
Official Twitter Account of Divisional Information Office #AMRAVATI, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
AMRAVATI, MAHARASHTRA
Joined July 2016
- Tweets59.6K
- Following83
- Followers9.2K
- Likes8K
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
प्रशासकीय कामकाजात एआयचा वापर करताना सुरक्षितता, जबाबदारी आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देणे आवश्यक असून, एआय हे मानवी बुद्धिमत्तेला पर्याय नसून निर्णयप्रक्रियेला सहाय्य करणारे तंत्रज्ञान आहे, असे मत ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह महाराष्ट्र’मधील परिसंवादात व्यक्त करण्यात आले.
माहिती व जनसंपर्क विभाग, महाआयटी आणि आयलाउंज मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे आयोजित या परिषदेत ‘बिल्डिंग ट्रस्टेड एआय : एनॅबलिंग सिक्युअर, रिस्पॉन्सिबल अँड इन्क्लुझिव्ह इंटेलिजंट गव्हर्नमेंट’ या विषयावर चर्चा झाली. डेलॉइट इंडियाचे संचालक अंशुमन सैकिया यांनी सूत्रसंचालन केले.
गंभीर फसवणूक तपास कार्यालयाचे सहसंचालक स्वप्नील बावकर यांनी आर्थिक गुन्ह्यांतील क्लिष्ट व्यवहार आणि कॉर्पोरेट फसवणुकीचे संकेत ओळखण्यासाठी एआय उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. मात्र, संवेदनशील माहितीच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र ऑफलाइन एआय प्रणाली आणि तपासात मानवी देखरेख आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्प्लंकचे एआय तज्ज्ञ व वरिष्ठ सोल्युशन्स अभियंता आशुतोष सुनार यांनी एआयआधारित सुरक्षा प्रणालीमुळे विविध विभागांतील माहितीचे एकत्रित विश्लेषण करून संभाव्य सायबर हल्ल्यांची पूर्वसूचना मिळवता येते, असे स्पष्ट केले. त्यामुळे हल्ल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी सायबर धोके आधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य होणार आहे.
सर्व्हिसनाऊचे वरिष्ठ सल्लागार राघुल श्याम रवी यांनी एआयच्या सुरक्षित वापरासाठी स्पष्ट नियमावली, नियंत्रण आणि देखरेख यंत्रणा आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. योग्य नियमन आणि कार्यचौकटीच्या माध्यमातून एआयच्या मदतीने शासकीय सेवा अधिक वेगवान, सुलभ आणि पारदर्शक करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परिसंवादाला माहिती तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध राज्यांचे प्रतिनिधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
#कृत्रिमबुद्धिमत्ता
#AITransformationConclave
#ArtificialIntelligence
#DigitalTransformation
#IntelligentGovernance
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर शासनाच्या निर्णयप्रक्रियेत सहाय्यक म्हणून व्हावा; मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मानवी हस्तक्षेप आणि पडताळणी अनिवार्य असावी. एआयमुळे मानवी क्षमता, कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता अधिक सक्षम होण्यासोबतच सुशासन, पारदर्शकता व सार्वजनिक हिताला प्राधान्य मिळाले पाहिजे, असे मत माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे आयोजित ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या ‘महा एआय’ या स्थानिक पातळीवर कार्यरत सर्वम मॉडेलच्या माध्यमातून शासन निर्णय, प्रशासकीय संदर्भ आणि विविध तरतुदींच्या आधारे मसुदे तयार करणे सुलभ झाले आहे. मात्र, अंतिम मसुद्याची पडताळणी आणि मान्यता अधिकाऱ्यांनीच देणे आवश्यक असल्याचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी स्पष्ट केले.
एआयच्या आधारे गुन्हेगारीच्या कार्यपद्धतींचे विश्लेषण करण्यासाठी महाराष्ट्रात ‘महा क्राइम ओएस’ हा प्रायोगिक उपक्रम राबविण्यात येत आहे. वाहनचोरी, घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांमधील समान प्रवृत्ती आणि पद्धती ओळखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. मात्र, एआयने दिलेल्या निष्कर्षांची सत्यता तपासून जबाबदार निर्णय घेण्याची भूमिका मानवी अधिकाऱ्यांचीच असेल.
