WARD L BMC (@mybmcWardL) header
WARD L BMC (@mybmcWardL) profile picture

Official account of Ward-L of Brihanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 8652750405. App- BMC 24X7

Kurla, Sakinaka, Chandivali.
Joined June 2019
Photo by WARD L BMC (@mybmcWardL)Photo by WARD L BMC (@mybmcWardL)Photo by WARD L BMC (@mybmcWardL)Photo by WARD L BMC (@mybmcWardL)Photo by WARD L BMC (@mybmcWardL)Photo by WARD L BMC (@mybmcWardL)Photo by WARD L BMC (@mybmcWardL)Photo by WARD L BMC (@mybmcWardL)Photo by WARD L BMC (@mybmcWardL)Photo by WARD L BMC (@mybmcWardL)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत धूळ नियंत्रण तसेच हवा गुणवत्ता सुधारण्याच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. (१/२)
2
1
7
887
या अंतर्गत लाल बहादूर शास्त्री परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली. (२/२) #MyBMCUpdates
65
बृहन्मुंबई महानगपालिका अंतर्गत एल विभागातील आरोग्य विभागामार्फत संभाजी चौक, मॅच फॅकट्री परिसरात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्मिती व आभा कार्ड यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. #mybmcupdates #ABHAcard
828
दीपावली – २०२६ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर 🔷बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली - २०२६ प्रीत्यर्थ ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक २८ ऑक्टोबर २०२६) केली. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱयांना दीपावलीचा सण आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अदा करण्याचे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. 🔷दीपावली - २०२६ करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतची बैठक आज (दिनांक २८ ऑक्टोबर २०२६) महापौर दालनात झाली. उपमहापौर श्री. संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, सभागृहनेते श्री. गणेश खणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते श्री. अशरफ आजमी, एआयएमआयएम गटनेते श्री. विजय उबाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते श्री. यशवंत किल्लेदार, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या श्रीमती अमरीन अब्रहानी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, सहआयुक्त (वित्त) श्री. देविदास क्षिरसागर, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. किशोर गांधी यांच्यासह महानगरपालिका कामगार / कर्मचारी संघटनांच्‍या समन्वय समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 🔷महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, राज्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने निकषांनुसार राज्यातील ३०० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील या परिस्थितीचा सारासार विचार करून महानगरपालिकेतील गटनेते, पदाधिकारी, महानगरपालिका प्रशासन आणि कामगार-कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने अधिकारी व कर्मचाऱयांना ३३ हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान एकत्रितपणे अदा करण्यात येणार आहे. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
13
25
1
53
14,511
महात्मा जोतिबा फुले मंडईतील समस्यांचे निराकरण करावे, स्वच्छता अधिक प्रभावीपणे राबवून सुरक्षा व्यवस्था बळकट करावी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान संबंधितांना निर्देश 🔷महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक व जागतिक कीर्तीचे वारसास्थळ आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने व्यापारी, ग्राहक आणि देश-विदेशातील पर्यटक देखील भेट देतात. या पार्श्वभूमीवर मंडईतील स्वच्छता अधिक प्रभावीपणे करावी, सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी, स्थानिक व्यापारी व ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ स्थित महात्मा जोतिबा फुले मंडई व परिसराची मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक २८ ऑक्‍टोबर २०२६) सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. सी आणि डी प्रभाग अध्‍यक्ष श्री. आकाश राज पुरोहित, नगरसेविका श्रीमती हर्षिता नार्वेकर, नामनिर्देशित नगरसेवक अॅड. कमलाकर दळवी, ए विभागाचे सहायक आयुक्‍त श्री. उज्‍वल इंगोले, सहायक आयुक्‍त (बाजार) श्री. नितीन शुक्ला यांच्‍यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔷या पाहणीदरम्‍यान महापौर श्रीमती रितू तावडे यांनी मंडईचा पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, सार्वजनिक स्‍वच्‍छता, अतिक्रमण, सुरक्षा व्‍यवस्‍था आणि मंडईच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या प्याऊ तसेच कारंज्याची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. महात्मा फुले मंडई दुकानदार सेवा संस्था यांनी दिलेले निवेदन स्वीकारुन त्यांच्या समस्या व मागण्याही महापौर श्रीमती तावडे यांनी जाणून घेतल्या. 