
MLA 220 Shrirampur - Rahuri Assembly, Public & Social worker, GS @INCMaharashtra, Former Secretary @IYC #PhD research Scholar
Shrirampur, Shirdi
Joined September 2009
- Tweets77.6K
- Following376
- Followers9.5K
- Likes137K
🗓️ २९-१०-२०२६ 📍 स्वयंवर मंगल कार्यालय, श्रीरामपूर
दि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार विकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मतदार संवाद कार्यक्रमाला आज उपस्थित राहून सभासदांशी संवाद साधला.
सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि सहकार चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी सहकार विकास आघाडी कटिबद्ध आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता, विश्वास आणि विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देण्यासाठी सर्व मतदारांनी सहकार विकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन यावेळी केले.
या निवडणुकीत सहकार विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना ‘कपबशी’ या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार तथा नवनिर्वाचित संचालक श्री. सुजय विखे पाटील जी, माजी आमदार श्री. भानुदास मुरकुटे जी, माजी आमदार श्री. वैभव पिचड जी, नवनिर्वाचित संचालक श्री. रणजित देशमुख जी, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष श्री. करण ससाणे जी, श्री. सचिन गुजर जी, श्री. सचिन जगताप जी, सौ. अनुराधा नागवडे जी, सौ. संगिता वाघ जी, श्री. गणपतराव सांगळे, श्री. कारभारी जावळे, श्री. संजय फंड, श्री. बाबासाहेब दिघे, श्री. सुधीर नवले, श्री. ज्ञानेश्वर मुरकुटे, सौ. कांचन सानप उपस्थित होते.
#DCCBankElection #Ahilyanagar #Shrirmapur #HemantOgale
@drsujayvikhe @vaibhav_pichad @karan_sasane
नमस्कार,
चलो दिल्ली रामलीला मार्च, लोकतंत्र को बचाने का, वोट चोरी को रोकने का, संविधान को बचाने का मार्च है।
यह किसी एक राजनीतिक पार्टी का मार्च नहीं - यह हिंदुस्तान की आत्मा का मार्च है।
सब लोग जो नरेंद्र मोदी, अमित शाह, ज्ञानेश कुमार से तंग हैं। सब लोग जो लोकतंत्र को बचाना चाहते हैं, संविधान की रक्षा करना चाहते हैं, आप सब आइए।
एक ही protest है - देश का protest है।
Don't worry about the police, don't worry about lathis - the BJP will not have the guts to try any of their antics.
Come march with us - we will walk together to protect the Constitution, to protect the Indian nation.
घबराने की जरूरत नहीं है।
I urge all student groups, regardless of your political affiliation - if you feel that India is under attack, if you feel you are under attack, your expression, your ideas, your way of thinking is under attack, come and join us.
It will be a fantastic march, and it's a march for the soul of this country.
Looking forward to seeing all of you there.
🗓️ 1 नवंबर
📍 रामलीला मैदान, नई दिल्ली
#ChaloDilli
@RahulGandhi @INCIndia @INCMaharashtra
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद जाधव (पाटील) जी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य प्राप्त होवो हीच सदिच्छा.
@makrandpatil99
Hemant Ogale retweeted
नमस्कार,
चलो दिल्ली रामलीला मार्च, लोकतंत्र को बचाने का, वोट चोरी को रोकने का, संविधान को बचाने का मार्च है।
यह किसी एक राजनीतिक पार्टी का मार्च नहीं - यह हिंदुस्तान की आत्मा का मार्च है।
सब लोग जो नरेंद्र मोदी, अमित शाह, ज्ञानेश कुमार से तंग हैं। सब लोग जो लोकतंत्र को बचाना चाहते हैं, संविधान की रक्षा करना चाहते हैं, आप सब आइए।
एक ही protest है - देश का protest है।
Don't worry about the police, don't worry about lathis - the BJP will not have the guts to try any of their antics.
Come march with us - we will walk together to protect the Constitution, to protect the Indian nation.