एआयचा वापर करताना संभाव्य धोके, माहितीची अचूकता, तंत्रज्ञानाची निवड आणि संसाधनांचे नियोजन यांचे मूल्यमापन आवश्यक आहे. मानवी श्रम व कौशल्यांना पर्याय निर्माण करण्याऐवजी त्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी एआयचा जबाबदारीने वापर करणे, हाच सुशासनाचा मूलमंत्र असल्याचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी नमूद केले.
@Brijeshbsingh
#कृत्रिमबुद्धिमत्ता
#AITransformationConclave
#ArtificialIntelligence
#DigitalTransformation
#IntelligentGovernance
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नागरी निवारा परिषदेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वर्ग-1 रूपांतरण आदेश वितरित करण्यात आले. सुमारे 62 एकरांवरील या वसाहतीत 113 सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील 6 हजार 250 सदनिका आणि 25 हजार रहिवाशांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे या सदस्यांना मालकी हक्क मिळून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. वांद्रे येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात हा कार्यक्रम झाला.
मुंबईतील शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वार्षिक बाजारमूल्य दरपत्रकाच्या (रेडी रेकनर) केवळ पाच टक्के अधिमूल्य आकारून भोगवटादार वर्ग-१ दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे संस्थांच्या पुनर्विकासासह स्वयं-पुनर्विकासाला गती मिळून रहिवाशांना हक्काची मालकी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील अन्य पात्र गृहनिर्माण संस्थांनाही या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम आणि परिसरनिहाय शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
सदनिकाधारकांना स्वतंत्र मालमत्ता पत्रक देण्याच्या निर्णयामुळे मालकी हक्क अधिक स्पष्ट होऊन मालमत्तेच्या व्यवहारातील गैरप्रकारांना आळा बसेल. तसेच स्वयं-पुनर्विकासासाठी शासनाने दिलेल्या सवलतींमुळे मुंबईत सुमारे १ हजार ६०० प्रस्ताव पुढे आले आहेत. सर्वसामान्यांना हक्काचे घर आणि उत्तम जीवनमान मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी मानखुर्द येथील अतिक्रमणमुक्त केलेली १४ एकर शासकीय जमीन चित्रनगरीच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्ह्यात विशेष मोहिमेद्वारे आतापर्यंत सुमारे ६० एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ‘सक्षम’ कौशल्य विकास अभियानांतर्गत ३१ हजार ५६९ युवकांना करिअर मार्गदर्शन, ३ हजार ४४९ युवकांना रोजगाराच्या संधी, तर १ हजार १२८ युवकांना प्रत्यक्ष नोकरी मिळाली आहे. या उपक्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.
नागरिकांना कायदेशीर मालकी हक्क, पुनर्विकासाची संधी आणि रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे विविध विभाग समन्वयाने काम करीत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागरी निवारा परिषदेतील गृहनिर्माण संस्थांना वर्ग-१ दर्जा मिळणे हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगितले. तसेच, ‘सक्षम’ कौशल्य अभियानांतर्गत वांद्रे-सांताक्रूझ परिसरातील ३१ हजार नागरिकांचे सर्वेक्षण करून ३ हजार ५०० युवकांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार प्रवीण दरेकर, सुनील प्रभू, मुरजी पटेल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, नागरी निवारा अंतर्गत गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
@cbawankule
@MPLodha
@ShelarAshish
#CooperativeHousingSociety
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
परेल येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे ‘द इंटेलिजंट स्टेट : कॅन #एआय मेक गव्हर्नमेंट मोअर प्रेडिक्टिव्ह?’ या विषयावर आयोजित परिसंवादात विविध राज्यांतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
संभाव्य समस्या आणि आव्हानांचा पूर्वअंदाज घेऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर आवश्यक आहे. मात्र, एआयचा वापर करण्यापूर्वी समस्या निश्चित करणे, अपेक्षित परिणाम स्पष्ट करणे आणि माहितीची सुरक्षितता, पारदर्शकता व नैतिकता जपणे महत्त्वाचे असल्याचे मत माहिती व जनसंपर्क विभागाच्या एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉनक्लेव्हमधील परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कृषी, नागरी प्रशासन, कॉर्पोरेट नियमन, गुंतवणूकदार संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रांत एआयच्या माध्यमातून माहिती विश्लेषण, भविष्यवेधी नियोजन आणि निर्णयप्रक्रिया अधिक अचूक व गतिमान करण्यावर चर्चा झाली.
