fadnavis retweeted
Today’s News (30 October, 2026) : #DevendraFadnavis #Thread👇
1
3
10
8,537
Devendra Fadnavis retweeted
आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026 ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/219913/ अंजनगाव सुर्जी येथे श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/219918/ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मुंबईच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनाला चालना मिळणार mahasamvad.in/219922/ वर्ध्यात कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार mahasamvad.in/219930/ मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/220033/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
3
8
30
8,359
Devendra Fadnavis retweeted
मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे संपादक व व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारण्यासाठी शासन पुढाकार घेईल. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हे दालन उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, व्यंगचित्रकला ही एक अशी प्रभावी कला आहे, जिथे एकही शब्द न उच्चारता हवे तेवढे प्रभावी फटके मारता येतात आणि नेमके सांगायचे ते लोकांपर्यंत पोहोचवता येते. कोणत्याही काळातील घडामोडी असोत किंवा विरोधाभास असो, तो सातत्याने व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडण्याचे काम मराठी व्यंगचित्रकारांनी केले आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. ही एक विलक्षण कला आहे, जी महाराष्ट्राच्या मातीने आधीपासून जोपासली आहे. ही कला भावी पिढीपर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच मोलाची भूमिका बजावणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तकाचे महत्व अधोरेखित केले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @ShelarAshish @uddhavthackeray @RajThackeray #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #BookRelease
1
14
27
1,855
Devendra Fadnavis retweeted
🔸CM Devendra Fadnavis unveils 'Maharashtrachya Hasyaresha', a book compiled by Editor and Cartoonist Prashant Kulkarni. Minister Adv. Ashish Shelar, Uddhav Thackeray, Raj Thackeray and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपादक व व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाचे प्रकाशन. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से संपादक व व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी इनके द्वारा संपादित 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' इस पुस्तक का विमोचन। इस अवसर पर मंत्री एड. आशिष शेलार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕗7.45pm | 29-10-2026📍Mumbai | संध्या. ७.४५ वा. | २९-१०-२०२६📍मुंबई. @Dev_Fadnavis @ShelarAshish @uddhavthackeray @RajThackeray #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #BookRelease
3
20
1
97
19,418
Devendra Fadnavis retweeted
लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ... आइए हम सभी शनिवार 31 अक्टूबर को शाम 4 बजे, बोरीवली स्टेशन से शुरू होने वाली बड़ी पदयात्रा का हिस्सा बनें और संदेश दें कि देश प्रधानमंत्री @NarendraModi जी के साथ खड़ा है।
1,384
753
164
3,537
114,321
Devendra Fadnavis retweeted
श्री संत रूपलालजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक धार्मिक, सांस्कृतिक वारसा जतन आणि पर्यटन विकासाचे केंद्र ठरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारकाच्या विकास आराखड्यासंदर्भात बैठक पार पडली. हे स्मारक ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथे उभारण्यात येणार असून, सुमारे ₹80.26 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती चळवळीचा वारसा आणि श्री संत रूपलालजी महाराजांचे समाजप्रबोधनाचे विचार जतन होणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अंजनगाव सुर्जी येथील मौजे जेठमलपूर येथे हे राष्ट्रीय स्मारक आकार घेणार आहे. या स्मारकासाठी जागेचा प्रस्ताव सादर करावा. संत श्री गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या श्री संत रूपलालजी महाराज यांनी समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्मप्रसाराच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विकास आराखड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाविक, वारकरी आणि पर्यटकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व निवासी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये सभामंडप, पोथीवाचन सभागृह, योग केंद्र, वस्तुसंग्रहालय, अन्नपूर्णा इमारत, शहानूर इमारत, दिंडी सभागृह, वसतिगृह, चंद्रभागा इमारत, प्रवचन सभागृह, बहुउद्देशीय सभागृह, निवासी खोल्या, प्रशासकीय इमारत आणि कर्मचारी निवासस्थानांचा समावेश आहे. या सुविधांमुळे धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, पोथीवाचन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध होईल. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी निवासासह अन्य आवश्यक सुविधाही निर्माण केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या स्मारकाच्या आराखड्यात मुख्य स्मारकासोबत शहानूर नदीवरील पूल, 2.40 किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता, श्री संत रूपलालजी महाराजांचा पुतळा आणि अन्य पुतळ्यांच्या उभारणीचाही समावेश आहे. या कामांमुळे स्मारकापर्यंत पोहोचणे सुलभ होऊन परिसरातील पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे. हे राष्ट्रीय स्मारक धार्मिक श्रद्धेसह सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक वारसा जतन आणि पर्यटन विकासाचे केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. आधुनिक व पर्यावरणपूरक सुविधांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @DrSanjayKute #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
1
426
431
2,993
Devendra Fadnavis retweeted
ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे महाराष्ट्र मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स, 2026 संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ॲग्रीगेटर क्षेत्रातील वाढती वाहन संख्या, स्वतंत्र टॅक्सी चालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांचा आढावा घेतला. राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी ॲग्रीगेटर कंपन्यांच्या वाहनांची, चालकांची आणि त्यांच्या कामाचे तास याची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणारा अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा. या प्लॅटफॉर्मला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जोड देऊन वाहनांचे संचालन, चालकांची नियुक्ती, पार्किंगची व्यवस्था आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. वाहन आणि चालकांची संपूर्ण माहिती एका प्लॅटफॉर्मवर ॲग्रीगेटर कंपन्यांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंदणी, त्यासाठी वापरले जाणारे पार्किंगचे ठिकाण, संबंधित चालकाची माहिती, वाहन चालविण्याचा परवाना, पोलीस पडताळणी आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा तपशील डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, दिवसभरात वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कोणता चालक कोणते वाहन चालवितो, याची अद्ययावत नोंद या प्रणालीत असावी. एखादी घटना घडल्यास संबंधित वाहन आणि चालकाची माहिती तातडीने उपलब्ध होईल, अशी सक्षम यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या प्लॅटफॉर्मवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वाहनांचे संचालन, चालकांच्या पाळ्या आणि अन्य महत्त्वाच्या बाबींचे विश्लेषण करता येईल. त्यामुळे नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याबरोबरच आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करणे शक्य होईल. प्रवास वाटपातील पारदर्शकतेसाठी अल्गोरिदमचे परीक्षण ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये स्वतंत्र टॅक्सीचालक आणि मोठ्या फ्लीट कंपन्यांच्या वाहनांना प्रवास वाटप करताना समान संधी मिळते की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणत्या वाहनाला, कोणत्या कारणाने आणि कोणत्या निकषांवर प्रवास दिला जातो, याचे परीक्षण करता येणे आवश्यक आहे. प्रवास वाटपामध्ये भेदभाव होत असल्यास तो ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळण्यासोबतच स्थानिक चालकांना रोजगाराच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रवास वाटप आणि कंपन्यांच्या कामकाजावर तांत्रिक देखरेख या बाबींना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. राज्यातील ॲग्रीगेटर क्षेत्राचा विस्तार आणि प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी, सक्षम आणि गतिमान नियामक यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे. स्वतंत्र टॅक्सी चालकांचे हित, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेतील शिस्त यांचा समतोल राखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रभावी नियंत्रण व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन विभागाला दिले. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @PratapSarnaik #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
