अभिजात मराठी retweeted
डॉ श्रीराम लागू यांच्या अविस्मरणीय भूमिका:
नाटक :
नटसम्राट : गणपतराव बेलवलकर यांची भूमिका
सूर्य पाहिलेला माणूस : सॉक्रेटिसची अजरामर मुख्य भूमिका
हिमालयाची सावली : महर्षी कर्वे
सिनेमा :
पिंजरा (१९७२): शिस्तप्रिय मास्तरांची भूमिका.
सामना (१९७५): परखड प्रश्न विचारणाऱ्या 'मास्तर'ची भूमिका.
सिंहासन (१९७९): कावेबाज अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे यांची भूमिका.
अभिजात मराठी retweeted
२७ नोव्हेंबर 🎬
या शुक्रवारी चित्रपटगृहांत दोन वेगळ्या धाटणीचे मराठी चित्रपट एकत्र येत आहेत. एक रहस्यमय थरार, तर दुसरा मनाला भिडणारा कौटुंबिक विनोदी सिनेमा.
🔍 मिरांडा वॉर्निंग
आदिनाथ कोठारे यांच्या भूमिकेतला हा क्राईम-मिस्ट्री थ्रिलर. ग्रामीण भागातील शांत हॉलिडे होममध्ये घडलेल्या गुन्ह्याचा तपास करणारा कडक पोलीस अधिकारी आणि एक हुशार खुनी, यांच्यातला खेळ पाहायला विसरू नका. विशेष म्हणजे या चित्रपटाचा संपूर्ण नफा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. म्हणजे तुमचं तिकीट एका चांगल्या कामालाही हातभार लावेल. 🙏
कलाकार: आदिनाथ कोठारे, जान्हवी किल्लेकर, सुरेश विश्वकर्मा, पायल जाधव, वैभव चव्हाण
🐘 गणा धाव रे
केदार शिंदे दिग्दर्शित हा कोकणातला कौटुंबिक, विनोदी आणि भावनिक चित्रपट. गणेशोत्सवावर संकट आलेलं असताना भक्ताची हाक ऐकून खुद्द बाप्पा गौरीच्या रूपात आणि मूषक 'आखू' च्या रूपात पृथ्वीवर येतात. श्रद्धा, हास्य आणि भावनांचा सुंदर संगम!
कलाकार: भरत जाधव, प्रणाली घोगरे, भार्गवी चिरमुले, सुलभा आर्य, पुष्कराज चिरपुटकर
🎟️ या वीकेंडला कुटुंबासोबत, मित्रांसोबत मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहूया! 💛
📅 २७ नोव्हेंबर २०२६ पासून चित्रपटगृहांत
अभिजात मराठी retweeted
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺
🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
अभिजात मराठी retweeted
📚 चिमणरावांचे चऱ्हाट – चिं. वि. जोशी
मराठी विनोदी साहित्याचा विषय निघाला की चिमणराव आणि गुंड्याभाऊ यांच्याशिवाय गप्पा पूर्णच होत नाहीत. या दोघांची ओळख मराठी वाचकांना करून देणारा पहिला संग्रह म्हणजे "चिमणरावांचे चऱ्हाट".
✍️ लेखक: चिंतामण विनायक जोशी (चिं. वि. जोशी, १८९२–१९६३), पुण्याचे प्रसिद्ध विनोदी लेखक आणि पाली भाषेचे अभ्यासक.
🗓️ प्रकाशन वर्ष: १९३५
🏢 प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
साध्या, मध्यमवर्गीय चिमणरावांच्या रोजच्या आयुष्यातील गमतीजमती, घरगुती गोंधळ आणि त्यांना प्रत्येक वेळी अडचणीत आणणारा गुंड्याभाऊ, हे या कथांचे खास आकर्षण आहे. कुठेही बोजड भाषा नाही, टोमणे नाहीत, फक्त निखळ, निर्मळ हास्य. म्हणूनच ही पात्रे वाचकांना आपलीच वाटतात.
- जोशींच्या लिखाणावर आधारित "सरकारी पाहुणे" हा मराठी चित्रपट १९४२ मध्ये आला आणि तो खूप यशस्वी ठरला.
- पुढे १९७७ मध्ये "चिमणराव गुंड्याभाऊ" ही दूरदर्शन मालिका आली, तिलाही लोकांनी भरभरून प्रेम दिले.
- जोशींची बहुतेक पुस्तके आजही छापली जातात, यावरूनच पिढ्यानपिढ्या वाचकांचे प्रेम टिकून असल्याचे दिसते.