राजस्थानमध्ये कृषी व दुष्काळ व्यवस्थापन, आंध्र प्रदेशमध्ये नागरी तक्रार निवारण, तसेच कॉर्पोरेट व्यवहार व भांडवली बाजार नियमनासाठी एआयचा वापर होत असल्याची उदाहरणे देण्यात आली. उपग्रह प्रतिमा, एकात्मिक माहिती संच, डिजिटल डॅशबोर्ड आणि भविष्यवेधी विश्लेषणाच्या आधारे संभाव्य संकटांचा अंदाज घेऊन प्रशासन अधिक परिणामकारक बनविण्याची क्षमता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
एआयचा वापर हा केवळ तंत्रज्ञानाचा स्वीकार नसून प्रशासनाच्या कार्यपद्धतीत गुणात्मक बदल घडविण्याचे माध्यम आहे. त्यासाठी विभागीय समन्वय, माहितीचे एकत्रीकरण, सक्षम डिजिटल पायाभूत सुविधा आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. एआयचा वापर करताना मानवी निर्णयक्षमता, उत्तरदायित्व, माहितीची गोपनीयता आणि सर्वसमावेशकता यांचा समतोल राखणे महत्त्वाचे असल्याचेही परिसंवादात स्पष्ट करण्यात आले.
परिसंवादाचे सूत्रसंचालन उत्तर प्रदेश शासनाच्या प्रधान सचिव संजुक्ता समद्दार यांनी केले. राजस्थानच्या कृषी व फलोत्पादन विभागाच्या प्रधान सचिव मंजू राजपाल, आंध्र प्रदेशचे नगर प्रशासन आयुक्त व संचालक पी. संपत कुमार, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव प्रशासनाचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव भूपेश चौधरी, हिमाचल प्रदेशचे अतिरिक्त सचिव निशांत ठाकूर, भारतीय कॉर्पोरेट विधी सेवेच्या मुंबई विभागाच्या सहायक संचालक सायली जाधव आणि सेबीचे कार्यकारी संचालक अवनीश पांडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
#कृत्रिमबुद्धिमत्ता
#AITransformationConclave
#ArtificialIntelligence
#DigitalTransformation
#IntelligentGovernance
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
ग्रामीण भागातील डिजिटल साक्षरता, भाषिक अडचणी आणि इंटरनेटच्या मर्यादा दूर करण्यासाठी व्हॉट्सॲपसारख्या परिचित माध्यमातून स्थानिक भाषेत एआय आधारित शासकीय सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामुळे शासकीय सेवा अधिक सुलभ व सर्वसमावेशक होऊन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील, असे पिनॅकल टेलिसर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष जयेश बागडे यांनी ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये सांगितले.
ग्रेटर चेन्नई महानगरपालिकेने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मालमत्ता कर, जन्म-मृत्यू दाखले आणि विवाह प्रमाणपत्रांसह ४५ सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या माध्यमातून मागील १२ महिन्यांत कर व सेवा शुल्कापोटी सुमारे १०० कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. तसेच, स्थानिक भाषांतील संदेश, व्हॉइस नोट आणि एआय आधारित संवादामुळे नागरिकांना घरबसल्या शासकीय सेवांचा लाभ घेणे शक्य होत आहे.
व्हॉट्सॲप कॉल, व्हॉइस एआय एजंट, एसएमएस आणि ई-मेल यांसारखी संवाद माध्यमे एकाच प्रणालीशी जोडल्यास डिजिटल सेवांची पोहोच अधिक व्यापक होऊ शकते. डिजिटल परिवर्तनाच्या केंद्रस्थानी सर्वसमावेशकता ठेवून देशातील शेवटच्या घटकापर्यंत तंत्रज्ञानाचा लाभ पोहोचविणे आवश्यक असल्याचे बागडे यांनी नमूद केले.
यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#कृत्रिमबुद्धिमत्ता
#AITransformationConclave
#ArtificialIntelligence
#DigitalTransformation
#IntelligentGovernance
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
महाराष्ट्राला तंत्रज्ञानसक्षम आणि कार्यक्षम बनविण्यासाठी हार्डवेअर व सॉफ्टवेअर यांची सांगड घालणारी एकात्मिक डिजिटल यंत्रणा आवश्यक आहे. स्मार्ट डिस्प्ले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा, सार्वजनिक सुरक्षा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन अधिक स्मार्ट, सुरक्षित व गतिमान करता येईल, असे सॅमसंग इंडियाचे महाव्यवस्थापक सौरभ एन. करवंदे यांनी माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने आयोजित ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये सांगितले.
विमानतळ, रेल्वे स्थानके, रुग्णालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये माहितीचे प्रभावी प्रसारण, कमांड अँड कंट्रोल सेंटर, डिजिटल माहिती फलक, स्मार्ट क्लासरूम आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सॅमसंगची एकात्मिक तंत्रज्ञान प्रणाली उपयुक्त ठरत आहे. बैठकांचे स्वयंचलित सारांश, बहुभाषिक संवाद आणि सॅमसंग नॉक्सच्या माध्यमातून डिजिटल माहितीची सुरक्षितता ही या प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. देशातील ५० हजार वर्गखोल्यांच्या डिजिटल परिवर्तनातही कंपनीने योगदान दिले आहे.
शासन आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या समन्वयातून स्मार्ट डिस्प्ले व एकात्मिक डिजिटल सुविधांचा विस्तार केल्यास महाराष्ट्राचे एआय मिशन अधिक प्रभावीपणे राबविता येईल आणि नागरिकाभिमुख शासकीय सेवांना गती मिळेल, असा विश्वास करवंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#कृत्रिमबुद्धिमत्ता
#AITransformationConclave
#ArtificialIntelligence
#DigitalTransformation
#IntelligentGovernance
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ येथे आयोजित ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘एजंटिक एसओसी विदाऊट ट्रेड-ऑफ्स ऑर कॉम्प्रोमाइज’ या विषयावर ट्रेलिक्सचे सोल्यूशन्स इंजिनिअरिंगचे देबज्योती गुहा यांनी सादरीकरण केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनरेटिव्ह एआयमुळे सायबर हल्ले अधिक प्रगत व गुंतागुंतीचे होत असल्याने, त्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी एआय आधारित स्वयंचलित सुरक्षा संचालन केंद्र (ऑटोनॉमस एआय एसओसी) तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरत आहे. संस्थेची संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवून इंटरनेटशिवाय कार्य करणारे ऑन-प्रिमाइसेस एआय एसओसी तंत्रज्ञान सायबर सुरक्षेसाठी प्रभावी पर्याय असल्याचे ट्रेलिक्सचे देबज्योती गुहा यांनी सांगितले.
सायबर गुन्हेगार एआयचा वापर करून अधिक वेगाने व अत्याधुनिक पद्धतीने हल्ले करत असल्याने पारंपरिक सुरक्षा यंत्रणांना नव्या धोक्यांची ओळख पटविणे आव्हानात्मक ठरत आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी स्वयंचलित व संदर्भाधारित विश्लेषण करणारे एजंटिक एआय एसओसी विकसित करण्यात आले आहे.
हे तंत्रज्ञान संस्थेच्या स्वतःच्या डेटा सेंटरमध्ये इंटरनेटशिवाय कार्यरत राहून संवेदनशील माहितीची गोपनीयता, डेटा सार्वभौमत्व आणि नियामक अनुपालन राखते. इन्व्हेस्टिगेशन, रेमेडिएशन आणि हंटिंग या तीन इंजिनांच्या माध्यमातून संभाव्य सायबर धोक्यांची अचूक ओळख, वर्गीकरण व प्राधान्यक्रम निश्चित करून हल्ल्यांना जलद प्रतिसाद देणे शक्य होते.
एआय प्रणालींमधील चुकीचे किंवा दिशाभूल करणारे निष्कर्ष टाळण्यासाठी विश्वासार्हता, अचूकता आणि परिणामकारकतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. संस्थांच्या स्वतंत्र डिजिटल पायाभूत सुविधांनुसार कार्य करणाऱ्या ऑन-प्रिमाइसेस एजंटिक एआय एसओसीमुळे माहितीची सुरक्षितता कायम राखून सायबर धोक्यांचे विश्लेषण, प्रतिबंध आणि नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास गुहा यांनी व्यक्त केला.
यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#कृत्रिमबुद्धिमत्ता
#AITransformationConclave
#ArtificialIntelligence
#DigitalTransformation
#IntelligentGovernance
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
भारतीय पौराणिक कथा आणि महाकाव्यांकडे केवळ पारंपरिक दृष्टिकोनातून न पाहता, त्यातील विविध पात्रांचे विचार, भूमिका आणि मानवी पैलू समजून घेणे महत्वाचे आहे. रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्यांमध्ये धर्म, कर्तव्य, कर्म आणि मानवी स्वभाव यांविषयी सखोल चिंतन मांडण्यात आले आहे. या कथांचा अभ्यास करताना प्रत्येक पात्राकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आनंद नीलकंठन यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजित ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’ मध्ये ‘भारतीय पौराणिक कथांची नव्याने मांडणी’ या विषयावरील विशेष संवाद सत्रात चित्रपट निर्मात्या श्वेता पड्डा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आनंद नीलकंठन हे कादंबरीकार, पटकथा लेखक आणि स्तंभलेखक म्हणून परिचित आहेत. भारतीय पौराणिक कथांमधील परिचित पात्रांचे वेगळ्या दृष्टिकोनातून चित्रण करणे ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे.
भारतीय पौराणिक कथांमध्ये पात्रांचे चित्रण केवळ नायक आणि खलनायक अशा ठरावीक चौकटीत करता येत नाही. रामायण आणि महाभारतातील प्रत्येक पात्राला स्वतःची भूमिका, विचार आणि परिस्थिती आहे. एखाद्या पात्राच्या दृष्टिकोनातून संपूर्ण कथा समजून घेतल्यास तिचे वेगळे पैलू उलगडतात. रावण, दुर्योधन, सीता किंवा हनुमान यांसारख्या पात्रांकडे वेगवेगळ्या भूमिकांतून पाहण्याचा प्रयत्न आपल्या कथनाला नवे आयाम देतो, असे श्री.नीलकंठन यांनी यावेळी सांगितले.
भारतीय परंपरेत रामायणाच्या अनेक आवृत्या आणि कथनपरंपरा आढळतात. काळ, प्रदेश आणि स्थानिक संस्कृतीनुसार या कथांना वेगवेगळे संदर्भ लाभले आहेत. त्यामुळे विविध आवृत्यांचा अभ्यास करताना त्यांच्याकडे उत्सुकतेने आणि खुल्या मनाने पाहणे गरजेचे आहे, असेही नीलकंठन यांनी नमूद केले.
या संवादातून तरुण वाचकांना भारतीय महाकाव्यांचा आशय, त्यातील पात्रांचे विविध पैलू आणि कथाकथनातील सर्जनशील शक्यता यांची ओळख झाली. परंपरागत साहित्याकडे चिकित्सक, जिज्ञासू आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा या सत्राने दिली.
#MumbaiBookFestival
#ReadingCulture
#LoveForBooks
#ReadAndGrow
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
कृत्रिम बुद्धिमत्ता (#एआय) ही मानवी बुद्धिमत्तेला पर्याय म्हणून नव्हे, तर तिची क्षमता वाढविणारे साधन म्हणून वापरली पाहिजे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या अनुभवाचा व बुद्धिमत्तेचा उपयोग एआय तंत्रज्ञानासोबत केल्यास निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी, अचूक आणि गतिमान होऊ शकते. त्यामुळे शासनाच्या दैनंदिन कामकाजात तसेच धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार तथा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (#मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी केले.
माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ येथे ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सर्विस नाऊच्या वरिष्ठ संचालक गरिमा बब्बर, ओपन टेक्स्टचे देश संचालक मनीष बलूजा, डेलॉइट इंडियाचे पार्टनर जय गुहा, गव्हकनेक्टचे संचालक फहीम हक, आयलॉग मिडियाचे रमणकुमार मिश्रा तसेच केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सेमीकंडक्टर उत्पादन, चिप डिझाइन, फॅब्रिकेशन आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांमध्ये भारताला मोठा पल्ला गाठायचा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी केवळ तंत्रज्ञान आणि ॲप्लिकेशन्स पुरेसे नसून उच्च दर्जाची व अखंडित ऊर्जा उपलब्धता, संगणकीय क्षमता आणि भौतिक पायाभूत सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, असे श्री.परदेशी यांनी यावेळी सांगितले.