1
451
455
3,141
Devendra Fadnavis retweeted
🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the development plan for the national memorial of Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj, Anjangaon Surji taluka, Amravati district. MLA Sanjay Kute and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखडा, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती संदर्भात बैठक. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखड़ा, तह. अंजनगांव सुर्जी, जिला अमरावती के संदर्भ में बैठक। इस अवसर पर विधायक डॉ. संजय कुटे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐1pm | 29-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु.१ वा. | २९-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis @DrSanjayKute #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
44
512
1
581
16,485
Devendra Fadnavis retweeted
🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the Maharashtra Motor Vehicle Aggregator Rules, 2026. Minister Pratap Sarnaik and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स, 2026 संदर्भात बैठक. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र मोटर व्हीकल एग्रीगेटर रूल्स, 2026 के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री प्रताप सरनाईक एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕧 12.30pm | 29-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.३० वा. | २९-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis @PratapSarnaik #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
55
519
1
602
20,847
Devendra Fadnavis retweeted
🛣️ Connecting Key Economic Hubs, Strengthening Central India! The 26.6 km Indore–Raghogarh 4-laning project on NH-47 is currently under construction, aiming to strengthen connectivity between Indore and Harda while improving links with key economic centres across Central India. The Greenfield corridor features a four-lane carriageway, one major bridge, four minor bridges and 19 underpasses, designed to facilitate smoother traffic movement, safer crossings and better local connectivity. Once completed, the project will strengthen links towards Betul and Nagpur, enhance connectivity between Madhya Pradesh and Maharashtra, and support the efficient movement of goods and passengers. @MORTHIndia @PIBMoRTH #NHAI #BuildingANation
2
23
2
66
4,098
Devendra Fadnavis retweeted
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an MoU between the Government of Maharashtra (Industries Investment and Services Department) and Varun Beverages Ltd. for establishing state-of-the-art integrated manufacturing unit for FMCG & beverages at MIDC, Arvi, Wardha district, Maharashtra. Key Highlights of the MoU: 🔸 Proposed Investment: ₹2100 crore 🔸 Direct Employment: 550 jobs Objectives of the MoU: ✅ Direct jobs at the plant, plus indirect work in transport, packaging and distribution around Arvi. ✅ Boost to the surrounding industrial ecosystem, including agro-industries, packaging, transport and cold-storage suppliers. ✅ Creation of demand for local fruit and milk. COO, Group Head-Technical, RjCorp & Varun Beverages Ltd. Rajinder Jeet Singh Bagga and senior officials were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग) आणि वरुण बेव्हरेजेस लिमिटेड यांच्यात वर्धा जिल्ह्यातील एमआयडीसी, आर्वी येथे एफएमसीजी व पेय पदार्थांसाठी अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य कराराची ठळक वैशिष्ट्ये : 🔸 प्रस्तावित गुंतवणूक : ₹2100 कोटी 🔸 थेट रोजगार संधी : 550 सामंजस्य कराराची उद्दिष्टे : ✅ प्रकल्पामुळे थेट रोजगारासोबतच आर्वी परिसरात वाहतूक, पॅकेजिंग व वितरण क्षेत्रांत अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ✅ कृषी-आधारित उद्योग, पॅकेजिंग, वाहतूक आणि शीतगृह पुरवठादारांसह परिसरातील औद्योगिक परिसंस्थेला चालना. ✅ स्थानिक स्तरावर फळे आणि दुधाच्या मागणीत वाढ. यावेळी सीओओ, ग्रुप हेड-टेक्निकल, आरजे कॉर्प अँड वरुण बेव्हरेजेस लिमिटेड, राजिंदर जीत सिंह बग्गा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
52
524
3
649
24,820
Devendra Fadnavis retweeted
Today’s News (29 October, 2026) : #DevendraFadnavis #Thread👇
19
19
53
22,328
Devendra Fadnavis retweeted
