
ALT मागील 3 वर्षांपासून सतत अल्पसंख्याक समाजाला शैक्षणिक व आर्थिक मदतीसाठी AMRUT संस्था (EWS CERTIFICATE आणि अनारक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना वित्तीय मदत करणारी संस्था) अल्पसंख्यक आयोग आणि MARTI संस्था कारण देऊन वित्तीय मदत टाळत आहे. महाराष्ट्रातील 15% अल्पसंख्यक समाज इतर समाजाप्रमाणे BARTI SARTHI MAHAJYOTI AARTI इ . प्रमाणे UPSC MPSC BANKING RAILWAYS सारख्या तमाम स्पर्धा परीक्षांच्या शिकवणी आणि वित्तिय मदती साठी शासनासमोर निवेदन करत आहे परंतु कोणतीही कारवाई होत नाही. आर्थिक रूपाने अत्यंत कमजोर असलेला अल्पसंख्यक समाजातील विद्यार्थी आर्थिक मदत न मिळाल्यामुळे समावेशी विकासात मागे पडत आहे. कृपया सर्वसमावेशक विचार करून MARTI संस्थेला सुरू करण्यात यावे आणि अल्पसंख्यक समाजाला शैक्षणिक व आर्थिक मदत करावी, जेणेकरून हा समाज सुद्धा समावेशी विकासाचा भाग होईल आणि समृद्ध महाराष्ट्र होण्यात हातभार लावेल. NOTE: अमृत संस्था ज्यांना आरक्षण मिळत नाही अश्या समाजाला शैक्षणिक व आर्थिक मदतीसाठी बनविण्यात आली आहे तरी सुद्धा अल्पसंख्याक समाजाला यातून GR काढून वगळण्यात आले आहे. कृपया अमृत मधून मदत द्यावी.

