भारताकडे मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ, भाषिक विविधता आणि व्यापक स्वरूपातील माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे कमी खर्चातील हे एआय मॉडेल्स, स्थानिक भाषांमधील तंत्रज्ञान आणि स्थानिक गरजांनुसार माहितीचे विश्लेषण करणारी प्रणाली विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘महाजीपीटी’मुळे शासकीय निर्णय प्रक्रियेला गती
महाराष्ट्रात प्रत्यक्ष सुरू असलेल्या एआय आधारित उपक्रमाची माहिती देताना परदेशी यांनी ‘महाजीपीटी’ (MahaGPT) या प्रणालीचे महत्व सांगितले. मित्रा संस्थेने आयआयटी मुंबईच्या सहकार्याने आणि आयआयटी रुरकीच्या पाठबळाने ही प्रणाली विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रणालीमध्ये गेल्या सुमारे ६० वर्षांतील दीड लाखांहून अधिक शासन निर्णय तसेच २ हजार २३० हून अधिक कायदे आणि त्यासंबंधित नियमांचा माहिती संग्रह उपलब्ध करण्यात आला आहे.
‘महाजीपीटी’ प्रणालीमध्ये मराठी भाषेत प्रश्न विचारून शासकीय नियमांनुसार उत्तरे मिळविण्याची सुविधा विकसित करण्यात येत आहे. दस्तनोंदणी कोणत्याही ठिकाणी करता येण्यासंदर्भातील शासन निर्णय, वर्ग-२ जमिनीवर बांधकामासाठी आवश्यक परवानग्या, जमिनीच्या वापरात बदल करण्याची प्रक्रिया, जिल्हाधिकाऱ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या जमिनींच्या भाडेपट्ट्याच्या नियमांची तुलना अशा प्रश्नांची उत्तरे ही प्रणाली देत असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या बुद्धिमत्तेला पूरक म्हणून करावा. मानवी अनुभव, निर्णयक्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची विश्लेषण क्षमता यांचा एकत्रित वापर केल्यास प्रशासनाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होऊ शकते. एआयचा वापर मानवी बुद्धिमत्तेची जागा घेण्यासाठी नव्हे, तर तिची क्षमता अनेक पटींनी वाढविण्यासाठी व्हावा, असे आवाहन परदेशी यांनी केले.
#कृत्रिमबुद्धिमत्ता
#AI
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
राज्यात पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर प्रायोगिक तत्वावर उभारण्यात येणारे आदर्श सह दुय्यम निबंधक कार्यालय मुंबईतील लोअर परळ येथील मफतलाल टॉवरमध्ये कार्यान्वित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोनशिलेचे अनावरण करून आणि फीत कापून या कार्यालयाचे उद्घाटन केले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यालयाचे पाहणी करीत येथील सुविधांची माहिती घेतली.
आदर्श सह दुय्यम निबंधक कार्यालयात शासकीय नोंदणी सेवा, डिजिटल तंत्रज्ञान, व्यावसायिक ग्राहक सेवा आणि आधुनिक पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. नियोजित भेटीनुसार नोंदणी प्रक्रिया, तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती, पारदर्शक सेवा, कमी प्रतीक्षा कालावधी आणि नोंदणीच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना मार्गदर्शन ही या कार्यालयाची वैशिष्ट्ये आहेत.
नोंदणीची प्रक्रिया
नियोजित भेटीच्या दिवशी पक्षकारांनी मूळ कागदपत्रे, ओळखपत्रे, भेटीची पुष्टी आणि शुल्क भरल्याच्या पावत्या घेऊन कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेशापूर्वी सुरक्षा कर्मचारी भेटीची वेळ आणि कागदपत्रांची पडताळणी करतील. स्वागत कक्षातील कर्मचारी प्राथमिक पडताळणी करून रांग व्यवस्थापन प्रणालीद्वारे टोकन देतील.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रांचे अनुक्रमणीकरण, पृष्ठांकन, मुद्रांकन आणि स्कॅनिंग करून ती शासकीय नोंदणी प्रणालीमध्ये अपलोड केली जातील. यामुळे अभिलेखांचे सुरक्षित व्यवस्थापन, डिजिटल जतन, मागोवा आणि भविष्यातील उपलब्धता सुनिश्चित होईल. स्कॅनिंग आणि गुणवत्ता तपासणीनंतर नोंदणीकृत दस्तऐवज, पोचपावती नागरिकांना रीतसर पोच घेऊन दिली जातील.