Chaired the 54th PRAGATI meeting yesterday. The focus areas: Reviewed projects worth over Rs. 16,000 crore across 31 States and UTs. Faster redevelopment of railway stations as multimodal hubs. Boosting self-reliance in pharma manufacturing. Ekta Malls to empower artisans and local businesses. The focus is clear…substantive outcomes, timely execution and long lasting benefits for people. pib.gov.in/PressReleseDetail…
440
1,824
58
7,920
1,342,432
Devendra Fadnavis retweeted
आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 28 ऑक्टोबर 2026 महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/219840/ शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/219859/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
9
263
3
277
16,161
Devendra Fadnavis retweeted
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अचूक माहिती आणि डेटाबेस निर्मितीवर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि योजनांपश्चात सर्वेक्षणाबाबत बैठक पार पडली. सरकारी योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्त्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने योजनांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. योजनांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास, लाभार्थ्यांच्या माहितीचे विश्लेषण, योजनांमुळे साध्य झालेल्या परिणामांचे मूल्यमापन आणि त्यातून पुढील सुधारणांसाठी आवश्यक बाबी निश्चित करणे, अशा विविध स्तरांवर काम केले जात आहे. राज्यातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी या सर्वेक्षणांचा चांगला उपयोग होऊ शकतो. योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्वेक्षणातून मिळणारी माहिती केवळ माहितीपुरती मर्यादित न ठेवता, त्यातून प्रत्यक्ष कामकाजात सुधारणा घडवून आणण्यास मदत होईल. उपलब्ध माहितीच्या आधारे योजनांची सद्यःस्थिती समजून घेणे, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी ओळखणे आणि अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांच्या क्षेत्रीय कार्यालयांनी आवश्यक सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून योजनांबद्दलची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल, आणि सरकारच्या योजनांना मिळणारा प्रतिसाद समजण्यास मदत होईल. तसेच या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अचूक डेटाबेस तयार होईल, आणि लोकांना सरकारी योजनांचा अधिक लाभ मिळण्यास मदत होईल. या सर्वेक्षणातून सरकारी योजनांबाबत अधिक विश्वासार्हता निर्माण होऊन राज्य सरकारला अचूक माहिती मिळेल आणि गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. क्षेत्रीय कार्यालयांचा सहभाग महत्त्वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजनांची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आवश्यक सहकार्य करून माहिती संकलन व विश्लेषणाच्या प्रक्रियेत समन्वय साधावा आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूरक वातावरण निर्माण करावे. शासकीय यंत्रणा आणि संबंधित संस्थांनी एकसंघ भावनेतून काम केल्यास योजनांच्या अंमलबजावणीत अधिक चांगले परिणाम साधता येतील. उपलब्ध माहितीचा योग्य वापर, समन्वयपूर्ण कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांच्या आधारे प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवून आणता येईल. या माध्यमातून सरकारच्या विविध योजना अधिक परिणामकारक होण्यासह नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्याच्या प्रक्रियेत गुणात्मक परिवर्तन घडविणे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @ShelarAshish #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
32
51
1
70
3,283
Devendra Fadnavis retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय पटाचे सखोल अभ्यासक आणि राजकीय, सामाजिक व आर्थिक घडामोडींची अभ्यासपूर्ण मांडणी करणारे व्यक्तिमत्त्व हरपले, ही पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. ॐ शांती 🙏 #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
3
272
1
318
12,541
Devendra Fadnavis retweeted
MLC elections in 28 seats across 4 big states - Uttar Pradesh, Maharashtra, Bihar and Karnataka. Elections held using ballot papers. Guess how many seats Congress won? 🧐
16,163
40,611
7,211
178,741
14,349,256
Devendra Fadnavis retweeted
