Trupti Ajay Sarode retweeted
**हिंदुत्वाचा विचार, मराठी अस्मितेचा बुलंद आवाज!**
मराठी माणसाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे, हिंदुत्वाचा विचार घराघरांत पोहोचवणारे आणि आपल्या कणखर नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि राष्ट्रहिताचा विचार सातत्याने जपला.
आज मा. उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हाच विचार पुढे नेत हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
बाळासाहेबांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली!
#BalasahebThackeray #स्मृतिदिन #अभिवाद
@mieknathshinde @DrSEShinde @neelamgorhe @Shivsenaofc
Trupti Ajay Sarode retweeted
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#Shivsena #EknathShinde #हिंदुहृदयसम्राट #स्मृतिदिन #BalasahebThackeray #अभिवादन
Trupti Ajay Sarode retweeted
Eknath Shinde Live l कुलाबा, मुंबई वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन - लाईव्ह nitter.cf/i/broadcasts/2aWQLEJzb…
Trupti Ajay Sarode retweeted
पायल झांबरे मृत्यू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी; हुंड्यासाठी सुनांचा छळ करण्याची विकृत प्रवृत्ती थांबली पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे
पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील पायल अक्षय झांबरे यांच्या दुर्दैवी मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक आहे. मुलगी झाल्याच्या कारणावरून मानसिक छळ करणे, हुंडा व मालमत्तेसाठी दबाव आणणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप गंभीर आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी चर्चा करून दिल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री आधार केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या अनिता शिंदे आणि आश्लेषा खंडागळे यांनी पायल यांचे भाऊ ऋषिकेश पवार व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, "सुनांकडून सोने, पैसे आणि मालमत्ता ओरबाडून घेण्याची, त्यांचा छळ करण्याची प्रवृत्ती आता तरी थांबली पाहिजे. सुनांना सन्मानाने जगू द्या. अशा कृत्यांना कायद्याने कठोर शिक्षा होऊ शकते, याची जाणीव ठेवा. तसेच मुलीचा संसार टिकावा म्हणून माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्यावर सतत तडजोडीचा दबाव आणू नये. तिच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे."
या प्रकरणातील कथित धमक्या, मानसिक छळ आणि मालमत्तेसाठी आणलेला दबाव यासंदर्भातील सर्व पुरावे तपासात समोर आणून दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे. हुंडाबळीच्या घटनांतील पीडितांना न्याय मिळणे हाच खऱ्या अर्थाने दीपावलीतील न्यायाचा प्रकाश ठरेल.
#NeelamGorhe #PayalZambre #JusticeForPayal #WomenSafety #StopDowryHarassment #DowryFreeMaharashtra #StreeAadharKendra #WomenEmpowerment #Maharashtra
Trupti Ajay Sarode retweeted
भारतीय संगीतविश्वाच्या स्वरसाम्राज्ञी, गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
देशभक्तीची जाज्वल्य ज्योत तेवणारे गीत असो, भक्तिरस असो किंवा भावगीत, त्यांच्या सुरांनी पिढ्यानपिढ्यांच्या सुख-दुःखांना संवेदनशील आवाज दिला. भारताचा आवाज म्हणून जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या लतादीदींचे स्वर अजरामर आहेत आणि ते युगानुयुगे रसिकांच्या हृदयात जिवंत राहतील.
#LataMangeshkar #BharatRatna #LataDidi #DrNeelamGorhe #ShivSena
Trupti Ajay Sarode retweeted
भारतरत्न, गानसम्राज्ञी स्व.लता मंगेशकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
#Shivsena #Drshrikanteknathshinde #maharashtra #latamangeshkar
Trupti Ajay Sarode retweeted
।।पुनरागमनायच।।
मुंबईतील गिरगांव चौपाटी येथे विसर्जन मिरवणुक व पुष्पवृष्टी सोहळा. (२५ सप्टेंबर २०२६)
Trupti Ajay Sarode retweeted
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!
निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि रझाकारांच्या अत्याचारांविरुद्ध एकवटून मराठवाड्याला स्वतंत्र करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या असीम त्यागाला कोटी कोटी प्रणाम!