आधुनिक कार्यालयीन सुविधा
कार्यालयात स्वतंत्र स्वागत कक्ष, नागरिक सहायता सेवा, रांग व्यवस्थापन यंत्रणा, आरामदायी प्रतीक्षा कक्ष आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे नागरिकांचा प्रतीक्षा कालावधी कमी होऊन मालमत्ता नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.
@Dev_Fadnavis
@cbawankule
@MPLodha
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
महाराष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य, कुशल मनुष्यबळ, वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आणि वैविध्यपूर्ण औद्योगिक परिसंस्था यामुळे जर्मनीच्या लोअर सॅक्सोनी राज्यातील उद्योगांसाठी राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. #जर्मन उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन आणि विकास केंद्रे उभारून जगभरातील बाजारपेठांना सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोअर सॅक्सोनीचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उभय राज्यांतील सहकार्याचा कृती आराखडा मांडण्यात आला.
भागीदारीला ठोस स्वरूप देण्यासाठी वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेला ‘महाराष्ट्र-लोअर सॅक्सोनी संयुक्त कार्यगट’ स्थापन करावा. महाराष्ट्र आणि लोअर सॅक्सोनी या दोन्ही राज्यांची एकत्रित अर्थव्यवस्था सुमारे एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरची आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा सुमारे १५ टक्के वाटा असून, देशातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या जवळपास एक तृतीयांश गुंतवणूक राज्य आकर्षित करत आहे. महाराष्ट्राने २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतील वित्तीय आणि तंत्रज्ञान परिसंस्था, पुण्यातील वाहन व अभियांत्रिकी उद्योग, नागपूरची दळणवळण आणि औद्योगिक क्षमता तसेच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील उत्पादन समूह राज्याच्या आर्थिक विकासाला गती देत आहेत. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि आगामी वाढवण बंदरामुळे जागतिक मूल्यसाखळी व निर्यात केंद्र म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होईल. राज्य शासन पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, शिक्षण आणि मनुष्यबळ विकासात मोठी गुंतवणूक करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रगत उत्पादन आणि भविष्यकालीन वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फोक्सवॅगन हा महाराष्ट्र आणि लोअर सॅक्सोनीमधील महत्वाचा औद्योगिक दुवा आहे. राज्य शासनाने चाकण येथील उत्पादन सुविधांचे आधुनिकीकरण तसेच इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनांसाठी नव्या गुंतवणूक कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राला वाहन उत्पादन, अभियांत्रिकी, उत्पादन विकास, चाचणी आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनविण्याचा राज्याचा मानस आहे. अचूक अभियांत्रिकी, औद्योगिक स्वयंचलन, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, बॅटरी, एरोस्पेस आणि औद्योगिक कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतही सहकार्याच्या व्यापक संधी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हरित ऊर्जा आणि औद्योगिक परिवर्तनासाठी लोअर सॅक्सोनीचे पवनऊर्जा, हरित हायड्रोजन, बॅटरी तंत्रज्ञान आणि कमी कार्बन उत्सर्जनाच्या पोलाद उत्पादनातील कौशल्य महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल. महाराष्ट्राने २०४७ पर्यंत ऊर्जा मिश्रणात हरित ऊर्जेचा वाटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जर्मन भाषा प्रशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पात्रता मान्यता आणि पारदर्शक भरतीसाठी दोन्ही राज्यांनी संयुक्त कार्यक्रम विकसित करावेत, अशी भूमिकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डाॅ. अनबलगन पी., मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, जर्मनीचे भारतातील कॉन्सिलेट जनरल क्रिस्टोफ हॅलियर, लोअर सॅक्सनीचे राज्य संसद हन्ना नाबर, क्रिस्टोफ ब्रॅटमॅन, ॲन-फ्रेडरिके कुरा, मार्सेल शारेलमन तसेच लोअर सॅक्सनी चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सचे अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’
कागदाला कुठेही न कापता बनविल्या जाणाऱ्या सुशोभीकरणाच्या वस्तू तीन मिनिटांच्या आत बनविता येतात. अशा वस्तूंचा स्टॉल प्रदर्शनात उपलब्ध करुन देणारे श्री. सरदिप (पेपर फोल्डर आर्टिस्ट) यांची प्रतिक्रिया...