तुम्ही हे पुस्तक वाचले आहे का? तुमचा आवडता चिमणराव-गुंड्याभाऊ प्रसंग कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
अभिजात मराठी retweeted
निर्जीव वस्तूंबद्दल तुम्ही हमदर्दी दाखवायला सुरुवात केलीत तर त्यातूनच जित्याजागत्या माणसाचा आदर करणं हा सहजधर्म होईल.
(महोत्सव)
व. पु. काळे....
अभिजात मराठी retweeted
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या 'झिम्मा ३' चित्रपटाचा टीझर/ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
आधीच्या भागांप्रमाणे यावेळी महिलांची सहल नसून, पुरुषांची टोळी श्रीलंकेच्या सहलीवर गेल्याचे टीझरमध्ये पाहायला मिळते.
सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे संमिश्र प्रतिक्रिया आहेत. कुणाला ट्रेलर भारी वाटला, कुणाला अजून काहीतरी हवं होतं. 😄 पण हेही खरंच की ट्रेलर म्हणजे फक्त दोन-अडीच मिनिटांची झलक असते. पूर्ण गोष्ट, भावना, विनोद हे सगळं अनुभवायला सिनेमा पहावा लागेल. 🍿
म्हणूनच घाईत मत बनवण्यापेक्षा थोडं थांबूया. आधी सिनेमा पाहू, मग मनापासून बोलू, कौतुक असो वा टीका. 👏
अभिजात मराठी retweeted
ओळखा पाहू हे काय आहे? आणि हे तुमच्याकडे होते का? 🤔👇
आजच्या स्मार्ट टीव्हीच्या युगात हे कुठेतरी हरवून गेलंय, पण एका काळी प्रत्येकाच्या घरातील टीव्हीच्या रिमोटची शान म्हणजे हा 'रिमोट गार्ड'! 📺
टीव्हीचा रिमोट कितीही वेळा पडला, तरी त्याला साधी ओरखडाही येऊ नये म्हणून घराघरात या काळ्या रबराच्या कव्हरचा (गार्ड) वापर केला जायचा. काही जण तर नवीन रिमोट आणल्यावर त्यावरचं प्लास्टिकचं वेष्टनही काढत नसत आणि वरून हे गार्ड लावायचे! 😂
रिमोट जपून ठेवण्याची आपल्या पालकांची ही कसरत कोणा-कोणाला आठवतेय?
तुमच्या घरी हा होता का?
अभिजात मराठी retweeted
"देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा" हे सुधीर फडके यांनी गायलेले 'आम्ही जातो आमुच्या गावा' चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी भक्तिगीत आहे.
गीतकार जगदीश खेबूडकर यांनी रचलेल्या या गीतात मानवी शरीराला भक्ती साठवणारी तिजोरी मानून पांडुरंगाला सद्बुद्धी आणि मुक्तीची विनवणी केली आहे.
हे ईश्वरा, माझे हे मानवी शरीर एक तिजोरी आहे आणि त्यात केवळ तुझ्या भक्तीचाच ठेवा साठवला आहे. आता तू तुझ्या मंदिराचे आणि माझ्या अंतर्मनातील ज्ञानाचे दार उघड, अशी आर्त विनवणी भक्त देवाकडे करत आहे.
अभिजात मराठी retweeted
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺
🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
अभिजात मराठी retweeted
चिंटू ❤️
चिंटूची पस्तिशी!🎉
२१ नोव्हेंबर १९९१ रोजी एक छोटा मुलगा आपल्या भेटीला आला. आज त्याला ३५ वर्षे पूर्ण झाली, पण तो अजूनही तितकाच खोडकर, निरागस आणि आपलासा वाटतो! 😄
कुणी चिंटूबरोबर शाळेत गेलं, कुणी त्याच्या खोड्यांमध्ये आपलं बालपण शोधलं, तर कुणी आता मुलांबरोबर त्या गमती वाचून पुन्हा लहान झालं.
खोड्या करून हसवणं, कधी हळूच विचार करायला लावणं आणि कधी डोळ्यांच्या कडा ओलावणं, हे सोपं नाही. ते ३५ वर्षं सातत्याने करून दाखवल्याबद्दल प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन! 👏 तसेच या प्रवासात खंबीर साथ दिल्याबद्दल दैनिक सकाळ चेही धन्यवाद! 💐
चिंटू, असाच हसवत राहा! 🥳
@SakalMediaNews
