#मराठवाडा_मुक्ती_संग्राम_दिन #मराठवाडा #MarathwadaMuktiSangramDin #Maharashtra
@neelamgorhe
Trupti Ajay Sarode retweeted
#गणेशोत्सव हा उत्साहासोबतच सामाजिक सलोखा, शांतता आणि शिस्तीचा संदेश देणारा उत्सव आहे. यंदाचा गणेशोत्सव अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावा, तसेच समाजात वाढत चाललेली हिंसा थांबून प्रत्येकाच्या सन्मानाचे रक्षण व्हावे. तसेच, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला अधिकाधिक शक्ती मिळावी, समाजात शांतता व सलोखा नांदावा आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान जपला जावा, अशी अपेक्षा @Shivsenaofc नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. @neelamgorhe यांनी व्यक्त केली.
पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे (दि.१६)रोजी दर्शन घेत डॉ. गोऱ्हे यांनी विधिवत पूजा करून आरती केली. यावेळी त्यांनी #पुणे पोलिसांकडून @PuneCityPolice
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष तथा उत्सवप्रमुख पुनीत बालन, #शिवसेना शहर संघटक आनंद गोयल, अभिनेते जितेंद्र जोशी व उपेंद्र लिमये उपस्थित होते.
------
@punitbalan5
@DrSEShinde @mieknathshinde
@Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @neelamgorhe @jitendrajoshi27
@CMOMaharashtra @ANI
@ians_india @News18_marathi
@saamTVnews @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @NDTVMarathi @pudharionline @SakalMediaNews @lokmat @LokshahiMarathi @LoksattaLive @mataonline @PTI_News @TOIIndiaNews @IndianExpress @JaiMaharashtraN @PuneCityPolice
Trupti Ajay Sarode retweeted
Eknath Shinde Live📍गोवा पत्रकारांशी संवाद - लाईव्ह nitter.cf/i/broadcasts/1kJzDPWbO…
Trupti Ajay Sarode retweeted
साक्षरता हा केवळ अक्षरांची ओळख नसून माणसाला स्वाभिमानाने, जागरूकतेने आणि आत्मविश्वासाने जगण्याचे बळ देणारे प्रभावी माध्यम आहे. शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार असून ते समता, विकास आणि उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी करते.
विशेषतः प्रत्येक मुलगी आणि महिला साक्षर व सुशिक्षित होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने सक्षम आणि प्रगतीशील समाजाची निर्मिती होईल. आजच्या या दिनी शतप्रतिशत साक्षर आणि ज्ञानसंपन्न समाज घडविण्याचा संकल्प करूया!
#InternationalLiteracyDay #LiteracyDay #WorldLiteracyDay #EducationForAll
Trupti Ajay Sarode retweeted
सुप्रसिध्द गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण स्व. आशाताई भोसले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #aashataibhosle
Trupti Ajay Sarode retweeted
शिवसैनिकांची माऊली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #minataithakrey #maharashtra
Trupti Ajay Sarode retweeted
जय देवा भीमाशंकरा!