‘महासारथी’ला गती, ‘महाइंडस’चा शुभारंभ, AI च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रशासनात नवे पर्व! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महासारथी संदर्भात आढावा बैठक पार पडली. कृत्रिम बुद्धिमत्ता, एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरातून शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन आणि अपात्र लाभार्थ्यांची पडताळणीही या माध्यमातून अधिक प्रभावीपणे करता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शासकीय कामकाजासाठी एकात्मिक डेटाबेस, एआयचा वापर आणि विविध विभागांतील माहितीचे एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘महाआयडी’च्या माध्यमातून नागरिकांची माहिती एकत्रित करण्याबरोबरच शासकीय यंत्रणेची कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढविण्यास मदत होणार आहे. शासन निर्णयांच्या मोठ्या संग्रहातून आवश्यक माहिती वेगाने शोधणे, पत्रव्यवहाराचे व्यवस्थापन करणे आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ करणे यासाठी या प्रणालींचा उपयोग होईल. सार्वभौम एआयचा अशा प्रकारे वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावी होणार ‘महासारथी’ हा राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम पूर्णत्वाकडे जात असून, त्यातील विविध विभागांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. या प्रणालीमध्ये विविध विभागांच्या माहितीचे एपीआय इंटिग्रेशन केल्यास संबंधित डेटाचे सातत्याने अद्ययावतीकरण करणे शक्य होईल. त्यातून योजनांची अंमलबजावणी, निधीचा विनियोग आणि लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. विशेषतः वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये योग्य लाभार्थ्यांची निवड, अपात्र लाभार्थ्यांची ओळख आणि योजनांमुळे प्रत्यक्षात साध्य झालेल्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी एकत्रित माहितीचा उपयोग होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. ‘महाइंडस’मुळे प्रशासकीय कामकाज सुलभ ‘सर्वम एआय’च्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या ‘महाइंडस’ या सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यात मराठीसह 22 भारतीय भाषांमध्ये मसुदालेखन, भाषांतर, सारांश तयार करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे शक्य होणार आहे. शासकीय डेटा देशाबाहेर जाणार नाही किंवा एआय मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी वापरला जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवरील ‘जीआर एक्सपर्ट’ सुविधेद्वारे आजपर्यंतचे शासन निर्णय शोधणे आणि त्यातील बदल तपासणे, ‘ई-मेल समरायझर’द्वारे ई-मेलचा सारांश तयार करणे, तर ‘आरएफपी बिड इव्हॅल्युएटर’च्या माध्यमातून निविदांची तुलना व मूल्यांकन करणे शक्य होणार आहे. डिजिटल प्रणालींचा प्रत्यक्ष वापर महत्त्वाचा ‘महाडीबीटी’, ‘आपले सरकार 2.0’ आणि ‘मैत्री 2.0’ या उपक्रमांबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केवळ डिजिटल व्यवस्था उभारणे पुरेसे नाही, तर संबंधित विभागांनी त्यांचा प्रत्यक्ष वापर सुरू करणे आणि अधिकाधिक वापरकर्त्यांना या प्रणालींशी जोडणे महत्त्वाचे आहे. प्रणालींचा वापर वाढल्यास त्यातील त्रुटी आणि अडचणी लक्षात येतील व त्यावर वेळेत उपाययोजना करता येतील. ‘महाआयडी’चे सॉफ्ट लॉन्च करण्यात आले असून, त्याअंतर्गत आतापर्यंत 1 कोटींहून अधिक आयडी तयार झाले आहेत. सर्व विभागांचे बॅकएंड इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर ही प्रणाली अधिक व्यापक स्वरूपात कार्यान्वित करता येईल. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी निर्धारित वेळेत पूर्ण करून पुढील टप्प्याचे नियोजन काटेकोरपणे राबवावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. महाडीबीटी, आपले सरकार आणि मैत्री पोर्टलवर नवीन सेवा ‘महाडीबीटी 2.0’वर मत्स्यव्यवसाय विभागाच्या 24, कामगार विभागाच्या 10 आणि महिला व बालविकास विभागाच्या 2 अशा एकूण 36 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. ‘आपले सरकार 2.0’ पोर्टलवर परिवहन विभागाच्या 61 सेवांसह विविध विभागांच्या एकूण 71 सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच ‘मैत्री’ पोर्टलवर वैधमापनशास्त्र विभागाच्या 13 नवीन सेवांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी मंत्री नितेश राणे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @NiteshNRane #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #DigitalGovernance
3
251
258
3,266
Devendra Fadnavis retweeted
डेटा सेंटर के क्षेत्र में महाराष्ट्र का नेतृत्व बरकरार रहेगा! @Dev_Fadnavis #Maharashtra #DataCenter #InvestMaharashtra
38
47
6
98
14,046
Devendra Fadnavis retweeted
संवैधानिक संस्थाओं को बदनाम करने की कोशिश । @Dev_Fadnavis #IndianConstitution #CJP #ConstitutionOfIndia
3
14
31
2,300