घबराने की जरूरत नहीं है।
I urge all student groups, regardless of your political affiliation - if you feel that India is under attack, if you feel you are under attack, your expression, your ideas, your way of thinking is under attack, come and join us.
It will be a fantastic march, and it's a march for the soul of this country.
Looking forward to seeing all of you there.
🗓️ 1 नवंबर
📍 रामलीला मैदान, नई दिल्ली
#ChaloDilli
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील जी विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
या निवडणुकीत विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व पदवीधर मतदारांचे मनःपूर्वक आभार!
या विजयासाठी मेहनत घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
#MahavikasAghadi
#Marathwada #ChhatrapatiSambhajinagar #HemantOgale
@Dr_Pratapsinhp
नागपूरात कॉंग्रेसचा ‘बब्बर शेर’ परत निवडून आलाय!
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजीत गोविंदराव वंजारी जी यांच्या विजयाने काँग्रेस संपत नसते, ती प्रत्येक संघर्षातून नव्या ताकदीने उभी राहत असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
विरोधकांनी कितीही आव्हाने उभी केली, कितीही अपप्रचार केला, तरी विचारांची लढाई लढणारी काँग्रेस थांबत नाही, झुकत नाही आणि संपतही नाही! नागपूरच्या या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, काँग्रेस हा केवळ पक्ष नाही, तर जनतेच्या विश्वासातून उभा राहिलेला विचार आहे!
काँग्रेसचा विचार जिवंत आहे, कार्यकर्त्यांचा निर्धार बुलंद आहे आणि विजयाचा हा सिलसिला असाच कायम राहणार आहे. ✋🔥
#CongressVictory #AbhijitWanjari #MahaVikasAghadi #Nagpur #HemantOgale
@wanjarri @INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi @kharge @sirivellaprasad @INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @NANA_PATOLE @SunilKedar1111 @NitinRaut_INC
नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. अभिजित वंजारी जी यांनी विजय प्राप्त केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
पदवीधरांची पसंती काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या विचारांना आहे, हा या विजयातून मिळालेला स्पष्ट राजकीय संदेश आहे. सुशिक्षित मतदारांनी व्यक्त केलेला हा विश्वास म्हणजे केवळ एका उमेदवाराचा विजय नसून, शिक्षण, रोजगार, तरुणांचे भविष्य आणि लोकशाही मूल्यांसाठी लढणाऱ्या विचारांचा विजय आहे. पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्याची अपेक्षा आणि परिवर्तनाची आकांक्षा या विजयातून अधोरेखित झाली आहे.
#AbhijitWanjari #Congress #MahaVikasAghadi #HemantOgale #Nagpur
@wanjarri
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांनी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न सोडवणे, पदवीधरांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलणे आणि त्यांच्या न्याय्य मागण्या सभागृहात मांडून तुम्ही पदवीधरांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी व्हाल तसेच तुमच्या नेतृत्वात पदवीधरांना न्याय मिळेल, हा विश्वास आहे.
आपल्या पुढील यशस्वी आणि प्रभावी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा!
#HarshadaDeshmukhJadhav #MahaVikasAghadi #PuneGraduates #HemantOgale #Shrirampur
@Harshada_Speaks
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार श्री. अशोक चव्हाण जी साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य प्राप्त होवो हीच सदिच्छा.
@AshokChavan1958
अपराजित योद्धे, आद्यक्रांतिकारक, राजराजेश्वर, चक्रवर्ती, श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
भारतीय राजांची अभेद्य एकजूट उभारत त्यांनी ब्रिटिश सत्तेची धूळधाण उडवली. त्यांच्या चरित्रातील अतुलनीय पराक्रम, अदम्य शौर्य आणि स्वराज्यनिष्ठा आपल्याला सदैव प्रेरित करत राहील.
#YashwantraoHolkar #MaharajaHolkar #MarathaEmpire #IndianHistory
Hemant Ogale retweeted
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज मुळा धरणाच्या पाणी नियोजनाची (कालवा सल्लागार समिती) बैठक जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. येणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरणे महत्वाचे आहे.