🔷महापौर श्रीमती रितू तावडे म्‍हणाल्‍या की, महात्मा जोतिबा फुले मंडई हे मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. जागतिक कीर्तीचे वारसास्थळ म्हणून या मंडईला विशेष महत्त्व आहे. मंडईचा परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यास प्राधान्य द्यावे. मंडईत येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करावे. यासोबतच मंडईतील पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आणि अन्य मूलभूत सुविधांची नियमित तपासणी करून त्या सुरळीत कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. मंडईच्या ऐतिहासिक वास्तूचे आणि वारसा स्थळाचे महत्त्व जपत परिसरातील अतिक्रमणांवर नियमानुसार कार्यवाही करावी. नवीन विकसित होत असलेल्या इमारत व परिसरात बायो - टॉयलेटची सुविधा उपलब्‍ध करता येईल का, याची चाचपणी करावी. सांडपाणी वाहिन्‍यांची नियमितपणे स्‍वच्‍छता करावी तसेच मंडई परिसराचा विकास होताना सांडपाण्याची समस्या निकाली निघेल, याची तजवीज करावी. पुरातन पाणपोईचे जतन व संवर्धन करून तिचे पुनरुज्जीवन करावे. मंडई परिसराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्‍ही यंत्रणा लावावी, असे विविध निर्देश महापौर श्रीमती तावडे यांनी दिले. 🔷मंडईतील सार्वजनिक स्वच्छता अधिक प्रभावीपणे राबवून नियमित स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. गाळेधारक/ व्‍यावसायिकांनीदेखील स्‍वत:हून स्‍वच्‍छता कार्यात सहभागी व्‍हावे. देखभाल - दुरूस्‍तीसाठी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहनदेखील महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
1
20
30
10,988
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔷फटाक्यांतील घटकांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. 🔷त्यामुळे, फटाके टाळूया आरोग्य जपूया ! #mybmcupdateas @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
25
39
3
69
13,437
🔷मुंबईतील मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांवर (Garbage Vulnerable Points- GVP’s) कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाने तंत्रज्ञानाधारित अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 🔷माहीम येथील डॉ. रायकर मार्गावरील गजानन वाटीका येथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कॅमेरा लावण्यात आला आहे. 🔷कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरा कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची हालचाल ओळखतो आणि तत्काळ ध्वनिक्षेपकाद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याचे व उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन करतो. 🔷महानगरपालिकेकडून येत्या काही दिवसात मुंबईत विविध ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे लावण्यात येणार आहेत. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @mybmcSWM
59
90
16
318
34,723
🔷फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बृहन्मुंबईतील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 🔷वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. बांधकाम स्थळांवरील तसेच लगतच्या रस्त्यांवरील धूळ नियंत्रणाची जबाबदारी संबंधित विकासक किंवा बांधकाम व्यावसायिकांची आहे. तसेच, वायू गुणवत्ता मापन यंत्रणा आणि सेन्सरवर चुकीची आकडेवारी दिसत असल्यास किंवा ते बंद असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देशदेखील श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 🔷फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश तसेच वायू गुणवत्ता सुधारणेसाठी उपाययोजनांबाबत आज आढावा बैठक पार पडली. त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी हे निर्देश दिले. 🔷अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपआयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) श्री. अविनाश काटे, सर्व परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. #MyBMCUpdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
10
28
4
40
26,279
🔷BMC's Municipal Commissioner Smt. Ashwini Bhide, instructed that the directions issued by the Hon’ble Bombay High Court regarding noise pollution caused by firecrackers and their adverse effects be implemented strictly. She also directed that effective measures be undertaken to improve air quality across Mumbai. 🔷Smt. Ashwini Bhide further instructed that the 28-point guidelines issued by the BMC for controlling air pollution be implemented rigorously. The responsibility for controlling dust at construction sites and on adjoining roads rests with the concerned developers or builders. She also directed that action be taken against those responsible if air quality monitoring systems and sensors display incorrect data or remain non-functional. 