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारच्या पर्वकाळी दर्शन - पूजन
Trupti Ajay Sarode retweeted
आई ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नसून पुढील पिढी घडविणारी महत्त्वाची शक्ती आहे. कुटुंबासाठी आयुष्यभर केलेल्या मातांच्या त्यागाची आणि अदृश्य श्रमांची योग्य दखल घेणे आवश्यक आहे. आज पुरस्कार मिळत असला तरी या मातांनी मागील ३५-४० वर्षांत केलेला संघर्ष, त्याग आणि कष्टांचे हे फलित आहे, असे मत @Shivsenaofc नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. @neelamgorhe यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित ८व्या आदर्श माता पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षीय भाषण करताना डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी त्यांनी पुरस्कारप्राप्त सर्व मातांचे अभिनंदन करून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
“महिलांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने सांभाळून घेताना अनेकदा स्वतःच्या इच्छा आणि गरजा बाजूला ठेवाव्या लागतात. घर, मुलांचे संगोपन, कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांचे मोठ्या प्रमाणावर अदृश्य श्रम होत असतात. या श्रमांना अपेक्षित तेवढी सामाजिक आणि आर्थिक मान्यता आजही मिळालेली नाही,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
पालकत्व ही केवळ आईची जबाबदारी नाही
मुलांच्या संगोपनात आईसोबत वडिलांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकारने पुरुषांना मुलांच्या संगोपनासाठी १५ दिवसांची पितृत्व रजा (Paternity Leave) देण्यास सुरुवात केली आहे. बाळाला आई आणि वडील या दोघांचीही गरज असते. त्यामुळे पुरुषांनीही पालकत्वाची जबाबदारी सक्रियपणे स्वीकारली पाहिजे, असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि मालमत्तेतील अधिकारासाठी महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. १९९४ मध्ये जमिनीच्या कागदपत्रांमध्ये महिलांचे नाव समाविष्ट करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या कायदेशीर तरतुदींमुळे महिलांच्या मालमत्ता हक्काला बळ मिळाले, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
‘आदर्श माता’ पुरस्कारातून कृतज्ञतेची भावना
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सुरू केलेला आदर्श माता पुरस्कार हा केवळ पुरस्कार नसून मुलांना घडविणाऱ्या मातांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या यशामागे त्यांच्या मातांनी दिलेले संस्कार, संघर्षाची शिकवण आणि मूल्यांची शिदोरी महत्त्वाची असते. त्यामुळे अशा मातांचा गौरव समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते विधानपरिषदेचे सभापती प्रा. @Prof_RamShinde यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे, गृहराज्यमंत्री @iYogeshRKadam यांच्या मातोश्री ज्योती कदम, नगरसेवक @sunnynimhan यांच्या मातोश्री स्वाती निम्हण तसेच सिने दिग्दर्शक @DigpalOfficial यांच्या मातोश्री सुनीता लांजेकर यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सपकाळ, जाधवर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दूल जाधवर आणि खजिनदार सुरेखा जाधवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
------
@DrSEShinde @mieknathshinde @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar
@CMOMaharashtra @ANI
@ians_india @News18_marathi
@saamTVnews @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @NDTVMarathi @pudharionline @SakalMediaNews @lokmat @LokshahiMarathi @LoksattaLive @mataonline @PTI_News @JaiMaharashtraN
Trupti Ajay Sarode retweeted
श्रावणी सोमवारनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर, पुणे येथे पूजेसाठी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:
#Shivsena #Eknathshinde
Trupti Ajay Sarode retweeted
📍 #मुंबई |
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आले असता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उपस्थित राहून त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री जयकुमार रावल, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#AmitShah #Mumbai #EknathShinde #Maharashtra
@AmitShah @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @MPLodha @ShelarAshish @JaykumarRawal
Trupti Ajay Sarode retweeted
राज्यातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिवसेना–महायुती सरकारने ‘रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन’ यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीसाठी सामंजस्य करार केला आहे. विद्यार्थ्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना–महायुती सरकारचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
#Shivsena #Eknathshinde
Trupti Ajay Sarode retweeted
ठाणे।
या अपार प्रेमाबद्दल लाडक्या बहिणींचे मनःपूर्वक आभार!
पवित्र रक्षाबंधन सणाचे काही खास क्षण..
Trupti Ajay Sarode retweeted
अतूट धागा
बहिणींच्या प्रेमाचा...
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी घालून दिलेली रक्षाबंधनाच्या सणाची परंपरा यंदाही ठाण्यातील आनंदआश्रमात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लाडक्या बहिणींनी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना मोठ्या विश्वासाने, आपुलकीने राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
गडचिरोलीच्या शेवटच्या टोकापासून ते कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातून ठाण्यात दाखल होत लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. लाडक्या बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच खरी ताकद असल्याची भावना यावेळी शिंदे साहेबांनी व्यक्त केली.
यासोबतच शिवसेना प्रवक्त्या व खासदार प्रा.डॉ.ज्योतीताई वाघमारे यांनीही शिंदे साहेबांच्या निवासस्थानी येऊन राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार डॉ.नीलम गोऱ्हे, #शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, महिला नेत्या मीनाताई कांबळी, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, उपनेत्या कला शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#Shivsena #Eknathshinde #रक्षाबंधन


