🗓️ २६-१०-२०२६ 📍 बालाजी मंगल कार्यालय, श्रीगोंदा
सखी सन्मती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थी बांधवांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि करिअरविषयक प्रश्नांवर चर्चा करत त्यांच्या आकांक्षा, अडचणी आणि भविष्याविषयीच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी आंदोलनातून नावारूपास आलेले श्री. विवेकानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मीदेखील विद्यार्थ्यांच्या करिअरविषयी थोडक्यात मार्गदर्शन करताना योग्य ध्येय निश्चित करणे, सातत्याने अभ्यास करणे, आत्मविश्वास जपणे आणि अपयशाने खचून न जाता जिद्दीने पुढे जाणे यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, त्यांना योग्य संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे.
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुजीत क्षिरसागर जी, श्रीगोंदा तहसीलदार श्री. सचिन डोंगरे जी, पोलीस निरीक्षक श्री. सुभाष सानप जी, श्री. ऋषिकेश गांगुर्डे, श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक श्री. प्रशांत ओगले, सौ. हेमांगी ओगले आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी बांधव उपस्थित होते.
@RahulGandhi @kharge @sirivellaprasad @INCHarshsapkal @INCIndia @VijayWadettiwar @INCMahrashtra @satejp
🗓️ २६-१०-२०२६ 📍 विळद घाट, अहिल्यानगर
मुळा प्रकल्पाच्या रब्बी हंगाम २०२६-२७ साठी पाणीवाटपाचे नियोजन, सिंचन व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील जी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.
शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पिकांचे भवितव्य सिंचनाच्या पाण्याच्या योग्य नियोजनावर अवलंबून असते. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर व नियोजनबद्ध वापर, पाणीवाटपातील समतोल आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि शेतीचे उत्पादन टिकून राहावे, यासाठी प्रभावी नियोजन व योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे हित, पाण्याचे योग्य नियोजन आणि शेतीची समृद्धी हेच सिंचन व्यवस्थापनाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. मुळा प्रकल्पाच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि रब्बी हंगामासाठी पाणीवाटपाचे नियोजन प्रभावीपणे राबविले जावे, अशी मागणी यावेळी केली.
यावेळी माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार श्री. प्राजक्त तनपुरे जी, आमदार श्री. विठ्ठलराव लंघे जी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
#MulaDam #WaterManagement #RabiSeason #IrrigationPlanning #HemantOgale
@RVikhePatil @prajaktdada
@RahulGandhi @kharge @sirivellaprasad @INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @INCIndia @INCMaharashtra
🗓️ २५-१०-२०२६ 📍 श्रीरामपूर
काल कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विघ्नहर्ता महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या मनोरंजक आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आनंद मिळाला.
माझी पत्नी तथा साई सोशल फाउंडेशनच्या संचालिका सौ. निती ओगले, नगरसेविका सौ. योगिता नागले आणि सौ. ज्योती जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धा, आकर्षक बक्षिसे आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.
महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ करणे, हा अशा उपक्रमांचा खरा उद्देश आहे. आपल्या संस्कृतीतील सण-उत्सव जपत समाजातील महिलांना आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
महिलांचा सन्मान, त्यांच्या आनंदाला प्राधान्य आणि समाजातील एकोप्याला बळ देणारे असे उपक्रम नेहमीच प्रेरणादायी ठरतात. या सुंदर आयोजनासाठी विघ्नहर्ता महिला मंडळ आणि सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
#Shrirampur #KojagiriPournima #KhelPaithanicha #WomenCulture #Ahilyanagar
रामायणाचे रचनाकार, आदिकवी महर्षी वाल्मिकी यांस जयंती निमित्त कोटी कोटी वंदन! सर्वांना वाल्मिकी जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
त्यांनी रचलेल्या रामायणातून आपल्याला सत्य, सेवा, करुणा आणि सामाजिक समरसतेची प्रेरणा मिळते.
#ValmikiJayanti #MaharishiValmiki #Ramayana #JaiShriram











