🔷A review meeting was held today to assess the implementation of the Hon’ble Bombay High Court’s directions concerning noise pollution caused by firecrackers and their adverse health effects, along with measures to improve air quality. 🔷Additional Municipal Commissioner (Eastern Suburbs) Dr. Avinash Dhakane, Deputy Municipal Commissioner (Commissioner’s Office) Shri. Prashant Gaikwad, Deputy Municipal Commissioner (Environment and Climate Change) Shri. Avinash Kate, all Zonal Joint Commissioners, Deputy Municipal Commissioners, Assistant Commissioners and concerned officials were present at the meeting. #mybmcupdates
26
33
6
78
25,900
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔷फटाक्यांतील घटकांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. 🔷त्यामुळे, फटाके टाळूया आरोग्य जपूया ! #mybmcupdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
6
31
35
12,138
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ब्लू स्काइज २०२६’ (Blue Skies 2026) ही स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये कु. प्राची राजेश पटेल, कु. सादिका रिजवान अन्सारी, कु. अनुराग उमेश साहनी, सुमित रामगोपाल शर्मा आणि कु. अचल विनयकुमार जैस्वार या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धेत यश संपादन केले. तर कुमार अंश प्रजेश कल्लुपालम या विद्यार्थ्याने रॅप साँग श्रेणीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालयात सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 🔷या कार्यक्रम प्रसंगी उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) श्री. अविनाश काटे, शिक्षण अधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे, उपशिक्षण अधिकारी श्रीमती ममता राव आदी उपस्थित होते. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्लू स्काइज २०२६’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी पोस्टर, चित्रकला, गाणे, रॅप साँग आणि व्हिडिओ अशा विविध श्रेणींमध्ये आपली सर्जनशीलता आणि पर्यावरणविषयक जाणीवा व्यक्त केल्या. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
4
22
1
34
9,979
🔷नागरिकांनी पुढील ७ दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. #mybmcupdates
8
68
6
131
32,814
🔹राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागाच्या (वॉर्ड) वतीने जंतनाशक मात्रा देण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जंतांचा प्रादुर्भाव रोखून बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विशेष मोहिम सुरु आहे.
1
2
5,116
🔹 घरोघरी, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना आणि मुला-मुलींना ही मात्रा दिली जात आहे. #MyBMCUpdates
68
🔷जंतांचा प्रादुर्भाव रोखून बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 🔷सार्वजनिक आरोग्य विभागाने या विशेष मोहिमेसाठी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात नियोजन केले आहे. 🔷शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना आणि मुला-मुलींना ही मात्रा दिली जाणार आहे. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
1
28
19
10,691
🔹फटाक्यांचा आवाज टाळूया, सणाचा आनंद द्विगुणित करूया. 🔹माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. सण साजरा करताना नियमांचं पालन नक्की करा, असे आवाहन करत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर. #MyBMCUpdates #harshadakhanvilkar @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
31
36
4
63
10,002
🔷माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔷फटाक्यांचा आवाज टाळूया, आनंद द्विगुणित करुया ! @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
4
29
1
26
14,387
बृहन्मुंबई महानगरपालिका 'एल' विभागामार्फत आज घाटकोपर-अंधेरी लिंक मार्ग येथे 'पादचारी प्रथम (Pedestrian First)' अभियानांतर्गत विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.
9
3
25
19,889
या मोहिमेद्वारे पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे, अनधिकृत रॅम्प, बांधकाम साहित्य, कचरा तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त हालचालींमध्ये अडथळा ठरणारे सर्व अडथळे हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. #PedestrianFirst #MyBMCUpdates
255
🔷माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ राबविण्यात येत आहे. 🔷या अंतर्गत, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करता येणार आहे. #mybmcupdates #SIR #SIR2026 #SpecialIntensiveRevision #SIRMaharashtra #VoterRegistration2026 #lnformedVoter @maharashtrasec @ecisveep @CEO_Maharashtra
1
29
26
13,882