📍 मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस (गेट-२)
📚 २४–२९ नोव्हेंबर २०२६
#MumbaiBookFestival
#ReadingCulture
#LoveForBooks
#ReadAndGrow
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
📍 उत्तर भारतीय संघ सभागृह, वांद्रे (पूर्व), मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी निवारा परिषद अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे वर्ग-१ रुपांतरण आदेश वितरण कार्यक्रम
#LIVE nitter.cf/i/broadcasts/2peVWRJVN…
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
📍 हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल, मुंबई
#थेटप्रसारण
‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’
#LIVE nitter.cf/i/broadcasts/2zkYlQJdy…
श्रमाला प्रतिष्ठा आणि कष्टकऱ्यांना सन्मान देणारा विचार !
महात्मा जोतीराव फुले यांनी श्रमाचे महत्त्व अधोरेखित करत कष्टकरी, शेतकरी आणि श्रमिक वर्गाच्या प्रश्नांना आपल्या लेखनातून व कार्यातून वाचा फोडली.
#महात्माफुले200 #महात्माज्योतीरावफुले #द्विशताब्दीजन्मवर्ष
55
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
📍रायगड
महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांमधील घरांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक असून अनेक वर्षांपासून घरांपासून वंचित असलेल्या बाधित कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही युद्धपातळीवर करावी. पारमाची येथील १९८ घरांची उभारणी तातडीने सुरू करून स्थानिकांच्या गरजांनुसार चांगल्या दर्जाची घरे बांधावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे बैठकीत दिले. दरडग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन ही शासनाची जबाबदारी असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
दरडग्रस्त नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. रोटी, कपडा आणि मकान उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून शासन काम करीत असून, गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांच्या हिताची कामे करताना कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांतील घरांच्या प्रश्नांबाबत बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे, जिल्हा परिषदेचे सभापती चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, विकास गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
@mieknathshinde
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
'मुंबई पुस्तक महोत्सवा'तील पुस्तक प्रदर्शनाचे खूपच छान नियोजन करण्यात आले आहे. सर्वच विषयाची पुस्तके येथे उपलब्ध आहेत – संस्कृती निंबाळकर, विद्यार्थिनी
📍 मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस (गेट-२)
📚 २४–२९ नोव्हेंबर २०२६
#MumbaiBookFestival
#ReadingCulture
#LoveForBooks
#ReadAndGrow
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
'मुंबई पुस्तक महोत्सव' या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न हाेत आहे.- वैभव देशमाने, स्टॉलधारक
📍 मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस (गेट-२)
📚 २४–२९ नोव्हेंबर २०२६
#MumbaiBookFestival
#ReadingCulture
#LoveForBooks
#ReadAndGrow
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI retweeted
भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२५ च्या तुकडीतील आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
भारतीय प्रशासकीय सेवेत आता अनुभवी डॉक्टर्स, इंजिनीअर्स आदी व्यावसायिक येत आहेत ही समाधानाची बाब आहे. मोठी उमेद व अपेक्षांसह युवा अधिकारी नागरी सेवेत रुजू होत आहेत. अधिकाऱ्यांनी कल्याणकारी योजनांचे लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा. अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश नोकरशाहीचे अनुकरण करू नये अशी सूचना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी अधिकाऱ्यांना केली.
यावेळी शासनाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी युवा भाप्रसे अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची माहिती दिली, तर शोभिका पाठक व डॉ. पंकज पटले या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाचे अनुभव कथन केले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले.
@maha_governor
@Jishnu_Devvarma




































